आजचं मार्केट – ३१ मार्च २०२३

आज क्रूड US $ ७९.१० प्रती बॅरल तर रुपया US $१= Rs ८२.२० च्या आसपास होते.

USA $ निर्देशांक १०२.२० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५५ आणि VIX १२.८५ होते.

आज USA मधील मार्केट तेजीत होती.हॉंगकॉंग आणि NIKEI तेजीत होते. सोने आणि चांदी तेजीत होते. बँकिंग इंडस्ट्रीवरील संकट निवळले आहे असं वाटल्यामुळे मार्केट्समध्ये तेजी आली.

चीनचा मॅन्युफॅक्चरिंग PMI ५१.९(५१.६) आला तसेच सर्व्हिस PMI ५८.२ (५५) आला.

FII ने Rs १२४५.३९ कोटींची खरेदी आणि DII ने ही Rs ८२२.९९ कोटींची खरेदी केली.

BEL बरोबर संरक्षण मंत्रालयाने Rs ५४९८ कोटींचे १० करार केले. तसेच संरक्षणाशी संबंधित ६ कंपन्यांशी Rs ३६००० कोटींचे करार केले BDला L Rs ८१६० ,गार्डन रिच शिप बिल्डर्सला Rs ९७८१ ,कोची शिपयार्डला Rs ९८०५ , न्यू स्पेस इंडिया Rs २९६३ कोटींची ऑर्डर मिळाली

ल्युपिनच्या पिठमपूर युनीट २ या युनिटचे USFDA कडून २१ मार्च ते २९ मार्च दरम्यान इन्स्पेक्शन झाले होते.

USFDA ने फॉर्म नंबर ४८३ इशू करून १० त्रुटी दाखवल्या.

NCLT च्या रेझोल्यूशन नुसार रिलायन्स ने सिंटेक्स मधील ७०% इक्विटी कॅपिटल घेतले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेक्सटाईल बिझिनेसचा विस्तार करण्यासाठी या अक्विझिशनचा उपयोग होईल.

JSW स्टील छत्तीसगढ आणि झारखंड मधील २ कोळशांच्या खाणीसाठी प्रीफर्ड बीडर ठरली.

जैन इरिगेशन यांच्या सबसिडीअरीने ‘IRVULIS’ बरोबर आंतरराष्ट्रीय इरिगेशन बिझिनेस मर्ज करण्याचा व्यवहार पूर्ण केला. या मर्जरनंतर जैन इरिगेशनच्या सबसिडीअरीचा स्टेक १८.७% असेल.

सनसेरा ENGG ने MMRSIC टेक्नॉलॉजी मध्ये स्ट्रॅटेजिक गुंतवणूक करण्यासाठी करार केला. कंपनीने २१% स्टेक साठी Rs २० कोटी गुंतवले.

ATHER इंडस्ट्रीजने सौदी अरेबियामधील सौदी आरामको टेक्नॉलॉजी बरोबर लेटर ऑफ इन्टेन्टसाठी करार केला.

कॉन्व्हर्ज पोलीओल तंत्रज्ञान आणि उत्पादन आणि कमर्शियलायझेशन साठी करार केला

आज सरकारने १ एप्रील ०२३ पासून लागू होणारी फॉरीन ट्रेड पॉलिसी जाहीर केली.या पॉलिसीत मर्चंट्स ट्रेड चा समावेश केला आहे .डेअरी क्षेत्रासाठी सरासरी निर्यातीच्या अटी मधून सूट दिली आहे. E-कॉमर्स रूटने निर्यात करण्यावर भर दिला जाईल. E- कॉमर्स रूटने US $ २० ०००कोटी ते ३०,००० कोटी निर्यातीचे लक्ष्य.ठेवले आहे FTA मध्ये रुपयांमध्ये ट्रेड करण्यावर भर., रुपया हे आंतरराष्ट्रीय चलन बनवण्यावर भर.दिला जाईल एक्स्पोर्टच्या मंजुरीसाठी ऑटोमेटेड सिस्टीम बेस्ड मंजुरी लाँच केली १ दिवसात एक्सपोर्टसाठी मंजुरी मिळेल हे लक्ष्य ठेवले आहे.वाराणसी, मोरादाबाद, फरिदाबाद, आणि मिर्जापूर या ४ शहरांना एक्स्पोर्ट एक्सलन्स सिटीचा दर्जा दिला. एक्सपोर्टर्ससाठी AMNESTY स्कीम जाहीर केली.
GR इन्फ्रा कंपनी तेलंगणामध्ये MAHABUBABAAD जिल्ह्यात ४ लेनच्या ग्रीन फिल्ड हायवे हायब्रीड अँन्यूइटी तत्वावर बांधण्यासाठी L १ बीडर ठरली GR इन्फ्राला NHAI च्या कर्नाटक, महाराष्ट्र, आणि UP मधील Rs ४४५४ कोटींच्या ५ रोड प्रोजेक्टसाठी लेटर ऑफ अवॉर्ड मिळाले.

नेस्लेची ‘कॅपिटल फूड्स’ खरेदी करण्यासाठी बोलणी चालू आहेत. हे डील US $ १ बिलियनचे असेल. चिंग’S सीक्रेट चे कॅपिटल फूड्स हे ओनर आहेत. स्पाईसी नूडल्स आणि FUSION CHUTNEYS ही प्रोडक्टस आहेत.

PVR ने रामनवमीच्या दिवशी डेहरादूनमध्ये ५ स्क्रीन आणि तेलंगणामध्ये ४ स्क्रीन मल्टिप्लेक्सेस सुरु केले.
PNGRB ( पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस रेग्युलेटरी बोर्ड ) ने नैसर्गिक गॅस पाइपलाईन्ससाठी साठी १ एप्रिल २०२३ पासून युनिफाईड टॅरिफ Rs ७३.९३/mmbtu एवढी जाहीर केली. याचा फायदा IGL MGL यांना होईल.

IOC ने रशियन कंपनी रोजनेफ्ट बरोबर करार केला.
सॅनोफी ही कंपनी त्यांचा कन्झ्युमर हेल्थकेअर विभाग वेगळा करणार आहेत.

कोची शिपयार्डला मिसाईल व्हेईकल साठी Rs ९८०४ कोटींची ऑर्डर मिळाली

जानेवारीत रिलायन्स जिओ ने १६.६ लाख तर भारती एअरटेलने १२.८ लाख नवीन ग्राहक जोडले. तर VI ने १३.६ लाख ग्राहक गमावले.

रिलायन्स इंडस्ट्रीएमधून जिओ फायनान्सियल सर्व्हिसेस डीमर्ज होईल. रिलायंस इंडस्ट्रीजच्या प्रत्येक शेअरहोल्डरला रिलायन्सच्या त्यांच्या जवळ असलेल्या १शेअरमागे रिलायन्स जिओ चा १ शेअर मिळेल. २ मे २०२३ रोजी होणाऱ्या शेअरहोल्डर्सच्या बैठकीत या डीमर्जरवर विचार होईल.

कोल इंडियाने कोळशाच्या उत्पादनाचे ७०.३० कोटी टन हे लक्ष्य FY २३ साठी पार केले.

TVS मोटर्स, सीमेन्स, AB कॅपिटल, झी लिमिटेड ९७%,इंडियन हॉटेल ९६% BOB, JK सिमेंट, औरोबिंदो फार्मा ९५% , टायटन ९४% दालमिया भारत ९३% HAL ८४% या प्रमाणे रोलओव्हर झाले.

जानेवारी २०२३ महिन्यात रिलायन्स जिओ ने १६.६ लाख नवीन ग्राहक तर भारती एअरटेलने १२.८ लाख नवीन ग्राहक जोडले. VI ने १३.६ लाख ग्राहक गमावले.

RVNL ला पश्चिम बंगालमध्ये Rs ७२० कोटींचे काँन्ट्रक्ट मिळाले.

इंजिनीअर्स इंडियाला Rs ४८.८२ कोटींची ऑर्डर मिळाली.

IT, रिअल्टी, इन्फ्रा, FMCG, एनर्जी, मेटल, बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८९९१, NSE निर्देशांक निफ्टी १७३५७ आणि बँक निफ्टी ४०६०६ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.