आजचं मार्केट – ३० मे २०२३

आज क्रूड US $ ७६.५० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.१९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.७६ आणि VIX १२.२० होते.

आज USA ची मार्केट्स बंद होती. उद्या ‘DEBT CEILING’ वर वोटिंग आहे. चीनमधील बेकारीचा दर वाढत आहे. आज FII नी Rs १७५८ कोटींची खरेदी तर DII नी Rs ८५३ कोटींची खरेदी केली.

IRCTC चे चौथ्या तिमाहीचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. कॅटरिंग आणि रेल नीर मध्ये ग्रोथ झाली.

टोरंट पॉवर, NBCC, शोभा (प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले रिअलायझेशन Rs ९८९८ कोटी झाले.), ISGEC, हिकल, NHPC, मोंन्टे कार्लो, टाइम टेक्नोप्लास्ट यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

कॅम्पस ऍक्टिव्हवेअर, स्टोव्ह क्राफ्ट( फायद्यातून तोट्यात गेली. ) NFL (फायद्यातून तोट्यात गेली), RVNL यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल कमजोर आले.

सरकारने ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनियावर ५ वर्षांसाठी ट्रान्समिशन चार्जेस माफ केले.

ऑफशोअर विंड प्रोजेक्टवर ट्रान्समिशन फी माफ केली. याचा फायदा GAIL, NTPC ला होईल.

DGCA ने सांगितले की बासमती किंवा नॉन बासमती तांदूळ युरोपियन युनियन च्या कोणत्याही देशांना ( अपवाद नॉर्वे, स्वीडन, आइसलँड. लेसिस्टन्सटाईन आणि UK यांचा ) निर्यात करण्यासाठी आता इन्स्पेक्शन ऑथॉरिटीजच्या इन्स्पेक्शन सर्टिफिकेट ची जरुरी असणार नाही. ही सवलत येत्या सहा महिन्यापर्यंत लागू राहील.

DB रिअल्टी ही कंपनी प्रेस्टिजच्या सब्सिडिअरीला Rs ११०० कोटींमध्ये २ कंपन्यांमधील स्टेक विकणार.

मुंजाल शोवा चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले कंपनीने Rs ४.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

हेरंबा इंडस्ट्रीज प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs १.२५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

लँडमार्कचे प्रॉफिट उत्पन्न वाढले निकाल चांगले आले.

सन फार्माने PHILOGEN SPA बरोबर लायसेन्सिंग पॅक्ट केला. स्किन कॅन्सर वरील अविकसित औषधे युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मध्ये कमर्शिअलाईझ करण्यासाठी पॅक्ट केला.

अपोलो हॉस्पिटलचे प्रॉफिट ५०% वाढले रेव्हेन्यू २१% वाढला.मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ९ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. या साठी रेकॉर्ड डेट १९ ऑगस्ट २०२३ निश्चित केली. सप्टेंबर ९ पासून लाभांश तुमच्या खात्यात जमा केला जाईल.

पनामा पेट्रोकेम चे प्रॉफिट, उत्पन्न कमी झाले. कंपनीने Rs ५ लाभांश जाहीर केला.

लक्स इंडस्ट्रीजचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.

अरविंद फॅशन चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

३M चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

मार्कसन फार्माचे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन मध्ये उल्लेखनीय वाढ झाली.

V-गार्ड इंडस्ट्रीजचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६२९६९ NSE निर्देशांक निफ्टी १८६३३ बँक निफ्टी ४४४३६ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

One thought on “आजचं मार्केट – ३० मे २०२३

  1. Rahul Takale

    madam namskar ,
    me navin aahe share bajara madhe, tumchya lekha madhe crude oil price, rupaya chi kimmat ,bond yeild etc dilelya astat lekhachya suruvatila, tar yancha market var kasa parinam hoto hey ekhade udaharan deun sangu shakal ka?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.