आजचं मार्केट – २२ मार्च २०२३

आज क्रूड US $ ७४.९० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१ = Rs ८२.६६ वर राहील ( करन्सी मार्केट बंद आहे) .USA $ निर्देशांक १०२.८३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५९ आणि VIX १४.९४ होते.

USA च्या जेनेट येलेन यांनी सांगितले की ठेवीदारांच्या हिताचे रक्षण केले जाईल. जर गरज भासली तर डिपॉझिट्स १००% इन्शुअर्ड करू. या त्यांच्या घोषणेनंतर USA चे मार्केट सुधारले.
UK मध्ये फेब्रुवारी महिन्यासाठी महागाई १०.४% एवढी आली.

M & M च्या न्यू लास्ट माईल मोबिलिटी युनिट मध्ये IFC Rs ६०० कोटीची गुंतवणूक करेल.M&M ची जागतिक गुंतवणूकदारांबरोबर US $ १ .००बिलियन ते US $ १.३ बिलियन एवढी रक्कम त्यांच्या इलेक्ट्रिक व्हेइकलच्या क्षमता विस्ताराला गती देण्यासाठी उभारण्यासाठी बोलणी करत आहे. यासाठी कंपनी त्यांच्या इलेक्ट्रिक व्हेइकलयुनिट ( याची व्हॅल्यू US $ ९.१ बिलियन आहे ) मधले शेअर येत्या दोन वर्षात हप्त्या हप्त्याने विकेल.

सरकार खतांवरील सबसिडी कमी करण्याचा किंवा रद्द करण्याचा विचार करत आहे. यासाठी सरकार खतांची प्रीमियम प्रोडक्टस लाँच करेल. DAP साठी ‘नैनो DAP,’ युरिया साठी युरिया गोल्ड आणि सिंगल सुपर फॉस्फेट ऐवजी ट्रिपल सुपर फॉस्फेट सरकार लाँच करेल. नैनो DAP साठी कोरोमंडल इंटरनॅशनल आंध्र प्रदेशात आणि IFFCO गुजरात आणि ओडिशामध्ये प्लांट लावेल एकूण उत्पादन क्षमता १ कोटी बॉटल असेल. या नवीन प्रीमियम प्रॉडक्टसवर सरकार कमी सबसिडी देईल किंवा अजिबात देणार नाही.

देवयानी इंटरनॅशनल मधील २,.८५% स्टेक म्हणजे ३.४४ कोटी शेअर्स DUNERN इन्व्हेस्टमेन्टने Rs १४५.०४ प्रती शेअर या दराने Rs ४९९.४० कोटींना विकले. तर फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सि फंडाने ६२ लाख शेअर्स Rs १४५ प्रती शेअर या दराने Rs ८९.९० कोटींना खरेदी केले.

टाटा मोटर्स १ एप्रिल २०२३ पासून त्यांच्या कमर्शियल व्हेइकल्सच्या किमतीत ५% वाढ करणार आहे. सुधारित BS 6 फेज २ ची पूर्तता करण्यासाठी उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेतला असे कंपनीने सांगितले.

आशियाना हौसिंगचे वार्षिक बुकिंग Rs १२७८ कोटी (२५.२१ लाख SQ FEET ) झाले. त्यामुळे आज शेअरमध्ये खरेदी झाली.

चोलामंडल इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स कंपनीने श्री अजय भाटिया यांची चीफ रिस्क ऑफिसर म्हणून नेमणूक केली.

HG इन्फ्रा इंजिनीअरिंग कानपुर रेल्वे स्थानकाच्या EPC तत्वावर ३ वर्षाच्या मुदतीच्या Rs ६७७ कोटींच्या डेव्हलपमेंट काँट्रॅक्टसाठी लोएस्ट बीडर ठरली.

BL कश्यप आणि सन्स ना रेल्वे लॅन्ड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडून ‘बिजवासन’रेल्वे स्थानकाच्या डेव्हलपमेंटसाठी १५ महिने मुदतीचे Rs ३१३ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

इमामी चे बोर्ड ऑफ डायरेक्टर मार्च २४ २०२३ ला शेअर बायबॅकवर विचार करणार आहे.

झायड्स लाईफसायन्सेस च्या ‘TOFACITINIB’ च्या ५mg आणि १० mg टॅब्लेटसाठी USFDA कडून टेंटेटिव्ह मंजुरी मिळाली. हे औषध ऱ्हुमॅटॉइड आणि सोरायटिक आर्थ्रायसिस वर आहेत.

IOC च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने पारादीपमध्ये पेट्रोकेमिकल्स प्रकल्प उभारण्यासाठी फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्यासाठी मंजुरी दिली. हे प्रोजेक्ट Rs ६१०७७ कोटींचे असेल.

टाटा पॉवर ची सबसिडीअरी टाटा पॉवर रिन्यूएबल्स एनर्जी या सब्सिडिअरीला सोलापूर येथे २०० MW सोलर पॉवर प्रोजेक्ट १८ महिन्यात सुरु करण्यासाठी MSEDCL कडून ऑर्डर मिळाली.

हिंदुस्थान झिंक या कंपनीने Rs २६ प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला. या ची रेकार्ड डेट २९ मार्च २०२३ निश्चित केली आहे.

भारती एअरटेलने कोलकात्यात 5G सेवा लाँच केली.
MPSEDC( मध्य प्रदेश स्टेट इलेक्ट्रॉनिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ) ने रेलटेलला Rs ३४.९१ कोटींची ऑर्डर दिली.

REC नी पॉवर ग्रीडला ६ SPV युनिट्स ट्रान्स्फर केले.

एंजल १ ने Rs ९.६०% लाभांश जाहीर केला.

JK टायरने त्यांच्या टायर उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी IFC ( इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन) बरोबर करार केला. IFC कंपनीत Rs २४० कोटींची गुंतवणूक करेल. IFC ५.६% स्टेक US $ ३० मिलियनला घेणार

चांगला मान्सून, MSP मध्ये वाढ, यामुळे यावर्षी ट्रॅक्टर विक्री ४% ते ६% ने वाढेल असा अंदाज क्रिसिलच्या रिपोर्टमध्ये व्यक्त केला आहे. पिग आयर्न आणि रबराच्या किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे २०२१ साली असलेले ट्रॅक्टर व्यवसायातील २२% मार्जिन आता १५% ते १६% वर आले आहे. ट्रॅक्टर साठी रिप्लेसमेंट मागणी ५५% ते ६०% असते. ट्रॅक्टर ६ ते ८ वर्षांमध्ये नवीन घेतले जातात. अल निनोच्या परिणामामुले ही ग्रोथ कमी होण्याचा संभव आहे.

RVNL २४ मार्च रोजी अंतरिम लाभांशावर विचार करेल.

NBCC ला रिपेअर रिनोव्हेशन आणि निर्माणासाठी Rs ४७८ कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.

GAIL ने १ एप्रिल २०२३ पासून इंटिग्रीटेड नैसर्गिक गॅस पाईप लाईन टॅरिफ ४५% ने वाढवली.
BHELने हायड्रोजन ब्लेंडींग टाईप ४ सिलिंडर साठी IGL बरोबर करार केला.

KEC इंटरनॅशनल ला PGPIL कडून ट्रान्सफॉर्मेशन आणि डिस्ट्रिब्युशन साठी Rs १५६० कोटीची ऑर्डर मिळाली.

आज फार्मा, PSU बँका, ऑटो, FMCG मध्ये खरेदी तर मेटल्स रिअल्टी आणि PSE मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८२१४ NSE निर्देशांक निफ्टी १७१५१ बँक निफ्टी ३९९९९ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.