आज क्रूड US $ ७३.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.६० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.०६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.६७ आणि VIX १२.१० होते. चीनचा मॅन्युफॅक्चरिंग PMI ४८.८ आणि सर्व्हिस PMI ५४.५ आले. USA चे अध्यक्ष बिडेन यांनी सांगितले की युगांडाला US १ बिलियन देण्याचा प्रस्ताव आहे.
क्रूडचे दर कमी होत आहेत. कारण क्रूडचा पुरवठा वाढत आहे.
HDFC लाईफ मधील ABARDEENने त्यांचा १.६६% स्टेक बल्क डील च्या माध्यमातून Rs ५६३ ते Rs ५८५ प्रती शेअर या दरम्यान विकला .
सोना BLW या कंपनीचा MSCI निर्देशांकात समावेश होणार आहे. या कंपनीतील ३.२५ % स्टेकचे Rs ५०० प्रती शेअर भावाने विक्रीचे Rs ९५० कोटींचे ब्लॉक डील झाले .
अडाणी पोर्टचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. कंपनीने Rs ५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला
टोरंट फार्मा ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
पतंजली फूड्स चे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
ग्राफाईट या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल कमजोर आले.
कोल इंडिया नॉनकोकिंग कोलच्या किमती ८% ने वाढवणार आहे. यामुळे कोल इंडियाला Rs २७०३ कोटींचे वाढीव उत्पन्न मिळेल.
ल्युपिनने ‘ENZENE बायो सायन्सेस’ बरोबर CENTUXIMAB हे औषध भारतात लाँच करण्यासाठी करार केला.
माझगाव डॉक्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
डिक्सन टेक्नॉंलॉजीने ‘XIAOMI INDIA’ बरोबर भारतात मोबाईल फोन उत्पादन आणि निर्यातीसाठी करार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
बिर्ला सॉफ्टने bCloud+ इंटरप्राइजसाठी लाँच केले.
बायोकॉनला कॅन्सर वरील औषधासाठी API सर्टिफिकेट मिळाले.
पूनावाला फिनकॉर्प ला RBI ने त्यांचा हाऊसिंग फायनान्स आर्म विकायला परवानगी दिली.
JSW स्टील विजयनगर ही तिच्या ऑटोमोटिव्ह स्टील प्रॉडक्ट उत्पादन करणाऱ्या युनिटला ‘ग्रीन प्रो एकोलेबल’ मिळवणारी पहिली कंपनी झाली.
लँडमार्क कार्सला ‘MG मोटर्स इंडिया’ कडून भोपाळ आणि इंदूर मध्ये डिलरशिप ओपन करण्यासाठी LOI मिळाले.
सुझलॉन एनर्जी चौथ्या तिमाहीत YOY तोट्यातून फायद्यात आली.
भारत सरकारने वेदांत रिसोर्सेस आणि तैवानच्या ‘HON HAI प्रिसिजन इंडस्ट्रीज कंपनी यांच्या २८-नॅनोमीटर चिप्स प्रोजेक्टला इन्सेन्टिव्ह देण्यास नकार दिला.
हिमाद्री केमिकल्सने ‘SICONA बॅटरी टेक’ या ऑस्ट्रेलियन कंपनी बरोबर करार करून गुंतवणूक केली.
बँक ऑफ बरोडाने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन साठी टेक महिंद्रा बरोबर करार केला.
ल्युपिनला USFDA कडून ‘OBETICHOLIC TABLET’ साठी मंजुरी मिळाली.
BPCL च्या R & D सेंटरमुळे फ्युएल उद्योगात नवीन शोध लागले आणि सुधारणा झाल्या तसेच बरीचशी पेटंट्स मिळाली.
आज फार्मा, FMGC, रिअल्टी मध्ये खरेदी झाली.एनर्जी मेटल्स बँकिंग मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६२६२२ NSE निर्देशांक निफ्टी १८५३४ बँक निफ्टी ४४१२८
वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !