आज क्रूड US $ ७४.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.३० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०२.६८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.४६ आणि VIX १३.१४ होते.
USA मधील कन्झ्युमर सेंटीमेंट ६ महिन्याच्या किमान स्तरावर आले. ते ५७.७% झाले. हाऊसहोल्ड स्पेंडिंग ५.४% ने कमी झाले. डॉलर निर्देशांक १०२ च्यावर गेला.
भारतामध्ये एप्रिल महिन्यासाठी CPI ( कन्झ्युमर प्राईस इंडेक्स ) ४.७ आले तर मार्च महिन्यासाठी IIP १.१ आली( IIP फेब्रुवारीमध्ये ५.६% होते ).
-०.९२% एवढा एप्रिल २०२३ साठी WPI आला.
आज FII नी Rs १०१४ कोटींची खरेदी तर DII नी Rs ९२२ कोटींची विक्री केली.
डेल्टा कॉर्प, GNFC, PNB, कॅनरा बँक, BHEL, मनापूरम फायनान्स बॅन मध्ये होते.
D-मार्ट चे प्रॉफिट ७.८% वाढून Rs ४६० कोटी झाले. पण मार्जिन ०.४० पाईंट कमी झाले. उत्पन्न २०.६% ने वाढून Rs १०५९४ कोटी झाले.
अडानी इंटरप्राईस Rs १२००० कोटींचा QIP करणार आहे.
अडाणी ट्रान्समिशन Rs ८५०० कोटींचा QIP करणार आहे. हा कंपनी ASM मधुन बाहेर आली.
HPCL चे प्रॉफिट ८०% ने वाढून ९ वर्षात सर्वात जास्त म्हणजे Rs ३२२३ कोटी झाले. उत्पन्न ८.७% ने वाढून १.१४ लाख कोटी झाले.
DLF चे प्रॉफिट ४०.६% ने वाढून Rs ५७० कोटी झाले. उत्पन्न ६% ने कमी होऊन Rs १४५६ कोटी झाले.
बिर्ला कॉर्पला मध्य प्रदेश मधील कटनी येथील ८,८९७६० हेक्टर एवढ्या जागेवरील मायनिंग अधिकार मिळाले.
हिरोमोटोने मोटोस्पोर्ट S A COSTARICA या कोस्टारिकामधील कंपनीबरोबर भागीदारी केली.
नवीन फ्लोरिंनचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने Rs ७ प्रती शेअर फायनल लाभांश जाहीर केला.
सरकारने जाहीर केले की संरक्षणखात्याशी संबंधित ९३८ उपकरणे आता आयात केली जाणार नाहीत. त्यामुळे संरक्षण खात्याशी संबंधित कंपन्या उदा BDL BEL गार्डन रिच शिपबिल्डर्स HAL यांना काँट्रॅक्टस मिळण्याची शक्यता आहे.
DLF अडवान्सड एंझाइम, अमि ऑर्गनिक्स , यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
IGL चे रिझल्ट कमजोर आले.
हिकलच्या पनोली युनिटला USFDA ने कोणत्याही त्रुटीशिवाय फॉर्म ४८३ दिला.
सेंच्युरी प्लायवूड चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
वॉस्कॉन इंजिनीअरिंगचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
सुबेक्स ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली.
करूर वैश्य बँकेचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले GNPA आणि NNPA कमी झाली. बँकेने Rs २ लाभांश जाहीर केला.
SBC एक्सपोर्टस या कंपनीला स्टेटबँकेकडून ८४,३९,३३६ लोकांसाठी ऑर्डर मिळाली. कल्याण ज्युवेलर्सचे प्रॉफिट कमी झाले,उत्पन्न वाढले. कंपनीला २ एअरक्राफ्ट विक्रीचे Rs ३३.३५ कोटी उत्पन्न झाले.
DR रेड्डीजच्या श्रीकाकुलम प्लाण्टला USFDA ने ४ त्रुटी दाखवल्या.
उदयपूर सिंचाई विभागाकडून RVNL ला Rs ६७५ कोटींच्या काँट्रॅक्टसाठी LOA मिळाले
आज ऑटो, इन्फ्रा, PSE, IT, रिअल्टी, FMCG आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६२३४५ NSE निर्देशांक निफ्टी १८३९८ बँक निफ्टी ४४०७२ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
share करा पण क्रेडिट देऊन !