आजचं मार्केट – २१ मार्च २०२३

सर्व वाचकांना आणि श्रोत्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

आज क्रूड US $ ७३.१० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.६० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.०३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.४९ आणि VIX १५.०८ होते.

सोने आणि चांदी तेजीत आहेत याचा फायदा मुथूट फायनान्स, मनापूरम आणि टायटन यांना होईल लुपिनची अलायन्स कंपनी ‘CAPLIN ‘ ला USFDA कडून एका इंजेक्शनला अंतिम मंजुरी मिळाली. USA मध्ये विक्री करता येईल. या इंजेक्शनची वार्षिक विक्री US $ ५३ मिलियन आहे.
स्टर्लिंग विल्सन यांना ३०० MW च्या ४ ब्लॉक्स चे एक BOS पॅकेज मिळाले. NTPC चा KHAVDAA येथील १२०० MW च्या सोलर प्रोजेक्ट चालू आहे. याची क्षमता १५०० MW आहे बीड व्हॅल्यू २१०० कोटी असून ३ वर्षात पूर्ण करायचे आहे.

सिऍट टायर्स मधून अनंत गोएंका यांनी राजीनामा दिला त्यांच्या जागी अर्णब बॅनर्जी यांची २ वर्षांसाठी नेमणूक झाली.

IOC आणि NTPC हे एक JV करून रिन्यूएबल एनर्जी पॉवर प्लांट लावणार आहेत.

PNC इंफ्राटेक ला ३० महिन्यात पूर्ण करायच्या प्रोजेक्टची हरयाणा रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन कडून Rs ७७१ कोटींची ऑर्डर मिळाली.

डायनामॅटिक टेकने Rs २५०९ प्रती शेअर या भावाने प्रेफरन्स शेअर्स इशुदवारा Rs ११२ कोटी उभारले.

UNO मिंडा ने Rs ६० कोटींमध्ये कोसेईमिंडा अल्युमिनियम या कंपनीत ८१.६९% स्टेक आणि Rs ११ कोटींमध्ये ४९.९०% स्टेक KOSEI मिंडा मौल्ड या कंपनीत घेतला. हे कंपनीचे KOSEI जपान बरोबरचे JV आहे.

J कुमार इन्फ्राला बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून एअरपोर्ट डेपो तयार करण्यासाठी Rs १८२ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

सरकारने क्रूड वरील विंडफॉल टॅक्स Rs ४४०० प्रती टन वरून Rs ३५०० प्रती टन एवढा कमी केला.

म्हणजे Rs ९०० ने प्रती टन कमी केला. डिझेलवरची एक्स्पोर्ट ड्युटी Rs ०.५० वरून Rs १.०० केली.

पेट्रोल आणि ATF वर कोणतीही ड्युटी लावली जाणार नाही. याचा फायदा ONGC, MRPL, रिलायन्स आणि IOC चेन्नई पेट्रो यांना होईल .

NMDC ने त्यांच्या प्रॉडक्टस च्या किमती वाढवल्या.
CLSA ने IGL, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि MGL चे रेटिंग आणि टार्गेट वाढवले.पुढील महिन्यात मंत्रिमंडळाची मीटिंग आहे.

श्रेयस शिपिंगला एका कंटेनरची डिलिव्हरी मिळाली .

कोल इंडियाने सांगितले की ते लवकरच कोळश्याच्या किमती वाढवणार आहेत. कोळशाचे उत्पादन १०० कोटीं झाले.

J & K बँकेने बजाज ALLIANZ बरोबर करार केला.

आज हिंदुस्थान झिंकची अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

IDFC, IDFC फायनान्शियल होल्डिंग आणि IDFC Ist बँकेचे मर्जर होणार आहे.या मर्जरमध्ये स्वॅप रेशीओ ठरवण्यासाठी ऍक्सिस कॅपिटलची नेमणूक केली.

फैसल इस्लामिक बँक ऑफ इजिप्त बरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन साठी इंटलेकट डिझाईन एरेना ने करार केला.

पारस डिफेन्सला CSIR NAL बंगलोर कडून Rs ६४ कोटींची ऑर्डर मिळाली.

किर्लोस्कर फेरसने सोलापूर प्लांटमध्ये हाय प्रेशर मोल्डिंग लाईनचे इन्स्टॉलेशन पूर्ण केले.

रिलायन्स जिओ ने आणखी ४१ शहरात( एकूण ४०६ शहरात) 5G लाँच केले.

SCI च्या ऍसेट डीमर्जरसाठी रेकॉर्ड डेट ३१ मार्च २०२३ निश्चित केली. नवीन कंपनी DEBT फ्री असून Rs १००० कोटी कॅश असेल . या कंपनीजवळ दक्षिण मुंबईतील १६७ फ्लॅट्स १.५० लाख SQ फीट जमीन आणि कोलकातामधील ऑफिस अशी मालमत्ता ट्रान्स्फर होईल. तुमच्याजवळ SCI चा एक शेअर असेल तर तुम्हाला नवीन कंपनीचा एक शेअर मिळण्याची शक्यता आहे.

ग्रनुअल्स इंडियाने सांगितले की USFDA ने त्यांच्या युनिटचे इन्स्पेक्शन केले पण कोणतीही त्रुटी दाखवली नाही

NTPC REL ने सैन्याच्या जागेत हायड्रोजन प्लांट लावण्यासाठी MOU केले

आज एनर्जी, मेटल, इन्फ्रा, बँकिंग या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

IT आणि FMCG क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८०७४ NSE निर्देशांक निफ्टी १७१०७ बँक निफ्टी ३९८९४ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.