आजचं मार्केट – २५ ऑगस्ट २०२३

आज क्रूड US $ ८३.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.२१, USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२३ VIX १२.०४ होते.

USA मधील तिन्ही निर्देशांक आणि एशियन मार्केट्स मध्ये मंदी होती. आज जॅक्सन हॉल मध्ये जेरोम पॉवेल यांच्या भाषणाकडे जगातील सर्व मार्केट्सचे लक्ष आहे

चीनने कर्जासंबंधात नियम सोपे करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली.

व्हेनिझुएला आणि इराण क्रूडच्या सप्लायमध्ये वाढ करत आहेत. रशियाला क्रूडचा भाव US $ ९० प्रती बॅरलच्या आसपास राहायला पाहिजे आहे.

FII ने Rs १५२४.८७ कोटींची खरेदी तर DII ने Rs ५७९६.६१ कोटींची खरेदी केली.

GMR इन्फ्रा, RBL बँक, BHEL, डेल्टा कॉर्प, GNFC, हिंदुस्थान कॉपर, I बुल्स HSG, इंडिया सिमेंट, मन्नापुरम फायनान्स, मेट्रोपोलीस हेल्थ केअर, PNB बॅनमध्ये होते. एस्कॉर्टस कुबोटा आणि सन टीव्ही बॅन मधून बाहेर आले.

USA मध्ये कॅपिटल गुड्स कंपन्यांना मिळणाऱ्या ऑर्डर्स कमी होत आहेत.

महागाई वाढत आहे. नोकऱ्या मिळत आहेत.

जॉबलेस क्लेम कमी होत आहेत. ( २.४० लाखां वरून २.३०लाख झाले)

भारतात बँकांकडे सरप्लस फंड आहेत म्हणून १०% इन्क्रिमेंटल CRR लागू केला.

गार्डन रिच शिपबिल्डर्सने गोव्यातील डेम्पो बरोबर करार केला.

ईंडीगोने १९० बोईंग ७३७ ची ऑर्डर दिली.
KAYNES टेक ने कर्नाटक सरकार बरोबर Rs ३७५० कोटींचा करार केला कंपनी लवकरच प्रिंटेड सर्किट बोर्डचा प्लांट सुरु करणार आहे.

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड ने खास तरुणाईसाठी ‘YOUSTA’ फॅशन स्टोर्स हैदराबाद येथे चालू केले. यात Rs ४९९ आणि Rs ९९९ असे दोन विभागअसतील.

अशी २०० ‘YOUSTA स्टोर्स’ उघडणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज ने ओबेराय हॉटेलबरोबर ३ ICONIC हॉटेल्स उघडण्यासाठी करार केला. यापैकी १ हॉटेल UK मध्ये स्टॉक पार्क, भारतात अनंत विलास आणि गुजरात मध्ये आणखी एक हॉटेल चालू करतील.

सनराईज एफिशिअंट मार्केटिंग ही कंपनी १:१ बोनस शेअर देणार आहे.

रावळगाव शुगर फार्म ही कंपनी ३० ऑगस्ट २०२३ रोजी शेअर स्प्लिट वर विचार करणार आहे.

१९७ कम्युनिकेशन चे प्रमोटर ANTFIN त्यांचा ३.६% स्टेक ( २.३ कोटी शेअर्स ) ब्लॉक डीलच्या माध्यमातून Rs ८८०.१० च्या फ्लोअर प्राईसवर ( २.७% डिस्काऊंटवर ) विकणार.

अस्त्र मायक्रो वेव्ह ला Rs १५८ कोटींच्या ऑर्डर सॅटेलाईट सबसिस्टिम एअरबोर्न रडार आणि सबसिस्टिमस ऑफ रडार E-W प्रोजेक्ट साठी DRDO, ISRO, आणि DPSU कडून मिळाली.
इंडियन एअरफोर्स ची कार्यक्षमता वाढवण्यासाठी EWSUIT ची गरज आहे. हे EWSUIT BEL कडून खरेदी केले जातील.

वेदांताचे म्हणणे राजस्थान ऑइल ब्लॉक आर्बिट्रेशन मध्ये मान्य झाले.

भारती एअरटेलने जून मध्ये १४.०९ लाख यूजर्स ( मे मध्ये १३,२८ लाख), जिओने २२.७ लाख यूजर्स झाले ( ३०.३८ लाख मे मध्ये ) तर VI जूनमध्ये १२.८५ लाख ( मे मध्ये २८.१५ लाख) झाले.

शॉपर्स स्टॉपचे MD CEO वेणुगोपाल यांनी ३१ ऑगस्ट २०२३ पासून राजीनामा दिला.

SYRMA SG मध्ये सत्येन्द्र सिंह यांची CEO म्हणून नेमणूक केली. सत्येन्द्र सिंह यांना लार्जमल्टीनॅशनल कॉर्पोरेशनमधील स्ट्रॅटेजी, ऑपरेशन्स, मॅन्युफॅक्चरिग आणि बिझिनेस मॅनेजमेंटचा ३० वर्षांचा अनुभव आहे.

CDC ग्रुपने RBL बँकेचे ९९.५ लाख शेअर्स विकले.
पॉवर मेकला एकूण Rs ७३० कोटींच्या दोन ऑर्डर्स मिळाल्या.

अंबर मध्ये ९.३५ लाख शेअर्सचा Rs २६१ कोटींचा सौदा झाला.

उनो मिंडा च्या ७४ लाख शेअर्स म्हणजे २.५२ % स्टेक चा सौदा झाला.

सरकारने संरक्षण मंत्रालयासाठी स्वदेशी कंपन्यांकडून Rs ७८०० कोटींची खरेदी करायला परवानगी दिली.
जिओ BSE निर्देशांकातून आता २८ ऑगस्ट ऐवजी १ सप्टेंबरला बाहेर पडेल.

VST टिलर्स ने इलेक्ट्रिक पॉवर टिलर आणि कृषी उपकरणे डेव्हलप करण्यासाठी USA मधील SOLECTRACK बरोबर मास्टर सर्व्हिसेस अग्रीमेंट केले.

शिल्पा मेडिकेअरच्या तेलंगाणा युनिटला ब्राझीलच्या रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडून क्लीन चिट मिळाली.

ल्युपिन च्या ‘ESBRIET’ च्या जनरिकला USFDA ची मंजुरी मिळाली. ‘PIRFENIDONE’ या टॅब्लेट्स ना USFDA ची मंजुरी मिळाली.

HPCL सध्या २२% ते २३% रशियन क्रूड प्रोसेस करते असे व्यवस्थापनाने सांगितलं .

LIC ने टाटा केमिकल्समधील स्टेक ७.१२२३% वरून ९.१७७% केला.

सॉफ्ट बँक लवकरच झोमॅटोचे शेअर्स विकणार आहे.
IOC ने सांगितले की ३६० डिग्री एनर्जी कंपनी बनण्यासाठी Rs ४ लाख कोटी ऑइल रिफायनिंग. पेट्रोकेमिकल आणि एनर्जी ट्रान्झिशन मध्ये गुंतवणार आहे.

आज FMCG, PSE, इन्फ्रा, एनर्जी, ऑटो , रिअल्टी, मेटल, फार्मा मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६४८८६ NSE निर्देशांक निफ्टी १९२६५ बँक निफ्टी ४४२३१ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.