आज क्रूड US $ ७५.५०प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.४४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५९ आणि VIX १४.७६ होते.
डाऊ जोन्स आणि NASDAQ मध्ये ४०० बेसिस पाईंट्सची तेजी होती. फर्स्ट रिपब्लिक बँकेमध्ये ११ बँकांनी US $ ३००० कोटी डिपॉझिट केले. फेडने क्रेडिट लाईन उघडली. USA मधील बँकांनी US $ १६४८० कोटींचे कर्ज घेतले.
चीनने RRR ( रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशियो) मध्ये ०.२५% ची कपात केली.लगेचच मेेटल शेअर मध्ये तेजी आली
FII नी Rs २८२ कोटींची विक्री तर DII नी Rs २०५१ कोटींची खरेदी केली.
सरकार २७ स्टील उत्पादक कंपन्यांबरोबर PLI योजनेसंबंधात मीटिंग घेणार आहे.
NTPC आणि REC यांच्या ग्रीन एनर्जी आर्ममध्ये पेट्रोनास स्टेक घेणार आहे. NTPC आणि REC या दोन्हीही कंपन्या BHARAT २२ आणि FTSE मध्ये आहेत त्यामुळे या निर्देशांकाच्या री बॅलन्सिंग मध्ये या कंपन्यांवर परिणाम होईल.
लेमन ट्रीने राजस्थानच्या गंगानगर येथील ६० खोल्यांच्या हॉटेलसाठी लायसेन्सिंग करार केला.
इन्फोसिसने ABN AMRO च्या कॉर्पोरेट कस्टमर्ससाठी लिक्विडीटी मॅनेजमेंट सोल्युशन लाँच केले.
TCS च्या राजेंद्र गोपीनाथांनी राजीनामा दिला.श्री गोपीनाथन यांना गेल्या वर्षीच ५ वर्षे मुदतवाढ दिली होती. त्यांच्या जागी ‘KRITHIVASAN’ यांची नेमणूक केली.
STYRENIX परफॉर्मन्स या कंपनीने Rs ८० इंटरीम लाभांश जाहीर केला.
ECB ( युरोपियन सेंट्रल बँक) नी ०.५०% रेट वाढवला पण गरज लागल्यास लिक्विडीटी पुरवू असे सांगितले.
SAIL ने Rs १ प्रती शेअर तर ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस ने Rs २१ इंटरीम लाभांश जाहीर केला.
सरकारने Rs ७०००० कोटींच्या संरक्षण उपकरणांच्या खरेदीसाठी मंजुरी दिली. यात ६० UH मरिन चॉपर्स चा समावेश आहे. या चॉपर्स साठी HAL ला ऑर्डर दिली.
ग्लेनमार्क फार्माच्या GRC ५४२७६च्या दुसऱ्या फेजसाठी USFDA ने परवानगी दिली.
रेल विकास निगम ही Rs ११२ कोटींच्या प्रोजेक्टसाठी लोएस्ट बीडर ठरली.
अरिंदम भट्टाचार्य यांना इंडिपेन्डन्ट डायरेक्टर नेमले आणि अनुप साहा आणि राकेश भट यांना एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हंणून बजाज फायनान्सने नेमणूक केली.
हिंदुस्थान झिंक २१ मार्च २०२३ रोजी इंटरीम लाभांशावर विचार करेल.
वोल्टासच्या सबसिडीअरीला Rs १७७० कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.
BEL ने Rs ०.६० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. यासाठी रेकॉर्ड डेट २५ मार्च २०२३ निश्चित केली
इंडीया मार्ट ‘इंटरमेश ‘टेन टाइम्स ऑन लाईन ‘ मधील ३०% स्टेक डायव्हेस्ट करणार.१८७०४ शेअर्स विकणार.
अमेरिकन रिजनल बँकेत इन्फोसिस आणि TCS यांचे एक्स्पोजर आहे.
HI-TECH पाईप ने एका शेअरचे १० शेअर्समध्ये स्प्लिट केले.
VAATECHWABAG ला वर्ल्ड बँक आणि AIIB फंडेड Rs ८०० कोटींची DBO ऑर्डर मिळाली.
SHALBY ची सबसिडीअरी मार्स मेडिकल डिव्हाइसेसने SHALBY इंटरनॅशनल ग्रोथमध्ये ९९.३३% स्टेक घेतला.
PVR चे एकूण स्क्रीन १६७४ झाले. यावर्षी ११४ शहरात १८० स्क्रीन यावर्षी ओपन केले.पुढील वर्षी सुद्धा कंपनीचे १७५ – १८० मल्टिप्लेक्स स्क्रीन उघडण्याचे लक्ष्य आहे.
कंपनीचे बहुतेक मल्टिप्लेक्स प्रिमायसेस १५ ते २० वर्षांच्या लीजवर घेतलेले आहेत. ५ वर्षांचे ऑप्शन असते. यावर्षी हिंदी बॉक्स ऑफिसचा परफॉर्मन्स ठीक नाही.
इन्फोसिसने ‘SANDWELL कॉऊंसिल’ बरोबर डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म साठी करार केला.
GAIL ने ‘शेल एनर्जी’ बरोबर MOU केले.
मारुती सुझुकीने ‘न्यू BREZZA CNG’ साचे तीन व्हरायन्ट लाँच केले. याची किंमत Rs ९.१४ लाखांपासून सुरु होते.
आज मार्केटमध्ये रिअल्टी,IT, मेटल्स, एनर्जी, इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली तर FMCG, ऑटो, फार्मा या क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७९८९ NSE निर्देशांक निफ्टी १७१०० बँक निफ्टी ३९५९८ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !