आजचं मार्केट – २८ मार्च २०२३

आज क्रूड US $ ७७.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.६० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५२ आणि VIX १५.२४ होते.

आज जागतिक संकेत चांगले होते. एनर्जी आणि बँकांच्या शेअर्समध्ये तेजी होती. USA मध्ये बँकिंग सेक्टरला काही सवलती देण्यात येतील असे सांगितले २ वर्षाचे बॉण्ड यिल्ड ०.२४ने वाढून ४ पेक्षा जास्त पुढे गेले.

इराक मधील सेमिऑटोनॉमस रिजन कुर्दीस्थान मधून तुर्कस्तानला होणारी ४,५०,०० बॅरल्सची निर्यात थांबवून ते क्रूड स्टोअरेज कडे न्यावे लागले त्यामुळे क्रूडच्या सप्लायमध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे क्रूडचा भाव वाढला.

जर्मनीमध्ये २४ तासांचा संप आहे त्यामुळे रेल आणि हवाई यात्रा ठप्प आहे. महागाई ९% च्या पुढे गेली आहे.

सोने आणि चांदी यात मंदी आहे.

आज FII नी Rs ८९० कोटींची विक्री तर DII नी Rs १८०८ कोटींची खरेदी केली.

कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्सचे ब्लॉक डील Rs ११० प्रती शेअर भावाने झाले. हाइडेल इन्व्हेस्टमेंटने शेअर्स विकले. हे शेअर विकून त्यांना Rs २८८ कोटी मिळतील

नैसर्गिक गॅसच्या किमती किरीट पारेख कमिटी ठरवेल. याचा परिणाम फर्टिलायझर कंपन्यांवर आणि गॅस डिस्ट्रिब्युशन कंपन्यांवर होईल. नैसर्गिक गॅसची फ्लोअर किंमत US $ ४ /mmbtu आणि कमाल किंमत US $ ६.५/mmbtu निश्चित केली आहे. यामुळे ONGC आणि ऑइल इंडिया यांच्या वर विपरीत परिणाम तर फर्टिलायझर आणि गॅस डिस्ट्रिब्युशन कंपन्यांना फायदा होईल.

SJVN ला जपानीज येन १५ बिलियन म्हणजेच Rs ९१५ कोटी ग्रीन फायनान्स जपान बँक ऑफ इंडस्ट्रियल कोऑपरेशन कडून मिळाले.

PNC इंफ्राटेक उत्तर प्रदेशातील हायब्रीड ऍन्युइटी मोडच्या Rs ८१९ कोटींच्या प्रोजेक्टसाठी L १ बीडर ठरली.

अलकार्गो लॉजिस्टिक्सनी KWE सिंगापूर बरोबर शेअर खरेदी ऍग्रीमेंट अलकार्गो लॉजिस्टिक्स ‘गती KINTETSU’ मधील ३०% १.५० लाख शेअर्स Rs ४०६.७१ कोटींना खरेदी करण्यासाठी करार केला यामध्ये १.३० लाख शेअर्स KWE KINTETSU वार्ल्स एक्स्प्रेस कडून तर २०००० शेअर्स KWE KINTETSU एक्स्प्रेस कडून खरेदी करेल. त्यामुळे गती ला फायदा होईल.

दिलीप बिल्डकॉन ला बंगलोर विजयवाडा या Rs ७८० कोटींच्या HAM प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली.
फिनिक्स मध्ये CPP इन्व्हेस्टमेंट नी Rs १६० कोटींची गुंतवणूक केली

आदित्य बिर्ला कॅपिटल त्यांचा इन्शुअरन्स आर्म ‘नो कॅश नो DEBT’ तत्वावर Rs ४५५ कोटींना विकणार आहे.

लेमन ट्री केरळमध्ये ४२ रूम्सचे हॉटेल उघडणार आहे.

वेदांता आज ५ व्या इंटरीम लाभांशावर विचार करेल.
नेस्ले १२ एप्रिलच्या बोर्ड मीटिंग मध्ये फायनल लाभांश आणि वार्षिक निकालांवर विचार करेल.
पारस डिफेन्स ला रेड डॉट रिफ्लेक्स साईट साठी लायसेन्स मिळाले.

दालमिया भारत नॉनकोअर असेट्स विकणार आहे.
अंबुजा सिमेंट त्यांची उत्पादन क्षमता १४० MTPA एवढी वाढवणार आहे. त्यामुळे जेफरीने टार्गेट Rs ४९० केले.

ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स या कंपनीला Rs १८४ कोटींची ऑर्डर मिळाली. आता टोटल ऑर्डर बुक Rs १५५५ कोटी झाले.

सरकारनी इन्शुअरन्स कमिशन संबंधित नियम काढून टाकले. त्यामुळे आता विमा कंपन्यांना त्यांच्या एजंट्सना देण्यात येणार्या कमिशनचा दर ठरवता येईल.

मोल्ड टेक पॅकेजिंगने २७ मार्च पासून हैदराबाद युनिटमध्ये कमर्शियल उत्पादन आणि ऑपरेशन्स सुरु केली.

टाटा एलेक्सिने AMPINE बरोबर करार केला.
झायड्स लाईफ च्या LEVOTHYROXINE सोडियम इंजेक्शन MT ला USFDA कडून मंजुरी मिळाली.

AVALON टेक्नॉलॉजीचा Rs ८६५ कोटींचा ( Rs ३२०.०० कोटी फ्रेश इशू, Rs ५४५ कोटी OFS) IPO ३ एप्रिल ला ओपन होऊन ६ एप्रिलला बंद होईल.प्राईस बँड Rs ४१५ ते Rs ४३६ आहे.

आजपासून Paytm च्या KYC वॉलेट वरून ग्राहक प्रत्येक UPI QR कोड आणि ऑनलाईन मर्चंट्स जेथे UPI पेमेंट केली जाऊ शकतात तेथून payment करू शकतील त्यामुळे आज Paytm चा शेअर ३% वर होता.

सेबी ने अनिवार्य नॉमिनेशन्स साठी डेडलाईन ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवली.

आधार PAN लिंक करण्यासाठी मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवली.

सरकारने IOC BPCL HPCL या कंपन्यांना ७४३२ पब्लिक चार्जिंग स्टेशन साठी Rs ८०० कोटी मंजूर केले.

GR इन्फ्रा NHAI च्या Rs १६१३ कोटींच्या २ प्रोजेक्टसाठी लोएस्ट बीडर ठरली.

रिअल्टी ,ऑइल &गॅस, पॉवर ऑटो IT एनर्जी या क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीटबुकिंग झाले. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७६१३ NSE निर्देशांक निफ्टी १६९५१ बँक निफ्टी ३९५६७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.