आजचं मार्केट – २३ मार्च २०२३

आज क्रूड US $ ७६.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.३३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.४७ आणि VIX १४.९१ होते.

आज मार्केटने कोरोनाच्या प्रादुर्भावाची बातमी फारशा गाम्भीर्याने घेतली नाही.

फेडने रेटमध्ये ०.२५% ची वाढ केली. फेड ने सांगितले की बँकांना जशी जरूर लागेल तशी केस टू केस बेसिस वर मदत केली जाईल. आता फेड चे रेट ४.७५% – ५% च्या दरम्यान असतील. येलेननी सांगितले की युनिव्हर्सल डिपॉझिट इन्शुअरन्सचा कोणताही प्रस्ताव नाही.

CHALET हॉटेलने ‘सोनमील इंडस्ट्री’ मधील १००% स्टेक Rs ७४.६४ कोटींना आणि ‘ड्युक्स रिट्रीट’ Rs ८१.७५ कोटींना खरेदी करणार.

ग्लोबल सर्फ्स या कंपनीचे लिस्टिंग BSE वर Rs १६३ आणि NSE वर Rs १६४ वर झाले. हा IPO १२ वेळा भरला होता. IPO मध्ये शेअर Rs १४० ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना माफक लिस्टिंग गेन झाला.

L & T ने इलेक्ट्रोलायझर च्या उत्पादनासाठी करार केला. सरकारने बायोफ्युएलच्या निर्यात धोरणात बदल केला. आता कोणत्याही अटींशिवाय निर्यात करता येईल. जर निर्यात नॉन्फ्युएल वापरासाठी असेल तर लायसेन्स काढावे लागेल.

GPT इन्फ्राला Rs १२३ कोटींची तर पॉवर मेक ला Rs १०३४ कोटींची आणि राजनंदिनी मेटल्सला Rs २०.४५ कोटींची ऑर्डर मिळाली .

ओरिओन प्रो फिनटेक ला US $ १८ मिलियन्सची ऑर्डर मिळाली.

बजाज हिंदुस्थानने BPVPL मध्ये ५.०४% स्टेक खरेदी केला.

१ एप्रिल २०२३ पासून मारुती सर्व गाड्यांच्या किमतीत वाढ करणार आहे

IGL ने Rs १० प्रती शेअर २रा अंतरिम लाभांश जाहीर केला.

‘CRAVATEX ब्रॅण्ड्स’ आणि मेट्रो ब्रॅण्ड्स यांच्या मर्जरला मंजुरी मिळाली

उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्यामुळे ग्रामीण भागात मागणी वाढेल. ITC लवकरच सर्व प्रकारच्या फूड प्रोडक्टस्मध्ये मिलेट प्रॉडक्टस लाँच करेल. ITC च्या मते महागाईचा सर्वात कठीण काळ संपत आला आहे.

टाटा मोटर्स टाटा डिजिटल मध्ये US $२०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

वेदांताचे प्रमोटर्स त्यांचा काही स्टेक विकणार आहेत या बातमीचा वेदांताने इन्कार केला.

मान इंडस्ट्रीच्या अंजार येथील नवीन प्लांटमध्ये उत्पादन सुरु झाले म्हणून शेअर तेजीत होता.

आज पासून HAL चा OFS सुरु झाला आज पहिल्या दिवशी नॉन रिटेल कोटा पूर्ण भरला.

हिरो मोटो त्यांच्या सर्व व्हेइकल्सच्या किमती १ एप्रिल पासून २% ने वाढवणार आहे.

कोरोमंडल स्पेशालिटी आणि इंडस्ट्रियल केमिकल्स या नव्या ग्रोथ विभागात प्रवेश करणार आहे. येत्या २ वर्षात Rs १००० कोटी गुंतवणूक करणार. क्रॉप प्रोटेक्शन केमिकल आणि कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन बिझिनेस करणार आहे. नजाराची सबसिडीअरी ‘ABSOLUTE स्पोर्ट्स’ ( स्पोर्ट्स कीडा) ही ‘प्रो फुटबाँल नेटवर्क LLC(PFN)’ यामध्ये ७३.२७% स्टेक US $ १.८२ मिलियनला घेणार आहे. PFN ची कमाई २०२२ मध्ये US $ २.१ मिलियन होती.

झारखंड मधील Rs ७६४.०१ कोटींच्या आणि ७३० दिवसांत पूर्ण करायच्या NHAI च्या प्रोजेक्ट साठी HG इन्फ्रा लोएस्ट बीडर ठरली.

PNC इंफ्राटेकला सोनावली -गोरखपूर हायवेज या सब्सिडिचेरीला मार्च ६ असून HAM प्रोजेक्ट साठी NHAI नी नियुक्त केले. हायब्रीड ऍन्युइटी तत्वावर उत्तर प्रदेशात ४ लेन्सचा रस्ता ९१२ दिवसात पूर्ण करायचे प्रोजेक्ट आहे.

अरुणाचल प्रदेशात २८८० MW चे मल्टिपर्पज प्रोजेक्ट साठी GR इंफ्राचा वाटा ५०% आहे. प्रोजेक्ट Rs ८७२.१७ कोटी आणि Rs ३६३७ कोटी चे आहे. या प्रोजेक्ट साठी GR इन्फ्रा आणि पटेल इंजिनीअरिंग यांचे कन्सॉरशियम ‘DIBANGपॉवर’ लोएस्ट बीडर ठरले.

आज FMCG, फार्मा मेटल्स मध्ये मामुली तेजी होती तर बँकिंग, रिअल्टी, IT यात प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७९२५ NSE निर्देशांक निफ्टी १७०७६ बँक निफ्टी ३९६१६ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.