आज क्रूड US $ ७५.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.२०च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.३९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.४९ आणि VIX १३.२१ होते.
USA मध्ये डाऊ जोन्स NASDAQ आणि S & P ५०० हे तिन्ही निर्देशांक तेजीत होते.
सरकारने विंडफॉल टॅक्स Rs ४१०० वरून शून्य केला. याचा फायदा ONGC, ऑइल इंडिया, रिलायन्स आणि HOEC ला होईल.
अल्ट्राटेक सिमेंटने राजस्थानमध्ये नवीन युनिट कमिशन केले
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, व्हेसुव्हिअस यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
FII नी Rs १६८५.२९ कोटींची खरेदी आणि DII नी Rs १९१.२० कोटींची खरेदी केली.
डेल्टा कॉर्प, GNFC, PNB,BHEL आज बॅन मध्ये होते.
बर्गर पेंट्स चे चे प्रॉफिट YOY १६% ने कमी होऊन Rs १८५.७० कोटी तर उत्पन्न YOY ११.७% ने वाढून Rs २४४३.६० कोटी झाले.ऑपरेटिंग मार्जिन कमी झाले.
कंपनीने Rs ३.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
कोरोमंडेल इंटरनॅशनलचे प्रॉफिट YOY १५% ने कमी होऊन Rs २४६.४४ कोटी झाले तर रेव्हेन्यू २९.५% YOY ने वाढून Rs ५४७६.०० कोटी झाला. ऑपरेटिंग मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ६ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
PVR INOX या कंपनीला Rs ३३३.४० कोटी तोटा झाला. रेव्हेन्यू Rs ११४३.२० कोटी झाला मार्जिन २३.१% असून वन टाइम लॉस Rs १०.८ कोटींचा बुक केला.
HDFC बँकेच्या HDFC कॅपिटल अडवायझर्सच्या कंट्रोल आणि व्यवस्थापनातील बदलाला सेबी ने मंजुरी दिली.
फायझर चे प्रॉफिट ३% YOY वाढून Rs १२९.६५ कोटी झाले तर रेव्हेन्यू ४.२% ने वाढून Rs ५७२.६४ कोटी झाले. मार्जिन १७० बेसिस पाईंट वाढून ३१.८% झाले.कंपनीने Rs ३५ फायनल आणि Rs ५ स्पेशल लाभांश जाहीर केला.
ASTRAL चे प्रॉफिट YOY ४५.५% ने वाढून Rs २०५.७० कोटी झाले. रेव्हेन्यू YOY ८.३% ने वाढून Rs १५०६.२० कोटी झाले. प्लम्बिंग बिझिनेसमध्ये ३.६% तर ऍडेसिव्हज बिझिनेस मध्ये २५% वाढ झाली.
बँक ऑफ बरोडाचे प्रॉफिट Rs १७७९ कोटींवरून Rs ४७७५ कोटी झाले. NII Rs ११५२५ कोटी झाले. NPA कमी झाले. बँकेने Rs ५.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केले. ग्रनुअल्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs १.५० प्रतिशेअर लाभांश जाहीर केला.
कजरिया सिरॅमिक्सचे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ३ लाभांश जाहीर केला.
IOC ला Rs १००५८.६० कोटी प्रॉफिट झाले रेव्हेन्यू २.०२ लाख कोटी झाला मार्जिन ७.६% राहिले कंपनीने Rs ३ लाभांश जाहीर केला.
ज्युबिलण्ट इंग्रेव्हिया या कंपनीचे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले.
मॅक्स हेल्थ चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
ITC आणि गॉडफ्रे फिलिप्स ने सिगारेटच्या किमती ३% ते ५% ने वाढवल्या.
एन्ड टू एन्ड अप्लिकेशन सेवांसाठी ब्रिटिश पेट्रोलियम कडून इन्फोसिसला ऑर्डर मिळाली.
HDFC म्युच्युअल फंडाच्या डिफेन्स कंपन्यांवर आधारित म्युच्युअल फंडाचा NFO सुरु झाला आहे.
TV टुडे चे प्रॉफिट आणि उत्पन्न कमी झाले.
मुकुंद चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले.
पारस डिफेन्सने सोसायटी ऑफ अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग रिसर्च बरोबर MOU केले.
रिलायन्स ने सोमवारपासून डिझेलच्या किमती कमी केल्या.
SKF इंडियाने ‘क्लीन मॅक्स टाईयो’ बरोबर २६२६७ शेअर्स किंवा २६% स्टेक साठी शेअर होल्डिंग अग्रीमेंट केले.
MPS चे निकाल चांगले आले. कंपनीने Rs २० लाभांश जाहीर केला.
आज ऑटो, इन्फ्रा, बँकिंग, मेटल्स, FMCG, एनर्जी या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. IT क्षेत्रातील शेअर्समध्ये मामुली खरेदी झाली
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१९३२ NSE निर्देशांक निफ्टी १८२८६ बँक निफ्टी ४३९०३ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
share करा पण क्रेडिट देऊन !