आज क्रूड US $ ७६.५० प्रती बॅरलच्या च्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.८६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.५६ आणि VIX १२.८९ होते.
USA च्या DEBT CEILING बाबत वाटाघाटीतून तोडगा निघू शकेल.असे वाटल्याने आज USA च्या मार्केटमध्ये तेजी होती. तसेच तिसर्या तिमाहीपासून रेटकट होईल असे मार्केटला वाटते.
FII नी १४९.३३ कोटींची खरेदी तर DII नी २०३.८७ कोटींची विक्री केली.
आज सोने, चांदी, आणि बेस मेटल्स मध्ये मंदी होती.
SBI फंडस् मॅनेजमेंटला HDFC बँकेत ९.९९% स्टेक घेण्यासाठी RBI ने परवानगी दिली.हा स्टेक घेण्यासाठी ६ महिन्याची मुदत दिली आहे.
वेदांत फॅशन्स चे प्रमोटर रवी मोदी १.६९ कोटी शेअर्स म्हणजेच ७ % स्टेक OFS द्वारा विकणार आहे. यासाठी फ्लोअर प्राईस Rs ११६१ ठेवली आहे. ६९.८७ लाख शेअर्स किंवा २.८८% स्टेक जादा विकण्याचे ऑप्शन आहे.
लेमन ट्री या कंपनीने लखनौ मध्ये ८२ रूम्सची मालमत्ता विकत घेण्यासाठी करार केला. लेमन ट्री प्रीमियर या ब्रॅण्डखाली ही खरेदी होईल.
JSW स्टील ही कंपनी महाराष्ट्रातील सुरजगढ येथील ४ आयर्न ओअर ब्लॉक्स साठी प्रिफर्डबिडर झाले.
REC चा नफा ३३% वाढून Rs ३०६५ कोटी झाले रेव्हेन्यू ६.३% वाढून Rs १०२४३ कोटी झाले. कंपनीने Rs ८.२५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
थरमॅक्स चे प्रॉफिट ५२.३% ने वाढून Rs १५६.२ कोटी तर रेव्हेन्यू १६%ने वाढून Rs २३१० कोटी झाले. कंपनीने Rs १० प्रती शेअर लाभांश दिला.
NHPC ला गुजरात ऊर्जा विकास निगम कडून २०० MW सोलर प्रोजेक्ट साठी Rs १००८ कोटींची ऑर्डर मिळाली.
Paytm ने SBI कार्ड आणि NPCL बरोबर कोब्रांडेड RUPAY क्रेडिट कार्ड लाँच करण्यासाठी करार केला.
रेस्टारंट ब्रँड एशिया मधील त्यांचा स्टेक एव्हरस्टोन विकणार आहे. ज्युबिलण्ट फूड्स आणि अडव्हेंट जनरल अटलांटिकलाही हा स्टेक विकत घेण्यात स्वारस्य आहे.
फायझर ने MAGLEX आणि MAGNAMICIN यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगवर बंदी घातली.
क्लीन सायन्सेस चे प्रॉफिट, उत्पन्न मार्जिन वाढले निकाल चांगले आले.कंपनीने Rs ३ लाभांश जाहीर केला.
SHALBY चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले निकाल कमजोर आले.
वेदान्त २२ मे २०२३ रोजी इंटरीं लाभांशावर विचार करेल.
इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड नुमालीगढ रिफायनरीज मध्ये राईट्स इशू दवारा अमोनिया प्रोडक्ट प्रोजेक्ट च्या विस्तारासाठी Rs १३५ कोटी गुंतवण्याची शक्यता आहे.
झायड्स लाईफ चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ६०१ कोटींचा वन टाइम लॉस बुक केला. Rs ६ लाभांश जाहीर केला.
श्रेयस शिपिंग चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन सर्व कमी झाले Rs १.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
PSP प्रोजेक्टसचे प्रॉफिट कमी झाले कंपनीने Rs २.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
SBI चे प्रॉफिट Rs ९११३ कोटींवरून Rs १६६९५ कोटी झाले. NII Rs ४०३९२ कोटी तर NIM ३.५०% होते प्रोव्हिजन Rs ७२३७ कोटींवरून Rs ३३१५ कोटी केली.
GNPA ३.१४% वरून २.७८% तर NNPA ०.७७% वरून ०.६७% झाले.बँकेने Rs ११.३० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
GAIL चे प्रॉफिट Rs ६०४ कोटी तर उत्पन्न Rs ३२८४३ कोटी झाले. मार्जिन ०.९% होते. अरविंद चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
IPCA च्या पिपरिया युनिटच्या तपासणीत USFDA ने ३ त्रुटी दाखवल्या.
व्हील्स इंडियाचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
टॉरंट फार्माच्या दहेज युनिटची तपासणी USFDA ने सुरु केली.
ITC चे प्रॉफिट Rs ४१९१ YOY वाढून Rs ५०८७ कोटी झाले. उत्पन्न Rs १६३९८ कोटी झाले. EBITDA Rs ६२०९ कोटी आणि EBITDA मार्जिन ३७.९% होते. सिगारेटपासून उत्पन्न १४% वाढून Rs ६४३३ कोटींवरून Rs ७३५६ कोटी झाले. हॉटेल बिझिनेसचे उत्पन्न १०१% ने वाढून Rs ३८० कोटींवरून Rs ७८२ कोटी झाले.
Rs ६.७५ +२.७५ स्पेशल लाभांश कंपनीने जाहीर केला.
ओरिएंट पेपर तोट्यातून फायद्यात आली.
GNFC चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न कमी झाले. कंपनीने Rs ३० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
LT फूड्स चे प्रॉफिट वाढले मार्जिन आणि उत्पन्न वाढले. निकाल चांगले आले.
रामको सिमेंटचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
PNB हाऊसिंगचे निकाल ठीक आले. कंपनीने Rs ९ लाभांश दिला.
इंडीगो ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. कंपनीला Rs ९१९.२० प्रॉफिट ( -Rs १६८१ कोटी ) झाले. उत्पन्न Rs १४१६० कोटी ( Rs ८०६०.०० कोटी ) झाले. कंपनीने Rs ३ लाभांश जाहीर केला.
आज रिअल्टी, मेटल्स, पॉवर, फार्मा FMCG आणि ऑटो मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१४३१ NSE निर्देशांक निफ्टी १८१२९ आणि बँक निफ्टी ४३७५२ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
share करा पण क्रेडिट देऊन !