आज क्रूड US $ ७७.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.६० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.१९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८१ आणि VIX १२.३२ होते.
USA मार्केटमध्ये AI संबंधित कंपन्या NVIDIA ,मारवेल, मायक्रोसॉफ्ट, टेस्ला, APPLE, आणि अल्फाबेट या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. NASDAQ तेजीत होते.
FII ने Rs ३५० कोटींची खरेदी तर DII नी Rs १८४० कोटींची खरेदी केली.
कर्नाटक बँक( Rs ५ प्रती शेअर लाभांश ) गॉडफ्रे फिलिप्स ( Rs ४४ प्रती शेअर लाभांश ),पूर्वाकारा, भारत बिजली, TCI, कॅपॅसिटे इन्फ्रा, हर्क्युलस होईस्ट,, इंडिगो पेंट्स, PFC, एव्हलॉन टेक, मेदांता यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
चंबळ फर्टिलायझर्स, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, ऑरोबिंदो फार्मा, केमकॉन , आयनॉक्स विंड, सन टेक रिअल्टी, GMR इन्फ्रा चे चौथ्या तिमाहीचे निकाल कमजोर होते.
ICRA ( Rs १३० प्रती शेअर लाभांश ) चे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
सन फार्मा ‘टॅरो फार्मा’ चे १०० % अक्विझिशन पूर्ण करणार. हा स्टेक US $३८ प्रती शेअर या भावाने म्हणजे CMP ला ३१.२ प्रीमियमने घेणार आहे.
BHEL चा फायदा ३३% ने कमी होऊन Rs ६११ कोटी झाला, रेव्हेन्यू २% वाढून Rs ८२२७ कोटी झाले.
क्लीन सायन्सेस चे प्रमोटर त्यांचा ३.५% स्टेक ओपन मार्केटमध्ये २९ मे ते ३० जून दरम्यान विकणार आहेत. सध्या प्रमोटरकडे ७८.५% स्टेक आहे तो ७५% करण्यासाठी हा स्टेक विकणार आहे.
इंजिनीअर्स इंडिया चे प्रॉफिट १४०% वाढून Rs १९० कोटी तर रेव्हेन्यू ७.६% वाढून Rs ८८० कोटी झाला.
NCC चे प्रॉफिट कमी झाले. ( पूर्वीच्या प्रॉफीटमध्ये वन टाइम गेन होता ) रेव्हेन्यू ४२.३% वाढून Rs ४९४९ कोटी झाला.
ONGC चे निकाल कमजोर आले. कंपनीला Rs २४७.७० कोटी लॉस झाला. रेव्हेन्यू ५.९% कमी होऊन Rs ३६२९३ कोटी झाला. कंपनीने वन टाइम लॉस Rs ९२३५ कोटी बुक केला.
दालमिया सिमेंट ३.६ MTPA क्लिंकरायझेशन क्षमतेचे युनिट उमरंगसो येथे Rs ३६४२ कोटी आणि ग्राइंडिंग युनिट २.४MTPA चे श्री लंकेत लावणार आहे.
ल्युपिन फार्मा कॅनडाला कॅनडा हेल्थ कडून स्पिरिव चे जनरिक व्हर्जन मार्केट करायला परवानगी मिळाली.
इझी ट्रिप चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
बजाज हिंदुस्थानचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
आंध्र शुगर चे प्रॉफिट उत्पन्न, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs २ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
NIIT फायद्यातून तोट्यात, उत्पन्न कमी. ऑपरेशनली पण तोटा झाला.
रुचिरा पेपर प्रॉफिट वाढले, उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
SML इसुझू तोट्यातून फायद्यात आली , उत्पन्न वाढले.
नाटको फार्मा तोट्यातून फायद्यात आली.
ताज GVK चे प्रॉफिट उत्पन्न वाढले.
सूप्राजित चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
PG इलेक्ट्रोप्लास्ट आणि जैना ग्रुप यांनी LED टेलिव्हिजन उत्पादन करण्यासाठी JV केले.
L & T ने ग्रीन एनर्जी काउन्सिल ची स्थापना केली.
ICICI बँक त्यांचा ICICI लोम्बार्ड मधील ४८.२% स्टेक २.५% ने ९ सप्टेंबरपर्यंत वाढवणार.
ज्युबिलण्ट फार्मोवा हे कंपनी फायद्यातुन तोट्यात गेली उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
आज रिअल्टी बँकिंग ऑटो मेटल्स क्षेत्रात तेजी होती. IT मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६२८४६ NSE निर्देशांक निफ्टी १८५९१ बँक निफ्टी ४४२७६ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !