आजचं मार्केट – २१ ऑगस्ट २०२३

आज क्रूड US $ ८५.४० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.४४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२५ तर VIX १२.१० होते.

२४ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२३ दरम्यान जॅक्सन हॉल ची मीटिंग असेल. फेडचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यात काय मत व्यक्त करतात त्याच्या कडे मार्केटचे लक्ष असेल. मेटा, अमेझॉन, अल्फाबेट, आणि मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये मंदी होती.

चीनने त्यांच्या १ वर्षाच्या लोनसाठी रेट ३.५५% वरून ३.४५% केला.

FII ने Rs २६६.९८ कोटींची विक्री तर DII नी Rs ३३९.१८ खरेदी केली.

मन्नापुरम फायनान्स, चंबळ फर्टी, डेल्टा कॉर्प, GNFC, ग्रॅन्युअल्स, हिंदुस्थान कॉपर, I बुल्स HSG फायनान्स, इंडिया सिमेंट, PNB, SAIL झी एन्टरप्रायझेस बॅन मध्ये होते.

टायटन ने कॅरटलेन मध्ये २७.१८% स्टेक Rs ४६२१ कोटींना घेतला. आता टायटनचा ७१.०९% स्टेक आहे तो आता ९८.२८% होईल.

गुजरात गॅस ने इंडस्ट्रियल गॅसच्या किमती Rs ४०.८३/SCM केली.

LNG च्या किमती वाढल्यामुळे Rs २.५० ने वाढवल्या. आधी Rs ३८.४३ होत्या.

M & M जुन २०२१ ते जून २०२३ दरम्यान बनवलेल्या गाड्यांची तपासणी करणार आहे.

नॉलेज मरीन & इंजिनीअरिंग वर्क्स च्या सब्सिडियरीला वाळूच्या व्यापाऱ्याकडून ४ LOI , बहारीन दिनार १५.४५ मिलियनसाठी ( Rs ३४२.०६ कोटी ) मिळाली.

भारत फोर्जला युरो ९३.८७ मिलियन ची एक्स्पोर्ट ऑर्डर मिळाली.

आज जिओ स्मॉल फायनान्स चे लिस्टिंग झाले . हे लिस्टिंग BSE वर Rs २६५ वर आणि NSE वर Rs २६२ वर झाले. FTSE मध्ये जिओ राहील आणि २३ तारखेपासून MSCI ग्लोबल इंडेक्स मध्ये जाईल. १० दिवस T टू T ग्रुपमध्ये असेल.

मार्केटमध्ये काही लोकांना असे वाटत आहे की फेड रेट वाढवणार नाही पण रेट कमी करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तानला ने ‘VI’ बरोबर NOV २१ मध्ये २ वर्षांसाठी टर्मशीट करार केला होता. त्याची मुदत NOV २०२३ मध्ये संपेल. त्याचा परिणाम रेव्हेन्यूवर Rs १७ कोटी तर प्रॉफिट वर Rs ९ कोटी असेल.

मुरुगप्पा ग्रुपने DR. वल्ली अरुणाचलम बरोबरचा वादविवाद सोडवला. वल्ली ही MV मुरुगप्पांची मुलगी आहे. तिला अंबाडी इन्व्हेस्टमेंट मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये डायरेक्टरची सीट हवी होती.

अंबाडी इन्व्हेस्टमेंट ही मुरुगप्पा ग्रुपची होल्डिंग कंपनी आहे. यामुळे मुरुगप्पा ग्रुपच्या चोला फायनान्स, चोला इन्व्हेस्टमेंट, EID पॅरी, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, कोरोमंडेल आणि शांती गिअर्स वर परिणाम होईल.

GQG चा अडाणी पोर्टमधील स्टेक ५.०३% झाला.
येस बँकेने त्यांचे NPA JC फ्लॉवर्स ARC ला विकले त्यातून बँकेला Rs २३० कोटी मिळाले.

व्हा टेक वाबाग ला सिडको कडून Rs ४२० कोटींची ऑर्डर मिळाली.

NDTV ला शॉर्टटर्म ASM लिस्ट मधून बाहेर काढले.
BHEL ला ‘महान ENERGEN LTD’ कडून Rs ४००० कोटींची ऑर्डर मिळाली.

ABB LTD ला नाशीकमधील रिलायंन्स लाईफचा प्लांट ऑटोमेटेड करण्यासाठी ऑर्डर मिळाली.

L & T ला ऑस्ट्रेलियातून केमिकल प्लांटसाठी Rs १००० ते Rs २५०० कोटी दरम्यान ऑर्डर मिळाली.
एअर पॅसेंजर ट्राफिक ३०% तर एअरक्राफ्ट मुव्हमेंट १७% ने वाढली. याचा फायदा GMR इन्फ्राला होईल.

मार्केट गेला आठवडाभर कन्सॉलिडेट करत आहे त्याची काही कारणे अशी आहेत.

भारताचा IIP कमी झाला. महागाई वाढली, USA मध्ये फेड रेट वाढवेल अशी भीती, रुपयाची घसरण, USA मधील बॉण्ड यिल्डस मधील वाढ, US $ इंडेक्स वाढत आहे, चीनची ढासळती अर्थव्यवस्था, या सर्व गोष्टींचा प्रतिकूल परिणाम मार्केटवर होत आहे त्यामुळे मार्केटमध्ये NEGATIVE BIAS तयार होत आहे.

आज IT, मेटल्स, रिअल्टी, हॉटेल्स, फार्मा, PSE, एनर्जी शेअर्स मध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५२१६ NSE निर्देशांक निफ्टी १९३९३ बँक निफ्टी ४४००२ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.