आजचं मार्केट – २६ मे २०२३

आज क्रूड US $ ७६ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.६० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.१४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८२ आणि VIX ११.९८ होते.

USA मधील जॉबलेस क्लेमचे आकडे चांगले आले.

GDP चे आकडे १.३% म्हणजे चांगले आले. फेडची १३ -१४ जून २०२३ या दोन दिवशी बैठक आहे.

FII नी Rs ५८९ कोटींची खरेदी आणि DII नी Rs ३३८ कोटींची खरेदी केली.

जून सीरीज साठी रोलओव्हर ७०% म्हणजे चांगले झाले.

SAIL, पेज इंडस्ट्रीज, झी एंटरटेनमेंट ( फायद्यातून तोट्यात ),VI (तोटा कमी झाला,) यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल कमजोर आले.

प्राज इंडस्ट्रीज ने IOC बरोबर ५०-५० JV केले. बायोफ्युएल प्रोडक्शन फॅसिलिटी सेट अप करणे मार्केटिंग करणे, CBC इथेनॉल SAF चे उत्पादन करणे. दोघेही ५०%-५०% गुंतवणूक करतील. प्राज इंडस्ट्रीजचे प्रॉफिट ५३% वाढले रेव्हेन्यू २१% ने वाढले.

रिलायन्स रिटेल ने लोटसमध्ये ५१% स्टेक Rs ७४ कोटींना घेतला.

ITD सिमेंटेशन, बेक्टर फूड्स, मेडप्लस, ज्युपिटर वॅगन्स,रॅडिको खेतान,AIA इंजिनीअर्स, GMM फौडलर,इंजिनीअर्स इंडिया चे चौथ्या तिमाहीचे निकाल सुंदर आले.

HOEC, ज्युबिलण्ट इंडस्ट्रीज ह्या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या.

ASTER DM त्यांचा गल्फ व्यवसाय विकणार आहेत. UFO मुव्हीज चा तोटा कमी झाला.

टॉरंट फार्माच्या दहेज प्लांटच्या तपासणीत USFDA ने ३ त्रुटी दाखवल्या.

रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्टस ने जनरल मिल्स बरोबर करार केला.

औरोबिंदो फार्माच्या ‘CARBOPROST TROMETHAMINE’ या इंजेक्शनला USFDA ची मंजुरी मिळाली.

श्री सिमेंट कच्छ मध्ये ग्रीनफिल्ड सिमेंट प्लांटसाठी मायनिंग लीज घेणार आहे.

MPHASIS ने KOREA-AI बरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला.

अडाणी विल्मर फॉर्च्युन ब्रँड दवारा WHOLE WHEAT च्या क्षेत्रात पदार्पण करणार ही त्यांची गोल्ड स्टॅंडर्ड विथ ऑस्टेरिटी आणि प्युरिटी प्रॉडक्टस असतील.

न्यूक्लिअस सॉफ्टवेअरचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. कंपनीने Rs १० लाभांश जाहीर केला.

अंबिका कॉटन चे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले कंपनीने Rs ३५ लाभांश दिला.

स्नोमन लॉजिस्टिक्स तोट्यातून फायद्यात आली, उत्पन्न वाढले.

NCLAT ने NCLT ची BSE आणि NSE यांना झी एंटरटेनमेंट मर्जरवर पुनर्विचार करण्यासाठी काढलेली ऑर्डर रद्द केली आणि प्रकरण पुन्हा NCLT कडे वर्ग केले.

KPI ग्रीनचे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढले.
संवर्धना मदर्सनचे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढले.

PG इलेक्ट्रोप्लास्ट चे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

M & M चे प्रॉफिट YOY Rs १२७० कोटींवरून Rs १५५० कोटी झाले. उत्पन्न YOY Rs १७२३८ कोटींवरून Rs २२५७१ कोटी झाले. मार्जिन वाढले कंपनीने Rs ५१२ कोटींचा वन टाइम लॉस बुक केला.कंपनीने Rs १६.२५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

इन्फोएज चा तोटा वाढला उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

व्होल्टास तामिळनाडूमध्ये प्लांट लावण्यासाठी Rs ५०० कोटी गुंतवणार आहे.

राईट्स आणि PFC यांनी ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टीक्ससाठी करार केला.

ग्रासिमचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

पॉवर मेक चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

BEML चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले. कंपनीने Rs ५ लाभांश जाहीर केला.

गेटवे डिस्ट्रिपार्क चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

सन फार्मा तोट्यातून फायद्यात आले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

सुप्रिया लाईफ सायन्सेस चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.

आज फार्मा ऑटो अँसिलिअरी, IT ऑटो, मेटल्स, FMCG या क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६२५०१ NSE निर्देशांक निफ्टी १८४९९ बँक निफ्टी ४४०१८ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.