आज क्रूड US $ ८४.५० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.६५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९७ आणि VIX १०.४१ होते.
USA मध्ये महागाई कमी होत आहे आणि कंपन्यांचे निकाल चांगले येत आहेत APPLE, प्रॉक्टर & गॅम्बल, मायक्रोसॉफ्ट तेजीत होते. इंटेलचे निकाल चांगले आले तर PCE( पर्सनल कंझम्पशन एक्सपेंडिचर) २.९७ % ने कमी झाला.
चिनी सरकारने सांगितले की ते आता कन्झ्युमर सेक्टर वर लक्ष्य केंद्रित करणार आहे. तसेच मध्यम आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. चीनचा जुलै महिन्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग PMI ४९.३ तर कॉम्पोझिट PMI ५१.१ आला.
आज मारुतीचे पहिल्या तिमाहीचे निकाल आले. प्रॉफिट Rs १०१२ कोटींवरून YOY Rs २४८५ कोटी झाले. उत्पन्न Rs २६४९९ कोटींवरून Rs ३२३२७ कोटी झाले. मार्जिन YOY ७.२% वरून ९.२% झाले.
पेट्रोनेट LNG चे प्रॉफिट Rs ६१४ कोटींवरून Rs ७८९,९० कोटी तर उत्पन्न Rs १३८७४ कोटींवरून Rs ११६५६ कोटी झाले. मार्जिन ६.८% वरून १०.१% झाले.
RBI च्या MPC ची बैठक ऑगस्ट ८ २०२३ ते ऑगस्ट १० दरम्यान होईल. RBI गव्हर्नर १० ऑगस्ट रोजी वित्तीय पॉलिसी जाहीर करतील. रेट पॉज घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पिरामल एंटरप्रायझेस चे NII YOY १७% ने कमी होऊन Rs ८९१ कोटी झाले. कंपनीला Rs ५०९ कोटींचे प्रॉफिट झाले यात Rs ८५५ कोटींच्या श्रीराम फायनान्स च्या स्टेक सेलच्या रकमेचा समावेश आहे)
गोदरेज प्रॉपर्टीज DEBT सेक्युरिटीजच्या दवारा फंड उभारण्यावर विचार करेल.
ग्लॅन्ड फार्माच्या विशाखापट्टणम फॅसिलिटीच्या ऑन्कॉलॉजी फॅसिलिटीचे GMP इन्स्पेक्शन जुलै २०-जुलै २८ दरम्यान USFDA ने करून त्यांना कोणतीही त्रुटी दाखवल्याशिवाय फॉर्म नंबर ४८३ इशू केला.
पॉवर ग्रीड दोन आंतरराज्य ट्रान्समिशन सिस्टीम प्रोजेक्टसाठी BOOT( बिल्ड, OWN, ऑपरेट,ट्रान्सफर ) रूट अंतर्गत यशस्वी बीडर ठरली.
FII ने Rs १०२३.९१ कोटींची विक्री तर DII नी Rs १६३४.३७ कोटींची खरेदी केली.
SBFC फायनान्स चा Rs १०२५ कोटींचा IPO ( यात Rs ६०० कोटी फ्रेश इशू आणि Rs ४२५ कोटींची OFS ) २ ऑगस्टला ओपन होऊन ७ ऑगस्टला बंद होईल. या IPO चा प्राईस बंद Rs ५४ ते Rs ५७ असून फ्रेश ईशूची प्रोसिड्स कॅपिटल बेस वाढवण्यासाठी आणि बिझिनेस आणि ऍसेट मधील वाढ फायनान्स करण्यासाठी करण्यात येईल.
काँकॉर्ड बायोटेक ह्या बायोफार्मा क्षेत्रातील कंपनीचा IPO ३ ऑगस्ट रोजी ओपन होईल. हेलिक्स इन्व्हेस्टमेंट त्यांचा पूर्ण स्टेक (२०% स्टेक, २.०९ कोटी शेअर्स ) OFS दवारा विकेल. कंपनी IPO द्वारा Rs १५०० कोटी उभारण्याची शक्यता आहे.
SME प्लॅटफॉर्मवर VINSYS IT सर्व्हिसेस, ORIANA पॉवर ( सोलर एनर्जी ) आणि YUDITZ सोल्युशन्स यांचे IPO येणार आहेत.
SME प्लॅटफॉर्मवर YASONS CHEMEX CARE चे लिस्टिंग ३ ऑगस्टला तर INNOVATUS इंटरटेन्मेन्टचे लिस्टिंग ४ ऑगस्टला होईल.
प्रकाश इंडस्ट्रीजचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
बजाज हिंदुस्थान चा तोटा वाढला उत्पन्न कमी झाले.
HIL चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
गो फॅशन्स चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
हेरिटेज फूड्स चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
अडाणी ग्रीन चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
कॅस्ट्रॉल चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
नवीन फ्ल्युओरीन चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
वेलस्पन चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले निकाल चांगले आले.
नोसिल चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
धनलक्ष्मी बँक तोट्यातून फायद्यात आली. NII वाढले GNPA वाढले.
UPL चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले. कंपनीने त्यांच्या उत्पन्नाच्या वाढीबद्दल गायडन्स ४%-८% वरून १% -५ % केला.
GAIL चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
अडाणी ट्रान्समिशन चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
क्युपिड चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
कर्नाटक बँक गुरुवारी फंड उभारणीवर विचार करणार आहे.
ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
बंधन बँकेचे १.७६ कोटी शेअर्स (१.१% ) स्टेक Rs ३८५ कोटींना ब्लॉक डील द्वारे विकला.
केंद्र सरकार २१ राज्य सरकारांना विशेष सहकार्य म्हणून Rs ८४९०० कोटी देणार आहे.
सीमेन्सच्या ७५% पेक्षा जास्त शेअरहोल्डर्सनी लो व्होल्टेज आणि गेर्ड मोटर्सचा बिझिनेस विकण्याच्या प्रस्तावाला विरोध केला.
पॉवर मेक या कंपनीला Rs ३०४३८ कोटींचे माईन डेव्हलपमेंट आणि ऑपरेशन साठी झरिया कोल फिल्ड्सच्या OHANAABAD चे २८ वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. या खाणीत ९६.७८ मत एवढा कोळसा असून वार्षिक क्षमता ४ MTPA आहे. या साठी कंपनी एक स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करेल.
RVNL ने वंदे भारत ट्रेन्स साठी कॉन्ट्रॅक्ट फायनल केले. TMH आणि LES बरोबर शेअर पर्चेस अग्रीमेंट केले.
व्हीनस रेमिडीजला त्यांच्या कॅन्सरवरील औषधांची विक्री फिलिपाइन्स पॅराग्वे, मोल्दोवा आणि जॉर्जिया मध्ये करण्यासाठी मंजुरी मिळाली.
लक्ष्मी ऑर्गनिक्स ला गुजरातमधील दहेज येथे नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने मंजुरी दिली.
जन SFB ने IPO साठी नवीन DRHP दाखल केले.
पर्सिस्टंस सिस्टिम्सने जनरेटिव्ह AI सोल्युशन लाँच करण्यासाठी गूगलबरोबर पार्टनरशिप केली.
सरकारने डोमेस्टिक नैसर्गिक गॅसची किंमत US $ ७.८५ प्रती mmbtu ठरवली ONGC आणि ऑइल इंडिया यांच्या साठी US $ ६.०५ प्रती mmbtu ठरवली.
आज FMCG आणि फार्मा मध्ये प्रॉफिट बुकिंग तर IT, मेटल्स, रिअल्टी, एनर्जी इन्फ्रा तसेच स्माल कॅप आणि मेडीयम कॅप शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६६५२७ NSE निर्देशांक निफ्टी १९७५३ आणि बँक निफ्टी ४५६५१ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !