आजचं मार्केट – २२ ऑगस्ट २०२३

आज क्रूड US $ ८४.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.२७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.३५ आणि VIX ११.९९ होते सोने Rs ५८५०० च्या आसपास तर चांदी Rs ७१३०० च्या आसपास होती.
बेस मेटल्स मध्ये हलकी तेजी होती.

USA मार्केटमध्ये BHP ३७% पडला, HSBC ने NVIDIA चे टार्गेट वाढवले म्हणून NVIDIA तेजीत होता.

.FII नी Rs १९०१ कोटींची विक्री तर DII नी Rs ६२६.२५ कोटींची खरेदी केली.

चंबळ फर्टी, डेल्टा कॉर्प, GNFC, हिंदुस्थान कॉपर, इंडिया सिमेंट, PNB, SAIL, झी इंटरप्रायझेस, I बुल्स HSG फायनान्स, मन्नापुरम फायनान्स बॅनमध्ये होते ग्रॅन्युअल्स बॅन मधून बाहेर आला.

अडानी इंटरप्रायझेस मधील २.२२% स्टेक म्हणजे २.५३ कोटी शेअर्स ७ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट दरम्यान ‘KEMPAS’ ने घेतला.

वेलस्पन इंडियाने मिशीगन इंजिनीअरिंग मधील ५०.१०% स्टेक घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
LIC ने Mphasis मधील त्यांचा स्टेक ४.९०% वरून ५.०५% केला.

युनियन बँक ऑफ इंडिया QIP दवारा Rs ५००० कोटी उभारणार आहे.

लेमन ट्री हॉटेलने कसौली आणि भुवनेश्वर या दोन प्रॉपर्टीज साठी लायसेन्सिंग करार केला. टाटा पॉवर च्या टाटा रिन्यूएबल एनर्जी या सबसिडीअरीने टाटा मोटर्सच्या पंतनगर प्लांट बरोबर ९ MVP सोलर पॉवर साठी पॉवर पर्चेस अग्रीमेंट केले.

ब्रिगेड ने चेन्नईत ६.५४ एकर जमीन रेसिडेन्शियल प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी करार केला

तामिळनाडू मर्कंटाईल बँकेने ‘JOKATA ‘ या डिजिटल प्लॅटफॉर्म बरोबर करार केला. हा प्लॅटफॉर्म MSME साठी मुख्यत्वे डिजिटल लोन देतो.

तामिळनाडू मर्कंटाईल बँकेने सांगितले की यामुळे त्यांचा भौगोलिक रिच वाढेल तसेच त्यांच्या MSME कस्टमर्सना एन्ड टू END डिजिटल सर्व्हिस पर्सनलाइझ्ड अनुभवसिद्ध सर्व्हिस, समाधानकारक सेवा उपलब्ध करून देऊ शकू.

पटेल इंजिनीअरिंगच्या JV ने Rs १२७५.३० कोटींच्या प्रोजेक्टसाठी किमान बोली लावली

RVNL ने मसाकानी पारादीप रोड विकास या नावाने सबसिडीअरी बनवली.

RITES ने NHPC बरोबर कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्सल्टेशन NHPC च्या अरुणाचल प्रदेशमधील २८८० MV दिबांग प्रोजेक्टसाठी करार केला.

इंडो अमाईन्स च्या संबंधित गुजरात पोल्युशन कंट्रोल बोर्डाने त्यांची इंडो अमाईन्सचा प्लांट बंद करण्याची ऑर्डर मागे घेतली.

आज पासून एरोफ्लेक्स या होज पाईप बनवणाऱ्या कंपनीचा Rs ३५१ कोटींचा IPO ( १६२ कोटींचा फ्रेश इशू आणि Rs १८९ कोटींचा OFS ) Rs २ दर्शनी किमतीच्या शेअर्सचा २२ ऑगस्ट २०२३ ला ओपन होऊन २४ ऑगस्ट २०२३ ला बंद होईल.याचा प्राईस बँड Rs १०२ ते Rs १०८ असून मिनिमम लॉट १३० शेअर्सचा आहे. कंपनी स्टील, ऑइल आणि गॅस उद्योगात लागणारे होज पाईप पुरवते. कंपनीचा बिझिनेस ८०% आंतरराष्ट्रीय मार्केट आणि २०% डोमेस्टिक मार्केट मध्ये आहे.कंपनी मेटल फ्लेक्सिबल सोल्युशन्स बनवते भारतात HAL, BHEL, BEL यांचा समावेश ग्राहकात आहे. कंपनी टर्नकी बेसिसवर हॉज पाईपचे काम करते आणि त्यांचा मेंटेनन्स करते.कंपनी आयात करायला लागणाऱ्या कच्च्या मालाचे भारतात उत्पादन करण्याची शक्यता अजमावत आहे.गेल्या दोन वर्षात कंपनीची विक्री वाढल्यामुळे मार्जिनमध्येही सुधारणा झाली. कंपनीचा PE रेशियो ४०.९१ ROE २६.४३ आणि ROC ३१.९६ होते. डेबीट इक्विटी रेशियो ०.३९असून EPS २.६४ होते.कंपनीचा कच्चा माल कॉईल आणि स्टील आहे कंपनी कच्चा माल चीन आणि इतर देशातून आयात करते. कंपनीचा मुम्बै येथे १ प्लांट आहे.

आणि कंपनी दुसरा प्लांट उभारण्याचा किंवा फॉरवर्ड आणि बॅकवॉर्ड इंटिग्रेशन मध्ये अक्विझिशन करण्याचा विचार करत आहे.

जिओ फायनान्स आता २८ ऑगस्टला BSE च्या इंडेक्सएसमधून बाहेर पडेल.

VI Rs २४०० कोटींचे कर्ज सप्टेंबर अखेरपर्यंत फेडेल.

न्यूजेंन सॉफ्टवेअरला US $ ९,९०,००० ची ऑर्डर मिळाली.

ग्लेनमार्क फार्माने US DEPT ऑफ जस्टीस ऍण्टीट्रस्ट डिव्हिजनबरोबर अग्रीमेंट केले.

ग्रीव्हज कॉटनने उषा फायनान्शियल सर्व्हिसेस बरोबर EV थ्री व्हीलर साठी फ्लेक्सिबल फानान्सियल सर्व्हिसेस साठी करार केला.

आज मिडकॅप, मेटल्स FMCG मध्ये खरेदी तर IT, PSU, फार्मा मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५२२० NSE निर्देशांक निफ्टी १९३९६ बँक निफ्टी ४३९९३ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.