Monthly Archives: August 2023

आजचं मार्केट – १७ ऑगस्ट २०२३

आज क्रूड US $ ८३.५० प्रती बॅरल तर रुपया US $१= Rs ८३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.५६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२८ आणि VIX १२.४९ होते
सोने Rs ५८४०० च्या आसपास तर चांदी Rs ६९७०० च्या आसपास होते. बेस मेटल्स कॉपर अल्युमिनियम आणि झिंक मंदीत होती.

USA च्या फेडच्या FOMC च्या मिनिट्समध्ये सांगितले की अजून या वर्षात दोनदा दरवाढ केली जाऊ शकते. आज USA आणि एशियन मार्केट्स मध्ये मंदी होती.

टेनसेंट या चिनी कंपनीचे निकाल असमाधानकारक होते.
फीचने सांगितले की आता भारतीय बँकांजवळ पुरेसे कॅपिटल आहे आणि सामान्यतः NPA चे प्रमाण १०% च्या खाली आहे.

FII ने Rs ७२२.७६ कोटींची तर DII ने Rs २४०६.१९ कोटींची खरेदी केली

हिंदुस्थान कॉपर, SAIL, बलरामपूर चिनी, चंबळ फर्टिलायझर्स, डेल्टा कॉर्प, GNFC, ग्रॅन्युअल्स, इंडिया सिमेंट, मन्नापुरम फायनान्स, झी एंटरटेनमेंट, आणि I बुल्स HSG फायनान्स बॅनमध्ये होते.

अडाणी पॉवर्समध्ये प्रमोटर्सनी ८.०९% स्टेक विकला तर GQG पार्टनर्सने ३.९४% स्टेक घेतला.

ऑरोबिंदो फार्माच्या ABACAVIR, DOLUTEGRAVIR, आणि LAMIVUDIN या तीन औषधांच्या संयुक्त फॉर्म्युलेशन टॅब्लेट्सच्या जनरिकला USFDA ने मान्यता दिली.हे औषध HIV ग्रस्त लहान मुलांसाठी VIIV हेल्थकेअरच्या लायसेन्स अंतर्गत बनवले जाईल.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनने उत्तरपूर्व विभागात स्कीम अंतर्गत ऍसेटचे यशस्वी कमिशनिंग केले. हे १६ ऑगस्टपासून सुरु होतील.

न्यू QUEST आशिया इन्व्हेस्टमेंट II ने त्यांचा उज्जीवन स्मॉल फायनान्सियल सर्व्हिसेस मधील स्टेक ५.१७% वरून २.७०% एवढा केला. २.४७% स्टेक कमी केला.

एस्सार शिपिंगच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने कंपनीच्या ‘एनर्जी II’ बर्म्युडा’ , एस्सार शिपिंग DMLC दुबई, आणि OGD सर्व्हिसेस होल्डिंग या तीन सबसिडीअरीमधील ODI आणि शेअर्स विकण्यासाठी मंजुरी दिली

इक्विटी इंटेलिजन्स फंडाने RPSG व्हेंचर्स मधील त्यांचा स्टेक २.७९% वरून २.०८ इतका केला.

ग्लोबल स्पिरिट्सचे २५ लाख शेअर्स (८.५% स्टेक) Rs ९७५ ते Rs ९८५ दरम्यान विकले गेले.

MB फिनमार्टने रेलिगेरे मध्ये ८१ लाख शेअर्स खरेदी केले. त्यामुळे बर्मन कुटुंबाचा स्टेक वाढला.

NAVA ने त्यांचा ओडिशा मधील प्लांटमध्ये सिलिकॉन मँगेनीजचे उत्पादन बंद केले.

FDA ने सिप्ला च्या पाताळगंगा प्लांट २ मध्ये गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस अनुसरल्या जात नाहीत म्हणून १० दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा आदेश दिला.

ग्लेनमार्क फार्माच्या ‘TACROLIMUS ऑइन्टमेन्ट या औषधा साठी SANDA (सप्लिमेंटल न्यू ड्रग ऍप्लिकेशन) मंजुरी मिळाली.

इंडसइंड बँकेने ब्रिटिश एअरवेज आणि कतार एअरवेज बराबर मल्टिब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच केले.

व्हीनस रेमिडीजने ‘ELORES’ हे ‘काळजी’ वरील औषध लाँच केले.

HDFC लाईफने US $ डिनॉमिनेटेड लाईफ आणि हेल्थ इन्शुअरन्स पॉलिसीज गिफ्ट सिटी ब्रान्चमधून लाँच केल्या.

HDFC AMC ने गिफ्ट सिटी मधून ग्लोबल इन्व्हेस्टर्ससाठी ६ फंड लाँच केले.

RCF च्या नॅनो युरियाच्या प्लांटला पर्यावरणाची मंजुरी मिळाली.

GMDC ने त्यांच्या फायनल लाभांशाची रक्कम Rs ९.१० प्रतिशेअर वरून Rs ११.४५ प्रती शेअर केली.

INDAG रबर चे निकाल चांगले आले.

दिलीप बिल्डकॉनच्या JV ला मध्यप्रदेशात कन्स्ट्रक्शन साठी Rs ६९९ कोटींची ऑर्डर मिळाली.

सोडा ASHची किंमत वाढल्यामुळे DCW या कंपनीला फायदा होईल.

HP ऍडहॅसिव्ह ही कंपनी स्प्लिटवर विचार करणार आहे.
कृष्णा मेडिकल कोंडापूर हेल्थकेअर मधील ८.०६% स्टेक खरेदी केला.

HEC इन्फ्रा ला Rs ३७ कोटींची ऑर्डर मिळाली.

बाटा ही कंपनी फुटवेअर जायंट आदिदास बरोबर पार्टनरशिप करण्यासाठी बोलणी करत आहे.

DR अगरवाल आय हॉस्पिटल मध्ये TAMASEK आणि TPG ने US $ ८० मिलियनची गुंतवणूक केली

मद्रास फर्टिलायझर ने जो प्लान्ट बंद केला होता तो सुरु केला.
आज एनर्जी, FMCG, IT, फार्मा, PSE मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले तर पेपर सेक्टरमध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५१२९ NSE निर्देशांक निफ्टी १९३६५ बँक निफ्टी ४३८९१ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – १६ ऑगस्ट २०२३

आज क्रूड US $ ८४.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ८२.९० च्या आसपास होते.US $ निर्देशांक १०३.१३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१८ आणि VIX १२.३३ होते.

आज सोने Rs ५८८७५ तर चांदी Rs ७०००७ च्या आसपास होते. बेस मेटल्स मंदीत होती.
UK ची महागाई ६.८% ने तर कोअर महागाई ६.९% ने वाढली.

चीनने त्यांचा १ वर्षांसाठी रेट ०.१५% ने कमी केला. चीनची झोन्गझी ही कंपनी अडचणीत आली आहे. आता हा रेट २.५% झाला.

फीचने सांगितले की USA मधील आणखी १२ बँका डाऊन ग्रेड होऊ शकतात.

USA मार्केटमधील तिन्ही निर्देशांक मंदीत होते.

जपानची GDP ग्रोथ ६% झाली.

भारताचा CPI ७.४४% आला (जून महिन्यात ४.६१ होता)
FII ने Rs २३२४ कोटींची विक्री तर DII ने Rs १४६० कोटींची खरेदी केली.

GNFC, बलरामपूर चिनी, चंबळ फर्टिलायझर्स, डेल्टा कॉर्प, ग्रॅन्युअल्स, I बुल्स HSG, इंडिया सिमेंट, मन्नापुरंम फायनान्स, आणि झी एंटरटेनमेंट बॅनमध्ये होते.

ITC चे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट Rs ४९०२ कोटी (Rs ४१६९ कोटी) झाले तर उत्पन्न Rs १७२८९ कोटींवरून Rs १५८२८ कोटी झाले. तर मार्जिन ३२.७% वरून ३९.५% झाले. ITC ने सांगितले की कंपनी ITC च्या १० शेअर्समागे ITC हॉटेलचा १ शेअर देईल.

ITC हॉटेल्सच्या लिस्टिंग ला १.५ वर्ष लागेल.ITC महाराजा हेरिटेज मधील २५% स्टेक घेणार.

इन्फोसिसला लिबर्टी ग्लोबल कडून ५ वर्षांसाठी US $ १६० कोटींचे डील मिळाले.

३ वर्षांची मुदतवाढ मिळाली तर हे डील US $ २५० कोटींचे होईल.

पेन्नार या कंपनीला Rs ७०२ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

सरकारने त्यांच्या विंडफॉल टॅक्सच्या रिव्ह्यू मध्ये डोमेस्टिकली उत्पादित केलेल्या क्रूड वरील विंडफॉल टॅक्स Rs ४२५० प्रती टना वरून Rs ७१०० केला. तसेच डिझेलच्या एक्सपोर्टवरील ड्युटी Rs १ वरून Rs ५.५० केली. ATF वरील ड्युटी प्रती लिटर Rs २ ने वाढवली.

उनो मिंडा EV कॉम्पोनंट आणि पिस्टन उत्पादन करण्यासाठी २ नवीन प्लांट सुरु करणार आहे.
मंत्रिमंडळाने रेल्वेचे नवीन ट्रॅक टाकण्यासाठी आणि काही ट्रॅक अपग्रेड करण्याच्या ७ प्रोजेक्टला मंजुरी दिली. ह्या प्रोजेक्टसाठी Rs २०००० कोटी मंजूर केले. ह्याचा फायदा रेल्वेशी संबंधित RVNL, RITES, रेलटेल, SAIL, KEC इंटरनॅशनल, JSPL, IRCON, या शेअर्सना होईल.

रेलिगेअरमध्ये बर्मन कुटुंबाने त्यांचा स्टेक वाढवला.

नजारा टेक च्या सिंगापूर सबसिडीअरीने इझरेलच्या ‘स्नॅक गेम्स’ या कंपनीमध्ये US $ ५.१४ लाखांना स्टेक खरेदी केला.

ऑरोबिंदो फार्माच्या ‘ICATIBANT’ इंजेक्शनला USFDA ची मंजुरी मिळाली.

NMDC ने लम्प आणि फाईनच्या किमती Rs ३०० प्रती टन कमी केल्या.

रॉयल ऑर्चिडने सिमल्यात नवीन हॉटेल सुरु केले.

फॉक्सकॉमने भारतात I फोन १५ चे उत्पादन सुरु केले.

SBFC या कंपनीच्या शेअर्सचे BSE वर Rs ८१.९९ आणि NSE वर Rs ८२ वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये शेअर Rs ५७ ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.

SRF मध्ये GST ऑथॉरिटीज ने सर्च ऑपरेशन कंडक्ट केले.
E बस सर्व्हिसेससेवेसाठी केंद्र सरकारने Rs ५७६१३ कोटींची तरतूद केली. ही सेवा एकूण १०० शहरात १०००० बसेस सेवा सुरु करतील त्यासाठी १७० शहरांची निवड केली आहे. यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची गुंतवणूक असेल. याचा फायदा ओलेक्ट्रा ग्रीन, टाटा मोटर्स, JBM ऑटो, अशोक लेलँड यांना होईल.

झेन टेक ला संरक्षण मंत्रालयाकडून Rs ६५ कोटींची ऑर्डर मिळाली.

ल्युपिनच्या ‘BROMFENAC OPTHALMIC च्या सोल्युशनच्या जनरिकला USFDA ची मंजुरी मिळाली

JSW एनर्जी मध्ये GQG ने Rs ३४५ प्रती शेअर दराने Rs ४१०.९४ कोटींना १.१९ कोटी शेअर्स खरेदी केले.

चीन मध्ये ऍसिटिक ऍसिडच्या किमती वाढल्या आहेत याचा फायदा GNFC ला होईल.

‘VI’ चे लॉसेस वाढले उत्पन्न वाढले.

कोची शिपयार्डचे प्रॉफिट १३५% ने वाढले तर गार्डन रिच शिपबिल्डर्सचे प्रॉफिट ५४% ने वाढले.

अशोक लेलँड OHM ग्लोबल मोबिलिटी मधील १००% स्टेक Rs १.०० लाखाला घेऊन या कंपनीत Rs ३०० कोटींची गुंतवणूक करतील.

सेन्को गोल्डचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

सुनील मुंजाल हे हिरोमोटो कॉर्पचे व्यवस्थापन आणि कंट्रोल सोडतील.

रिअल्टी, ऑटो, फार्मा, FMCG, इन्फ्रा मध्ये खरेदी तर मेटल्स आणि बँकिंग मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५५३९ NSE निर्देशांक निफ्टी १९४६५ बँक निफ्टी ४३९४६वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – १४ ऑगस्ट २०२३

आज क्रूड US $ ८६.५० प्रती बॅरल तर रुपया US $१= Rs ८२.९० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०२.९५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१७ आणि VIX १२.१८ होते
ग्लोबल मार्केट्स कमजोर होती. चीन मधून कमजोर संकेत. कंट्री गार्डनचा शेअर पडला. USA मध्ये WPI .३% आला UK ची GDP ग्रोथ .२% आली.

ऑरोबिंदो फार्माचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

NMDC, ऍडव्हान्स एंझाइम चे निकाल चांगले आले. अतुल ऑटो चा तोटा वाढला, टिमकीन चा प्लांट बंद आहे निकाल कमजोर आले, सिटी युनियन बँक रूपा, लक्स, यांचे निकाल कमजोर आले.

जून महिन्यासाठी IIP ३.७% आली.

जुलै महिन्यासाठी WPI -१.३६% ( जून मध्ये -४.१२% होता) आला. म्हणजे होलसेल महागाई वाढली.

सेबीने सुप्रीम कोर्टाकडे हिंडेनबर्ग संबंधात रिपोर्ट सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ मागितली.

गॅब्रिएल चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

SAKTHI शुगरचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

नेक्टर लाईफ सायन्सेसचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले.

SJVN ने पंजाब पॉवर स्टेट कॉर्पोरेशनबरोबर पॉवर पर्चेस अग्रीमेंट केले.

DCW ने प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले.

अस्त्राझेनेकाचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
सॅकसोफ्ट चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

लक्सचे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले

ABB चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले ऑर्डर बुक १०%ने वाढले.

PFC चे NII वाढले प्रॉफिट वाढले.

ASTRAL चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

कॅम्लिन फाईन चे निकाल चांगले आले

मार्कसन्स फार्मा प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढले.

कॅपॅसिटी इन्फ्राचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.

FII ने Rs ३०७३.२८ कोटींची विक्री तर DII ची Rs ५००.३५ कोटींची खरेदी केली.

इंडिया सिमेंट, बलरामपूर चिनी, चंबळ फर्टिलायझर, डेल्टा कॉर्प, ग्रॅन्युअल्स, हिंदुस्थान कॉपर, I बुल्स HSG, मन्नापुरम फायनान्स, आणि झी इंटरप्रायझेस बॅन मध्ये होते.

ONGC चे प्रॉफिट ३४.१ % YOY कमी होऊन Rs १००१५ कोटी तर रेव्हेन्यू २०.१% कमी होऊन Rs ३३८१४ कोटी झाला.

ITC ने संजीव पुरी यांना जुलै २२ २०२४ पासून पुढील ५ वर्षे MDCEO म्हणून नेमणूक करण्यास मंजुरी दिली. तसेच हेमंत मलिक आणि अलका भरूच यांची डायरेक्टर म्हणून नेमणूक केली.

NCLT ने वेदांताच्या ‘मीनाक्षी एनर्जी’ च्या रेझोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली.

स्टर्लिंग & विल्सन रिन्यूएबल एनर्जी ला खावडा येथील GIPCL ( गुजरात इंडस्ट्रीज पॉवर CO ) कडून त्यांच्या ६०० MWac सोलर PV या प्रोजेक्टच्या ३ वर्षांच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स साठी Rs ११३० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

बायोकॉन ची सबसिडीअरी ( जी बायोसिमिलर बिझिनेस हॅन्डल करते) बायोकॉन बायालॉजीक्स चे २०२५ च्या पहिल्या सहामाहीत लिस्टिंग करण्याचा बायोकॉनचा विचार आहे
NALKO चे प्रॉफिट ४०.२% ने कमी होऊन Rs ३१७८.४० कोटी झाले तर रेव्हेन्यू A .३% निकामी होऊन Rs ३३३८० कोटी झाला.

नायकाचे प्रॉफिट ८% वाढून Rs ५.४ कोटी तर रेव्हेन्यू २४% ने वाढून Rs १४२१.८० कोटी झाला.

डिव्हीज लॅबकचे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले. पण कंपनीने सांगितले की कंटेनर्सची उपलब्धता वाढते आहे कच्च्या मालाच्या किमती कमी होत आहेत. त्यामुळे येत्या काही तिमाहीत कंपनीच्या निकालात सुधारणा दिसण्याची शक्यता आहे.

TCS ला USA मधील कंपनी ‘लेक्समार्क’ कडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी ऑर्डर मिळाली.

स्पाईस जेट YOY तोट्यातून फायद्यात आली उत्पन्न कमी झाले.

पाम ऑइलच्या किमती मलेशियात ६ महिन्यांच्या किमानस्तरावर आहेत.

NCDEX ने वेदर डेरीव्हेटीव्ह्ज लाँच करण्याच्या दृष्टीने SKYMET बरोबर MOU केले.

सोने Rs५८८७४ आणि चांदी Rs ६९८०० च्या आसपास होते. बेस मेटल्स मंदीत होती.

सोलार ऍक्टिव्ह चा तोटा वाढला उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
WOCKHARDT चा तोटा वाढला.

हवाई प्रवास डेटा :MOM ३.३% कमी होऊन १.२१ कोटी तर YOY २४.६% कमी होऊन १.२१ कोटी झाले. इंडिगोचा मार्केट शेअर ६३.२% वरून ६३.४% झाला.

रामकृष्ण फोर्जिंग ने US $ १३.६५ मिलियनचे बिझिनेस डील केले.

बोरोसिलचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.

मेटल, ऑटो, रिअल्टी, फार्मा बँकिंग मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. IT, FMCG, एनर्जी मध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५४०१ NSE निर्देशांक निफ्टी १९४३४ बँक निफ्टी ४४०९० वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – ११ ऑगस्ट २०२३

आज क्रूड US $ ८६.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.७०च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.५१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०९% VIX ११.४० होते.

आज USA चे महागाईचे आकडे आले महागाई ३.२%   तर कोअर महागाई ४.७% झाली. जॉबलेस क्लेम २१००० ने वाढून ते २४८००० झाले. USA मधील मार्केट मंदीत होती.
GMDC १७ ऑगस्ट रोजी लाभांश देण्यावर विचार करणार आहे. फायनल लाभांशाची रेकॉर्ड डेट ३१ ऑगस्ट २०२३ निश्चित केली

DLF ग्लोबल हेल्थ बरोबर हॉस्पिटल बनवणार.

HCL टेक ने व्हेरिझॉन बरोबर US $ २ बिलियनचा करार केला.

ABB इंडिया ११ ऑगस्ट २०२३ रोजी स्पेशल लाभांशावर विचार करेल.

अपोलो टायर्स चे प्रॉफिट YOY १२४% ने वाढून Rs ३९६.९० कोटी झाले रेव्हेन्यू ५% ने वाढून Rs ६२४४ कोटी झाला कच्च्या मालाच्या कमी झालेल्या किमती किमती आणि इतर उत्पन्न वाढले.

SAIL चे प्रॉफिट YOY  ७३.६% ने कमी होऊन Rs २१२.५कोटी झाले तर रेव्हेन्यू १.४% ने वाढून Rs २४३५९ कोटी झाला. वाढलेले इतर उत्पन्न कच्या मालाच्या कमी झालेल्या किमती आणि टॅक्स खर्च कमी झाले.

सूर्योदय SFB चे प्रॉफिट ६पटीने वाढून Rs ४७.६ कोटी झाले. इतर उत्पन्न वाढले. प्रोव्हिजन कमी केल्या. NII २६.९% वाढून Rs २२४.७० कोटी झाले

टॉरंट पॉवर चे प्रॉफिट ६% ने वाढून Rs ५३२.३० कोटी रेव्हेन्यू १२.५५% ने वाढून Rs ७३२७.६० कोटी झाला फायनान्सियल कॉस्ट आणि डेप्रीसिएशन खर्च वाढला.

MTAR टेक चे प्रॉफिट २५.४% ने वाढून Rs २०.३० कोटी झाले. रेव्हेन्यू ६७.६% ने वाढून Rs १५२.६० कोटी झाला.
जिओ फायनॅन्शियल्स चे शेअर्स तुमच्या डिमॅट अकाउंटला ( रेकॉर्ड डेट २० जुलै ) तुमच्या खात्यात क्रेडिट झाले
MSCI चे रिबॅलन्सिंग १ सप्टेंबर २०२३ पासून अमलात येईल. ग्लोबल स्टॅंडर्ड इंडेक्स मध्ये PFC, REC, अशोक लेलँड, सुप्रीम इंडस्ट्रीज, IDFC १st बँक, HDFC AMC यांचा समावेश होईल तर ACC या इंडेक्समधून बाहेर पडेल.
बायोकॉनचे प्रॉफिट कमी उत्पन्न कमी आणि मार्जिन कमी झाले.

हिरोमोटो कॉर्प चे प्रॉफिट YOY ३२% ने वाढून Rs ८२४.७२ कोटी झाले. इतर उत्पन्न आणि वाढती  ऑपरेशनल कार्यक्षमता यामुळे कंपनीने VRS वर Rs १६० कोटी खर्च करूनही त्यांचे प्रॉफिट वाढले. रेव्हेन्यू ४.५% ने वाढून Rs ८७६७.३० कोटी झाला.

विक्री मात्र २.६% ने कमी होऊन १३.५३ लाख  युनिट झाली.
LIC चे प्रॉफिट Rs ६८२.८८ कोटी तर प्रिंमियम Rs ९८३६२.८० कोटी झाले.नॉन पार  फंडातील  अक्रिशन Rs ७४९१.५३ कोटी ट्रान्स्फर केल्यामुळे LIC ने Rs ९५४३.७० कोटींचे प्रॉफिट जाहीर केले आहे.

शनिवार १२ ऑगस्ट २०२३ रोजी ऑरोबिंदो फार्मा, अडवान्सड एन्झाईम, अमर राजा, क्रॉम्प्टन कन्झ्युमर, फिनोलेक्स केबल्स, JK सिमेंट, NITCO, PANACEA बायोटेक, PTC इंडिया, RVNL, सिग्नेट इंडस्ट्रीज, V २ रिटेल, झी मीडिया त्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

अडाणी ग्रुपने ते त्यांचा अडाणी विल्मरमधील  स्टेक  विकणार असल्याच्या बातमीचे खंडन केले आणि तसे स्टॉक  एक्सचेंजीस ना कळवले.

असाही सोंगवोन या कंपनीला भरूच मधील जमीन विक्रीचे Rs ४६.९ कोटी मिळाले.

ITC ने ५ फॅक्टरी आणि १ हॉटेल चालू केले.

मुकुंदचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.

झायड्स लाईफ चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

पॉलिप्लेक्स फायद्यातून तोट्यात गेली. इन्कम कमी झाले मार्जिन कमी झाले.

वोन्डरेला हॉलिडेजचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

NIIT तोट्यातून फायद्यात आली. इन्कम कमी झाले. इतर उत्पन्न Rs १६ कोटी झाले.

TTK प्रेस्टिज चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले.

किरि इंडस्ट्रीज फायद्यातून तोट्यात गेली उत्पन्न कमी झाले.
रेमंड चे प्रॉफिट उत्पन्न वाढले  मार्जिन कमी झाले.

कोची शिपयार्ड चे प्रॉफिट उत्पन्न वाढले.

गोदरेजचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

कल्पतरू पॉवर प्रॉफिट उत्पन्न वाढले.

इन्फोएज तोट्यातून फायद्यात आली (QOQ) उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

अपोलो हॉस्पिटलचे प्रॉफिट कमी होऊन Rs १७३ कोटी उत्पन्न वाढून Rs ४४१७ कोटी तर मार्जिन कमी होऊन ११.५% झाले.

विनती ऑर्गॅनिकचे प्रॉफिट आणि उत्पन्न कमी झाले.

LIC ने नॅशनल फर्टिलायझर मधील त्यांचा स्टेक ११.३% वरून ९.२७% एवढा केला.

KPI ग्रीनचे प्रॉफिट उत्पन्न वाढले.

BEML चा तोटा कमी झाला उत्पन्न कमी झाले.

HAL चे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

सूर्य रोशनीचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

आज फार्मा FMCG बँकिंग मध्ये विक्री तर PSU बँकांमध्ये खरेदी झाली. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५३२२ NSE निर्देशांक निफ्टी १९४२८  बँक निफ्टी  ४४१९९  वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – १० ऑगस्ट २०२३

आज क्रूड US $ ८७.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.८० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.४५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०१७ होते.

USA मधील मार्केट्स मंदीत होती युरोपियन मार्केट्स तेजीत होती.USA च्या मार्केट्स मध्ये NVIDIA अमेझॉन मायक्रोसॉफ्ट, मेटाचे शेअर पडले.

थॉमस कुक तोट्यातून फायद्यात आली.

FII ने Rs ६४४.११ कोटींची खरेदी आणि DII ने Rs ५९७.८८ कोटींची विक्री केली.

बलरामपूर चिनी, चंबळ फर्टिलायझर्स, डेल्टा कॉर्प, हिंदुस्थान कॉपर,आणि I बुल्स HSG फायनान्स बॅनमध्ये होते.

REDTAPE च्या लिस्टिंगला NSE आणि BSE यांनी मंजुरी दिली.

क्रूडची आयात आणि मागणी कमी होत आहे सौदी अरेबिया आणि ओपेकचे मेम्बर क्रूडचे उत्पादन कमी करण्याची शक्यता आहे.

पीडिलाइटचे प्रॉफिट वाढून Rs ४६८ कोटी उत्पन्न वाढून Rs ३२७५ कोटी आणि मार्जिन वाढून २१.५९% झाले.

FACTचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ५२ कोटींचा वन टाइम लॉस बुक केला.
अल्केम लॅबचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. निकाल चांगले आले.

हिंदाल्को ने टेक्सरेल बरोबर अल्युमिनियम वॅगन आणि कोच साठी स्ट्रॅटेजिक करार केला.

गोदरेज कंझ्युमर्स तामिळनाडूमध्ये Rs ५१५ कोटींची गुंतवणूक करणार आहे.

DR रेड्डीजने USA मध्ये KOMBIGLYZE चे जनरिक लाँच केले.

आज RBI ने त्यांचे द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर केले. RBI ने दरात कोणताही बदल केला नाही आणि स्टान्स ही विथड्रॉव्हल ऑफ अकॉमोडेशन ठेवला. रेपोरेट ६.५०% MSF आणि बँक रेट ६.७५ रिव्हर्स रेपो रेट ३.३५% SDF ६.२५% आणि CRR ४.५% कायंम ठेवले.

हवामानातील बदल, जिओपॉलिटिक टेन्शन, आणि इतर बाबींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेची ग्रोथ १.७% वर आली.पेरणीचे प्रमाण वाढत आहे पावसाचे प्रमाण पुरेसे आहे डिस्ट्रिब्युशन मात्र अनियमित आहे. सर्व्हिस ऍक्टिव्हिटी वाढत आहे. PV विक्री एअरट्रॅव्हलचे वाढते प्रमाण यावरून अर्बन मागणी तर ग्रामीण मागणी ( ट्रॅक्टर आणि २ व्हीलर) मागणी वाढत आहे. खाजगी भांडवल गुंतवणूक वाढत आहे. सिमेंट आणि स्टीलचा खप वाढत आहे. फ्लो ऑफ रिसोर्सेस ७.५ लाख कोटींचा झाला.

निर्यात मात्र कमी झाली. रिअल GDP ग्रोथचे अनुमान FY २३-२४ साठी ६.५%, पहिल्या तिमाहीसाठी ८% दुसऱ्या तिमाहीसाठी ६.५% तिसऱ्या तिमाहीसाठी ६% चौथ्या तिमाहीसाठी ५.७% आणि २४-२५च्या पहिल्या तिमाहीसाठी अनुमान ६.६% केले आहे. फॉरीन रिसोर्सेस US $६०० बिलियन होते.

RBI ने कर्जदारांच्या EMI तसेच व्याजाच्या दरात बदल करताना बँकांना अधिक पारदर्शकता ठेवण्यास सांगितले आहे.
कर्जदारांना फिक्स रेटचे ऑप्शन आणि फोरक्लोजरचे ऑप्शन उपलब्ध करून द्यायला सांगितले. तसेच या ऑप्शनसाठी काही चार्जेस लावायचे असल्यास तेही त्यांना सांगायला सांगितले.

जुलै महिन्यात अन्नधान्याची महागाई वाढणार आहे. क्रूडची किंमत वाढत आहे. RBI ने महागाईचे अनुमान २३-२४ साठी ५.४% दुसऱ्या तिमाहीसाठी ६.२% तिसर्या तिमाहीसाठी ५.७% चौथ्या तिमाहीसाठी ५.२% आणि २४-२५च्या पहिल्या तिमाहीसाठी ५.२% ठेवले आहे. महागाई ४% पेक्षा कमी ठेवण्यासाठी RBI नेहेमीच प्रयत्नशील राहील.

Rs २००० च्या नोटा परत आल्याने आणि RBI ने त्यांचे सरप्लस सरकारकडे ट्रान्स्फर केल्याने सरकारी खर्च वाढला त्यामुळे अर्थव्यवस्थेतील लिक्विडीटी वाढली. RBI ने श्येड्यूल्ड बँकांना १२ ऑगस्टपासून १०% इन्क्रिमेंटल CRR ठेवण्यास सांगितले आहे. ८ सप्टेंबर ला ह्या निर्णयाचा रिव्ह्यू केला जाईल.

बँक क्रेडीट वाढले NPA कमी झाले बँकांची कॅपिटलची पोझिशन चांगली आहे. FPI चे फ्लो चांगले वाढले तर FDI फ्लो कमी झाले.

RBI अर्थव्यवस्थेत पुरेशी लिक्विडीटी राहते याकडे लक्ष ठेवेल

ग्रीव्हज कॉटन फायद्यातून तोट्यात गेली. उत्पन्न कमी झाले.

TVS श्रीचक्र तोट्यातून फायद्यात आली मार्जिन वाढले.

IPCA लॅबचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

NIIT लर्निंग चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

३M इंडिया चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.

अरविंद फॅशनचा तोटा वाढला उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

प्रिसिजन वायर चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.

मुंजाल शोवा चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.

पेज इंडस्ट्रीजचे YOY निकाल कमजोर असले तरी QOQ सुधारणा दिसत आहे. कंपनीने Rs ७५ लाभांशाची घोषणा केली.

अवंती फीड्स प्रॉफिट वाढले रेव्हेन्यू कमी झाले

इंगरसोल रँडचा फायदा वाढला, उत्पन्न वाढले.

संवर्षांना मदर्सन फायदा उत्पन्न मार्जिन वाढले.

पटेल इंजिनीअरिंग चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले

मनापूरम फायनान्सचे फायदा रेव्हेन्यू मार्जिन वाढलेशिल्पा मेडिकेअर पँझायदा वाढला उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.

कार ट्रेंडचे प्रॉफिट वाढले रेव्हेन्यू वाढले.

सतलज टेक्सटाईल्स फायद्यातून तोट्यात गेली.

टाइम टेक्नोप्लास्ट चे फायदा रेव्हेन्यू वाढले.

ग्रासिम चे प्रॉफिट रेव्हेन्यू कमी झाले

NCC चे प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढले.

विश्वराज शुगर चा तोटा वाढला रेव्हेन्यू कमी झाला.

चोलामंडळम फायनान्स चे प्रॉफिट वाढले NII वाढले.

KRBL चा फायदा वाढला. Rs १ लाभांश दिला आणि कंपनी Rs ५०० प्रती शेअर भावाने टेंडर रूटने ६५ लाख शेअर बायबॅक करण्यासाठी Rs ३२५ कोटी खर्च करणार.

गुजरात पर्यावरण कंट्रोल बोर्डाने नवीन फ्ल्युओरीनचा दहेज येथील प्लांट बंद करण्याचा निर्णय रद्द केला.

२-३ आठवड्यात सरकार इथेनॉल ची किंमत Rs १.५० ते Rs २ प्रती लिटर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अबॉट लॅबचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

बॉम्बे डाइंगचा तोटा वाढला, उत्पन्न कमी झाले.

बजाज कन्झ्युमर चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

JB केमिकल्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

विसाका इंडस्ट्रीज चे प्रॉफिट कमी झाले, इन्कम कमी झाले, मार्जिन कमी झाले.

मनाली पेट्रो प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन कमी झाले.

टाटा पॉवरचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

BSE चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

BLS इंटरनॅशनल प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

V-मार्ट फायद्यातून तोट्यात गेली, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.

झी इंटरप्रायझेस चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले कंपनीने Rs ७०.५० कोटी वन टाइम लॉस बुक केला.

मॅक्स फायनान्स प्रॉफिट वाढले, NII वाढले, उत्पन्न वाढले.
व्हरांडा लर्निंगचा तोटा कमी झाला, उत्पन्न वाढले.

PI इंडस्ट्रीजचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

V-गार्डचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

सुला वाईन चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

IOL केमिकल्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.

फोर्स मोटर्स तोट्यातून फायद्यात आली उत्पन्न वाढले.
सेबीने लिस्टिंगची कालमर्यादा T+६ वरून T+३ केली. ही मर्यादा १सप्टेंबरपासून ऐच्छिक आणि १ डिसेम्बरपासून अनिवार्य असेल.

ऍक्सिस बँकेला मॅक्स लाईफ मध्ये प्रेफरन्स अलॉटमेंट दवारा Rs १६१२ कोटी गुंतवण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी मिळाली. या गुंतवणुकीनंतर ऍक्सिस बँकेचा मॅक्स लाईफमध्ये १६.२२% स्टेक होईल आणि ऍक्सिस ग्रुपचा १९.०२% होईल.

पॉवर ग्रीडच्या बोनस इशूसाठी १२ सप्टेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.

हिंदुस्थान ग्लास चे निकाल सुंदर आले.

युग डेकॉर १८ ऑगस्ट रोजी बोनस इशूवर विचार करेल.
NCLT ने सर्व हरकती रद्द करून झी इंटरप्रायझेस आणि सोनी यांच्या मर्जरला परवानगी दिली.

दीपक फर्टिलायझर्स ही कंपनी गुजरातमधील दहेज येथील नायट्रिक ऍसिडची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी Rs १९५० कोटी गुंतवणार आहेत.

आज FMCG, फार्मा, बँकिंग रिअल्टी, IT, मध्ये प्रॉफिट बुकिंग आणि मेटल्स आणि एनर्जी मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५६८८ NSE निर्देशांक निफ्टी १९५४३ बँक निफ्टी ४४५४१ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – ९ ऑगस्ट २०२३

आज क्रूड US $ ८६.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १ = ८२.८० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.३५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०२ आणि VIX ११.४७ होते.आज सोने Rs ५९३५०च्या आसपास तर चांदी Rs ७०५०० च्या आसपास होते. सोन्याला US $ १९१३ वर सपोर्ट आहे. बेस मेटल्स तेजीत होती. सरकार गव्हावरील इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याच्या /रद्द करण्याच्या विचारात आहे.

FII ने Rs ७११.३४ कोटींची विक्री तर DII ने Rs ५३७.३१ कोटींची खरेदी केली.

चंबळ फर्टिलायझर्स, डेल्टा कॉर्प, बलरामपूर चिनी, हिंदुस्थान कॉपर, I बुल्स HSG फायनान्स, इंडिया सिमेंट बॅन मध्ये होती.

बँक ऑफ अमेरिका ने भारतीय शेअरमार्केटचा आऊटलूक अपग्रेड केला. डिसेंबर २०२३ पर्यंत निफ्टी २०५०० चा स्तर गाठेल असे अनुमान केले. कारण डोमेस्टिक इंफ्लो स्ट्रॉंग आहे. USA मध्ये रिसेशन येण्याची भीती कमी झाली आहे.काही दिवसांपूर्वी मॉर्गन स्टॅंलेने सुद्धा भारतीय मार्केट्सचे अपग्रेडेशन केले होते.

वॉलमार्ट ने भारतातल्या फ्लिपकार्ट मध्ये जो टायगर ग्लोबलचा स्टेक होता तो US $ १.४ बिलियनला खरेदी केला.
डाऊ जोन्स चे इंडस्ट्रियल ऍव्हरेज १२७.७३ ने कमी झाले.
चीनचे ट्रेड सरप्लस २१.४% पडले. (US $ ८०.६० बिलियन होते ) झाला. चीनची निर्यात १४.५% ने पडली तर आयात १२.५% ने कमी झाली. चीनमध्ये महागाई -०.३% कमी झाली.

USA चे महागाईचे आकडे १० ऑगस्टला येतील. USA ची कंपनी यलोट्रक बुडाली. या कंपनी जवळ ३०००० ट्रक आहेत.

इंडियन आर्मिकडून २०० ड्रोन सप्लाय आणि IFCO कडून ४०० ड्रोनची ऑर्डर ‘दक्ष अनमॅन्ड सिस्टीम’ या कोरोमंडेलच्या सहाय्यक कंपनीला मिळाली.

मूडीज ने बँकिंग सेक्टर ला डाऊन ग्रेड केले. लहान आणि मध्यम आकाराच्या ११ बँकांचे रेटिंग कमी केले.

धानुका एग्रीटेकने गुजरातमधील दहेज प्लांटमध्ये ट्रायल प्रोडक्शन चालू केले.

ICICI लोम्बार्डला GST च्या इंटेलिजन्स विभागाने Rs २७३.४० कोटींची नोटीस पाठवली.

जय भारत मारुतीने त्यांच्या २ शेअर्सचं ५ शेअर्स मध्ये स्प्लिट जाहीर केले

आयडिया फोर्ज ला भारत सरकारकडून Rs ८८ कोटींची ऑर्डर मिळाली.

युनिकेम लॅबमध्ये २६% स्टेक घेण्यासाठी ओपन ऑफर आणण्यासाठी सेबीने मंजुरी दिली.

GENSOL ला OREDA कडून Rs ११५ कोटींची इलेक्ट्रिक बसेस साठी ऑर्डर मिळाली.

सुझलॉन एनर्जी QIP रूटने फंड उभारणार आहे.

अडाणी वूल्मर मधील ४४% स्टेक (व्हॅल्यू US $ २७ बिलियन) अडाणी ग्रुप विकण्याचा विचार करत आहे.

M & M ने EALFA सुपर रिक्षा आणि स्वराज ८२०० व्हील हार्वेस्टर लाँच केले.

गुजरात अल्कली चे प्रॉफिट, उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले निकाल असमाधानकारक होते.

भारत फोर्ज चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
ताज GVK चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

इगरशी मोटर्स तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

युनो मिंडा चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.कंपनी NCD दवारा Rs ४०० कोटी उभारेल.

आंध्र शुगरचे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले.
गुजरात पिपावावचे प्रॉफिट, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

TD पॉवरचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले
ऑइल इंडिया चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.

जिनस पॉवरला स्मार्ट मीटर्ससाठी ऑर्डर मिळाली.
PFC ही कंपनी ११ ऑगस्टला बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करेल.

सेंट्रल बँकेने DMI हाऊसिंग बरोबर हाऊसिंग आणि SME लोन साठी करार केला.

आयशर मोटर्सने अमेझॉन बरोबर करार केला.

उत्कर्ष SFB चे NIM कमी झाले NII वाढले प्रॉफिट वाढले, GNPA, NNPA कमी झाले. CASA रेशियो २२% वरून १९% झाला. डिपॉझिट्स ३८% ने वाढली.

इनॉक्स विंडला ब्लॉक डील रूटने १.४६ कोटी शेअर्स विकून Rs ३०४.६८ कोटी मिळाले ह्या रकमेचा विनियोग कंपनी कर्ज फेडण्यासाठी करेल.

ल्युपिनच्या ‘SLVOCINOLONE ACETONIDE’ या एक्झिमा वरील औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली. या साठी USA मध्ये US $ २ कोटीचे मार्केट आहे.

SBI लाईफ ने अमित JHAINGRAN यांना MDCEO बनवण्यासाठी परवानगी मागितली.

प्रेस्टिज ला Rs २६७ कोटी ( ३०.३% वाढ ) रेव्हेन्यू १३% ने कमी होऊन Rs १६८१ कोटी झाले.

संधार टेक चे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढले.

अडाणी पोर्ट्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

TALBROS ने त्यांच्या १ शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लिट केले.
हिकल तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न आणि मार्जिन वाढले

धामापूर शुगरचे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले
बिर्ला कॉर्प चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

लिंडे इंडियाचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले
एस्सेल प्रोपॅक चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
कोल इंडियाचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

GSFC चे मार्जिन ६.९% ( १७.४% ) प्रॉफिट Rs ३४ कोटी (Rs १६३ कोटी ), आणि उत्पन्न Rs २०६२.९० कोटी ( Rs ३०९८ कोटी ) झाले.

सिमेन्सचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

NTPC ला मध्य प्रदेशात ८०MW चे सोलर फ्लोटिंग पॉवर प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली. V गार्ड चे प्रॉफिट वाढले उत्पन्न, मार्जिन वाढले.

सफारी इंडस्ट्रीज चे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढले.

पॉवर मेक चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

नाटको फार्मा चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

ड्रीम फोक्स चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

बर्गर पेंट्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. कंपनीने ५ शेअरमागे १ बोनस शेअरची घोषणा केली.
वरॉक इंजिनीअरिंग ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न आणि मार्जिन वाढले.

DATA पॅटर्न्स चे प्रॉफिट ८१.४% ने वाढून Rs २५.८३ कोटी तर रेव्हेन्यू ३१% ने वाढून Rs ८९.७ कोटी झाला. इतर उत्पन्नात वाढ झाली.

ट्रेंट चे प्रॉफिट Rs १६६ कोटी ( Rs ११५ कोटी ) वाढले उत्पन्न Rs २६२८.३७ कोटी ( Rs १८०३.०० कोटी ),मार्जिन कमी झाले.

पिरॅमिड टेक्नोप्लास्टचा Rs १४९ कोटींचा IPO १८ ऑगस्टला ओपन होऊन २२ ऑगस्टला बंद होईल. ( ५५ लाख शेअर्सचा फ्रेश इशू, ३७ लाख शेअर्सची OFS ) प्राईस बँड Rs १५१ ते Rs १६६ मिनिमम लॉट ९० शेअर्सचा असेल.

कल्याण ज्वेलर्सचे प्रॉफिट, उत्पन्न वाढले

सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजने रत्ना लाईफ सायन्सेसच्या Rs ५५० कोटींमध्ये अक्विझिशनला मंजुरी दिली.

NPPA ने फार्मा कंपन्यांना ओव्हर प्राइसिंग साठी पेनल्टी आणि त्यावरील व्याज आकारले होते. या संबंधातील २२०० केसेस पेंडिंग होत्या. सरकार आता AMNESTY स्कीम आणणार आहे. त्यातून सरकारला Rs ६००० ते Rs ७००० कोटी मिळतील.

आज FMCG IT PSE ऑटो फार्मा यात खरेदी तर रिअल्टी आणि बँकिंग मध्ये प्रॉफीटबुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५९९५ NSE निर्देशांक निफ्टी १९६३२ बँक निफ्टी ४४८८० वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – ८ ऑगस्ट २०२३

आज क्रूड US ८४.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.८० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०२.२३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०२ आणि VIX ११.४८ होते.

USA मधील मार्केट्स तेजीत होती. I फोन्सची विक्री कमी होईल म्हणून APPLE चा शेअर मंदीत होता. टेस्लाचा शेअरही मंदीत होता

FII ने Rs १८९२ कोटींची विक्री तर DII ने Rs १०८०.८० कोटींची खरेदी केली.

इंडिया सिमेंट, बलरामपूर चिनी, GNFC, हिंदुस्थान कॉपर, पिरामल एंटरप्रायझेस आणि इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स बॅनमध्ये होते.

आयनॉक्स विंड मधील प्रमोटर्स त्यांचा स्टेक ५% डिस्काऊंटवर विकण्याची शक्यता आहे हे डील Rs ५०० कोटींचे होईल.
कतारच्या सॉव्हरिन वेल्थ फंड INQ होल्डिंग LLC ने अडाणी ग्रीन एनर्जीमध्ये ४.२६ कोटी शेअर्स Rs ९२० प्रती शेअर या भावाने Rs ३९१९.६० कोटींमध्ये खरेदी केले. प्रमोटर इन्फिनिटी ट्रेंड आणि इन्व्हेस्टमेंट ने ४.४८ कोटी शेअर्स (२.८% स्टेक ) Rs ९२०.४३ प्रतिशेअर या भावाने Rs ४१३१.१० कोटींना विकले.

HPL इलेक्ट्रिक आणि पॉवर यांने WBSEDCL यांच्या बरोबर वर्ल्ड बँकेने फंडिंग केले ल्या अडवान्सड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट साठी करार केला.

स्टार हेल्थ स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेबरोबर ४२ शहरात १०० शाखांमध्ये हेल्थ इन्शुअरन्स प्रोवाइड करण्यासाठी करार केला
सेंट्रल बँकेने Clix कॅपिटल बरोबर करार केला.

GENUS पॉवरइन्फ्राला Rs २२०९ कोटींची ऑर्डर मिळाली.
गोदरेज कन्झ्युमर चे प्रॉफिट YOY ७.६% ने कमी होऊन Rs ३१८.८० कोटी झाले. कंपनीने रेमंड कन्झ्युमर बिझिनेस खरेदी आणि इतर रिकन्स्ट्रक्शन मध्ये झालेला Rs ८१.७८ कोटींचा वन टाइम लॉस बुक केला. रेव्हेन्यू YOY १०.४% ने वाढून Rs ३४४९ कोटी झाला.

TVS सप्लाय चेनचा Rs ८०० कोटींचा (Rs ६०० कोटींचा फ्रेश इशू आणि १.४२ कोटी शेअर्सची OFS) IPO १० ऑगस्ट २०२३ ला ओपन होऊन १४ ऑगस्टला बंद होईल. प्राईस बँड Rs १८७ ते Rs १९७ असून मिनिमम लॉट ७६ शेअर्सचा आहे. अलॉटमेंट २१ ऑगस्टला होऊन २८ ऑगस्टला लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. ही कंपनी इंटिग्रेटेड सप्लाय चेन सोल्युशन आणि नेटवर्क सोल्युशन सप्लाय करते फ्रेश इशूची प्रोसिड्स कर्ज फेडण्यासाठी वापरले जाईल. कंपनीला FY २२-२३ मध्ये Rs ४१.७६ कोटी प्रॉफिट आणि उत्पन्न Rs १०२३५ कोटी झाले.

टोरंट फार्मा चे प्रॉफिट YOY ६.८% ने वाढून Rs ३७८ कोटी झाले. रेव्हेन्यू YOY १०.४% ने वाढून Rs २५९१ कोटी झाला. भारतातील बिझिनेस १५% ने वाढून Rs १४२६ कोटी आणि USA बिझिनेस २% ने कमी होऊन Rs २९३ कोटी झाला.

ग्लॅन्ड फार्माचे प्रॉफिट YOY १५% ने कमी होऊन Rs १९४.१० कोटी झाले. रेव्हेन्यू YOY ४१% ने वाढून Rs १२०८.७० कोटी झाला. मार्जिन उल्लेखनीयरित्या कमी झाले.
रेलटेल कॉर्पोरेशनला पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कडून एन्ड टू एन्ड सर्व्हिसेस स्मार्ट सिटी नेट वर्क इंफ्राच्या मॉनेटायझेशन साठी पुरवण्याचे कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू शेअरिंग बेसिस वर मिळाले. वार्षिक रेव्हेन्यू Rs ७० कोटी आणि १० वर्षात Rs ७०० कोटी मिळेल.

PB फिनटेक चा तोटा YOY Rs २०४ कोटींवरून कमी होऊन Rs १२ कोटी झाला.रेव्हेन्यू YOY ३२% ने वाढून Rs ६६६ कोटी झाला.

सेबीने MMTC चे स्टॉक ब्रोकिंग लायसेन्स ‘PAIRED कॉन्ट्रॅक्ट’ मध्ये सामील झाल्याने रद्द केले.

HDFC बँकेचे FTSE मधील वेटेज ०.८१ वरून १.५२% झाले. ही वेटेज मधील वाढ टप्प्या टप्प्या ने सप्टेंबर डिसेंबर आणि मार्च ३ टप्प्यात केली जाईल.

BEML ला बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून रोलिंग स्टॉक सप्लाय करण्यासाठी Rs ३१७७ कोटींच्या काँट्रॅक्टसाठी LOA मिळाले.

NIIT लर्निंग चे NSE वर Rs ३६६ वर आणि BSE वर Rs ३५६ वर लिस्टिंग झाले

मारुती सुझुकी सुझुकी मोटार कॉर्पोरेशन ला प्रेफरन्शियल तत्वावर मारुती सुझुकी चे इक्विटी शेअर्स देईल. या साठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नी मंजुरी दिली.

हार्ले डेव्हिडसन X ४४० चे २५००० युनिटचे बुकिंग झाल्यामुळे हिरोमोटो कॉर्पमध्ये खरेदी झाली.

ग्रॅन्युअल्सच्या METOPROLOL SUCCINATE ER टॅब्लेटच्या जनरिकला USFDAची मंजुरी मिळाली.

चंबळ फर्टिलायझर्सचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.

TCS ने भारत सरकारबरोबर गेमवर्ल्ड क्लास पब्लिक प्रोक्युअरमेंटमध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी करार केला
हेस्टर BIO चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

जैन इरिगेशन तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न आणि मार्जिन वाढले.

युनियन बँकेने २०० मायक्रो क्रेडिट प्रोसेसिंग सेंटर लाँच केली.
पुणे अपील ऑथॉरिटीने GAIL ला Rs ९३४ कोटींची कस्टम ड्युटी माफ केली.

प्रकाश पाईप्सचे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
सुब्रोसचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
J कुमार इन्फ्रा चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

हिंदाल्को प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

बोरोसिल रिन्यूएबल्स चा तोटा कमी झाला उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

नवकर कॉर्पोरेशन प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.

कनोरिया केमिकल्स फायद्यातून तोट्यात गेली उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

अडाणी पोर्ट्स चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.

टाटा पॉवरने महाराष्ट्र सरकारबरोबर २०००MW हायड्रो पॉवर प्रोजेक्टसाठी करार केला.

TALBROS ने त्यांच्या १ शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लिट करण्यासाठी मंजुरी दिली.

हिकल तोट्यातून फायद्यात आली उत्पन्न वाढले मार्जिन वाढले
PSU बँकिंग फार्मा IT मध्ये खरेदी आणि मेटल इन्फ्रा एनर्जी FMCG ऑटो मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५८४६ NSE निर्देशांक निफ्टी १९५७० बँक निफ्टी ४४९६४ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – ७ ऑगस्ट २०२३

आज क्रूड US $ ८६.७० प्रती बॅरल तर रुपया US $१= Rs ८२.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.९९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०४ आणि VIX ११.२२ होते.
FII ने Rs ५५६.३२ कोटींची विक्री तर DII ने Rs ३६६.६१ कोटींची खरेदी केली.

GNFC, हिंदुस्थान कॉपर आणि पिरामल इंटरप्रायझेस बॅनमध्ये होते

रशिया आणि सौदी अरेबिया क्रूडच्या उत्पादनात कपात करणार आहे.

अमेझॉनचे निकाल चांगले आले.

USA मध्ये १.८७ लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि लोकांना पगार वाढही झाली. त्यामुळे इन्फ्लेशन वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

रशियन जहाजावर ड्रोन हल्ला झाला तो युक्रेनने केला असे रशियाचे म्हणणे आहे. त्यामुळे या जिओ पॉलिटिकल समस्येमध्ये भर पडण्याची शक्यता आहे

भारत सरकार ने लॅपटॉप, कॉम्प्युटर्स, टॅब्लेट्स, डेटा प्रोसेसिंग डिव्हायसेस इत्यादींच्या आयातीवर घातलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी NOV १ २०२३ पर्यंत पुढे ढकलली. याचा परिणाम डिक्सन टेक्नॉलॉजी सारख्या शेअर्सवर होईल.

Paytm चे CEO विजयशेखर शर्मा हे ANTFIN चा १०.३% स्टेक रेसिलियन्ट ऍसेट मॅनेजमेंट मार्फत खरेदी करणार आहेत. हे OFF मार्केट ट्रॅन्झॅक्शन आहे. यात कॅशची कोणतीही देवाणघेवाण होणार नाही.. रेसिलियन्ट ऍसेट मॅनेजमेंट ANTFIN ला ऑप्शनल कॉन्व्हर्टिबल डिबेंचर्स त्यांच्या १०.३% स्टेकच्या रकमेचे इशू करेल. या ट्रन्झॅक्शन नंतर विजयशेखर शर्माचा स्टेक १९.५% आणि ANTFIN चा स्टेक १३.५% राहेल. या ट्रॅन्झॅक्शनमध्ये कंपनीच्या व्यवस्थापनावर आणि मालकीवर कुठलाही परिणाम होणार नाही. त्यामुळे Paytm चा शेअरमध्ये खरेदी झाली.

२८ ऑगस्टला रिलायन्स इंडस्ट्रीजचे AGM आहे.

झेन टेक्नॉलॉजी चे प्रॉफिट वाढले, इन्कम वाढले मार्जिन वाढले.

मोरेपॅन लॅबचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

बलरामपूर चिनीचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.

वेंकीजचे प्रॉफिट ,उत्पन्न मार्जिन कमी झाले.

CDSL चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.

VST टिलर्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

NESCO चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

P G इलेक्ट्रोप्लास्टचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

DELHIVERY चा तोटा कमी झाला उत्पन्न वाढले.

रेपको होम फायनान्स चे प्रॉफिट वाढले NII वाढले.

पंजाब & सिंध बँकेचे प्रॉफिट कमी झाले NII वाढले GNPA कमी झाले, NNPA वाढले.

बँक ऑफ बरोडा चे प्रॉफिट,NII वाढले GNPA आणि NNPA कमी झाले. प्रोव्हिजनमध्ये वाढ झाली.

AFFLE चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

इंडिया सिमेंट फायद्यातून तोट्यात गेली, उत्पन्न मार्जिन कमी झाले.

पराग मिल्कचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

ETHOS चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले.

उषा मार्टिनचे प्रॉफिट उत्पन्न वाढले.

मेघमणी ऑर्गनिक्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.

बाळकृष्ण इंडस्ट्रीजचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ४ अंतरिम लाभांश जाहीर केला.

मोल्ड टेक पॅकेजिंग चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

JSW होल्डिंगचे प्रॉफिट उत्पन्न वाढले.

रेस्टारंट ब्रॅंड्स एशियाचा तोटा वाढला, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

CE इन्फोचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
मनोरमा इंडस्ट्रीचे प्रॉफिट उत्पन्न वाढले.

नितीन स्पिनर्सचे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले.

रेट गेन चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

GNFC चे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले.

एरिस लाईफ सायन्सेस चे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढले.

रॉयल ओर्चीडचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.

ALKYL अमाईन्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.

रामको सिमेंट चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

पारस डिफेन्सचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

CAPLINE POINT चे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढले.

GHCL चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

कीस्टोन रिअल्टर्सचे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढले.

EIH असोसिएट्सचे प्रॉफिट उत्पन्न वाढले.

इमामीचे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढले.

व्हर्लपूलचे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले,

वोल्टाम्प ट्रान्सफॉर्मर्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

यथार्थ हॉस्पिटलचे BSE वर Rs ३०६.१० आणि NSE वर Rs ३०४ वर लिस्ट झाला. लिस्टिंग नंतर मात्र या शेअरमध्ये चांगली खरेदी झाली.

अडाणी ग्रीनमध्ये ४.७ कोटींचे सौदे Rs ४३५२ कोटींना झाले.
माझगाव डॉक्सचे सर्किट ५% वरून २०% केले.

RBI ने ICICI बँकेला ICICI लोम्बार्डमध्ये ४% स्टेक टप्प्याटप्प्याने घेण्यासाठी मंजुरी दिली.

कोरोमांडेल इंटरनॅशनल ला ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनासाठी Rs १६५ कोटींची ऑर्डर मिळाली.

मार्कसन फार्माच्या गोवा युनिटच्या ३१ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान झालेल्या तपासणीत USFDA ने २ त्रुटी दाखवल्या.
क्लास ८ ट्रक्सची विक्री २५% ने वाढून १३५०० युनिट झाली.

DR रेड्डीजच्या हैदराबाद युनिटला USFDA ने EIR दिला.
लेमन ट्री ने हिस्सार हरयाणा मध्ये ५० रूमच्या हॉटेलसाठी लायसेन्सिंग करार केला.

सरकारने ऑइल इंडियाला महारत्न ची दर्जा दिला. ही १३ वी महारत्न कंपनी आहे.

ग्रॅन्युअल्स च्या व्हर्जिनिया युनिटला USFDA ने क्लीन चिट दिली.

सिप्लाच्या पिथमपूर युनिटला जी क्लीन चिट मिळाली होती त्यात सांगितल्याप्रमाणे ‘ऑफिशियल ऍक्शन इनिशिएटेड’ झाली नाही असे USFDA ने सांगितले.

KIOCLने त्यांचा पॅलेट उत्पादन करणारा प्लांट बंद केला.
KRBL १० ऑगस्ट २०२३ रोजी शेअर बायबॅक आणि लाभांशावर विचार करेल. माझ्या मार्केट आणि मी या पुस्तकांत आणि मार्केटचा श्रीगणेशा या व्हिडिओमध्ये या दोन्ही कॉर्पोरेट ऍक्शन वर सविस्तर माहिती दिलेली आहे.

TVS सप्लाय चेन चा Rs ८८० कोटींचा ( फ्रेश इशू Rs ६०० कोटी आणि १.४२ कोटी शेअर्सचा OFS असेल ) IPO १० ऑगस्ट २०२३ ला ओपन होऊन १४ ऑगस्टला बंद होईल. प्राईस बँड १८७ ते Rs १९७ असेल.

भारती एअरटेल ने 5G वायफाय सेवा X ट्रिम एअरफायबर या नावाने दिल्ली आणि मुंबईत लाँच केली.

डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल संसदेमध्ये पारित झाले.
SPARC चा तोटा वाढला, उत्पन्न कमी झाले इतर उत्पन्न वाढले.

SEBI F&O सेगमेंटसाठी असलेल्या मानकांची समीक्षा करणार आहे.

फार्मा, रिअल्टी ऑटो, IT मध्ये खरेदी तर पॉवर मेटल्स ऑटोमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५९५६ NSE निर्देशांक निफ्टी १९५९७ बँक निफ्टी ४४८३७ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – ४ ऑगस्ट २०२३

आज क्रूड US $ ८५.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.७० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०२.४४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१८ आणि VIX १०.७४ होते

S&P ने भारताच्या अर्थव्यवस्थेचे रेटिंग वाढवून अर्थव्यवस्था ६.७५ ट्रिलियनची होईल असे सांगितले.

बँक ऑफ इंग्लंडने त्यांचे व्याजाचे दर ०.२५% ने वाढवून ५.२५% केला.

FII ने Rs ३१७.४६ कोटींची विक्री तर DII ने Rs १७२९,१९ कोटीची खरेदी केली

GNFC हिंदुस्थान कॉपर, पिरामल इंटरप्रायझेस बॅन मध्ये होते.

शनिवार ५ ऑगस्ट रोजी BOB, AFFLE इंडिया, APL अपोलो, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, बलरामपूर चीनी, MRS बेक्टर फूड्स, कॅप्री ग्लोबल, गुजरात फ्लुओरो, गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट, जयप्रकाश ASSO, मेघामानी फाईन केम, NEOJEN केमिकल्स, पराग मिल्क फूड्स, पंजाब & सिंध बँक, TVS इलेक्ट्रॉनिक्स आणि उषा मार्टिन त्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

वेदांताचे ११.४३ कोटी शेअर्स (३.०७% स्टेक ) COPTHALL मॉरिशस इन्व्हेस्टमेंट आणि सोशिएट जनरल ने Rs २५८.५५ प्रती शेअर भावाने खरेदी केले.

CDSL ला सेबीने त्यांची इंटर्नल कंट्रोल्स मजबूत करण्यासाठी लेटर पाठवले.

KPI ग्रीनला २०० MW च्या पॉवर प्रोजेक्ट साठी ऑर्डर मिळाली.

फर्स्ट सोर्स ने रिअल टाइम डेटा कस्टमर्स साठी A.AIGA लाँच केले.

टोरंट पॉवरची सबसिडीअरी टॉरंट ऊर्जा 8 ने शापूरजी पालनजीच्या गुजरात मधील डिसलायनेशन प्लांटसाठी १३२MW सोलर पॉवर सप्लाय करण्यासाठी शापूरजी आणि पालनजी च्या सबसिडीअरीबरोबर पॉवर पर्चेस अग्रीमेंट केले.

हिंडाल्कोची सबसिडीअरी ‘नॉव्हेलीस’ चे नेट उत्पन्न योय ४९% ने कमी होऊन US $ १५६ मिलियन झाले. नेट विक्री YOY २०% ने कमी होऊन US $४.१ बिलियन झाली.

लीक हाऊसिंग फायनान्स चे प्रॉफिट YOY ४३% वाढून Rs १३२३.७० कोटी आणि NII YOY ३८.४% वाढून Rs २२५२.३० कोटी झाले.

भरती एअरटेलने प्रॉफिट QOQ ४६.४% ने कमी होऊन Rs १६१२.५० कोटी झाले. कंपनीने वन टाइम फॉरीन एक्स्चेंज लॉस Rs ३४१६ बुक केला.रेव्हेन्यू QOQ ४% वाढून Rs ३७४४०.०० कोटी झाला. तर अर्पुज ३६% ने वाढून Rs २०० झाले

आयशर मोटर्सचे प्रॉफिटYOY ५०.४% वाढून Rs ९१८.३० कोटी रेव्हेन्यू YOY १७.४ % ने वाढून Rs ३९८६.४० कोटी झाला.

कमिन्स चे प्रॉफिट Rs ३१५.७० कोटी रेव्हेन्यू Rs २२०८.७० कोटी झाला

राणे होल्डिंग चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न आणि मार्जिन वाढले.

देवयानी चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

मारुती सुझुकी ८ ऑगस्टला सुझुकी मोटार कॉर्पोरेशनच्या सुझुकी मोटार गुजरात मधील १००% इक्विटी स्टेक खरेदीचे पेमेंट कसे करायचे यांच्या पर्यायांवर विचार करेल. हे पेमेंट कॅश किंवा मारुती सुझुकी च्या शेअर्सची प्रेफरंशियल अलॉटमेंट सुझुकी मोटार कॉर्पोरेशन ला करून केले जाईल.

सन फार्माचे प्रॉफिट YOY २% ने कमी होऊन Rs २०२३ कोटी झाले रेव्हेन्यू YOY ११% ने वाढून Rs ११९४१.०० कोटी झाला. कंपनीने Rs ३२३ कोटी वन टाइम चार्जेस आणि Rs ५१ कोटी म्हणजे अल्केमी ऑपरेशन्स कॅलिफोर्निया मधून न्यूयॉर्क मध्ये ट्रान्स्फर करण्यासाठी खर्च झाला. मार्जिन १०९ बेसिस पॉईंट वाढून २७.९०% झाले. इतर उत्पन्न Rs २०४ कोटी झाले.ल्युपिनचे प्रॉफिट YOY Rs ८६.८० कोटी लॉसमधून Rs ४५३.३३ कोटी प्रॉफिट झाले. रेव्हेन्यू YOY २८.६% ने वाढून वाढून Rs ४८१४.०६ कोटी झाले. मार्जिन ११९० बेसिस पॉईंट वाढून १८.५% झाले. नॉर्थ अमेरिका विक्री Rs १५९०.५० कोटी झाली.

Paytmची डिसबर्समेंट १४८% ने तर मर्चन्ट पेमेंट व्हॅल्यू ४८% ने वाढली.

JK टायर्सच्या प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन या सगळ्यांमध्ये उल्लेखनीय वाढ झाली.

SML ISUZU चे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन यात उल्लेखनीय वाढ झाली.

नावा लिमिटेड चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.

M & M चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
कंपनीला इतर उत्पन्न Rs ६५८ कोटी झाले. ऑटो सेगमेंटचे उत्पन्न आणि मार्जिन वाढले. निकाल चांगले आले.

SBI चे प्रॉफिट योय Rs ६०६८ कोटींवरून Rs १६८८४ कोटी झाले. GNPA २.७८ वरून २.७६ झाले. NNPA .६७% वरून ०.७१% झाले. NII Rs ३११९६ कोटींवरून ३८९०४.०० कोटी झाले. प्रोव्हिजनिंग QOQ Rs ३३१६ कोटींवरून Rs २५०१ कोटी झाले. डोमेस्टिक NIM ३.८४% वरून ३.४७% झाले. स्लीपेजिस ०.४१% वरून ०.९४% झाले.व्यवस्थापनाने सांगितले की क्रेडिट ग्रोथ डबल डिजिट राहील. रिटेल लोन ग्रोथ १६ % होती आणि डोमेस्टिक ग्रोथ १५% होती.

TCI एक्स्प्रेस चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

सेंच्युरी प्लायवूड प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.

भारत डायनामिक्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले निकाल कमजोर लागले.

GSPL चे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले.

AB फॅशन आणि रिटेल फायद्यातून YOY तोट्यात गेली. उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

CESC चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

BHEL चा तोटा वाढला उत्पन्न वाढले मार्जिन वाढले
आज IT, बँकिंग फार्मा इन्फ्रा मेटल्स मध्ये खरेदी तर रिअल्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५७२१ NSE निर्देशांक निफ्टी १९५१७ बँक निफ्टी ४४८७९ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – ३ ऑगस्ट २०२३

आज क्रूड US $ ८३.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs.८२.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.६६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१० आणि VIX ११.५६ होते.

मॉर्गन स्टॅन्ले ने चीनला EQUAL WEIGHT तर भारताला ओव्हरवेट रेटिंग दिले भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रातील रिफॉर्म्स, कॅपेक्स मुळे हे रेटिंग दिले गेले.

मार्केटमध्ये लोअर हाय लोअर लो ची सिरीज सुरु झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेमिंग कंपन्यांना सरकारने थोडा रिलीफ दिला. विनिंग अमाऊंट ऐवजी एन्ट्री लेव्हल डिपॉझिटवर GST २८% ने लागेल. सरकारने सांगितले की सहा महिन्याच्या अंमलबजावणीनंतर GST काउन्सिल रिव्ह्यू करेल.

FII ने Rs १८७७.८४ कोटींची विक्री तर DII ने Rs २.२३ कोटींची विक्री केली.

सांघी सिमेंट ACC ने खरेदी केली. त्यांना सांघी सिमेंटचा ६.१ MTP चा सिमेंट प्लांट क्लिंकर उत्पादन प्लांट, लाइमस्टोन रिझर्व्हज, कोस्टल जेटी आणि पोर्ट मिळेल ACC या प्लांटची क्षमता १५MTP पर्यंत वाढवेल. संघी सिमेंटचा सिमेंट प्लेट १००% क्षमतेवर चालवेल. सौराष्ट्र मुंबई कर्नाटक केरळ येथे मार्केटिंग करू शकू. एकूण Rs ३००० कोटी गुंतवणार. 26% stake साठी 114.22 या भावाने ओपन ऑफर येईल

GNFC, हिंदुस्थान कॉपर, पिरामल इंटरप्रायझेस, आणि IBULLS हाऊसिंग फायनान्स बॅन मध्ये होते.

टायटनचे प्रॉफिट २% ने YOY कमी होऊन Rs ७७७ कोटी झाले. ज्वेलरी बिझिनेसचे निकाल कमजोर होते. रेव्हेन्यू YOY २४.४% वाढून Rs १११४५ कोटी झाला.

HPCL ला Rs ६२०३.९० कोटी प्रॉफिट तर रेव्हेन्यू Rs १११९६०.६० झाला. हा परफॉर्मन्स QOQ ग्रोथ दाखवतो आणि अनुमानापेक्षा जास्त आहेत.

मनकाईन्ड फार्मा चे प्रॉफिट YOY ६६.४% वाढून Rs ४८६.९ कोटी झाले तर रेव्हेन्यू YOY १८.३%ने वाढून Rs २५७८.६० कोटी झाले.

मेट्रोपोलीस हेल्थ केअर चे प्रॉफिट YOY १३.८% ने कमी होऊन Rs २८.८ कोटी तर रेव्हेन्यू १% ने कमी होऊन Rs २७७ कोटी झाला. कमजोर ऑपरेटिंग आणि रेव्हेन्यू नंबर यामुळे प्रॉफिट कमी झाले. कंपनीने सांगितले की त्यांची B टू G काँट्रॅक्टस्ची मुदत संपली आणि कोविड कमी झाल्यामुळे प्रॉफिट कमी झाले. पहिल्या तिमाहीत बिझिनेस कमी असतो. दुसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत बिझिनेस चांगलं होतो. कोअर बिझिनेस मध्ये १२% ग्रोथ झाली.

गुजरात गॅस चे प्रॉफिट QOQ ४१.७% ने कमी होऊन Rs २१६ कोटी तर रेव्हेन्यू QOQ ३.७% कमी होऊन Rs ३७८१.५० झाले.

VIP इंडस्ट्रीज चे प्रॉफिट YOY १६.४% ने कमी होऊन Rs ५७.७५ कोटी आणि रेव्हेन्यू ७.७% ने कमी होऊन Rs ६३६.१० कोटी झाला.

इंटरग्लोब एव्हिएशन कंपनीचे प्रॉफिट Rs ३०९०.६० कोटी झाले. ( कंपनीला YOY Rs १०६४ .३० कोटी तोटा झाला होता) . कंपनी तोट्यातून फायद्यात आली.कंपनीचा रेव्हेन्यू YOY ३०% ने वाढून Rs १६६८३.१० कोटी झाले.
IPCA लॅब्सने युनिकेम लॅब मध्ये २.३५ कोटी शेअर्स Rs ४०२.२५ प्रती शेअर भावाने Rs ९४५.३४ कोटींना घेतले. या बल्क डीलसाठी CCI (कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) ची मंजुरी मिळाली.

कॅम्पस ऍक्टिव्हवेअर मध्ये ICICI PRU ने २५ लाख शेअर्स, सोशिएट जनरलने १७.१४ लाख शेअर्स Rs २९५ प्रती शेअर भावाने खरेदी केले.

नियोगी फिनटेकचे १.२२ कोटी शेअर्स WF एशियन RECONNAISSANCE फंडाने Rs ६१.६५ दराने तर CARMIGNAC पोर्टफोलिओ ने ५.५लाख शेअर्स Rs ६८.१ प्रती शेअर दराने विकले. तर माधुरी केला यांनी ५०.२० लाख शेअर्स (५.३% स्टेक) USA च्या थिंक इंडिया ऑपोर्च्युनिटीज फंडाने ५८ लाख शेअर्स (६.१% स्टेक ) Rs ६१.६५ प्रती शेअर या दराने खरेदी केले. मानसी शेअर & स्टॉक ब्रोकर ने ५ लाख शेअर्स Rs ६४.८८ प्रती शेअर दराने खरेदी केले.

वेदांताचे प्रमोटर TWIN स्टार यांनी वेदांताचें १६ कोटी शेअर्स Rs २५८.५० प्रती शेअर दराने Rs ४२८६ कोटींना विकले.

झायड्स लाईफ च्या ‘INDOMETHASIN SUPPOSITORY WITH जनरिक कॉम्पिटिटिव्ह डायजेस्टिव्ह थेरपी डेसिग्नेशन’ USFDA ने मंजुरी दिली.

भारताचा सर्व्हिसेस PMI ६२.३(५८.५) आणि कंपोझिट PMI ६१.९( ५९.४) झाले.

अंबुजा सिमेंट ही कंपनी सांघी इंडस्ट्रीजचे अधिग्रहण करणार त्यासाठी Rs ३०० कोटी जमा करणार.

आज पासून SBFC फायनान्स या कंपनीचा IPO ३ ऑगस्ट २०२३ ला ओपन होऊन ७ ऑगस्टला बंद होईल. ही कंपनी MSME, आणि गोल्ड लोन देते त्यांचे लोन साईझ Rs १० लाख ते Rs १५ लाख असून बहुतेक कर्जदार असंघटीत क्षेत्रातील आहेत. त्यांचा २४ राज्यात विस्तार आहे. शेअरची दर्शनी किंमत Rs १० असून प्राईस बॅंड Rs ५४ ते Rs ५७ असून मिनिमम लॉट २६० शेअर्सचा आहे.

FDC ९ ऑगस्ट २०२३ रोजी शेअर बायबॅकवर विचार करेल.बाय बॅक ची माहिती माझ्या मार्केट आणि मी या पुस्तकात दिली आहे

वरूण बिव्हरेजीस ने Rs १.२५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला प्रॉफिट Rs ७८७ कोटींवरून Rs ९९४ कोटी झाले. रेव्हेन्यू Rs ५०१८कोटींवरून Rs ५६९९ कोटी झाला. मार्जिन वाढले.

LT फूड्सने युगांडामध्ये नवीन युनिट स्थापन केले.

झायड्स वेल्फेअरचे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
एक्झो नोबलचे प्रॉफिट वाढले, इनकम वाढले.

सेरा सॅनिटरी वेअरचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले. मार्जिन वाढले.
ट्यूब इन्व्हेस्टमेंट चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

अवध शुगर चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

सन फार्माचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.कंपनीला Rs ३२३ कोटी वन टाइम लॉस झाला.

GE शिपिंग चे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.कंपनीनं Rs १२.९० लाभांश जाहीर केला.

मिंडा कॉर्प चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

डाबर इंडिया चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.बेबी केअर, ओरल प्रोडक्टस, बादशाह मसाला यात चांगली ग्रोथ झाली.

अडाणी इंटरप्रायझेसचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले

ब्ल्यू स्टार चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
कंपनीने Rs १००० कोटींचा QIP केला.

कन्साई नेरोलॅक चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

न्यू लॅन्ड लॅबोरेटरी चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.

नजारा टेक चे प्रॉफिट उत्पन्न वाढले.

झोमॅटो तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले, EBITD तोटा कमी झाला.

कर्नाटक बँकचे प्रॉफिट वाढले NII वाढले GNPA आणि NNPA कमी झाले.

ICRA चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
MRF चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले निकाल उल्लेखनीय आहेत.

आंध्र पेपर चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
M & M च्या EV कारभारात म्हणजे महिंद्रा इलेक्ट्रिक आणि ऑटोमोबाईल लिमिटेड मध्ये तमासेक Rs १२०० कोटींची गुंतवणूक करणार आहे MEAL ने तामसिक बरोबर ८०५८० कोटींचा EV साठी करार केला.या आधी ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट PLC ने Rs ७०००० कोटींची गुंतवणूक केली होती.

इंडस इंड बँकेने टायगर फिनटेक या बजाज कॅपिटल ग्रुपच्या कंपनीबरोबर कोब्रांडेड क्रेडिट कार्ड काढण्यासाठी भागीदारी केली.

LIC ने त्यांचा PFC मधील स्टेक ५.६% वरून ३.६% केला म्हणजे २% कमी केला.

कल्याण ज्वेलर्स ११ नवीन शोरूम लाँच करणार आहे.

सरकारने इलेक्ट्रॉनिक आयातीवर निर्बंध लावले. लायसेन्स शिवाय आता टॅब्लेट ऑटोमॅटिक डेटा प्रोसेसिंग युनिट कॉम्प्युटर लॅपटॉप पर्सनल आणि लार्ज कॉम्प्युटर आयातीवर निर्बंध घातले. ON लाईन आयातीवर कस्टम्स ड्युटी लागेल. आता एका माणसाला ऑनलाईन एकच कॉम्प्युटर मागवता येईल याचा फायदा डिक्सनला होईल

सरकारने डेटा प्रोटेक्शन बिल संसदेत पेश केले. कंपन्यांना डेटा प्रोटेक्शन ऑफिसरची नेमणूक करावी लागेल. कोणत्या देशांना डेटा पाठवता येणार नाही याची यादी जाहीर केली. सरकार कोणतेही कन्टेन्ट DELETE करू शकेल. कंपन्यांना कमाल पेनल्टी किती लावता येईल ते ठरवले.

ONGC ने BPCL बरोबर मुंबई रिजनमध्ये क्रूड ऑइल विक्री साठी टर्म करार केला.

रेडीको खेतान आणि Cummins यांचा प्रॉफिट,रेव्हेन्यू मार्जीन वाढले

आज बँकिंग, रिअल्टी एनर्जी, मेटल्स, इन्फ्रा, ऑटो मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले तर फार्मा मध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५२४० NSE निर्देशांक निफ्टी १९३८१ आणि बँक निफ्टी ४४५१३ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !