आजचं मार्केट – २७ मार्च २०२३

आज क्रूड US $ ७४.९० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.३० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.३८ आणि VIX १६.०० होते.

यन मार्केट्स तेजीत होती तर युरोपियन मार्केट्स मंदीत होती. DEUTCHE बँकेचे CDS ( क्रेडिट डिफॉल्ट स्कीम) ३०० पाईंट वाढले.
फर्स्ट सिटीझनने सिलिकॉन व्हॅली बँक खरेदी केली.
USA मध्ये US $ १६४०० कोटी फंडातून बँका रक्कम काढत आहेत.

३० मार्च २०२३ रोजी रामनवमी निमित्त शेअर मार्केट बंद राहील.

ल्युपिनच्या पीठमपुर युनिटच्या UK रेग्युलेटरी ऑथॉरिटीजने केलेल्या तपासणीत कोणतीही त्रुटी आढळली नाही.

मोरेपन लॅबच्या बद्दी युनिटच्या तपासणीत USFDA ने क्लीन चिट दिली.

झायड्स च्या अहमदाबाद युनिटच्या तपासणीत USFDA ने तीन त्रुटी दाखवल्या .

बटरफ्लाय गांधीमती आणि क्रॉम्प्टन यांच्या मर्जरला मंजुरी मिळाली . बटरफ्लाय गांधीमतीच्या ५ शेअर्सला क्रॉम्प्टनचे २२ शेअर्स मिळतील. मर्जरनंतर बटरफ्लायचा स्टेक ३% राहील.

ग्रासिमने सेन्च्युरी टेक्सटाईल कडून Rs २५५ कोटींमध्ये २२० एकर जमीन लीजवर घेतली.

शुक्रवारी FII नी Rs १७२० कोटींची विक्री तर DII नी Rs २५५५ कोटींची खरेदी केली.

BBCC या HSCC च्या सबसिडीअरीला AIIIMS कडून Rs ८१.१९ कोटींची ऑर्डर मिळाली.

इंडस इंड बँकेने ‘भारत फायनान्सियल इन्क्ल्युजन’ साठी विकास मट्टू यांची COO म्हणून नेमणूक केली.

L & T फायनान्स होल्डिंगला RBI ने L & T फायनान्स, L & T इन्फ्रा क्रेडिट, आणि L & T म्युच्युअल फंड ट्रस्टी यांचे L & T फायनान्स होल्डिंगमध्ये मर्ज करण्यासाठी परवानगी दिली.

एरिस लाईफ सायन्सेसने DR रेडीजच्या ९ डर्माटॉलॉजी ब्रॅंड्सचे अक्विझिशन पूर्ण केले.

आलेम्बिक फार्माच्या कारखाडी (F ३ ) इंजेक्टेबल ऑप्थल्मिक फॅसिलिटीचे १६ मार्च ते २४ मार्च या कालावधीत इन्स्पेक्शन केले होते. त्यात फॉर्म NO. ४८३ इशू केला आणि २ मायनर प्रोसिजरल त्रुटी दाखवल्या.

BEL ला ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर सिस्टीम’ सप्लाय करण्यासाठी Rs ३००० कोटींची ऑर्डर मिळाली. इंडियन नेव्हीकडून Rs १३०० कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.

सन फार्माने ‘VIVALDIS HEALTH AND FOODS’ मध्ये ६०% स्टेक Rs १४३.३० कोटींमध्ये घेण्यासाठी करार केला. उरलेला ४०% स्टेक नजीकच्या भविष्य काळात काही अटी आणि नियमांनुसार घेणार. सन फार्मावर IT ( सायबर) ऍटॅक झाला काही डेटा चोरीला गेला .

सरकारने कच्च्या ज्यूटची MSP Rs ५०५० प्रती क्विंटलने वाढवली. याचा परिणाम CHEVIOT, GLOSTER, आणि लुडलो ज्यूट यांच्यावर होईल.
बामर लॉरी या कंपनीला कंटेनर फ्रेट स्टेशन ऑपरेट करण्यासाठी लायसेन्स मिळाले.

RITES या कंपनीला आसाम राज्य सरकारकडून Rs १२२ कोटींची ऑर्डर मिळाली.

Paytm पेमेंट सर्व्हिस लायसेन्स साठी RBI कडून मुदत वाढ मिळाली.

ISGEC ला Rs १९७ कोटीची ऑर्डर मिळाली.

ल्युपिनच्या ‘VALBENAZINE’ या औषधाला USFDA कडून मंजुरी मिळाली.

TVS मोटर्सने घाना (आफ्रिका) मध्ये ७ नवीन प्रॉडक्ट लाँच केली

J कुमार इंफ्राच्या JV ला Rs ५२० कोटींची ऑर्डर मिळाली. यात J कुमार इंफ्राचा शेअर Rs ३१० लाख आहे.

गुजरात अंबुजा एक्स्पोर्टने पश्चिम बंगालमध्ये १२००टन प्रती दिवस क्षमतेचे MAIZE प्रोसेसिंग युनिट सुरु केले.

महिंद्रा लॉजिस्टीक्सने पुण्यामध्ये ‘ASCENDAS FIRSTSPACE’ हा १० लाख SQ फीट चा वेअर हाऊस पार्क लाँच केला.

FDC च्या रायगडमधील रोहा येथील प्लांटच्या २० मार्च ते २४ मार्च दरम्यान USFDA ने केलेल्या तपासणीत क्लीन चिट दिली.

BLS इंटरनॅशनल या कंपनीने पोलंडच्या वकिलातीबरोबर व्हिसा आऊटसोर्सिंग सर्व्हिसेस साठी करार केला.

डालमिया भारत ग्रुपचा IES च्या तीन एंटिटीमध्ये १४.८६% स्टेक आहे. डालमिया ग्रुप हा हळूहळू पूर्णपणे हा स्टेक विकून टाकणार आहे.

आज पॉवर आणि रिअल्टी क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग आणि फार्मा आणि FMCG क्षेत्रात खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७६५३ NSE निर्देशांक निफ्टी १६९८५ आणि बँक निफ्टी ३९४३१ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.