आज क्रूड US $ ८४.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.६० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.९३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१८ आणि VIX १२.३४ होते. सोने आणि चांदी मध्ये तेजी होती. बेस मेटल्समध्ये तेजी होती
USA ची मार्केट्स तेजीत पण वोलटाइल होती. एशियन मार्केट्स मजबूत होती.
चीन जे राहत पॅकेज देणार होते ते त्यांच्या सरकारने थांबवले. एव्हरग्रान्डमध्ये शेअर खूप पडल्यामुळे ट्रेडिंग स्थगित झाले नंतर काल ट्रेडिंग झाले तेव्हा शेअर पुन्हा पडला. चीनमध्ये लाईट सोडा ऍशच्या किमती वाढल्या
जपान राहत पॅकेज देणार आहे. जपानचे चलन कमजोर होण्याची शक्यता आहे.
FII ने Rs १३९३.२५ कोटींची विक्री तर DII ने Rs १२६४.०० कोटींची खरेदी केली.
I बुल्स HSG, BHEL, एस्कॉर्टस, GMR एअरपोर्ट इन्फ्रा, हिंदुस्थान कॉपर, इंडिया सिमेंट, मन्नापुरम फायनान्स, RBL बँक, सन टीव्ही, बॅनमध्ये होते.
दोराईस्वामी नरेन यांनी ३१ ऑक्टोबर २०२३ पासून बेयर क्रॉप सायन्सेस या कंपनीतून राजीनामा दिला.
HFCL QIP दवारा Rs ६८.६१ प्रती शेअर या फ्लोअर प्राईसवर फंड उभारणी करणार आहे.
अतुल चंद्रा यांची इंडिया बुल्स रिअल इस्टेट या कंपनीने २८ ऑगस्ट २०२३ पासून चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नेमणूक केली.
सन फार्माला हाय सिंगल डिजिट ग्रोथ FY २४ मध्ये अपेक्षित आहे. ग्लोबल स्पेशालिटी बिझिनेसचा विस्तार सुरु राहील. R & D वरील खर्च विक्रीच्या ७% ते ८% च्या दरम्यान असेल. स्पेशालिटी R & D वरील खर्च वाढेल.
गोकुळदास एक्स्पोर्ट या कंपनीने UAE ची कंपनी अल्ट्राको US $५५ मिलियन मध्ये खरेदी केली.या कंपनीचे केनयामध्ये ४ आणि इथिओपिया मध्ये १ प्लांट आहे. ही खरेदी इंटर्नल अक्रूअल्स आणि कर्जातून फायनान्स केली जाईल.अल्ट्राको ही कंपनी शॉर्ट्स, पँट, शर्ट , टी शर्ट्स, ब्लॉउज आणि वेंगवेगळ्या वयोगटासाठी ड्रेस बनवतात. या खरेदीनंतर गोकुळदास एक्स्पोर्टच्या शेअरला अपर सर्किट लागले.
GENSOL या कंपनीला दुबईत Rs १०१.६० कोटींच्या २ सोलर EPC प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली.
RCF ला सरकारने ‘नव रत्न’ कंपनीचा दर्जा दिला.
ग्रॅव्हिटाच्या टोगो प्लांटमध्ये बॅटरी रिसायकलिंग प्लांटमध्ये काम सुरु झाले.
ग्रीव्स कॉटन या कंपनीने E- रिक्षा साठी ‘पॉवर राजा’ बॅटरी रेंज लाँच केली.
GILLET ने Rs ५० प्रति शेअर लाभांश दिला..उत्पन्न Rs ५५३ कोटी वरून Rs ६१९ कोटी झाले तर फायदा Rs ६७ कोटींवरून Rs ९२ कोटी झाला. मार्जिन २०.२% वरून २३.२% झाले.
हिरो मोटोने KARIZMA XMR Rs १.७२ लाखांना लाँच केली.
मध्य भारत ऍग्रो प्रॉडक्ट या कंपनीने १:१ बोनस शेअर जाहीर केला.
लोढा ३ वर्ष मुदतीचे बॉण्ड्स इशू करणार आहे.
भारतीय रेल्वे कडून ‘रिस्पॉन्सिव्ह इंडस्त्री’ ला ऑर्डर्स मिळाल्या त्यामुळे शेअरमध्ये तेजी होती.
प्रेस्टिज इस्टेटने हैदराबाद मध्ये २ LUXURY हाऊसिंग प्रोजेक्ट लाँच केल्या.
मारुती हरयाणा प्लांटची क्षमता दुप्पट करण्यासाठी Rs ४५,००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ८ वर्षांत मारुती त्यांची उत्पादन क्षमता २मिलियन कार्स एवढी वाढवणार आहे. मारुती शेअर होल्डर्सच्या शेअरस्प्लिट करण्याच्या प्रस्तावाचा विचार करेल.
तसेच १ जानेवारी २०२४ पासून अर्णब रॉय मारुतीचे CFO म्हणून कारभार पाहतील.
PG इलेक्ट्रोप्लेस्ट Rs ५०० कोटींचा QIP करणार आहे.
३M या आंतरराष्ट्रिय कंपनीवर USA मध्ये इअर बड संबंधात लावलेली पेनल्टी कमी झाली.
ROC कॅपिटल, मेडिसन कॅपिटल आणि MIO IV यांनी स्टार हेल्थ चा ०.५८% स्टेक(२कोटी १५ लाख शेअर्स ) Rs ६१० प्रती शेअर या भावाने Rs १३१२ कोटींना विकला. भारती एअरटेलमध्ये १.१२ कोटी शेअर्स (०.१६% स्टेक) चा Rs ९६६ कोटींना सौदा झाला.
APL अपोलो Rs ४०० कोटींचे २६.३०लाख शेअर्सचा सौदा झाला.
NBCC ला इंडियन मेडिकल असोसिएशन कडून Rs ६६.३२ कोटींची ऑर्डर मिळाली. यामध्ये येथे इंद्रप्रस्थ येथे IMA हाऊस साठी डिझाईनिंग, प्लांनिंग, एक्झिक्युशन ३० महिन्यात पूर्ण करण्याची ऑर्डर मिळाली.
SJVN च्या सबसिडीअरीला ३ सोलर पॉवर प्रोजेक्ट ( ३२० MV क्षमतेचे) साठी आसाम पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने LOA दिले. ही ऑर्डर BOO (बीड ओन आणि ऑपरेट) बेसिसवर देण्यात आली आहे.
LTMINDTREE या कंपनीने SAAS कंपनी CAST बरोबर स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन केले.
टाटा पॉवरने आनंद ग्रुपबरोबर ४.४ MW कॅप्टिव्ह सोलर प्लांटसाठी करार केला.
सोम डिस्टीलरीजला छत्तीसगढ राज्य सरकारने बिअर ब्रँड सप्लाय करण्यासाठी मंजुरी दिली.
पिरॅमिड टेक चा शेअर BSE वर Rs १८५ वर आणि NSE वर Rs १८७ वर लिस्टिंग झाले. ज्यांना शेअर अलॉट झाले त्यांना माफक लिस्टिंग गेन झाले.
कॅपॅसिटे इंफ्राच्या JV ला RVNL कडून मालदीव प्रोजेक्ट साठी Rs ५७५ कोटींची ऑर्डर मिळाली.
BEAWAR ट्रान्स्मिशनलिमिटेड मधील स्टेक विकण्यासाठी मंजुरी.
अंबर एंटरप्रायझेस ने सांगितले की GIP PVT LTD यांनी अंबर इंटरप्रायझेसमध्ये स्टेक २.६२% वरून ५.२३% केला.
जामनगर युटिलिटीने जीओमध्ये ५ कोटी शेअर्स २०८.०० ते २११.०० प्रती शेअर या रेंज मध्ये खरेदी केले.
एस्कॉर्टस चा रेल्वे बिझिनेस इक्विपमेंट बिझिनेस विकण्याच्या विचारात आहेत. कंपनी ट्रॅक्टर बिझिनेसवर लक्ष केंद्रित करेल.
BNP पारिबास त्यांचा शेरखान मधील पूर्ण स्टेक विकणार आहे.
आज केमिकल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. चीनमध्ये प्लांट शट डाऊन आणि लेबर प्रोब्लेममुळे केमिकल्सच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. फिनाईल, असेटिक ऍसिड, लाईट सोडा ASH( सोडा ASH ची किंमत ९% वाढून US $ २८५ वरून US $ ३७३ झाली) यांच्या किमती आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये वाढत आहेत.
केमिकल्सच्या किमती वाढत असल्यामुळे केमिकल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी झाली. दीपक नायट्रेट, GHCL टाटा केमिकल्स DCW या कंपन्यांवर होईल.
केमिकल, स्पेशालिटी केमिकल्स ऑटो, PSE, IT, रिअल्टी पॉवर मेटल्स मध्ये खरेदी तर फार्मा आणि FMCG मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५०७५ NSE निर्देशांक निफ्टी १९३३६ बँक निफ्टी ४४५०० वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !