आजचं मार्केट – २४ मे २०२३

आज क्रूड US $ ७७.७० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १ =८२.६० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.५० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.६९ होते.

USA मध्ये NASDAQ १.२६% पडला. २ मे नंतर सर्वात जास्त USA ची मार्केट्स पडली.

FII नी Rs १८२ कोटींची खरेदी तर DII नी Rs ३९७ कोटींची खरेदी केली.

आज डेल्टा कॉर्प, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स हे शेअर बॅन मध्ये होते.

वेदांतानी US $ ८५ कोटी एवढी रक्कम ‘JP मॉर्गन ओक ट्री’ यांच्या कडून उभारली. त्यांना जंक रेटेड बॉंड्सचे पेमेंट US $ ५० कोटी महिनाअखेर पर्यंत करायचे आहे.

लिंडे इंडियाने Rs १२ फायनल आणि Rs ७.५० स्पेशन लाभांश जाहीर केला.

TVS श्रीचक्र Rs ३२.०५, ऍक्झॉ नोबल Rs ४० , TTK हेल्थकेअर ने Rs १० फायनल लाभांश जाहीर केला.

मार्च महिन्यात CGQ ने Rs १५४४६ कोटीची गुंतवणूक केली होती. ब्लूमबर्गप्रमाणे त्याची व्हॅल्यू Rs २३१२६ कोटी होते.
जैन यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची गुंतवणूक Rs २८७०० कोटी आहे. त्यांनी नव्याने गुंतवणूक केली आहे.

JSW एनर्जी चे प्रॉफिट ६८.५% ने कमी झाले. उत्पन्न ९.४% ने वाढून Rs २६७० कोटी झाले.

श्रीराम प्रॉपर्टिने चेन्नईच्या प्रोजेक्टचे १००% डेव्हलपमेंट राईट्स मिळविले १.९ मिलियन SQ फीट एवढा सेलिएबल एरिया आहे. येत्या ५ वर्षात Rs १२०० कोटी उत्पन्न मिळेल.
विप्रोने गूगल क्लाउड बरोबर भागीदारी वाढवली.

महिंद्रा CIE मधील त्यांचा ३.२३% स्टेक M & M ने Rs ४४७.६५ प्रती शेअर या दराने Rs ५८० कोटींना ब्लॉक डील च्या माध्यमातून विकला.

अशोक लेलँड, डिक्सन टेक्नॉलॉजी, बायोकॉन, वरून बिव्हरेजीस, स्नायडर इलेक्ट्रिकल्स लिंडे इंडिया, श्रीराम प्रॉपर्टीज, गॅब्रिएल, फेज थ्री,बिकाजी यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

थायरोकेअर , JSW एनर्जी जॉन्सन हिताची (फायद्यातून तोट्यात.) तामिळनाडू पेट्रो, ओरिएंट बेल यांचे निकाल कमजोर होते.

दीपक नायट्रेटची सबसिडीअरी दीपक केमिकल टेक्नॉलॉजीने गुजरात सरकारबरोबर केमिकल प्लांन्ट उभारण्यासाठी आणि Rs ५००० कोटी गुंतवणूक करण्यासाठी करार केला.

ऍंथोनी WASTE चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले.

सुजलॉनला टॉरंट पॉवर कडून ३००MW साठी ऑर्डर मिळाली.

पॉलिप्लेक्सचे प्रमोटर्स २४.३% स्टेक Rs १३८० कोटी विकणार आहेत.

इंडिया सिमेंटने Rs ११४ कोटींचा वन टाइम लॉस बुक केला. तोटा वाढला.

अवंती फीड्स प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले.

सीमॅक ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली.

हिंदाल्को फायदा कमी झाला Rs ३ लाभांश दिला
कमिन्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले कंपनीने Rs १३ लाभांश जाहीर केला.

हिताची एनर्जी प्रॉफिट कमी झाले उत्पन्न आणि मार्जिन वाढले.

AFFLE इंडिया ने YOUAPPI INC हे अकवायर करण्यासाठी US $ ३५.४४ मिलियनचा करार केला.
इरकॉन चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले. कंपनीने Rs १.२० लाभांश जाहीर केला.

GRAVITA ने पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथे रबर रिसायकलिंग प्लांट मध्ये कमर्शियल उत्पादन सुरु केले.

आज फार्मा FMCG मध्ये खरेदी तर मेटल्स, IT इंफ्रामध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेंसेक्स ६१७७३ NSE निर्देशांक निफ्टी १८२८५ बँक निफ्टी ४३६७७ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.