Monthly Archives: April 2023

आजचं मार्केट – २८ एप्रिल २०२३

आज क्रूड US $ ७९.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.६० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.५५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५२ आणि VIX ११.१८ होते.

USA ची मार्केट्स आज तेजीत होती. अमेझॉनचे निकाल खूपच छान आले पण त्यांच्या क्लाउड बिझिनेसमध्ये ग्रोथ कमी झाली. सॅमसंग चे निकाल खराब आले. मेटा त्यांचा ऍड प्रोडक्ट आणि मेसेजिंग बिझिनेस मर्ज करणार आहेत. USA चा GDP ग्रोथ रेट १.१% झाला. डिस्ने, मेटा आणि इतर कंपन्या कर्मचारी कमी करणार आहेत. मास्टर कार्डचे निकाल चांगले आले. फर्स्ट रिपब्लिक बँकेचा शेअर ९५% पडला. ही बँक बंद होण्याचे चान्स आहेत.

PI इंडस्ट्रीज चा आर्म PI हेल्थ सायन्सेस LTD ने ‘THERACHEM रिसर्च MEDILAB’ LLC आणि इतरांबरोबर ‘TRM इंडिया’ आणि ‘SOLIS PHARMAACHEM’ यात १००% स्टेक घेण्यासाठी शेअर पर्चेस अग्रीमेन्ट केली. या कंपन्या केमिकल काम्पाउंड आणि KEY स्टार्टींग मटेरियल्ससंबंधित रिसर्च डेव्हलपमेंट आणि उत्पादन करतात. PI हेल्थ सायन्सेस ने ‘ARCHIMICA SpA’ आणि ‘PLAHOMA TWELVE GMBH’ बरोबर ARCHIMICA ‘ मध्ये १००% स्टेक खरेदी करण्यासाठी करार केले. मार्केटला PI इंडस्ट्रीजची हि खरेदी पसंद आली त्यामुळे शेअर १ सर्किट पूर्ण करून दुसऱ्या सर्किट लिमिटमध्ये गेला.

IRB इन्फ्राला तेलंगणामध्ये हैदराबाद येथे १५० किलोमीटर लांबीच्या नेहरू आऊटर रिंग रोड साठी TOT (टोलिंग ऑपरेशन, मेंटेनन्स) ट्रान्स्फर प्रोजेक्ट साठी सिलेक्टेड बीडर ठरला.

आरती सर्फेक्टंटस्चे निकाल चांगले आले.
ट्रेन्टचे मार्जिन कमी झाले.

ग्लेनमार्क लाईफसायन्सेस, इंडियन हॉटेल्स, चे निकाल चांगले आले.

AB सनलाईफ AMC, श्रीराम फायनान्स, Mphasis, टिन प्लेट, APCOTEX, ACC, यांचे निकाल कमजोर आले.

कल्याणी स्टील चे निकाल ठीक होते कंपनीने Rs १० लाभांश जाहीर कला.

DELHIVERYने व्होल्वो कडून २०० युनिट FM ४X २ ट्रेलर ट्रॅक्टर साठी करार केला.

टाटा मेटॅलिक्स चे प्रॉफिट, उत्पन्न वाढले. फायदा मामुली वाढला, रेव्हेन्यू १३%वाढला मार्जिन १०.१% होते.

CSB बँकेचे GNPA आणि NNPA कमी झाले. NII आणि फायदा वाढले.

सुप्रीम इंडस्ट्रीजचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले
ओरिएंट सिमेंटचे प्रॉफिट कमी झाले. इन्कम वाढले.
IOL केमिकल्सचा प्रॉफिट आणि इन्कम वाढले.
अतुल लिमिटेड चे प्रॉफिट, इन्कम कमी झाले.
MRPL तोट्यातून फायद्यात आली.मार्जिन वाढले. निकाल चांगले आले.

रामकृष्ण फोर्जिंग्जचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले.

स्टार हेल्थ तोट्यातून फायद्यात आली. प्रीमियम इन्कम वाढले.

इंडिया मार्ट चा फायदा कमी झाला, उत्पन्न वाढले. कंपनीने १:१ बोनस जाहीर केला. आणि Rs २० लाभांश जाहीर केला.

L & T फायनान्स चा फायदा वाढला NII वाढले निकाल चांगले आले.

अल्ट्राटेक सिमेंटचे प्रॉफिट Rs २४६१ वरून Rs १८६६ कोटी झाले. उत्पन्न Rs १५७६७ कोटींवरून Rs १८६६२ झाले. मार्जिन १७.८% राहिले. कंपनीने Rs ३८ लाभांश जाहीर केला.

डाटा मॅटीक्स चे प्रॉफिट इन्कम मार्जिन वाढले.
आज कन्झ्युमर ड्युरेबल्स सोडून सर्व क्षेत्रात खरेदी झाली. आज १६ फेब्रुवारी नंतर निफ्टी १८००० च्या वर बंद झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१११२ NSE निर्देशांक निफ्टी १८०६५ बँक निफ्टी ४३२३३ वर बंद झाले..

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २७ एप्रिल २०२३

आज क्रूड US $ ७७.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= ८१.७० च्या आसपास आहे. US $ निर्देशांक १०१.५० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.४६ आणि VIX ११.४२ होते.

आज क्रूडची किंमत कमी झाली. US $ ७८ प्रती बॅरलपर्यंत खाली आली. USA मार्केटमध्ये गुंतवणूकदार फेडच्या निर्णयाची वाट बघत आहेत.

डाऊ जोन्स, S & P, आणि NASDAQ मंदीत होते. फर्स्ट रिपब्लिक बँकेचा शेअर पुम्हा ३०% पडला. लोक या बँकेतून ठेवी काढून घेत आहेत. ही बँक त्यांचे ५०% असेट्स विकायच्या विचारात आहे.

आज FII ने Rs १२५७.०० कोटींची खरेदी तर DII ने Rs २२७ कोटींची विक्री केली.

मेटाचे निकाल चांगले आले. लोकांना नोकरीवरून काढून टाकत आहेत. स्पेंडिंग कमी होत आहे. मागणी कमी होत आहे.

UTI AMC चा निकाल चांगला आला. कंपनीने Rs २२ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

शॉपर्स स्टॉपचे निकाल चांगले आले.

गुजरात गॅसने इंडस्ट्रियल गॅसच्या किमती कमी केल्या.
रेल विकास निगम LTD १३ वी नवरत्न CPSE झाली.

पिगमेंट मॅन्युफॅक्चरिंग ग्रुप HEUBACH ने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी HCLTECH ची निवड केली.
सुप्रीम इंडस्ट्रीजचे निकाल चांगले आले. प्रॉफिट ७८.४% नी वाढून Rs १५९.८० कोटी झाले. उत्पन्न १७.५% ने वाढून Rs १३८७ कोटी झाले.. मार्जिन १५.०६% होते.

बजाज फायनान्स चे प्रॉफिट Rs २४२० कोटी वरून Rs ३१५८ कोटी झाले. प्रोव्हिजन्स Rs ७०२ कोटींवरून Rs ८५९ कोटी झाल्या. नेट NPA ०.४१% वरून ०.३४% झाले. ग्रॉस NPA १.१४% वरून ०.९४% झाले. NII Rs ६०६८ कोटींवरून Rs ७७७१ कोटी झाले.

L & T टेक चे प्रॉफिट २२% ने वाढून Rs ११६९ कोटी झाले. उत्पन्न Rs ८०१३ कोटी झाले. प्रॉफिट QOQ ग्रोथ २% होऊन Rs ३०९ कोटी झाले तर रेव्हेन्यू QOQ २.३% ने वाढून Rs २०९६ कोटी झाले ऍन्युअल मार्जिन १८.५% होते.

सिटी युनियन बँकेच्या N कामाकोडी यांची ३ वर्षांसाठी MDCEO पदावरील नेमणुकीला RBI ने मान्यता दिली.

व्होल्टास चे प्रॉफिट २१.२% ने कमी होऊन Rs १४३.२कोटी ( Rs १८३ कोटी ) झाले.
उत्पन्न Rs २६६७ कोटींवरून ४.२५% ने वाढून Rs २९५६ कोटी झाले.
मार्जिन ९.८% वरून ७.४% झाले.

SBI लाईफ फायदा १५% ने वाढून Rs ७७७ कोटी झाला. प्रीमियम इन्कम १४% वाढून Rs १९८९७ कोटी ( Rs १७४३४ कोटी) ग्रॉस WRITTEN प्रीमियम १५% वाढला. Rs ६७३२० कोटी झाले.APE १८% वाढले.Rs १६८१० कोटी झाले. VNB मार्जिन ४२० बेसिस पाईंट वाढून ३०.१% झाले.

स्टॉक एक्सचेंजीसने स्पष्ट केले की डीमर्जर नंतर जुन्या कंपनीला निफ्टी मधून वगळून नवीन कंपनीला घेतले जात असे. आता जुनी कंपनी हि निफ्टी मध्ये राहू शकते. रिलायन्सइंडस्ट्रीजमधून रिलायन्स जिओ बाहेर पडणार होती त्यावेळेला काय होईल या विचाराने ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार त्रस्त होते. आता या स्पष्टीकरणानंतर डीमर्जर नंतरही रिलायन्स इंडस्ट्रीज निफ्टीमध्ये राहील हे स्पष्ट झाले.

रेमंड्सचा FMCG बिझिनेस गोदरेज कंझ्युमर्स ने Rs २८२५ कोटींना खरेदी केला. हे डील १० मे २०२३ पर्यंत पूर्ण होईल. यामुळे गोदरेज कंझ्युमर्सचा मेल्स ग्रुमिंगमध्ये बिझिनेस मजबूत होईल.

बजाज फिनसर्वचे निकाल चांगले आले. फायदा YOY Rs १३४६.कोटींवरून Rs १७६९ कोटी झाला. रेव्हेन्यू Rs १८८६२ कोटींवरून Rs २३६२५ कोटी झाला. कंपनीने Rs ०.८०पैसे लाभांश दिला. कंपनीला FY २३ साठी Rs ६४१७ कोटी प्रॉफिट झाले.

स्वराज इंजिनचे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

श्री दिग्विजय सिमेंटचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

चेन्नई पेट्रोचे निकाल उल्लेखनीयरित्या चांगले आले. कंपनीने Rs २७ प्रति शेअर लाभांश जाहीर केला.

द्वारिकेश शुगरचे निकाल कमजोर आले.

वेलस्पन इंडियाचे निकाल चांगले आले कंपनीने Rs १२० प्रती शेअर या दराने १६२००००० शेअरचा बायबॅक जाहीर केला कंपनी शेअर बाय बॅक वर Rs १९५ कोटी खर्च करेल.यासाठी रेकॉर्ड डेट १० मे निश्चित केली आहे. कंपनीने Rs ०.१० प्रती शेअर लाभांश जाहीर केला

सोम डिस्टीलरिजचे निकाल चांगले आले प्रॉफिट उत्पन्न वाढले.

कोलते पाटिलना मिळालेल्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमधून त्यांना Rs १२०० कोटींचा रेव्हेन्यू मिळेल.

लौरास लॅबचे निकाल कमजोर आले.

TV १८ ब्रॉडकास्टींग ने ‘VIACOM’ बरोबर करार केला.

सूर्या रोशनीचे निकाल चांगले आले.

टेक महिन्द्राचा प्रॉफिट Rs १२९७ कोटींवरून Rs १११२ कोटी झाला.( कमी झाले )
उत्पन्न Rs १३७१८ कोटी झाल. मार्जिन ९.६% होते. कंपनीनी Rs ३२ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
ऍक्सिस बँक फायद्यामधून तोट्यात आली . बँकेला Rs ५७२८ कोटी तोटा झाला. NII Rs ११७४२ कोटी झाले.GNP आणि NNP कमी झाले NIM ७३ बेस पाईंट वाढले

विप्रो Rs ४४५ प्रती शेअर या दराने टेंडर रूट बायबॅक वर Rs १२००० कोटी खर्च करेल. शेअर कॅपिटलच्या ४.९१% शेअर्स बायबॅक करणार. २६,९६,६२,९२१ शेअर्स बायबॅक करणार. ही प्राईस आजच्या CMP वर १९% प्रीमियम ने आहे.

विप्रोचे प्रॉफिट Rs ३०७४ कोटी .०४% YOY कमी झाले. रेव्हेन्यू ११% ने वाढून Rs २३१९०/- झाले. US $ इन्कम US $२८२ कोटी, मार्जिन १६.३%
LTI MINDTREE ने Rs ४० लाभांश, Rs १११४ कोटी फायदा , रेव्हेन्यू Rs ८६९१ कोटी EBIT Rs १४२१ कोटी. मार्जिन १६.४%

ओरॅकल फायनान्सियल सर्व्हिसेस ने Rs २२५ प्रती शेअर इंटरींम लाभांश जाहीर केला.

आज ऑटो मेटल रिअल्टी, IT मध्ये खरेदी झाली तर पॉवर क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०६४९ NSE निर्देशांक निफ्टी १७९१५ बँक निफ्टी ४३०००वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २६ एप्रिल २०२३

आज क्रूड US $ ८१.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= ८१.९० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.८० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.४१ आणि VIX ११.६३ होते.

काल USA मधील तिन्ही निर्देशांक मंदीत होते. फर्स्ट रिपब्लिक बँकेचे उत्पन्न ३३% ने कमी होऊन US $ २६.९ कोटी झाले. ग्राहकांनी बँकेतून US $ १०००० कोटींच्या ठेवी काढल्या. बॉण्ड मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी US $ ४८ कोटीचे बॉण्ड्स खरेदी केले.आज गोल्डमन साखस, बोईंग, आणि फेस बुक त्यांचे निकाल जाहीर करतील. कन्झ्युमर कॉन्फिडन्स डेटा ही निराशाजनक होता.

आज FII नी ४०७.३५ कोटींची विक्री तर DII नी ५६३.६१ कोटींची खरेदी केली.

२८ एप्रिल २०२३ रोजी इंडिया मार्ट बोनस इशूवर विचार करेल.

बजाज ऑटो चे प्रॉफिट YOY २.५% ने कमी झाले. रेव्हेन्यू ११.६६% ने वाढले पण सेल्स व्हॉल्युम १२.५% ने कमी झाले. कंपनीने Rs १४० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

टाटा कंझ्युमर्स चे प्रॉफिट २१% ने वाढले रेव्हेन्यू १४% ने वाढले. त्यापैकी १५% इंडिया बिझिनेस, १०% इंटरनॅशनल बिझिनेस आणि ९% ब्रँडेड बिझिनेस वाढला. कंपनीने Rs ८.४५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स चे प्रॉफिट Rs ०.५४ कोटी ( Rs १३७.७ कोटींवरून कमी होऊन) झाले. वन टाइम गेन Rs ९६.८ कोटी झाला.रेव्हेन्यू YOY ५७.८% ने वाढून Rs २५५.४ कोटी झाले.

सिप्लाची सबसिडीअरी मॅडिसन फार्मा डिझॉल्व्ह करण्यात आली. पण या सबसिडीअरीमार्फत फारसे व्यवहार होत नसल्याने सिप्लावर याचा काही परिणाम होणार नाही.

डालमिया भारत चे प्रॉफिट YOY १२१.४% ने वाढून Rs ५८९ कोटी तर रेव्हेन्यू YOY १५.७% ने वाढून Rs ३९१२ कोटी झाला.

AU स्माल फायनान्स बँकेचे प्रॉफिट YOY २३% ने वाढून Rs ४२५ कोटी झाले. प्रोव्हिजन्स ५६% ने कमी झाल्या. NII २९.५% ने वाढून Rs १२१३ कोटी झाले. GNPA १५ बेसिस पाईंट्सनी तर मनपा ९ बेसिस पाईंट्स नी कमी झाले.

महिंद्रा CIE चे प्रॉफिट ७३% ने वाढून Rs २७९ कोटी झाले तर रेव्हेन्यू १८.४% ने वाढून Rs २४४० कोटी झाला.

गुजरात राज्य सरकारने त्यांच्या सरकारी कंपन्यांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. ही तत्वे कंपन्यांनी बोनस, लाभांश, बायबॅक या संबंधात आहेत. गुजरात राज्य सरकारच्या सरकारी कंपन्यांनी प्रॉफिटच्या ३०% किंवा नेटवर्थच्या ५% एवढा लाभांश जाहीर करावा. गुजरात अल्कली, GNFC, GSFC, GMDC GIPCL गुजरात गॅस या कंपन्यात गुंतवणूकदारांनी खरेदी केली.

बायबॅकसाठी नेटवर्थ Rs २००० कोटी आणि बॅलन्सशीट मध्ये कॅश Rs १००० कोटी असली पाहिजे बोनस साठी इक्विटी शेअर कॅपिटलच्या १० पट किंवा जास्त रिझर्व्हज असले पाहिजेत स्प्लिट साठी फेस व्हॅल्यूच्या ५०पट किंवा त्यापेक्षा जास्त बुक व्हॅल्यू किंवा CMP असली पाहिजे ( फेस व्हॅल्यू Rs १ किंवा जास्त असली पाहिजे.)
GNFC शेअर बायबॅक, सर्व गुजरात राज्य सरकारच्या कंपन्या बोनस इशू करण्यासाठी पात्र आहेत. GSPL आणि गुजरात इंडस्ट्रीज स्प्लिट करू शकणार नाहीत.

क्रूडच्या किमती कमी होत असल्याने टायर उत्पादक कंपन्यांमध्ये खरेदी झाली.

धामापूर बायो ऑर्गनिक्स चे निकाल चांगले आले.
SANDUR मँगेनीज ला आयर्न ओअर उत्पादनाला मंजुरी मिळाली.

IGL ला नोएडा, गुरुग्राम, आणि फरिदाबाद येथे गॅस डिस्ट्रिब्युशनचे काम मिळाले.

VST या सिगारेट उत्पादन करणाऱ्या कंपनीने Rs १५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

KPI ग्रीन ने गुजरातमध्ये २६.१० MW पॉवर प्रोजेक्ट कमिशन केले.

KEC इंटरनॅशनलला Rs १०१७ कोटींची ऑर्डर मिळाली.

KPIT TECHला प्रॉफिट Rs १११.६० कोटी तर रेव्हेन्यू Rs १०२० कोटी झाले. मार्जिन १४% वर स्थिर राहीले .

पुनावाला फिनकॉर्प चे NPA कमी झाले डिसबर्समेंटमध्ये १५१% वाढ झाली. AUM ( ऍसेट अंडर मॅनेजमेंट) ३७% ने वाढले. NIM वाढले.
दालमिया भारतने JP असोसिएट्सचे काही सिमेंट क्लिंकर आणि पॉवर प्लांटचे अधिग्रहण पूर्ण केले.

मारुतीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले. प्रॉफिट Rs २६२३ कोटी रेव्हेन्यू Rs ३२०४८ कोटी आणि मार्जिन १०.४% होते. कंपनीने Rs.९० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. कंपनी त्यांची उत्पादन क्षमता १० लाख युनिट्स एवढी वाढवणार आहे.

तानला प्लॅटफॉर्म्स च्या प्रॉफिट मध्ये किरकोळ वाढ झाली उत्पन्न कमी झाले मार्जिनही कमी झाले. कंपनीने Rs ४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

HDFC लाईफचा सॉल्व्हन्सी रेशियो २०३% आणि न्यू बिझिनेस मार्जिन २७.६% राहिले. कंपनीने Rs १.९० प्रतिशेअर लाभांश जाहीर केला.

टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्टसला Rs १८४.११ कोटी तोटा झाला.

आज पॉवर, FMCG, रिअल्टी कन्झ्युमर प्रॉडक्टस मध्यें खरेदी झाली

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०३०० NSE निर्देशांक निफ्टी १७८१३ बँक निफ्टी ४२८२९ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २५ एप्रिल २०२३

आज क्रूड US $ ८२.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८१.९० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.३३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.४७ आणि VIX ११.६४ होते.

USA ची मार्केट्स फ्लॅट होती. ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार २ मे आणि ३ मे ला होणाऱ्या फेडच्या FOMC मीटिंन्ग ची वाट बघत आहेत. फेड बहुतेक दर वाढवेल असा अंदाज आहे.

फर्स्ट रिपब्लिक बँकेची डिपॉझिट्स ४१% ने कमी झाली. त्यामुळे लिक्विडीटी चा प्रॉब्लेम निर्माण झाला. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या २५ % कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील.

आज FII ने Rs ४१२.२७ कोटींची विक्री तर DII नी Rs ११७७.१८ कोटींची खरेदी केली.

महिंद्रा लाईफ डेव्हलपर्सला मुंबईमध्ये मालाड मध्ये आणखी एक सोसायटी रिडेव्हलपमेंटचे काम मिळाले. या प्रोजेक्टमधून कंपनीला Rs ८५० कोटी रेव्हेन्यू मिळेल असा अंदाज आहे.

इन्फोसिसने ‘आरामको’ या सौदी अरेबियातील एनर्जी आणि केमिकल क्षेत्रातील कंपनीबरोबर आरामको चे ह्युमन रिसोर्सेस तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि कौशल्य विकसित करण्यासाठी MOU केले.

क्रॉम्प्टन ग्रीव्हज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स ने १ मे २०२३ पासून शंतनू खोसला यांची १ वर्षांकरता एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमन म्हणून नेमणूक केली.

शंतनू खोसला हे डिसेंबर २०२५ पर्यंत ते नॉन एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमन असतील. प्रोमित घोष हे कंपनीचे नवीन MD आणि CEO असतील. १ मे २०२३ पासून मॅथ्यू जॉब यांनी राजीनामा दिला.

इंडस इंड बँकेने सुमंत कठपालिया यांची २ वर्षांकरता MD आणि CEO म्हणून मार्च २०२३ पासून नेमणूक करण्यासाठी शेअरहोल्डरर्सची मंजुरी मिळवण्याचे ठरवले आहे.

MAS ( मॉनेटरी ऑथॉरिटी ऑफ सिंगापूर) ने HDFC बँकेला त्यांचा ‘GRIHA Pte’
मधील २०% स्टेक घ्यायला मंजुरी दिली.

सेंच्युरी टेक्सटाईलचे प्रॉफिट YOY ६८.८% ने वाढून Rs १४५.२७ कोटी झाले. यांत Rs १३४ कोटी लीजहोल्ड लॅण्डसंबंधीत इतर उत्पन्नाचा समावेश आहे. रेव्हेन्यू Rs १२०८.५० कोटी झाला.

वेलस्पन इंडिया त्यांच्या एप्रिल २७ च्या बैठकीत शेअर बायबॅक, तिमाही निकाल आणि लाभांशावर विचार करेल.

पर्सिस्टंन्स सिस्टिम्स या IT क्षेत्रातील कंपनीने त्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.

कंपनीला प्रॉफिट Rs २५१.५० कोटी तर रेव्हेन्यू Rs २२५४.५०कोटी झाला मार्जिन १५.४ % होते. US $ रेव्हेन्यू US $ २७.४६ कोटी झाला. कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ ३.५ % राहिले कंपनी Rs १२ फायनल आणि Rs १० स्पेशल लाभांश जाहीर केला.

SMS फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी रूट मोबाईलने रूट गार्ड लाँच केले.

अनुपम रसायनला ५ वर्षांसाठी US $ ४६ मिलिअनची केमिकल सप्लाय करण्यासाठी ऑर्डर मिळाली. या ऑर्डर संबंधित MOU सही केले.

बँक ऑफ बरोडाच्या क्रेडिट कार्ड आर्म बॉब फायनान्सियल सोल्युशन्स मध्ये ४९% स्टेक घेण्यासाठी कार्लाइल ग्रुप, रेणुका रामनाथ ग्रुप, जपानची कंपनी ‘CREDIT SAISON’ हे इंटरेस्टेड आहेत.

नेस्लेचे प्रॉफिट Rs ५९४ कोटींवरून Rs ९३६ कोटी झाले. उत्पन्न Rs ३९८० कोटींवरून Rs ४८३० कोटी झाले. मार्जिन २३.४% वरून कमी होऊन २२.७% झाले . EBITDA Rs ९३० कोटींवरून Rs १०९८ कोटी झाला.

ओरिएंट ग्रीनच्या Rs ७२५ कोटी रिफायनान्सिंग साठी IREDA ने मंजुरी दिली.

M & M ने बोलेरो MAXX PIK-UP Rs ७.७५ लाख किमतीला लाँच केली

बिर्ला सॉफ्ट ने USA ची कंपनी ‘INVACARE CORP’ बरोबर सेटलमेंट करार केला.

Mahindra holidays चां रिझल्ट चांगला आला फायदा, revenue, ebitda,margin वाढले

HDFC AMC चां रिझल्ट ठीक आला पण ४८ रुपये लाभांश दिला

बायोकॉन बायोलोजिक्सला सिरमनी कर्ज दिले होते या कर्जाचे रूपांतर equity मध्ये होईल सिरमचा हिस्सा ४.९% होईल ३०० मिलियन डॉलर इतकी investment siram करेल १५ वर्षासााठी vaccine संबंधात करार झाला आहे

पॉवर ऑईल गॅस रिॲलिटी या सेक्टर मध्ये तेजी होती
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०१३० NSE निर्देशांक निफ्टी १७७६९ BANK निफ्टी ४२६७८ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २४ एप्रिल २०२३

आज क्रूड US $ ८०.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.८४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५६ आणि VIX १२.०० होते.

FII ने Rs २११६ कोटींची विक्री तर DII ने Rs १६३२ कोटींची खरेदी केली.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे निकाल चांगले आले. प्रॉफिट YOY १९.१% तर रेव्हेन्यू YOY २.८% ने वाढले. रिलायन्स जीओचा ARPUJ Rs १७८.८० राहिला ( १७८.२०) तर जिओ ने २.९२ कोटी नवीन ग्राहक जोडले. रिलायन्स रिटेलचा फूटप्रिंट ६४% ने वाढला तर स्टोअर्सची संख्या १८०४० झाली. O टू C बिझिनेसची प्रगती चांगली झाली.

WENDT चे निकाल चांगले आले. कंपनीने Rs ५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

ICICI बँकेचे प्रॉफिट YOY ३०% ने वाढून Rs ९१२२ कोटी झाले NII ४०.२% ने YOY वाढले. प्रोव्हिजन्समध्ये ५१% वाढ झाली. GNPA आणि NNPA कमी झाले बँकेचा निकाल चांगला आहे. बँकेने Rs ८ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

येस बँकेचे प्रॉफिट ४५% ने कमी झाले. प्रोव्हिजन १२८% ने वाढल्या. NII १५.७% ने वाढले. NIM ३० बेसिस पाईंट वाढून २.८०% झाले.

मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे प्रॉफिट वाढले रेव्हेन्यू कमी झाला, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs २ प्रती शेअर लाभांश आणि तुमच्या जवळील एका शेअर्समागे १ बोनस शेअरची घोषणा केली.कंपनीने Rs १४५०० कोटीची विक्री FY २०२४ साठी गायडन्स दिला.
तेजस नेटवर्कचा तोटा कमी होऊन Rs ११.५ कोटी ( Rs ४९.६ कोटी) झाला. रेव्हेन्यू १३.६% ने वाढला. EBITDA लॉस कमी होऊन ८.१९ कोटी ( ८८.११) झाला.

HDFC AMC या कंपनीचे व्यवस्थापन HDFC आणि HDFC बँकेच्या मर्जरनंतर HDFC बँक करेल.

HDFC बँक आणि HDFC चे मर्जर जुलै २०२३ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. HDFC बँकेने HDFC लाईफ आणि HDFC ERGO मध्ये स्टेक वाढवून ५०% केला पाहिजे. RBI ने मर्ज्ड एंटीटीला PSL प्रॉयोरिटी सेक्टर लेन्डिंग नॉर्म्स पूर्ण करण्यासाठी ३ वर्षांचा वेळ दिला.HDFC एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस ( ही कंपनी ३ शाळा चालवते) मधील HDFC चा स्टेक २ वर्षेपर्यंत ठेवू शकेल. HDFC क्रेडीला फायनान्सियल सर्व्हिसेस मधील स्टेक २ वर्षात १०% इतका कमी केला पाहिजे. RBI ने दिलेल्या या सवलतींमुळे मर्ज्ड एंटीटी आता त्यांचा सबसिडीअरीजमधील स्टेक २ वर्षापर्यंत इतर अटी पाळून ठेवू शकतील RBI ने CRR, SLR आणि LCR या अनिवार्य रेशीओमध्ये कोणतीही सवलत दिली नाही मर्ज्ड एंटीटीला पहिल्या दिवसापासून हे रेशियो पाळावे लागतील.
GIPCL कंपनी त्यांच्या ५०० MW सुरत लिग्नाइट पॉवर प्लांट साठी अवश्य तो कोळसा आयात करेल.
कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरहोल्डर्सनी उदय कोटक यांना नॉनएक्झिक्युटीव्ह, नॉनइंडिपेन्डन्ट डायरेक्टर म्हणून निवड केली.

विप्रो २७ एप्रिल २०२३ रोजी शेअर्स बायबॅक वर विचार करेल.

वेलस्पन इंडियाच्या चार सबसिडीअरीजच्या कंपनीत मर्जरला मंजुरी मिळाली.

श्री सिमेंट ने सराईकेला सिमेंट प्लांटची क्षमता वाढवली.

CE इन्फोकॉम सिस्टिम्स चे प्रॉफिट इन्कम वाढले मार्जिन कमी झाले.

राजरतन वायरचे प्रॉफिट इन्कम मार्जिन कमी झाले
सन फार्माने USFDA ने सुचवलेल्या अनिवार्य उपाययोजना पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या बेसिसवर त्यांच्या मोहाली प्लांट मधून शिपमेंट्स थांबवल्या आहेत.

सेंच्युरी टेक्सटाईल्स ने मुंबईच्या मलबार हिल्स एरियात जमीन खरेदी केली.या जमिनीतून Rs. ६०० कोटी उत्पन्न होईल असा कंपनीचे म्हणणे आहे.
श्रीराम फायनान्स २७ एप्रिल २०२३ रोजी फंड उभारणीवर विचार करेल.

अजमेराच्या सबसिडीअरीने विक्रोळीमध्ये जमीन खरेदी केली.

दालमिया भारत च्या झारखंड मधील बोकारो येथे दुसऱ्या सिमेंट लाईन मध्ये उत्पादन सुरु केले.
GAIL ला जर्मन कंपनी ‘SESE’ कडून मे महिन्यासाठी ४ LNGC कार्गो मिळतील.यापुढे दर महिन्याला ‘SESE’ गैलला याप्रकारे LNGC कार्गो पाठवील.

मारुतीने SUV FRONX लाँच केली. या सुवची किंमत Rs ७.४६ लाख आणि त्यापुढे असेल.
बँक ऑफ महाराष्ट्राचे चौथ्या तिमाहीचे निकाल समाधानकारक होते. प्रॉफिट Rs ८४० कोटी ( Rs ३५५ कोटी ) NII Rs २१८७ कोटी ( Rs १६१२ कोटी ) GNPA QOQ २.४७ ( २.९४) आणि NNPA QOQ ०.२५% ( ०.४७%) प्रोव्हिजन Rs ९४५ कोटी ( Rs ३४५ कोटी ) बँकेनी Rs १.३० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

भारती एअरटेल ने ‘सिक्युअर मीटर’ बरोबर करार केला. बिहारमध्ये १२ लाख NBLOT स्मार्ट मीटर बसवण्यासाठी करार केला.

इंडस इंड बँकेचे प्रॉफिट ४९.८८% ने वाढून Rs २०४० कोटी झाले. NII Rs ४६६९ कोटी ( Rs ३९८५ कोटी ) झाले. GNPA २.०६% वरून १.९८% तर NNPA ०.६२% वरून ०.५९% झाले.प्रोव्हिजनिंग Rs १०३० कोटी तर NIM ४.२८% झाले.बँकेने Rs १४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

AMI ऑर्गनिक्स हे ५५% स्टेक बाबा फाईन केमिकल्समध्ये घेणार. बाबा फाईन केमिकल्स ही कंपनी सेमीकंडक्टर उद्योगाला लागणारी स्पेशालिटी केमिकल्स बनवते. यासाठी AMI ओर्गानिक्स Rs ६८ कोटी पे करेल.

ऑरोबिंदो फार्माच्या ROFLUMILAST आणि CEVIMELINE HYDROCHLORIDE या औषधाना USFDA कडून मंजुरी मिळाली

IPCA लॅब युनिकेम लॅब मध्ये ३३.३८% स्टेक Rs १०३४ कोटींना खरेदी करणार. त्यानंतर २६% स्टेक खरेदी करण्यासाठी Rs ४४० प्रती शेअर भावाने ओपन ऑफर आणेल.

मार्च महिन्यासाठी GST कलेक्शन १.६७ लाख कोटी झाले.

आज IT, FMCG, PSE, बँकिंग, रिअल्टी मिडकॅप स्मॉल कॅप मध्ये खरेदी तर फार्मा आणि ऑटोमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६००५६ NSE इंडिया निर्देशांक निफ्टी १७७४३ बँक निफ्टी ४२६३५ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २१ एप्रिल २०२३

आज क्रूड US $ ८१.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.८० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५२ आणि VIX ११.७२ होते. जपानचे CPI ३.१ आले.

ग्लोबल क्यूज चांगले नव्हते. रिजनल बॅंक्स, एनर्जी, एअरलाईन्स कंपन्यांचे निकाल चांगले नव्हते, कमजोर होते.

कंपन्यांना त्यांच्या प्रोडक्टसच्या किमती कमी कराव्या लागत आहेत. क्रूडचे उत्पादन ओपेक कमी करत असूनही क्रूडचा भाव कमी होत आहे. हे मंदी येणार असल्याचे चिन्ह असू शकते.

FII ने Rs ११६९ कोटींची विक्री तर DII नी ८३३ कोटींची खरेदी केली.

रॉ शुगरचे भाव १२ वर्षांच्या कमाल स्तरावर आहेत.त्यामुळे साखरेचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहण्याची शक्यता आहे.

ग्रीन पॅनल च्या रुद्रपूर युनिटमध्ये काम सुरु झाले.
इंटलेक्ट डिझाईन ने कोअर बँकिंग प्लॅटफॉर्म लाँच केला.

स्टर्लिंग & विल्सन रिन्यूएबल रेव्हेन्यू ९१.७४% YOY कमी होऊन Rs ८८.४३ कोटी झाला नेट लॉस Rs ४२१.११ कोटी झाला.

सिमेन्सच्या आणि RVNL च्या JV ला गुजरात मेट्रो रेल फेज १, आणि अहमदाबाद फेज २साठी Rs ६७८ कोटींची ऑर्डर मिळाली.

फिनोलेक्स पुण्यामधील उर्से येथे ऑप्टिकल फायबर प्रीफॉर्म आणि फायबर DRAW क्षमता वाढवण्यासाठी Rs २९० कोटी गुंतवणार.

LIC चे प्रीमियम इन्कम ३२% YOY कमी झाले. रिटेल प्रीमियम १०% ने वाढले.

मॅक्स हेल्थ केअर ने ‘केअर हॉस्पिटल’ खरेदी केले.
सुवेंन फार्माच्या ‘BERHYANDA ‘ अक्विझिशनला CCA ची मंजुरी मिळाली.

GMR एअरपोर्ट ला तसेच इझी ट्रीपला वाढलेल्या हवाई प्रवासी वाहतुकीचा फायदा होईल.

लोढा म्हणजेच मॅक्रोटेकचे निकाल आणि बोनस इशूवर विचार करण्यासाठी २२/०४/२०२३ रोजी बैठक आहे.

TEXMACO ने NYMWAG CS यांच्या बरोबर फ्रेट वॅगन आणि त्याचे पार्ट बनवण्यासाठी JV केले.
ITC देशातील सगळ्यात मोठी ७ व्या नंबरची कंपनी झाली. ITC ची मार्केट कॅप Rs ५ लाख कोटींपेक्षा जास्त झाली.

ICICI प्रु चे निकाल चांगले आले. कंपनीने Rs ०.६० प्रती शेअर एवढा लाभांश जाहीर केला.

सोलार इंडस्ट्रीज ने संरक्षण मंत्रालयाबरोबर लॉइटरिंग म्युनिशन चा सप्लाय करण्यासाठी करार केला
DR रेड्डीज लॅबोरेटरीज ने ‘TREPROSTINIL इंजेक्शन’ USA मध्ये लाँच करण्याची घोषणा केली.

आज रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांचे तिमाही निकाल जाहीर करेल. २२ एप्रिल २०२३ रोजी ICICI बँक त्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल.

HCL टेक ला Rs ३९८३ कोटी प्रॉफिट झाले ( YOY ११% वाढ )आणि QOQ ३% घट झाली रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स १८% YOY वाढून Rs २६६०६ कोटी झाला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नी Rs १८ प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीरात केला.

CYIENT या कंपनीला YOY ६% वाढून Rs १६३ कोटी नेट प्रॉफिट झाले . ( QOQ ४% वाढ) रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स YOY ४८% वाढून Rs १७५१ कोटी झाले

पॉवर मेक ला Rs ७२० कोटींची ऑर्डर मिळाली.
हिंदुस्थान झिंक चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले. निकाल असमाधानकारक होते.

आदित्य बिर्ला मनी चे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

राजनंदिनी मेटल्सचे चौथ्या तिमाहीचे निकाल ठीक होते.

‘VI’ च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर कुमार मंगलम बिर्ला यांची नॉनइंडिपेंडेंट, नॉनएक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नेमणूक झाली. ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांनी राजीनामा दिला

रिअल्टी, मेटल, ऑटो, बँकिंग , इन्फ्रा यांच्यात प्रॉफीटबुकिंग तर FMCG, फार्मा, आणि IT क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९६६९ NSE निर्देशांक निफ्टी १७६२१ बँक निफ्टी ४२०८१ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २० एप्रिल २०२३

आज क्रूड US $ ८२.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= ८२.२० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०१.९५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५९ तर VIX १२.२० होते.

USA मध्ये टेस्ला चे निकाल खराब आले. कंपनीने किमती कमी केल्या. मेटा, फेसबुक,डिस्नी पुन्हा LAY ऑफ देणार आहे. USA मध्ये कर्ज देण्यासाठी असलेले नियम कडक केले. रिअल इस्टेट रिफायनान्सिंगची मोठी समस्या आहे.
आज मास्टेकने त्यांच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यांचे प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढले. कंपनीने Rs १२ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

ICICI सिक्युरिटीज चे निकाल कमजोर आहे. प्रॉफिट आणि उत्पन्न कमी झाले. कंपनीने Rs ९.२५ लाभांश जाहीर केला. कंपनीचे फी आणि कमिशन इन्कम कमी झाले.

टाटा कम्युनिकेशन चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले. Rs २१ लाभांश जाहीर केला.

EMKAY ला म्युच्युअल फंडासाठी सेबीची मंजुरी मिळाली.

अल्ट्राटेक सिमेंटच्या पाटलीपुत्र येथील ग्राइंडिंग युनिटची क्षमता ४.७ MTPA केली. ब्राऊनफिल्ड एक्स्पान्शन २.२ MTPA केले. ग्रे सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी १२९.१५ MTPA आहे.
इक्विटास स्माल फायनान्स बँकेला फॉरीन एक्स्चेंज मध्ये डीलिंग करण्यासाठी RBI ने परवानगी दिली.
शक्ती पम्प ला युगांडा सरकारच्या वतीने एक्सिम बँकेकडून US $ १ मिलियन मिळाले कंपनी युगांडा मध्ये सोलर वॉटर पम्पिंग सिस्टिम्स सुरु केली.

टाटा मोटर्स EV मधील गुंतवणूक GBP १५ बिलियन ( US $ १९ बिलियन)पुढील ५ वर्षात करणार आहे. हॅलिवूड प्लांट पूर्णपणे EV उत्पादनासाठी राहील. रोव्हर SUV २०२५ मध्ये लाँच होईल.

बॉंबे बर्मा त्यांच्या टांझानियातील ३ चहाच्या मळ्यांची ३९५७एकर जमीन आणि त्यावरील प्रॉपर्टीज आणि असेट्स US $१.२ मिलियनला Udongo Wetu ला विकणार आहे

पुडुचेरी PWD कडून NBCC ला Rs २०८ कोटींची ऑर्डर मिळाली.

आयन एक्स्चेंजने आज एक शेअरचे १० शेअर्समध्ये स्प्लिटला मंजुरी दिली.

वेदांताने हिंदुस्थान झिंकचे १०.३२ कोटी तारण म्हणून ठेवले.

अबॉट लॅबचे निकाल चांगले आले.

बँक ऑफ महाराष्ट्र QIP रूटने Rs ७५०० कोटी उभारण्यावर विचार करेल.

ग्रॅव्हीटा त्यांच्या मुंद्रा ( गुजरात) येथील रिसायकलिंग प्लांटची क्षमता ४०५०० MTPA करणार आहे .

नाटको फार्माने इंडोनेशियामध्ये US $ ३० लाखांची गुंतवणूक करून सबसिडीअरी स्थापन केली.

एशियाना ने गुरुग्राम प्रोजेक्ट फेज २ मधील २२४ युनिट्स विकली.

झायड्स लाईफ च्या ‘METOPROLOL TARTRATE’ ला USFDA कडून मंजुरी मिळाली. या औषधाचे USA मध्ये US $ ४.५२ कोटींचे मार्केट आहे.हे उच्च रक्तदाबावरचे औषध आहे.

टेलिकॉम कंपन्यांनी ३ मार्च २०२३ पर्यंत देशात १,१६००० 5G टॉवर्स उभारले भारती एअरटेलने १९००० तर रिलायन्स जिओ ने ८२५०० टॉवर्स उभारले. ‘VI’ ने एकही टॉवर उभारला नाही.जिओ आणि भारती एअरटेलने प्रत्येकी ५० शहरांत 5G सेवा सुरु केली.

आज मेट्रो, कॅम्पस ऍक्टिव्हवेअर, लिबर्टी, बाटा, मिर्झा, खादिम या फुटवेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये उल्लेखनीय तेजी होती.तसेच आज होजियरी क्षेत्रातील रूपा,डॉलर, लक्स, पेज इंडस्ट्रीज, SP अपरल्स मध्ये ही तेजी होती. तसेच ओरिएंटल हॉटेलचे निकाल समाधानकारक आल्यामुळे हॉटेल्सचे शेअर वाढले.

ओरिएंट हॉटेलचे प्रॉफिट उत्पन्न उल्लेखनीयरित्या वाढले.

फोर्टिस हेल्थकेअर ‘MEDEOR हॉस्पिटल कडून मानेसर आणि गुरुग्राम येथील ३५० बेडच्या हॉस्पिटलचे Rs २२५ कोटींमध्ये अधिग्रहण करणार आहे.

TTK हेल्थकेअर च्या डीलीस्टिंगला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी मिळाली. हे डीलीस्टिंग Rs १०५१.३१प्रती शेअर या दराने होईल.

टाटा पॉवरने कोईम्बतूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन बरोबर भागीदारीमध्ये २० EV चार्जिंग स्टेशन्स टेक्सटाईल सिटीमध्ये लावण्यासाठी करार केला. आता चार्जिंग स्टेशनची संख्या ११६ होईल.

आज बँका इन्फ्रा मध्ये हलकी खरेदी झाली. हॉटेल्स होजियरी आणि फुटवेअर कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

फार्मा आणि FMCG मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९६३२ NSE निर्देशांक निफ्टी १७६२४ बँक निफ्टी ४२२६९ वर बंदझाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – १९ एप्रिल २०२३

आज क्रूड US $ ८२.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.६६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५८ आणि VIX होते.

USA मधील मार्केट्स फ्लॅट होती. नेटफ्लिक्स आणि गोल्डमन साखस चे निकाल खराब तर बँक ऑफ अमेरिका आणि लॉकहीड मार्टिनचे निकाल चांगले आले.

UK मध्ये महागाई १०.१% आली .

आज FII नी Rs ८१०.६० कोटींची विक्री तर DII नी Rs ४०१.६० कोटींची खरेदी केली.

प्रेस्टिज इस्टेटची सबसिडीअरी ‘प्रेस्टिज EXORA बिझिनेस पार्क’ ने ‘DASHANYA टेक पार्क मध्ये ५१% स्टेक Rs ६६.०७ कोटींना घेतला.

पीडिलाइट इंडस्ट्रीने USA मधील ‘BASIC ऍडहेसिव्हज LLC’ यांच्या बरोबर टेक्नॉलॉजी, डिझाईन, ट्रेडमार्क, कॉपीराईट, डोमेन नेम, आणि ट्रेंड ड्रेस हे खरेदी करण्यासाठी करार केला. याचे पेमेंट पीडिलाइट येत्या काही काळात हप्त्याहप्त्याने करणार आहे.

झायड्स लाईफला ‘ESTRADIOL TRANSDERMAL सिस्टीम’ याचे उत्पादन आणि विक्री USA मध्ये करण्यासाठी USFDA ने मंजुरी दिली. या प्रॉडक्ट चे उत्पादन गुजरातमध्ये मोरैय्या येथील प्लांट मध्ये होईल.

स्टेट बँक ऑफ इंडियाला US $ २ बिलियन उभारायला एक्झिक्युटिव्ह कमिटीने परवानगी दिली.
बँक ऑफ इंडिया Rs ६५०० कोटी भांडवल उभारणी करणार आहे.

टाटा कॉफी चे प्रॉफिट २०% ने वाढून Rs ४८.८ कोटी झाले. रेव्हेन्यू १०.२% ने वाढून Rs ७२३ कोटी झाला. मार्जिन २३० बेसिस पॉईंट कमी झाले.

वाढलेल्या प्रॉफीटमध्ये इतर उत्पन्न आणि कमी झालेली करआकारणी यांचा समावेश आहे. तसेच टाटा कॉफीचे व्हॉल्युम कमी झाले.

ICICI लोम्बार्डच्या प्रॉफीटमध्ये ४०%YOY ग्रोथ होऊन ते Rs ४३७ कोटी झाले. NPE ( नेट प्रीमियम अर्निंग्स ) १२.३% ने वाढून Rs ३७२६ कोटी झाले. एकूण उत्पन्न १३.३% ने वाढून Rs ५२५६ कोटी झाले. कंपनीने Rs ५.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

TTK हेल्थकेअर २० एप्रिल २०२३ रोजी व्हॉलंटरी डीलीस्टिंगवर विचार करेल.

‘I’ बॉण्डवरील कुपन रेट महागाई आणि व्याजाचे दर यांचा एकत्रित विचार करून ठरवलेले असतात. सध्या हा रेट ७% आहे. काम न करता, काही धोका न पत्करता ५% -७%फायदा मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना इक्विटी मार्केटमध्ये रस नाही.

डिझेल वर आता एक्स्पोर्ट ड्युटी लागणार नाही.

सरकारने डोमेस्टिक /लोकल क्रूड ऑइल वर Rs ६४०० प्रती टन एवढा कर बसवला. यामुळे ONGC, रिलायन्स HOEC आणि ऑइल इंडिया या ऑइल एक्स्प्लोरेशन कंपनीजवर प्रतिकूल परिणाम होईल.

चीन पाकिस्तान मध्ये हवामानामुळे तांदुळाचे पीक कमी झाले. त्यामुळे तांदुळाचे शॉर्टेज आहे. याचा फायदा KRBL , LT फूड्स यांना होईल.

वेलस्पन इंटरप्रायझेस मध्ये FII नी त्यांचा स्टेक वाढवला.

सोम डिस्टीलरीजने कर्नाटकात हसन येथे बीअरचे कमर्शियल उत्पादन सुरु केले. गोल्डमन साखस नी AVALON मध्ये ३.२५ कोटी शेअर्स खरेदी केले.

२०१० वर्षातील ZETIA ड्रग्सच्या बाबतीत असलेल्या वादांत ग्लेनमार्क नी मर्क बरोबर समझोता केला. ग्लेनमार्क मर्कला US $ ४.८ कोटी देईल.
आज BEML लँड ऍसेट चे BSE वर Rs २९० वर आणि NSE वर Rs २८७ वर लिस्टिंग झाले.

कमोडिटी मार्केटमध्ये इसबगोल चा वायदा सुरु झाला. इसबगोलचे उत्पादन २५ लाख टन होते.

मनकाईन्ड फार्मा चा Rs ४३०० कोटींचा IPO ( पूर्णपणे OFS ) २५ एप्रिल ला ओपन होऊन २७ एप्रिलला बंद होईल. कंपनी कॅशरीच आहे पण गुंतवणूकदारांना कंपनीतील गुंतवणुकीतून बाहेर पडण्याच्या दिलेल्या वचनानुसार IPO आणला आहे. IPO नंतर प्रमोटर्सचे होल्डिंग ७६.५% राहील. ८ मे ला शेअर्स डिमॅट अकाउंटमध्ये जमा होतील आणि ९ मे रोजी लिस्टिंग होईल.प्राईस बँड Rs १०२६ ते Rs १०८० आहे. ह्या कंपनीचे भारतात २५ प्लांट असून ४ R & D सेंटर आहेत.ही कंपनी कंडोम्स, प्रेग्नन्सी डिटेक्शन, इमर्जन्सी कॉंट्रासेप्टिव्ह्ज, ऍण्टासीड, व्हिटॅमिन आणि मिनरल सप्प्लीमेण्ट्स याचे डिझाईन, डेव्हेलपमेंट, उत्पादन आणि विक्री करते
झोमॅटोने BLINKIT साठी पेआऊटचे स्ट्रक्चर बदलले. १ ऑर्डरला Rs १५ आणि इन्सेन्टिव्ह दिली जाईल असे सांगितले. ब्लिंकिंट दिल्ली मध्ये डिलिव्हरी करत होते. तेथे आता झोमॅटोचा बिझिनेस वाढेल.

AU स्मॉल फायनान्स बँकेला फॉरीन एक्स्चेंज मध्ये ऑथोराइझ्ड डिलर म्हणून काम करण्यासाठी RBI ने लायसेन्स दिले.

पिरामल इंटरप्रायझेसचे शेअर कॅनडियन फंड विकत आहे.

आज मार्केट बंद होता होता सोने, चांदी, आणि क्रूड मध्ये मंदी आली.

ITC इन्फोटेक मेक्सिकोमध्ये सबसिडीअरी सुरु करणार आहे.

आज मेटल्स आणि फार्मा मध्ये तेजी तर IT आणि पॉवर मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९५६७ NSE निर्देशांक निफ्टी १७६१८ बँक निफ्टी ४२१५४ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – १८ एप्रिल २०२३

आज क्रूड US $ ८४.९० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.०० USA १० वर्ष बॉण्ड यिल्ड ३.५९ आणि VIX १२.०२ होते.

चीनचा GDP ग्रोथ रेट २.९% वरून YOY ४.५% आला.
चीनमध्ये सोडा ASH च्या किमती कमी झाल्या मंगोलियामध्ये SODA ASH चे उत्पादन वाढले. टाटा केमिकल्सचे SODA ASH हे प्रमुख प्रोडक्ट आहे. टाटा केमिकल्सने सोडा ASH च्या किमती ३-४% ने कमी केल्या त्यामुळे टाटा केमिकल्सचा शेअर पडला.
३ जुलै २०२३ पासून SGX निफ्टीचे काम गिफ्ट सिटीमधून होईल.

आज FII नी Rs ५३३ कोटीची विक्री तर DII नी Rs २६९ कोटींची खरेदी केली.

आज ICICI लोम्बार्ड, टाटा कॉफी, शेफलर, क्रिसिल, विवांता ह्या कंपन्या त्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

मे आणि जून २०२३ च्या पॉलिसी अनाउन्समेंट मध्ये फेड दरवाढ करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. २ वर्षाचे बॉण्ड यिल्ड ४.२०%च्या वर पोहोचले.
संवर्धन मदर्सनने दक्षिण कोरियाची ‘YOUNGSHIN’ बरोबरच्या JV मध्ये स्टेक वाढवला.

जस्ट डायलचे चे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

AVALON टेक्नॉलॉजीचे लिस्टिंग BSE वर Rs ४३१ आणि NSE वर Rs ४३६ वर झाले.

एंजल १ चे निकाल चांगले आले. ३०.४% YOY ग्रोथ झाली. रेव्हेन्यू २१.३% ने वाढला. मार्जिन ३१० बेसिसपाईण्ट वाढून ४६.६% झाले.

ज्युबिलण्ट फूडच्या सबसिडीअरीमध्ये कोकाकोला इंडियाने हॅशटॅग लॉयल्टी मध्ये १५% स्टेक Rs १०४.६८ कोटींना घेतला. त्यामुळे हॅशटॅग लॉयल्टी मधील ज्युबिलण्टचा स्टेक ३५% वरून २९.७५ % झाला.

V. पद्मनाभन यांना सुबेक्सच्या MDCEO पदावरून सेवानिवृत्त व्हायला सांगितले. ते सुबेक्समध्ये २५ वर्षे कार्यरत असून ३१ मार्च २०२४ मध्ये रिटायर होणार आहेत.

हाथवे फायद्यातून YOY तोट्यात गेली. मार्जिन ६८० बेसिस पाईंट कमी झाले.

कोलते पाटीलने २०६५० NCD जपानमधील मारूबेनी कॉर्पोरेशनला इशू केले यातून कंपनीला Rs २०६.५० कोटी मिळाले.

गोवा कार्बनच्या बिलासपूर प्लांटमध्ये कामकाज सुरु झाले.

जिंदाल स्टेनलेस स्टीलची आज स्पेशल लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कॉफीच्या किमती वाढत आहेत. टाटा कॉफीचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन असल्यामुळे त्यांना या वाढत्या किमतींचा फायदा होईल.

QUICK हेलचे चौथ्या तिमाहीचे निकाल खराब आले. शर्मा यांनी राजीनामा दिला.

BEML लँड ASSET या BEML मधून डीमर्ज झालेल्या कंपनीचे उद्या लिस्टिंग होईल. तुमच्याजवळ BEML च्या असलेल्या प्रत्येक शेअरमागे नवीन कंपनीचा १ शेअर दिला आहे.

EU, जपान आणि तैवान यांच्या कडून आयात होणाऱ्या IT आणि कम्युनिकेशन प्रोडक्ट वर भारत सरकारने लावलेल्या इम्पोर्ट ड्युटी विरुद्ध WTO ( वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) कडे तक्रार केली होती WTO ने त्यांच्या बाजूने निकाल दिला. आता भारत सरकार या WTO च्या निकालाविरुद्ध अपील करणार आहे.

टाटा एलेक्सि ने गौहाटी IIT बरोबर EV टेक्नॉलॉजीसाठी करार केला.

शेफलर या कंपनीचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन मात्र कमी झाले.

क्रिसिलचे उत्पन्न प्रॉफिट वाढले मार्जिन कमी झाले कंपनीने Rs ७ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

ऍक्सिलीया चे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

अलंकार्गो लॉजिस्टिक्स त्यांचा बिझिनेस तीन विभागात विभागणी करणार आहे. या रेस्ट्रक्चरिंग स्कीम अंतर्गत तीन कंपन्या बनवून त्यांचे लिस्टिंग केले जाईल. या साठी १८ एप्रिल ही एक्स डेट निश्चित केली आहे. अल कार्गो लॉजिस्टिक्स, अल कार्गो टर्मिनल्स , आणि ट्रान्स इंडिया रिअल्टी आणि लॉजिस्टिक पार्क्स या नावाने तीन कंपन्या बनतील.

अलंकार्गो च्या ज्या शेअरहोल्डर्सच्या नाव १८ एप्रिल रोजी कंपनीचे शेअर्स असतील त्यांना नव्या दोन कंपनीचे शेअर्स १;१ याप्रमाणं दिले जातील.

इंटरग्लोबचा हवाई प्रवासाच्या मार्केटमध्ये मार्केटशेअर वाढला तर स्पाईस जेटचा मार्केट शेअर कमी झाला.

आज एनर्जी, इन्फ्रा, FMCG मध्ये दबाव तर फार्मा आणि रिअल्टीमध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९७२७ NSE निर्देशांकनिफ्टी १७६६१ बँक निफ्टी ४२२५९वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – १७ एप्रिल २०२३

आज आज क्रूड US $ ८६.४० च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.०० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०१.६५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५२ आणि VIX १२.९० होते.

USA मध्ये सिटी बँक JP मॉर्गन यांचे निकाल सुंदर आले. रिटेल सेल्स १% ने कमी झाले. डिझेलची विक्री कमी होऊ लागली.

FII नी Rs २२२ कोटींची खरेदी तर DII नी Rs २७४ कोटींची विक्री केली.

इन्फोसिसचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. कंपनीने Rs १७.५० प्रती शेअर एवढा लाभांश जाहीर केला. त्यांनी फ्युचर गायडन्स ही कमी केला. इन्फोसिसचा ADR १०% खाली होता.

HDFC बँकेचा निकाल त्यांच्या ख्यातीनुसार चांगला आला.प्रॉफिट YOY १९.८% वाढले. Rs १२०४७ कोटी झाले. NII २४% वाढले. Rs २३३५२ कोटी झाले.NPA कमी झाले. लोन ठेवीत वाढ झाली. बँकेने Rs १९/- लाभांश जाहीर केला.

झी एंटरप्रायझेस मध्ये ५.६५% स्टेक Rs २०० ते Rs २०८ प्रती शेअर दरम्यान ओपनहायमर ने ब्लॉक डील दवारा Rs १११४ कोटींना विकला. ओपनहायमर कंपनी मधून पूर्णपणे बाहेर पडले.

टाटा मोटर्स काही पॅसेंजर व्हेइकल्सच्या किमती १ मे २०२३ पासून ०.६% ने वाढवणार आहे.

GTPL ला YOY तोटा झाला पण QOQ फायदा वाढला.

मॅक्स हेल्थकेअर पटपडगंज मध्ये हॉस्पिटल सुरु करणार आहे. EQOVA हेल्थमध्ये Rs ६८.८६ कोटींमध्ये कंपनीने ३४% स्टेक वाढवला.

झायड्स लाईफच्या ‘ISOPROTERENOL’ ला USFDA ची मंजुरी मिळाली.

अशोक लेलँड्सला १५६० ट्रकस साठी VRL लॉजिस्टिककडून ऑर्डर मिळाली.

इन्फिनिटी डायरेक्ट होल्डिंग्स आणि इन्फिनिटी डायरेक्ट होल्डिंग्स साईड कार यांनी कॅम्लिन फाईन सायन्सेसमध्ये २६% स्टेक साठी Rs १६० प्रती शेअरने ओपन ऑफर आणली आहे.

मारुतीने नवीन पेट्रोल CNG व्हरायन्ट LCV सुपर कॅरी मिनी ट्रक Rs ५.३० लाख आणि त्यापेक्षा जास्त किमतीला लाँच केला.

ICICI बँक २२ एप्रिल २०२३ रोजी शेअर्स बायबॅक वर विचार करेल.

मार्चमध्ये WPI १.३४% या २९ महिन्यांच्या किमान स्तरावर होता. फेब्रुवारीमध्ये हा ३.८५% होता.

वेदांताने २० दक्षिण कोरियन कंपन्यांबरोबर ‘ग्लास आर्म डिस्प्ले’ करण्यासाठी करार केला. म्हणून शेअर तेजीत होता.

ज्युबिलण्ट इंग्रेव्हीया या कंपनीने गुजरात मधील भरूच येथे नवीन ‘असेटीक ANHYDRIDE’चा प्लांट सुरु केला.

मॉन्टेकार्लो ची विक्री ३६% ने YOY वाढली.त्यामुळे शेअर तेजीत होता.

GENSOL इंजिनीअरिंग या कंपनीने सांगितले की त्यांचे उत्पन्न १४४% ने वाढेल. Rs १६० कोटींवरून Rs ३९१ कोटी होईल.

KIOCL ला कर्नाटकामध्ये शिमोगा, कलबुर्गी,येथे माइनिंगसंबंधात Rs ३८१ कोटींची एक्स्प्लोरेशन प्रोजेक्ट मिळाली.

फिलिप्स कार्बन ब्लॅकने यूरोपमध्ये बेल्जीयम मध्ये एक सबसिडीअरी चालू केली.

बँकिंग, एनर्जी, PSU,FMCG ऑटो, रिअल्टी या क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.

फार्मा आणि IT क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९९११ NSE निर्देशांक निफ्टी १७७०२ बँक निफ्टी ४२२२०७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !