आजचं मार्केट – २९ मार्च २०२३

आज क्रूड US $ ७९.१० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.३० च्या आसपास होते.USA $ निर्देशांक १०२.४८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.६० आणि VIX १४.७० होते.

NTPC ने काकीनाडा ग्रीन अमोनिया प्लांटमध्ये पॉवर सप्लाय साठी करार केला.

अलीबाबा ही MNC कंपनी त्यांच्या बिझिनेसचे सहा भाग करून ६ IPO आणणार आहे.

ASTER DM च्या प्रमोटर्स नी ४% स्टेक Rs ४६० कोटींना खरेदी केला. प्रमोटर्सचा स्टेक ३७.८८% वरून ४१.८८% झाला

FII नी Rs १५३१.१३ कोटींची खरेदी तर DII नी १५६.११ कोटींची विक्री केली.

QUESS कॉर्पोरेशन मध्ये ६६.४३ कोटी शेअर्सचे Rs २५० कोटींचे ब्लॉक डील झाले.

HCC च्या सबसिडीअरीने बहरामपूर फराक्का हायवे क्यूब हायवेज ला Rs १५० कोटींना विकला.

L & T ला वेदांता ग्रुपकडून ५ LTPA फर्टिलायझर प्लांटसाठी २ मोठ्या ऑर्डर मिळाल्या

HFCL ला गुजरात मेट्रो कडून Rs २८१ कोटींची ऑर्डर मिळाली.

ITC त्यांच्या किंग साईझ फिल्टर सेगमेंटची किंमत वाढवणार आहे. गोल्ड फ्लेक्स च्या किमती ३% ने वाढवणार आहे. ते सामान्यतः सिगारेट पोर्टफोलिओच्या किमती वाढवणार आहेत.
वेदान्ताने Rs २०.५० प्रती शेअर पांचवा इंटरीम लाभांश जाहीर केला. या इंटरीम लाभांशासाठी ७ एप्रिल ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

सिरका पेन्ट्स या कंपनीची बोनस इशूवर विचार करण्यासाठी २९ मार्च २०२३ रोजी मीटिंग आहे.

GR इन्फ्रा या कंपनीला ईस्ट कोस्ट रेल्वे कडून KHURDA -बोलनगीर नवीन रेल लाईन प्रोजेक्टसाठी टनेल वर्कच्या Rs ५८७.५९ कोटींच्या ऑर्डरसाठी लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स मिळाले.

RPP इन्फ्राला बरेली (UP) च्या जेल बिल्डिंगचे १४८.०८ कोटींची ऑर्डर मिळाली.

SML इसुझू त्यांच्या ट्रक च्या किमती ४% ने तर बसच्या किमती ६% ने वाढवणार आहे.

NBCC ला पश्चिम बंगालमधील मालदा येथील अब्दुल गनी खान चौधरी आणि स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया कडून Rs १४६ कोटींची वर्क ऑर्डर मिळाली.

झायड्स लाईफच्या ‘LOPERAMIDE HYDROCHLORIDE’ कॅप्सूल २mg ला USFDA कडून फायनल अप्रूव्हल मिळाले. हे डायरियावरील औषध आहे.

JSL ‘निकेल पिग आयर्न कंपनी’ मध्ये ४९% स्टेक US $ १५७ मिलियन ला घेणार आहे. JSL ने . इंडोनेशियामधील HALMAHERA ISLAND मधील जी निकेल पिग आयर्नची स्मेल्टर फॅसिलिटी आहे त्याची डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन आणि ऑपरेशनसाठी NEW YAKING PTE LTD बरोबर करार केला.

PNB हौसिंग ने त्यांच्या राईट्स इशूची घोषणा केली. कंपनी तुमच्याजवळ जर ५४ इक्विटी शेअर्स असतील तर तुम्हाला २९ राईट्स शेअर्स Rs २७५ प्रती शेअर या दराने ऑफर केले जातील. PNB हाऊसिंग ९ कोटी फुलली पेड अप इक्विटी शेअर्स इशू करेल या राईट्स इशुमधून त्यांना Rs २४९३.७६ कोटी मिळतील. या इशूसाठी ५ एप्रिल ही रेकॉर्ड डेट निश्चित केली असून राईट्स इशू १३ एप्रिलला ओपन होऊन २७ एप्रिलला बंद होईल.

ग्रॅन्युअल्सची सबसिडीअरी GCH ने USA मध्ये पॅकेजिंग युनिट सुरु केले. या युनिटला USFDA ने क्लीन चिट दिली आहे.

आज बर्जर पेंट्स ९४% ज्युबिलण्ट फूड्स ९३% डाबर, MRF, श्री सिमेंट ९१% गोदरेज कंझ्युमर्स, श्रीराम फायनान्स, SBI कार्ड्स ९०%, ग्रासिम, सन फार्मा ८९%, वेदांता ८८%, व्हरपूल ८७%, इंडसइंड बँक, ऑरोबिंदो फार्मा, HDFC बँक ८६% ,कोटक महिंद्रा बँक, अल्केम लॅब, रामको सिमेंट, ८५%, ऍक्सिस बँक, नेस्ले ८४%, L & T, अडानी पोर्ट्स, कोल इंडिया ८२%, ICICI बँक ८०%, HCL टेक, SBI लाईफ, ७८%, इन्फोसिस, PVR, बजाज ऑटो,७७% बजाज फायनान्स ७६% या प्रमाणे F & O सेगमेंट मध्ये रोल ओव्हर झाले .

झी इंटरप्रायझेसने इंसॉल्व्हन्सी केसमध्ये कंपनीने इंडसइंड बँकेबरोबर सेटलमेंट केली. कंपनीने पहिला इंस्टालमेंट भरला कंपनी बाकी रक्कम ३० जूनपर्यंत परत करेल.कंपनीच्या सोनी बरोबरच्या मर्जरसंबंधात घेतलेली हरकत इंडसइंड बँकेने मागे घेतली.

टाटा पॉवरच्या सबसिडीअरीला सोलर प्रोजेक्ट साठी Rs १७६० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

GR इन्फ्राला Rs ७४० कोटींचे हायवे प्रोजेक्ट मिळाले.

आज IT PSE, FMCG, सिमेंट आणि बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७९६० NSE निर्देशांक निफ्टी १७०८० आणि बँक निफ्टी ३९९१० वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.