आजचं मार्केट – १७ मे २०२३

आज क्रूड US $ ७४.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.४० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.५८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५२ आणि VIX १३.१२ होते.

आज FII नी Rs १४०६ कोटींची खरेदी केली तर DII ने Rs ८८६ कोटींची विक्री केली.

बलरामपूर चिनी, मन्नापुरं फायनान्स, डेल्टा कॉर्प, GNFC आणि PNB बॅन मध्ये आहेत.

USA मध्ये ‘DEBT CEILING’ चा प्रश्न गंभीर होतो आहे. अध्यक्ष बिडेननी ऑस्ट्रेलियाचा दौरा रद्द केला. USA आणि चीन मध्ये काहीसा तणाव आहे. होम डेपो चे निकाल खराब आले.

भारती एअरटेल चे प्रॉफिट ५०% ने वाढून Rs ३००६ कोटी झाले. रेव्हेन्यू १४.३% कमी होऊन Rs ३६००९.०० कोटी झाले. कंपनीने Rs ४ लाभांश दिला. अर्पुज वाढून Rs १९३ झाले. ७.४ मिलियन नवे कस्टमर जोडले. टोटल सब्सक्राइबर ३७५ मिलियन झाले.

अंबर चे प्रॉफिट ८२% वाढून Rs १०४ कोटी झाले. रेव्हेन्यू ५५% वाढून Rs ३००२.६० कोटी झाले.
ओबेराय चे प्रॉफिट १०६.७% वाढून ४८०.३० कोटी झाले. रेव्हेन्यू १६.८ % वाढून Rs ९६१.४ कोटी झाले.

BPCL ला इथिलिन क्रॅकर प्रोजेक्ट बिना रिफायनरीत सुरु करायला परवानगी दिली.Rs ४९००० कोटी खर्च करणार. Rs ९७८ कोटी खर्च करून २ ‘५० MW’ चे विंड पॉवर प्लांट लावणार आहे. एक मध्य प्रदेशात आणि दुसरा महाराष्ट्रात लावणार आहे.

JK पेपर चे प्रॉफिट १५% ने कमी होऊन Rs २८३.५२ कोटी झाले रेव्हेन्यू ४.६% वाढून Rs १७१९ कोटी झाले.

जिंदाल स्टील आणि पॉवर चा फायदा ६९.५ % कमी होऊन Rs ४६५.६६ कोटी झाले. रेव्हेन्यू ४.५% ने कमी होऊन Rs १३६९२ कोटी झाला. कंपनीने Rs १५३ कोटी वन टाइम लॉस बुक केला.

झायडस लाईफ च्या ‘EPHEDREN SULPHATE’ या इंजेक्शनला USFDA ची अंतिम मंजुरी मिळाली.

देवयानी इंटरनॅशनलचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

झायड्स वेलनेस चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले कंपनीने Rs ५ लाभांश जाहीर केला.

DAP आणि MOD यांच्यावरील फर्टिलायझर सबसिडी ३५% पर्यंत कमी होईल. एक एप्रिल पासून ही nutrient बेस्ड सबसिडी सप्टेंबर २०२३ पर्यंत चालू राहील.

IT हार्डवेअर साठी PLI २ स्कीममध्ये Rs १७००० कोटींची तरतूद केली. ही सबसिडी ८ वर्षापर्यंत लागू होईल.

अडाणी हिंडेन बुर्ग खटल्यात सुप्रीम कोर्टांने सेबीला तज्ज्ञ समितीचा रिपोर्ट १५ ऑगस्टपर्यंत सादर करायला सांगितला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलै २०२३ रोजी होईल.

ज्युबिलण्ट फुड्सचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन २०.१% (२५%) राहिले. लाईक फॉर लाईक ग्रोथ -०.६% राहिली. कंपनीने Rs १.२० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

रामको सिमेंटचा तोटा वाढला उत्पन्न वाढले.

हेस्टर बायोसायन्सेसचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

अनुप इंजिनीअरिंगचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.

स्टरलाईट टेक्नॉलॉजी YOY तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. Rs १ अंतिम लाभांश जाहीर केला. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने Rs १००० कोटी इक्विटी द्वारे उभारण्यासाठी मंजुरी दिली.

राणे मद्रासने त्यांची ‘राणे लाईट मेटल कास्टिंग’ ही सबसिडीअरी विकण्याचा निर्णय घेतला आहे.

चीनमधून आयात होणाऱ्या फुटवेअर कच्च्या मालावरची इम्पोर्ट ड्युटी २०% वरून १०% करण्याची मागणी,. आताच्या १२% GST कमी करून ५% करण्याची मागणी. चीनमधून आयात होणाऱ्या स्वस्त फुटवेअरसाठी किमान आयात किंमत लावण्याची मागणी फुटवेअर सेक्टरमधील कंपन्यांनी केली आहे.

एरिस लाईफसायन्सेस चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

दीपक फर्टिलायझर्सचा फायदा कमी झाला, उत्पन्न वाढले, कंपनीने Rs १० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

तिरुमलाई केमिकल्स फायद्यातून तोट्यात गेली. उत्पन्न कमी मार्जिन कमी झाले. Rs १.५० लाभांश जाहीर केला.

आज रिअल्टी, IT, मेटल्स, एनर्जी, बँकिंग आणि फार्मा या क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. ऑटो आणि FMCG मध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१५६० NSE निर्देशांक निफ्टी १८१८१ बँक निफ्टी ४३६९८ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.