आजचं मार्केट – १६ मार्च २०२३

आज क्रूड US $ ७४.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.६१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.४९ आणि VIX १७.३२ होते.

USA मधील बँकाच्या अडचणीच्या दबावाचे लोण आता यूरोपमध्ये पोहोचले. युरोपियन बँक ‘CREDIT SUISSE’ संकटात आली या बँकेचा शेअर २५% पडला. स्विस नॅशनल बँक ‘CREDIT SUISSE’ ला US $ ५४०० कोटींचे कर्ज देणार आहे. ‘CREDIT SUISSE’ मध्ये सौदी नॅशनल बँकेचा ९.९% स्टेक आहे. हा स्टेक वाढवायला सौदी नॅशनल बँकेने रेग्युलेटरी कारणांमुळे असमर्थता दाखवली.
फेड आता रेट वाढवणे थांबवेल असे USA मधील गुंतवणूकदारांना वाटत आहे.

पातंजली मध्ये प्रमोटर्सची शेअरहोल्डिंग ८१% ( MPS नॉर्म्स नुसार ही ७५% च्यावर असता कामा नये.) त्यामुळे पतंजली मध्ये प्रमोटर्सचे शेअरहोल्डिंग ७५% पेक्षा कमी होईपर्यंत एक्स्चेंजने प्रमोटर ग्रुपचे शेअरहोल्डिंग फ्रीझ केले आहे.प्रमोटर्सचे शेअर्स ८ एप्रिल २०२३ पर्यंत सेबीच्या नियमानुसार लॉक इन पिरियड मध्ये आहेत. कंपनी लवकरच ६% शेअर्स FPO दवारा विकेलं.

सुमिमोटो वायरिंगने आज ब्लॉक डील द्वारे मदर्सन सुमीमधील २३ कोटी शेअर्स Rs ६९.९० प्रती शेअर ( ९% डिस्काऊंटवर) विकले. हे डील झाल्यावर मदर्सन सुमीचा शेअर पडला.

सारडा एनर्जीला त्यांच्या छत्तीसगढ प्लांटची क्षमता १.८ TPA वरून २.५ लाख टन TPA एवढी वाढवायला छत्तीसगढ एन्व्हायर्नमेंट खात्याने परवानगी दिली.

गोदावरी पॉवर आणि इस्पात १८ मार्च २०२३ रोजी शेअर बायबॅक वर विचार करेल.

कोका कोलानी त्यांच्या २०० ML च्या किमती कमी केल्या याचा परिणाम वरुण बिव्हरेजीसवर होईल.
पटेल इंजिनीअरिंगला Rs १२६५ कोटींची ऑर्डर मिळाली.

मान इंडस्ट्रीला Rs १३०० कोटींची ऑर्डर मिळाली.

अनुप बागची यांची ICICI प्रुचे MDCEO म्हणून नेमणूक झाली.त्यामुळे शेअरमध्ये तेजी होती
HG इन्फ्राने Rs ९९८.३६ कोटींच्या झारखंडमधील NHAI प्रोजेक्टसाठी कमीतकमी बोली लावली .
मॉडर्न ट्रेंड आउटलेटवर पनीर स्लाइस पुढील आठवड्यापासून ITC लाँच करेल.

इंडसइंड बँकेबरोबर झी एंटरटेन्मेन्टने इंसॉल्व्हंसी कोर्टातून अर्ज मागे घेण्यासाठी करार केला. झी इंटरप्रायझेस इंडसइंड बँकेला US $ १० मिलियनचे पेमेंट करेल. या पेमेंट नंतर इंसॉल्व्हंसी साठी केलेला अर्ज इंडस इंड बँक मागे घेईल.

AB सन लाईफ AMC ने Rs ५ लाभांश जाहीर केला.

एरिस लाईफसायन्सेसने DR रेड्डीज कडून ९ डर्माटॉलॉजी ब्रँड Rs २७५ कोटींना खरेदी केले.

DLF ने ११३७ लक्झरी अपार्टमेंट्स ( Rs ७ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त किंमत असलेली )विकली. या प्रोजेटमधून त्यांना Rs ८००० कोटी मिळाले. म्हणून आज शेअरमध्ये खरेदी झाली.

आज ‘CREDIT SUISSE’ अडचणीत आहे अशी बातमी आल्यावर सुरुवातीला मार्केट मंदीत गेले. पण स्विस नॅशनल बँकेने US $ ५४०० कोटींचे कर्ज देणार असे कळल्यावर दुपारी यूरोपमधील मार्केट्स तेजीत उघडली. त्याचा परिणाम म्हणून आणी एक्सपायरी
असल्यामुळे दुपारनंतर मार्केट सुधारले.

आज ऑटो आणि IT मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७६३४ NSE निर्देशांक निफ्टी १६९८५ बँक निफ्टी ३९१३२ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.