आजचं मार्केट – १५ मार्च २०२३

आज क्रूड US $ ७८.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.४० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.२२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.६७ आणि VIX १५.४६ होते.

आज USA चे फेब्रुवारी २०२३ ची महागाई निर्देशांकाचे आकडे ६.०० आला. डिसेंबर २०२२ पासून महागाई निर्देशांक ६.५ वरून फेब्रुवारी २०२३ मध्ये ६.०० पर्यंत खाली आला.

आज FII नी Rs ३०८७ कोटींची विक्री तर DII नी Rs २१२२ कोटींची खरेदी केली.

NBCC ला पुडुचेरी सरकारकडून Rs ५०० कोटीची ऑर्डर मिळाली.

रेलटेलला डाटा सेंटर इंफ्रासाठी Rs २९० कोटींची ऑर्डर मिळाली.

DFM फूड्स या कंपनीचे ५ एप्रिल २०२३ पासून डीलीस्टिंग होईल.

रिलायन्स रिटेल मेट्रोचा कॅश अँड कॅरी व्यवसाय खरेदी करणार आहे. या व्यवसायाची २१ शहरांत ३१ दुकाने आहेत. या डीलला CCI ची मंजुरी मिळाली.
सिप्ला क्वालिटी केमिकल इंडस्ट्रीमधील ५१.१८% स्टेक विकणार आहे. यातून कंपनीला US $ २५ ते ३० मिलियन मिळतील.

PNC इंफ्राटेक ही NHAI च्या Rs १२६० कोटींच्या प्रोजेक्टसाठी लोएस्ट बीडर ठरली.

मारुतीचे प्रमोटर्स सुझुकी मोटर्सनी ओपन मार्केट मधून ३.४५ लाख शेअर्स खरेदी केले. त्यामुळे आता त्यांचा स्टेक ५६.३७% वरून ५६.४८% झाला.

पारस डिफेन्सने इझ्राएलची कंपनी ‘CONTORP PRECISION TECHNOLOGY’ बरोबर करार केला.

क्रेडिट SUISSE मध्ये असलेले नीलकंठ मिश्रा ऍक्सिस बँकेच्या रिसर्च डिव्हिजनचे प्रमुख म्हणून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

NCLT ने इक्विटास होल्डिंग्स लिमिटेड आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या अमालगमेशनच्या स्कीमला मंजुरी दिली. तुमच्या डिमॅट खात्यात ०३/०२/२०२३( रेकॉर्ड डेट) रोजी असलेल्या इक्विटास होल्डिंगच्या १०० शेअर्सला इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे २३१ शेअर्स मिळतील.

नजारा टेकने सिलिकॉन व्हॅली बँकेतून US $ ७२.५ लाख दुसऱ्या बँकेत ट्रान्स्फर केले. आता SVB मध्ये US $ ०.५ लाख एवढी रक्कम शिल्लक आहे.

श्रीराम फायनान्स Rs १००० कोटींमध्ये या महिनाअखेर १५% स्टेक विकण्याची शक्यता आहे.
KPI ग्रीनला GEGA ने ३१ MV सोलर प्रोजेक्ट चालू करण्यासाठी परवानगी दिली.

बेयरने न्यू एग्री फूड क्लाउड सोल्युशनसाठी सोनाटा सॉफ्टवेअरची SI पार्टनर म्हणून निवड केली.

वेदांताने US $ १०० मिलियनचे पेमेंट करून तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले.

TCS ने सांगितले की ते ‘ENVESTMENT DATA AND ANALYTICS’ बरोबर पार्टनरशिप करणार.
EKI एनर्जी सर्व्हिसेसला कोची मेट्रो रेल कडून ऑर्डर मिळाली.

रामकृष्ण फोर्जिंग आणि टिटाघर वॅगन्स हे आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत रेल्वे कडून २० वर्षात १५,४०,००० फोर्ज्ड व्हील्स च्या उत्पादनासाठी लोएस्ट बीडर ठरले.

मिश्र धातू निगमने Rs १.६८ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

चीन पर्यावरणविषयक कारणांसाठी ३ वर्षांसाठी स्टील उत्पादन कमी करणार आहे. यामुळे भारतातील स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

क्रिसिलच्या एका रिपोर्टप्रमाणे यावर्षी PVC पाइप्ससाठी मागणी वाढेल. केंद्र आणि राज्य सरकारांचा इंफ्रावर जोर आहे. जलजीवन योजना घर घर जल मिशन इत्यादी योजनांमुळे ही मागणी वाढेल. याचा फायदा ASTRAL फिनोलेक्स, सुप्रीम इंडस्ट्रीज, पॉलिकॅब, प्रिन्स पाईप्स आणि APL अपोलो ट्यूब्स यांना होईल.

फिनोलेक्स या कंपनीची वर्षाला १२००० मेट्रिक टन एवढी उत्पादन क्षमता आहे. कंपनीने Rs १०० कोटींची गुंतवणूक केली आहे. कंपनीची १५% CAGR ग्रोथ आहे.

KEC ला थायलँड, सौदी अरेबिया, कडून Rs १०८० कोटींची टर्मिनेशन, डिस्ट्रिब्युशन साठी ऑर्डर मिळाली.

आज मेटल्स, फार्मा, PSE, एनर्जी मध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७५५५ NSE निर्देशांक निफ्टी १६९७२ बँक निफ्टी ३९०५१ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.