आज क्रूड US $ ७६.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.४६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.६४ आणि VIX १२.४० होते.
जपानमधील महागाई वाढली.
FII ने Rs ९७० कोटींची खरेदी तर DII ने Rs ८४९ कोटींची विक्री केली.
RBI ने Rs ८७४१६ कोटी सरप्लस सरकारकडे ट्रान्स्फर केले.
रेटगेन चे प्रॉफिट, उत्पन्न आणि मार्जिन वाढले.
अरविंद स्मार्टप्लेसेस चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs १.६५ फायनल लाभांश जाहीर केला.
WPIL चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
रूट मोबाईल चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले. कंपनीने Rs २ फायनल लाभांश जाहीर केला.
विनती ऑर्गनिक्सचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
मिंडा कॉर्प चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
बंधन बँकेचे प्रॉफिट NII कमी झाले.NPA कमी झाले
सीमेन्स त्यांचा WINDAR RENOVABLES मधील ३२% स्टेक US $ ७०० मिलियनला विकणार आहे. तसेच MASS TECH CONTROLS यांची EV डिव्हिजन अकवायर करणार आहे.
दिलीप बिल्डकॉन चा तोटा वाढला, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
अल्केम लॅबचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs १०३ कोटींचा वन टाइम लॉस बुक केला. कंपनीने Rs १० लाभांश जाहीर केला.
RPSG व्हेंचर्स फायद्यातून तोट्यात गेली. उत्पन्न वाढले.
DB कॉर्प चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
वेस्टकोस्ट पेपर चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, कंपनीने Rs १० लाभांश जाहीर केला.
मदर्सन वायरिंग चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
ताज GVK चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
किर्लोस्कर ऑइल चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले. कंपनीने Rs २.५० लाभांश जाहीर केला.
ओलेक्ट्रा ग्रीन टेकला २१०० EV बसेस साठी BEST कडून ऑर्डर मिळाली.
NMDC च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने ADNOC लॉजिस्टिक्स आणि सर्व्हिसेसच्या IPO ला सबस्क्राईब करण्यासाठी मंजुरी दिली.
सुझलॉन एनर्जीला ६९+MW ( ३ MW सर्व्हिसेस) साठी नॉर्डिक एनर्जी कंपनीकडून ऑर्डर मिळाली.
गोवा कार्बनच्या ओडिशामधील पारादीप युनिटमध्ये काम सुरु झाले.
DGCA ने स्पाईस जेटच्या ३ विमानांचे रजिस्ट्रेशन रद्द केले. ५ विमाने डिरजिस्ट्रेशन लिस्ट मध्ये टाकले.
नजारा टेकची सबसिडी NODWIN गेम्स ने नजारा , साऊथ कोरियन क्रॅफ्टन, सोनी ग्रुप, INNO पार्क इंडीया, आणि जेट सिन्थेसिस कडून Rs २३२ कोटी उभारण्यासाठी करार केला.
NEXUS SELECT TRUST चे BSE वर Rs १०२.२७ वर आणि NSE वर Rs १०३ वर लिस्टिंग झाले. या ट्रस्ट युनिटची इशू प्राईस Rs १०० होती.
युनायटेड स्पिरिट्स चे प्रॉफिट ७.४%ने वाढून Rs २०४ कोटी तर रेव्हेन्यू ०.३% ने कमी होऊन Rs २४९४ कोटी झाला. रिअलायझेशन चांगले झाले.
बाटा, PI इंडस्ट्रीज, टाटा एलेक्सि, इंडिगो, थॉमस कुक,KIMS, सिरमा SG चे निकाल चांगले आले.
फायझरने मॅग्नेक्स, मॅग्नामायसिन , झोसिन ही औषधे कॉल बॅक केली.
विप्रोने ‘सर्व्हिस NOW’ बरोबर ५ वर्षे बिझिनेस पार्टनरशिप करार केला.
RVNL ने इंदूर MMLP आणि MP इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बरोबर JV करणार आहे.
त्यामुळे मल्टी नोडल लॉजिस्टिक्स पार्क पॅन इंडिया लेव्हलवर करणार.
ग्लॅन्ड फार्माचे निकाल असमाधान कारक होते. कंपनीच्या शेअरला खालचे सर्किट लागले.
NDR ऑटो कॉम्पोनंट २३ मे २०२३ रोजी बोनस इशूवर विचार करेल.
JSW स्टिलचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले कंपनीने Rs ३.४० लाभांश जाहीर केला.
TER ( टोटल एक्सपेन्सेस रेशियो ) संबंधित कन्सल्टेशन पेपर सेबीने प्रसिद्ध केला.सेबीने सांगितले आहे की TER मध्ये ट्रान्झॅक्शन कॉस्ट आणि GST यांचा समावेश करावा. नॉनइक्वीटी आणि इक्विटी AUM मध्ये TER चे डिस्ट्रिब्युशन करावे. महिला इन्व्हेस्टर्सना प्रेफरन्स मिळेल हे बघावे. शक्यतो सर्व म्युच्युअल फंदांचा TER सारखा असावा. TER शिवाय म्युच्यूअलफंडाने शक्यतो इतर चार्जेस लावू नयेत बी-२ शहरातील म्युच्युअल फंड प्रसारकांना परफॉर्मन्स चार्जेस देता येतील. यामुळे निप्पोन AMC , आदित्य बिर्ला AMC, UTI AMC, आणि HDFC AMC चे शेअर्समध्ये मंदी आली
सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचा रिपोर्ट प्रसिद्ध केला. अडाणी ग्रुपमध्ये २४ जानेवारीपासून रिटेल पार्टीसिपेशन वाढले. हिंडेनबुर्ग रिपोर्ट प्रसिद्ध होण्याआधी काही जणांनी अडानी ग्रुपच्या शेअर्समध्ये शॉर्टींग केले होते. किमतीतील चढउतारांमध्ये रेग्युलेटरी फेल्युअर दिसत नाही. MPS नियमांचे उल्लंघन झाले नाही.
सेबीने केलेल्या नियमांच्या पालनासाठी एन्फोर्समेंट एजन्सीची नेमणूक करावी.
सेबी लवकरच इन्सायडर ट्रेसिंग साठी कन्सल्टेशन पेपर प्रसिद्ध करणार आहे. या पेपर मध्ये ‘इन्सायडर’ आणि अनपब्लिश्ड सेन्सिटिव्ह इंफॉर्मेशनची व्याख्या विस्तृत करण्याचा सेबी विचार करत आहे. आणि अशा प्रकारची इन्फॉर्मेशन २४ तासात द्यायला हवी असा नियम करणार आहे.
आज IT रिअल्टी ऑटो मेटल्स इन्फ्रा PSU बॅंक्स या क्षेत्रात खरेदी झाली तर फार्मा आणि PSE या क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE इंडिया निर्देशांक सेन्सेक्स ६१७२९ NSE निर्देशांक निफ्टी १८२०३ आणि बँक निफ्टी ४३९६९ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !