आज क्रूड US $ ७२.७० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.५८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.७४ आणि VIX १०.७८ होते.
PKH व्हेंचर्स या कंपनीचा IPO ३० जून २०२३ ते ४ जुलै २०२३ दरम्यान ओपन राहील. प्राईस बँड Rs १४० ते Rs १४८ आहे. या इशू मध्ये १.८२ कोटी शेअर्सचा फ्रेश इशू आणि ७३.७३लाख शेअर्सचा OFS आहे. अप्पर बँड नुसार कंपनी Rs ३७९.३५कोटी उभारेल.
यातून Rs १२४.१२ कोटी जलविद्युत प्रकल्पासाठी खर्च करेल आणि Rs ८० कोटी गरुड कन्स्ट्रक्शन या तिच्या सबसिडीअरीमध्ये गुंतवेल.ही कंपनी बांधकाम क्षेत्रात आहे. त्याच प्रमाणे कंपनी रिसॉर्ट. स्पा, आणि QSR हे देखील चालवते.( IPO ची माहिती माझ्या मार्केट आणि मी या पुस्तकात दिली आहे )
USA च्या न्यू होम सेल्स मध्ये MOM १२% वाढ झाली. टेक शेअर्स मध्ये तेजी आली.
कन्झ्युमर कॉन्फिडन्स १७ महिन्यांच्या वरच्या पातळीवर होता.
JP मॉर्गन च्या मते US $ ५० बिलियन्सची विक्री येईल.
ECB ने सांगितले की आता दरवाढ थांबवण्याची वेळ आली आहे.
चीनने सांगितले की त्यांच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती चांगली आहे.
NSE ने एक्स्पायरी शुक्रवारी शिफ्ट करण्याचे सर्क्युलर मागे घेतले.
FII ने Rs २०२४.०५ कोटींची खरेदी तर DII नी १९९१.३५ कोटींची विक्री केली
L & T फायनान्स आणि मनापूरम फायनान्स हे शेअर्स बॅन मध्ये होते.
Shallby रांची येथे FOSM हॉस्पिटल सुरु करणार.
रामको सिमेन्टच्या तामिळनाडू मधील प्लांट युनिट चे काम सुरु झाले.
अडाणी ग्रीनमध्ये ३.०५% ( ४.७९ कोटी शेअर्स ) Rs ४४१२ कोटींचे ब्लॉक डील झाले. अडाणी एंटरप्रायझेस मध्ये १.०३% स्टेकचे Rs ४१३० कोटींचे ब्लॉक डील झाले.(Futures Options आणि मी या पुस्तकात ब्लॉक डीलची माहिती दिली आहे )
HDFC लाईफ मध्ये १.६८ कोटींचे ब्लॉक डील झाले.
M & M फायनान्स मनापूरम चे रोलओव्हर ९२% झाले.
अल्केम लॅब,डेल्टा कॉर्प यांचे रोलओव्हर ९१% झाले.
दीपक नायट्रेट, डाबर, सन फार्मा, ज्युबिलण्ट फार्माचे रोलओव्हर ८९% झाले.
पिरामल इंटरप्रायझेस, सिमेन्स, मेरिको यांचे रोलओव्हर ८८% झाले.
बर्जर पेन्ट्स, Mphasis, याचे रोलओव्हर ८७% झाले.
विप्रो JSPL यांचे रोलओव्हर ८६% झाले.
अंबुजा सिमेंट, HDFC बँक, वेदांत यांचे रोलओव्हर ८५% झाले.
GQG ने अडाणी ग्रुपच्या स्टोक्समध्ये US $ १ बिलियनचा स्टेक घेतला.
इन्फोसिसने ‘स्किलसॉफ्ट’ बरोबर ६ वी पासून पुढील सर्व इयत्तांसाठी शिकणाऱ्यांसाठी एज्युकेशन आणि लर्निंग मध्ये सुधारणा करण्यासाठी MOU केले.
आदित्य बिर्ला फॅशन ला TCNS क्लोदिंगमध्ये ५१% स्टेक घ्यायला आणि अक्विझिशन करायला CCI (कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) ने संमती दिली.
स्वान एनर्जी ला नॉन-प्रमोटर्सला शेअर अलॉट करायला मंजुरी मिळाली.
टिटाघर वॅगनला गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय, टेस्टिंग, कमिशनिंग, ट्रेनिंग देण्यासाठी सुरत मेट्रो फेज १ साठी Rs ८५७ कोटींची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर ७६ आठवड्यात पूर्ण करायची आहे.
HDFC आणि HDFC BANK यांच्या मर्जरची तारीख १ जुलै आणि रेकॉर्ड डेट १३ जुलै असू शकते.
ग्लॅन्ड फार्माच्या हैदराबाद येथील पश्मियाराम या फॅसिलिटीच्या १५ जून २०२३ ते २७ जून २०२३ दरम्यान झालेल्या तपासणीत फॉर्म नंबर ४८३ दिला.
मंत्री मंडळाच्या बैठकीत उसाच्या FRP मध्ये ऑक्टोबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या हंगामासाठी Rs १०ची वाढ करण्यासाठी मंजुरी दिली. फर्टिलायझर्स संबंधित ‘प्रणाम’ योजनेला मंजुरी दिली. सरकारने सल्फर कोटेड युरिया स्कीमसाठी मंजुरी दिली तसेच या स्कीमसाठी Rs ३.६८ लाख कोटी सबसिडी वर्ष २०२५पर्यंत मंजूर केली.
SBI कॅपिटलचा SBI पेन्शन फंडामधील स्टेक SBI ला खरेदी करण्यासाठी एक्झीक्युटीव्ह कमिटीने मंजुरी दिली.
BEML ला BDL आणि BEL कडून हायमोबिलिटी वाहने खरेदी करण्यासाठी Rs ३८५ कोटींची ऑर्डर मिळाली.
केंद्र सरकारने पॉवर सेक्टरमधील रिफॉर्मसाठी राज्यसरकारांना Rs ६६१४३ कोटी इन्सेन्टिव्ह दिले.
TVS मोटर्सने झोमॅटो बरोबर १०००० E-स्कुटर्ससाठी ग्रीन सस्टेनेबिलिटी सोल्युशन साठी MOU केले.
शीला फोम्स ‘KURLON’ ला दोन टप्प्यात Rs ३२५० कोटींमध्ये खरेदी करणार आहे. शीला फोम्स चा बिझिनेस उत्तर आणि पश्चिम भारतात तर KURLON चा बिझिनेस बिझिनेस दक्षिण आणि पूर्व भारतात आहे. त्यामुळे या अक्विझिशनचा शीला फोम्स ला फायदा होईल.
PFC ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या MSCI च्या रिबॅलंसींगमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता असल्यामुळे शेअरमध्ये खरेदी होत आहे.
आज १ डिसेंबर २०२२ नंतर १४२ सेशन्सनंतर निफ्टीने १८९०८ वर नवीन ऑल टाइम हाय गाठला. सेन्सेक्सनेही ६३७१६ वर नवीन ऑल टाइम हाय गाठला.
बँक निफ्टीने ४४५०८ चा नवीन ऑल टाइम हाय गाठला.
मेटल्स, ऑटो, फार्मा, इन्फ्रा, एनर्जी, रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली. मेडिया आणि केमिकल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये मंदी होती.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६३९१५ NSE निर्देशांक निफ्टी १८९७२ बँक निफ्टी ४४३२७ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !