आज क्रूड US $ ७४.६० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १=Rs ८२.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.०५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.३७ आणि VIX १३.१५ होते.
आज सोने, चांदी, आणि बेस मेटल्स (कॉपर, अल्युमिनियम, झिंक) मंदीत होते.
आज FII नी Rs ८३७ कोटींची खरेदी तर DII नी Rs २०० कोटींची विक्री केली. आजपासून MSCI निर्देशांकाचे रिबॅलन्सिंग लागू होईल. MAX हेल्थ, सोना BLW आणि HAL यांचा निर्देशांकात नव्याने समावेश होईल. इंडस टॉवर्स, अडानी ट्रान्समिशन, अडाणी टोटल यांना निर्देशांकातून वगळले. इंडीगो, झोमॅटो, कोटक महिंद्रा बँकेचे वेटेज वाढले. NMDC स्टील, पॉवर मेक, RVNL यांचा निर्देशांकात समावेश केला. तर थायरोकेअर , दिलीप बिल्डकॉन, जिलेट यांना वगळले.
ONGC ला मुंबई ऑफशोअर MT २ ब्लॉक मध्ये ऑइल आणि गॅस मिळाला त्यांची नावे ‘अमित’ आणि ‘MOONGA ‘ अशी ठेवली.
M & M चे उत्पादन १८.५% ने वाढून ५८६४४ युनिट झाले. विक्री ४०.९% ने वाढून ६०४८१ युनिट झाली. निर्यात ३२.९% ने कमी होऊन १८१३ युनिट झाली.
जय भारत मारुती हरयाणामध्ये खारखोडा सोनेपत येथे आणि गुजराथमध्ये SMG सप्लायर पार्क येथे नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट लावणार आहे. कंपनी Rs ३०० कोटी ते Rs ३५० कोटी गुंतवणूक करणार आहे.
आयशर मोटर्स चा फायदा ४८.५% ने वाढून Rs ९०५.६० कोटी झाले. उत्पन्न १९.१% ने वाढून Rs ३८०४.३० कोटी झाले. कंपनीने Rs ३७ प्रतिशेअर लाभांश जाहीर केला.
सिमेन्सचा फायदा ३८.८% ने वाढून Rs ४७१.६० कोटी तर रेव्हेन्यू २७.८% ने वाढून Rs ४८५८ कोटी झाले. एकूण ऑर्डर्स Rs ३११५१ कोटींच्या झाल्या.
D-मार्ट, AFFLE, डेटा पॅटर्न नवीन फ्लोरिन NEOGEN सोनाटा सॉफ्ट वेअर, ऍडव्हान्स एंझाइम आज त्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
USA मध्ये प्रशासनाला DEBT CEILING ची मर्यादा पार होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासन त्यांच्या पार्लमेंटला DEBT CEILING वाढवण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. जॉबलेस क्लेम मध्ये वाढ झाली २६४००० ने. ऑक्टोबर २०२१ नंतर प्रथमच एवढे जॉब लेस क्लेम आले.
कर्नाटक हायकोर्टाने गेम्सक्राफ्टवर GST आकारण्यासंबंधित बाब रद्द केली. याचा फायदा डेल्टा कॉर्प आणि ऑन मोबाईल ग्लोबल यांना होईल.
मँगलोर केमिकल्सचे निकाल चांगले आले. साऊथ इंडियन बँक, सफायर, झेन टेक यांचे निकाल चांगले आले.
टेक्समॅको रेल चे प्रॉफिट Rs ५.४कोटींवरून Rs १८ कोटी झाले. उत्पन्न Rs Rs ४४७ कोटींवरून Rs ८३५ कोटी झाले. मार्जिन ६.३% वरून ६.६% झाले.
ओरिएंट इलेक्ट्रिकचे निकाल असमाधानकारक होते.
वेदांताचे प्रॉफिट Rs ६०२७ कोटींवरून Rs २६३४ कोटी तर उत्पन्न Rs ३९३४२ कोटींवरून Rs ३७२२५ कोटी आणि मार्जिन ३३.४% वरून २३.५% एवढे झाले. निकाल कमजोर आले.
अंबुजा सिमेंट भाटपारा आणि मराठा युनिटची क्लिंकर उत्पादन क्षमता ८० लाख टन करणार आहे.
कॅपलिन पाईंट ला त्यांच्या ‘KETOROLAC TROMETHAMINE’ या इंजेक्शन साठी USFDA ची मंजुरी मिळाली.
टाटा पॉवरची सबसिडीअरी TP SAURYA राजस्थानात बिकानेर येथे २०० MW क्षमतेचे सोलर प्रोजेक्ट लावणार आहे.
HAL चे YOY प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
राणे होल्डिंगचा तोटा वाढला उत्पन्न वाढले. कंपनीने Rs १७ लाभांश जाहीर केला.
ग्रीव्हज कॉटनचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले कंपनीने Rs ०.९० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
पॉली कॅब चे निकाल चांगले आले प्रॉफिट Rs ४२८.४ कोटी उत्पन्न Rs ४३२३.७० कोटी आणि मार्जिन १४.१% होते. कंपनीने Rs २० लाभांश दिला.
सिप्ला चे प्रॉफिट Rs ५२६ कोटी उत्पन्न Rs ५७३९.०० कोटी होत. कंपनीने Rs १८२ कोटी वन टाइम लॉस बुक केला. सिप्लाने Rs ८.५० लाभांश जाहीर केला.
एशियन पेन्ट्सच्या व्यवस्थापनाने सांगितले की मेट्रो, टायर II आणि टायर III सिटीजमध्ये त्यांच्या प्रोडक्टसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिअल्टी आणि बिल्डिंग उद्योगात ग्रोथ झाली. प्रीमियम सेगमेंट प्रॉडक्टमध्ये डबल डिजिट ग्रोथ आहे. वॉटर प्रूफिंग आणि होम डेकोर सेगमेंटला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिटेल, B-२- B, आणि इंडस्ट्रियल सेगमेंटमध्ये चांगली मागणी आहे. कंपनीला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कमी होत आहेत. कंपनीच्या होम डेकोर प्रोडक्टसची ५० स्टोर्समधून विक्री होत आहे.
किचन हार्डवेअर आणि बाथ मध्ये प्रतिसाद चांगला आहे. कंपनीने काही प्रोडक्टसच्या किमती कमी केल्या आहेत.
आज मेटल, पॉवर, ऑइल & गॅस या क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले. ऑटो, बँका, FMCG आणि फार्मा मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६२०२७ NSE निर्देशांक निफ्टी १८३१४ बँक निफ्टी ४३७९३ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !