आज क्रूड US $ ७७.०० प्रती बॅरल तर रुपया US $१= Rs ८२.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.३८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.४३ आणि VIX १३.२२ होते.
USA मधील महागाई कमी झाली. महागाई ४.९% (५%) आली. हाऊसिंग महागाई सुद्धा कमी झाली. २ वर्षात प्रथमच महागाई ५% पेक्षा कमी आली.
FII ने Rs १८३३ कोटींची खरेदी तर DII नी Rs ७८९ कोटींची विक्री केली.
कॅनरा बँक, BHEL, GNFC, मनापूरम फायनान्स बॅनमध्ये होते
एशियन पेंटचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट Rs ८७४ कोटींवरून YOY १२५८.४० कोटी झाले. उत्पन्न Rs ७८९२ कोटींवरून Rs ८७८७.३० कोटी YOY झाले.व्हॉल्युम ग्रोथ डबल डिजिट झाली. मार्जिन YOY १८.३% वरून २१.२% झाले डोमेस्टिक आणि डेकोरेटिव्ह पेन्ट्स मध्ये १६% व्हॉल्युम ग्रोथ झाली. कंपनीने Rs २१.२५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
NEULAND लॅबचे निकाल चांगले आले. प्रॉफिट चौपट झाले. उत्पन्न वाढले मार्जिन YOY १५.२% वरून २९.५ % झाले.
आदित्य बिर्ला कॅपिटलचे प्रॉफिट, उत्पन्न वाढले.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे प्रॉफिट, NII वाढले, GNPA आणि NNPA कमी झाले.
सॅनोफी त्यांचा हेल्थकेअर बिझिनेस ज्यात त्यांचे ALLEGRA, COMBIFLAM, DePURA, AVIL आणि इतर ब्रॅण्ड्स असतील . या कंपनीचे नाव सॅनोफी कन्झ्युमर हेल्थकेअर इंडिया लिमिटेड असे असून ही सॅनोफीची १००% सबसीडीअरी असेल. गेल्या वर्षी हेल्थकेअर बिझिनेसचे उत्पन्न Rs ७२८ कोटी असून एकूण उत्पन्नात शेअर २८% होता.म्हणून आज सॅनोफीच्या शेअरमध्ये Rs ५०० ची तेजी होती.
अजमेरा रिअल्टीजचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले कंपनीने Rs ३ लाभांश जाहीर केला.
ALKYL अमिन्स चे प्रॉफिट Rs ४९ कोटी तर उत्पन्न Rs ४१२ कोटी होते. कंपनीने rS १० फायनल लाभांश जाहीर केला.
लाल पाथ लॅबचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले , कंपनीने Rs ६ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
बलरामपूर चीनीचे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढले. निकाल चांगले आले.
DR रेड्डीज चे मार्जिन २५% ते ३०% राहील प्रोडक्ट लाईनचा आवाका वाढवण्याचा प्रयत्न करेल.
डिजिटलायझेशन आणि इनोव्हेशन मध्ये गुंतवणूक करत राहू. काही प्रॉडक्टस चा मार्केटशेअर वाढू शकतो. DR रेड्डीज चे प्रॉफिट ११ पट वाढले. Rs ९५९ कोटी झाले.
रेव्हेन्यू १६% वाढून Rs ६२६७ कोटी झाला. नॉर्थ अमेरिका २७% युरोप १२% आणि इंडिया बिझिनेस ३२% ने वाढला.
सोयाबीन आणि सनफ्लॉवर ऑईलच्या आयातीवरील इम्पोर्ट ड्युटी आणि अग्रिसेस मध्ये सरकारने सूट दिली ही सूट ३० जून २०२३ पर्यंत लागू राहील.
HDFC इन्व्हेस्टमेंट आणि HDFC होल्डिंग यांच्या HDFC मध्ये मर्जरला आणि नंतर HDFC च्या HDFC बँकेमध्ये मर्जरला आणि HDFC AMC चे व्यवस्थापन आणि कंट्रोल HDFC बँकेकडे ठेवायला RBI ने परवानगी दिली.
L & T चे निकाल अपेक्षेपेक्षा कमजोर आले. प्रॉफिट १०% ने वाढून Rs ३९८७ कोटी झाले. उत्पन्न १०% ने वाढून Rs ५८३३५ कोटी झाले.
गुजरात गॅसचे निकाल चांगले आले प्रॉफिट उत्पन्न वाढले.
CSB बँकेने सतीश गुंडेवार यांची चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून नेमणूक केली. दिवाकर हे ४ जूनला पद सोडतील.
हिंदाल्को चे नेट इन्कम US $ १५६ मिलियन झाले ( २७% ने कमी झाले) , ऑपरेशनल इन्कम ७% ने कमी झाले. EBITDA US $ ४०३ मिलियन ( ६% कमी झाले )
HG इन्फ्राचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
सागर सिमेंट तोट्यातून फायद्यात आली.
साऊथ इंडियन बँकेचे प्रॉफिट वाढले NII वाढले GNPA आणि NNPA कमी झाले. निकाल चाणफळे आले.
HAL चा MSCI निर्देशांकात समावेश होण्याची शक्यता आहे.
आज FMCG, बँका,सिमेंट,फार्मा मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१९०४ NSE निर्देशांक निफ्टी १८२९७ बँक निफ्टी ४३४७५ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
share करा पण क्रेडिट देऊन !