आजचं मार्केट – २४ ऑगस्ट २०२३

आज क्रूड US $ ८२.९२ प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.४० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.४३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१९ आणि VIX ११.५४ होते.

आज एशियन मार्केट तेजीत होती.NASDAQ तेजीत होते. NVIDIA चे निकाल सुंदर आले. कंपनीने बायबॅक जाहीर केला.

FII ने Rs ६१४.३२ कोटींची तर DII ने Rs १२५.०५ कोटींची खरेदी केली.

सन टीव्ही, एस्कॉर्टस कुबोटा, BHEL, डेल्टा कॉर्प, GNFC, हिंदुस्थान कॉपर, इंडिया सिमेंट, मेट्रोपोलीस हेल्थकेअर, PNB, मन्नापुरम फायनान्स, I बुल्स HSG बॅन मध्ये होते.

SAIL, झी इंटरप्रायझेस बॅन मधून बाहेर आले.
सरकार ऑक्टोबरच्या सुमारास साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॉरंट फार्माच्या दाहेज युनिटच्या तपासणीत USFDA ने २ त्रुटी दाखवून VAI ( व्हॉलंटरी ऍक्शन इनिशिएटेड ) दिला.

रामकृष्ण फोर्जिंग्जला ४ वर्षांसाठी फार्म इक्विपमेंट कॉम्पोनंट सप्लाय करण्यासाठी Rs १५६ कोटींची ऑर्डर मिळाली.

मन्नापुरम फायनान्स मध्ये १०.८४% स्टेक साठी Rs १३०१.०० कोटींचा ट्रेड झाला.

इप्का लॅबच्या पिपरिया युनिटला USFDA कडून VAI मिळाला.

तेजसने एअर मिसाईल चे यशस्वी टेस्टिंग केले.

संधार टेकचा म्हैसूर प्लांट सुरु झाला.

गुजरात अंबुजाला हिम्मतनगर येथे ९०० TPD क्षमतेचा वेट मिलिंग प्लांट लावण्यासाठी पर्यावरणाची मंजुरी मिळाली.

कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी US $ १ बिलियन म्हणजे Rs ८२७८ कोटी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स मध्ये ०.९९% स्टेक साठी गुंतवणूक करेल. या गुंतवणुकीप्रमाणे कंपनीची व्हॅल्यू US $ १०० बिलियन किंवा Rs ८.२७ लाख कोटी एवढी होते.
कोफोर्जचे प्रमोटर HULST BV ने ब्लॉक डीलच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण २६.६३% स्टेक Rs ४५५० प्रती शेअर ( ७.४% डिस्काऊंटवर) विकणार आहेत. HULST BV १.६२ कोटी शेअर्स Rs ७४०० कोटींना विकेल.

NHPC ने आंध्र प्रदेश पॉवर जनरेशन कॉर्पोरेशनबरोबर पम्पड स्टोअरेज हायड्रोपॉवर प्रोजेक्ट आणि रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी MOU केले.

वासकाँन इंजिनीअर्स ला बिहार मेडिकल सर्व्हिसेस आणि इन्फ्रा कॉरपोरेशन कडून सुपौल येथे लोहिया मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बांधण्यासाठी ३ वर्षात पूर्ण करण्याची Rs ६०५.६५ कोटींची ऑर्डर मिळती
प्रॉक्टर आणि गॅम्बल हेल्थचे प्रॉफिट YOY २८% ने कमी होऊन Rs २९.८ कोटी झाले. हे मटेरियल कॉस्ट वाढल्यामुळे आणि वन टाइम एम्प्लॉयी कॉस्टमुळे झाले. रेव्हेन्यू YOY १.८% ने वाढून Rs ३०१.२० कोटी झाला. कंपनीने Rs ५० प्रती शेअर फायनल लाभांश जाहीर केला.

दुसऱ्या दिवशी एअरोफ्लेक्स चा IPO २१.१० वेळा भरला रिटेल पोर्शन १७.७८ वेळा भरला.

TVS मोटर्सने दुबईमध्ये त्यांची दुसरी EV स्कुटर TV X या नावाने Rs २.५० लाख किमतीला लाँच केली.

GAIL येत्या ३ वर्षात Rs ३०००० कोटींची गुंतवणूक करेल. १५६०० किलो मीटर पाईपलाईन ऑपरेट करेल. कंपनी ४२०० किलो मीटर्सची नवीन पाईपलाईन बनवत आहे.

मॅक्स फायनॅन्शियल्स चे १२.५० लाख शेअर्स ( ३.३% स्टेक ) लार्ज ट्रेंड मध्ये Rs १०९ कोटींना विकले.

जायड्स लाईफच्या ‘ZINK SULFATE’ या इंजेक्शनला USFDA ची मंजुरी मिळाली.

ग्लॅन्ड फार्माच्या धुंडिगल युनिटच्या ३ जुलै २०२३ ते १४ जुलै २०२३ दरम्यान केलेल्या तपासणीत USFDA ने EIR ( एस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट) दिला.

टाटा पॉवरच्या सबसिडीअरीने ‘झूमकार’ बरोबर EV चार्जिंग सोल्युशन्ससाठी करार केला.

हायकोर्टाने स्पाईस जेटला मारन यांना Rs १०० कोटी १० सप्टेंबरपर्यंत द्यायला सांगितले.

सुजलॉनला ‘इंटेग्राम एनर्जी इन्फ्रा PVT LTD कडून ३१.५MV साठी ऑर्डर मिळाली.

स्प्रे किंग ऍग्रो इक्विपमेंट या कंपनीला ८४०००० कन्व्हर्टिबल वॉरंट इशू करायला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने मंजुरी दिली.

फॉरीन REISSUANCE ब्रॅंचेससाठी मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट Rs १०० कोटींवरून Rs ५० कोटी केली.

आज IT FMCG रिअल्टी मध्ये खरेदी होती तर बँकिंग, एनर्जी, इन्फ्रा, फार्मा मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५२५२ NSE निर्देशांक निफ्टी १९३८६ बँक निफ्टी ४४४९६ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.