आजचं मार्केट – २४ मार्च २०२३

आज क्रूड US $ ७५.६० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.५८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.३९ आणि VIX १४.५१ होते.

अक्सेंच्युअर या कंपनीने गेल्या वर्षी जो गायडन्स दिला होता तो पूर्ण झाला. पण त्यांनी पुढील वर्षांकरता गायडन्स कमी केला. कंपनीने सांगितले की त्यांनी १९००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे.

स्विस नॅशनल बँकेने ०.५०% तर बँक ऑफ इंग्लंडने ०.२५% एवढी दरवाढ केली तर बँक ऑफ नॉर्वेनी सांगितले की ते सुद्धा लवकरच दरवाढ करतील.
हिँडेनबर्गनी जॅक डोर्सीच्या कंपनीवर एक रिपोर्ट प्रसिद्ध केला.

‘TPG’ ने कॅम्पस ऍक्टिव्हवेअर या कंपनीमधील ७.६२% स्टेक Rs ३४५ प्रती शेअर या भावाने Rs ८०० कोटींना विकला

कॅनरा बँकेने रशियन JV मधील स्टेक स्टेट बँकेला Rs १२१ कोटींना विकला.

इंडिगो त्यांच्या विमानांची संख्या ३५० करणार आहे.

आज FII नी Rs.९९५.०१ कोटींची विक्री तर DII नी Rs १६६८.८५ कोटींची खरेदी केली.

‘ऑईलमॅक्स एनर्जी’ या प्रमोटर एंटीटीने ‘एशियन एनर्जी सर्व्हिसेस’ या कंपनीचे २.२१ लाख शेअर्स Rs १०४.८४ प्रती शेअर या भावाने ओपन मार्केटमधून खरेदी केले.

‘आनंद राठी फायनान्सियल सर्व्हिसेस’ या ‘आनंद राठी वेल्थ’च्या प्रमोटर्सने ३.३लाख शेअर्स Rs ८१० प्रती शेअर या दराने Rs २६.७३ कोटींना विकले.

ल्युपिनला त्यांच्या ‘OBETICHOLIC ACID’ च्या ५mg आणि १० mg टॅब्लेटसाठी USFDA ची मंजुरी मिळाली. USA मध्ये या टॅब्लेट्सची वार्षिक विक्री US $ २५५ मिलियन आहे.

संरक्षण मंत्रालयाने ‘BEL’ ला मीडियम पॉवर रडार आणि डिजिटल रडार वार्निंग रिसिव्हर सप्लाय करण्यासाठी Rs ३८०० ची दोन काँट्रॅक्टस दिली.

‘रचना’ ( ६०% JV मध्ये स्टेक ) आणि ‘RVNL’ ( ४०% स्टेक ) यांच्या JV ला ६ लाईन सरखेज- चंगोदर- राजकोट या नऊ-८A च्या रोड विभागाचे अपग्रेडेशन करण्याचे Rs २५२.२ कोटींचे EPC तत्वावर कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

‘IDFC FHCL’ या ‘IDFC’ च्या सबसिडीअरीला Rs २१९६.६० कोटी एवढा अप्लिकेशन मनी भरल्यावर ‘IDFC I st’ बँकेचे ३७.७५ कोटी शेअर्स अलॉट झाले. हे शेअर्स Rs ५९.१८ प्रती शेअर या भावाने दिले जातील. या नंतर ‘IDFC होल्डींग’चा ‘IDFC Ist’ बँकेत ३९.९९% स्टेक होईल.

टाटा स्टीलने टाटा स्टील ऍडवान्सड मटेरिअल्स चे १.३५ कोटी शेअर्स Rs १२.८१ प्रती शेअर या भावाने ‘टाटा स्टील डाऊनस्ट्रीम प्रॉडक्टस कडून Rs १७.३३ कोटींना खरेदी केले. या खरेदीनंतर टाटा ऍडवान्सड मटेरिअल्स ही टाटा स्टीलची डायरेक्ट WHOLLY OWNED सबसिडीअरी झाली.

हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्सने त्यांच्या धुळे येथील २ विंडमिल्स क्लीनविन एनर्जी नाईन LLP आणि ग्रीनवीन एनर्जी वन LLP यांना विकण्यासाठी मंजुरी दिली. या विंडमिल्सच्या विक्रीचा कंपनीच्या ऑपरेशन्स वर फारसा परिणाम होणार नाही.

इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स या कंपनिने ९.१६ लाख Rs १००० किमतीचे NCD IPO माध्यमातून विकून Rs ९१.६४ कोटी उभारले.

बजाज हिंदुस्थान शुगरने फेनील शुगरमध्ये प्रेफरन्स शेअर्सचे इक्विटी शेअर्समध्ये कन्व्हर्जन करून ९८% स्टेक घेतला.

वेदांता २८ मार्च २०२३ रोजी ५ व्या अंतरिम लाभांशावर विचार करेल.

फायनान्स बिलाच्या अमेंडमेंट प्रमाणे ज्या DEBT म्युच्युअल फंडाची इक्विटीमध्ये ३५% पेक्षा जास्त गुंतवणूक नाही त्यांच्या युनिट्सच्या विक्रीतून होणाऱ्या कॅपिटलगेन्स ला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स म्हणून समजले जाईल.

सध्या जे DEBT म्युच्युअल फंडाची युनिट्स ३ वर्षांपेक्षा जास्त होल्ड केलेली असली तर त्यावरील कॅपिटल गैन्स वर २०% टॅक्स आकारला जात होता आणि त्यासाठी indexation बेनिफिट मिळत असे किंवा indexation शिवाय १०% कर आकारला जाई. याप्रकारचेच बदल सोने, आंतरराष्ट्रीय शेअर्स किंवा डोमेस्टिक इक्विटी फंड ऑफ फंड्सना लागू होईल. या बदलामुळे HDFC AMC, UTI AMC, आदित्य बिर्ला सनलाईफ AMC, निप्पोन लाईफ AMC यांच्या शेअर्समध्ये विक्री झाली.

झायड्स लाईफ च्या डिप्रेशनवरील ‘DOXEPIN हायड्रोक्लोराईड’ या औषधाला USFDA ची अंतिम मंजुरी मिळाली.

इमामी Rs ४५० प्रती शेअर्स भावाने ४१ लाख शेअर्स ओपन मार्केटमधून बायबॅक करण्यासाठी Rs १८६ कोटी खर्च करेल .

RVNL ने Rs १.७७ प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला.

J कुमार इंफ्राच्या JV ला बंगलोर मेट्रोकडून Rs २५० कोटींची ऑर्डर मिळाली.

झायड्स लाईफच्या ‘AMIPIZA ‘ च्या जनरिकला USFDA ची मंजुरी मिळाली.

आज मेटल्स रिअल्टी बँका यात प्रॉफिट बुकिंग झाले.

आज BSE निर्देशांक सेंसेक्स ५७५२७ NSE निर्देशांक निफ्टी १६९४५ बँक निफ्टी ३९३९५ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.