आजचं मार्केट – २२ मे २०२३

आज क्रूड US $ ७५.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= ८२.८० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.२१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.६५ आणि VIX १२.६९ होते.

USA मध्ये ‘DEBT CEILING’ वाढवण्यासाठी वाटाघाटी चालू आहेत. रिपब्लिकन पक्षाचा आग्रह आहे की सरकारने येत्या काही वर्षात मल्टी इयर स्पेंडिंग कमी करणे आवश्यक असेल.

सध्या तरी गुंतवणूकदार इक्विटी मधून DEBT मार्केट मध्ये जात आहेत.

FII ने Rs ११३ कोटींची विक्री तर DII नी Rs १०७१ कोटींची खरेदी केली.

सेबी वायदामध्ये कुलिंग पिरियड १ तास करण्याच्या विचारात आहे तर आता IPO लिस्टिंग होण्याची मुदत ३ दिवस करण्याची शक्यता आहे.

आज थंगमाईल ज्वेलरी या कंपनीने १:१ बोनस आणि Rs ६ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. कंपनीचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले. निकाल चांगले आले.

स्टार हेल्थ ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली.

SPARC या कंपनीचा तोटा वाढला उत्पन्न वाढले.

टाटा मोटर्स ने ‘अल्ट्रोज चे CNG व्हरायन्ट’ Rs ७.७७+लाख किमतीला लाँच केले.

डिव्हीज लॅबचे निकाल कमजोर आले.

हिंदुस्थान कॉपरचे प्रॉफिट उत्पन्न वाढले.

बालाजी अमाईन्स चे प्रॉफिट आणि उत्पन्न कमी झाले.

नील कमल चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

गतीचा तोटा कमी झाला, उत्पन्न वाढले.

व्हॅलिएंट ऑर्गॅनिकचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले
ग्लेनमार्क लाईफ फायद्यातून तोट्यात गेली. उत्पन्न वाढले.

नारायण हृदयालयचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

JTEKT चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.

गो फर्स्ट च्या बाबतीत NCLT चा मोरॅटोरियम चा निर्णय योग्य ठरवला आता कंपनीला कर्ज देणारे कंपनीची विमाने जप्त करू शकणार नाहीत.

कोची शिप यार्डचे निकाल असमाधानकारक होते.

BEL चे निकाल चांगले आले.

CESC चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

JK लक्ष्मी सिमेंट चा फायदा ४०.१% ने कमी होऊन Rs ११० कोटी झाला. रेव्हेन्यू १६.४% ने वाढून Rs १८६२ कोटी झाला. सेल्स व्हॉल्युम ३% ने वाढून ३३.८८ लाख टन झाले.
NTPC चे प्रॉफिट १% वाढून Rs ५६७२ कोटी झाले. रेव्हेन्यू २०.३% ने वाढून Rs ४१३१८ कोटी झाले. NTPC ने Rs ४.२५ लाभांश जाहीर केला.

झोमॅटो चा तोटा कमी झाला Rs ३५८.७ कोटींवरून Rs १८७.६ कोटी झाला. टॉपलाइन वाढली. ऑपरेटिंग लॉस कमी झाला. रेव्हेन्यू ७०% ने वाढून Rs २०५६ कोटी झाला.

पॉवर ग्रीड चे प्रॉफिट ४% ने वाढून Rs ४३२० कोटी झाले. रेव्हेन्यू १४.७% ने वाढले कंपनीने Rs ४.७५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

DELHIVERY ला Rs १५८.६ कोटी लॉस झाला. रेव्हेन्यू १०.२% ने कमी होऊन Rs १८६० कोटी झाले.

श्रेयस शिपिंग व्हॉलंटरी डीलीस्टिंग करण्याची शक्यता आहे.
विश्वराज शुगरने शिवसागर शुगर आणि त्यांचे ऍग्री प्रोडक्टस खरेदी करण्यासाठी प्रस्ताव दिला.

सोम डिस्टिलरीने ओडिशा प्लांटसाठी कार्ल्सबर्ग (इंडिया ) बरोबर करार केला.

शिल्पा मेडिकेअरच्या हैदराबादमधील ANALYTICAL सर्व्हिसेस डिव्हिजनच्या GMP तपासणीत USFDA ने VAI ( व्हॉलंटरी ऍक्शन इनिशिएटेड) रिपोर्ट दिला.

HAL ने ड्रोन्सचे उत्पादन वाढवण्यासाठी JV केले.
BSNL ने 4G डिप्लॉयमेंट साठी TCS ला Rs १५००० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट दिले.

आज मेटल, IT, फार्मा, रिअल्टी आणि PSE मध्ये खरेदी झाली.

बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१९६३ NSE निर्देशांक निफ्टी १८३१४ बँक निफ्टी ४३८९७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.