आज क्रूड US $ ७८.७० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.७० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.०० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.७४ आणि VIX १२.५८ होते.
USA मधील DEBT CEILING चा प्रश्न अजून सुटला नाही. फीच ने USA चे रेटिंग कमी करण्याचा इशारा दिला. फीच ने सांगितले की सध्याचे AAA रेटिंग कमी करू.
UK मधील महागाई निर्देशांक ८.७ % आला आहे. महागाई कमी झाली.
आज FII नी Rs ११८५ कोटींची खरेदी तर DII नी नी Rs ३००.९३ कोटींची खरेदी केली.
१ जून पासून औद्योगिक गॅसच्या किमती Rs ३८.४३/SCM एवढ्या होतील.
हॉकिन्स ने Rs १०० लाभांश दिला.
कोल इंडियाचे ऑक्शन २७ जुलैपर्यंत पुढे ढकलले.
Nvidia चा शेअर २५% वाढला.ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये वापरण्यात येणारी चिप्स बनवते.
सॅकसॉफ्ट टेक्नॉलॉजी यांचे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढले.
हिंदवेअर चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
ग्रॅन्युअल्समध्ये इन्फॉर्मेशन सिक्युरिटी इन्सिडन्ट झाला.
४ ते ५ आठवड्यात HDFC आणि HDFC बँकेचे मर्जर होईल.
हिंदुस्थान झिंकचा ३.३% स्टेक वेदांताने तारण म्हणून ठेवला.
शक्ती पंप्सनी शक्ती मोबिलिटी EV मध्ये गुंतवणूक केली.
सोनाटा सॉफ्टवेअरने मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक लाँच करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट बरोबर करार केला.
PTC इंडस्ट्रीज च्या AEROLLOY टेक्नॉलॉजी युनिटला इस्राएल एअरोस्पेस इंडस्ट्रीने मान्यता दिली.
इंगरसोल रँड चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
कंपनीने Rs २० लाभांश जाहीर केला.
स्ट्राइड्स ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली. उत्पन्न वाढले.
संधार टेक्नॉलॉजी चे प्रॉफिट, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
IRFC चे प्रॉफिट कमी झाले.
भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांची DUOPOLI स्ट्रॅक्चर फॉर्म होत आहे.
Macquarie ने Rs १००० चे टार्गेट दिले आहे.
सुवेंन फार्माचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
BDL चा फायदा उत्पन्न कमी झाले. Rs १.२० प्रती शेअर लाभांश दिला.
DCM श्रीराम चे प्रॉफिट, उत्पन्न वाढले.
नारायण हृदयालयने नारायणा हेल्थ इन्शुअरन्स ही सबसिडीअरी सुरु केली.
कॅपिटल फूड बरोबर नेस्ले आणि ITC यांची बोलणी चालू आहेत.chings सिक्रेट आणि स्मिथ अँड जोन्स फूड इन्ग्रेडियंटस हे प्रोडक्टस आहेत. Rs ४००० ते Rs ५००० कोटींची बोली आहे.
JB केमिकलने १ शेअरचे २ शेअर्समध्ये स्प्लिट केले.
विप्रोने इंजिनीअरिंग Edge बिझिनेस लाईन आणि स्पार्टन रडार यांच्या बरोबर ऍडव्हान्स व्हेईकल सोल्युशन्ससाठी करार केला.
BL कश्यप एन्ड सन्स या कंपनीला इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस कडून Rs १३२ कोटींची ऑर्डर मिळाली. आता कंपनीचे एकूण ऑर्डर बूक Rs २६५० कोटी झाले.
गार्डन रिच शिपबिल्डर्स चा फायदा १७% ने तर रेव्हेन्यू १०% ने वाढला. इंडियन नेव्ही बरोबर १० ( ३० MM ) नेव्हल सरफेस गन विथ इलेक्ट्रा ऑप्टिकल फायर कंट्रोल सिस्टीम आणि अम्युनिशन सप्लाय साठी Rs २४८.५१ कोटींचा करार केला
इन्फोसिस ने डिजिटल वर्कफोर्स ह्या ऑनलाईन प्लॅटफार्मला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी ‘अडोबे’ बरोबर करार केला.
ऑइल इंडिया चे प्रॉफिट २.४% ने वाढून Rs १७८८ कोटी रेव्हेन्यू ०.४% ने वाढून Rs ५३९८ कोटी झाला. कंपनीने Rs ५.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
LIC चे प्रॉफिट Rs १३४२८ कोटी झाले. नेट प्रीमियम इन्कम कमी होऊन Rs १.३१ लाख झाले. LIC ने Rs ३ लाभांश जाहीर केला.
पेज इंडस्ट्रीजचे प्रॉफिट ५९% कमी झाले. रेव्हेन्यू कमी झाले. कंपनीने Rs ६० लाभांश जाहीर केला यासाठी रेकॉर्ड डेट २ जून असून २३ जूनपर्यंत लाभांश तुमच्या खात्यात जमा होईल.
नाल्को चे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले.
रिअल्टी, FMCG, इन्फ्रा क्षेत्रात खरेदी तर ऑटो मेटल्स आणि IT मध्ये मामुली खरेदी झाली. बँकिंग आणि एनर्जी मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६१८७२ NSE निर्देशांक निफ्टी १८३२१ बँक निफ्टी ४३६८१ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !