आज क्रूड US $ ९४.९० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.१६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.५६ आणि VIX ११.८७ होते.
अक्सेंच्युअर या कंपनीचे निकाल साधारण आले. मार्जिन कमी झाले कंपनीने -२%ते +२% चा गायडन्स दिला. याचा परिणाम IT सेक्टरमधील शेअर्सवर झाला.
आज दक्षिण कोरिया, तैवान आणि चीनचे बाजार बंद होते.
पश्चिम बंगालमधील पानागढ प्लांटमध्ये PRISM जॉन्सन ने ट्रायल रन पूर्ण केला. ऑक्टोबरच्या मध्यापासून कमर्शियल प्रॉडक्शन सुरु होईल.
L & T ला मरीन ड्राईव्ह कोस्टल रोड साठी सिविल बिझिनेस अंतर्गत अंडरग्राउंड टनेल साठी MMRDA कडून ऑर्डर मिळाली.
स्टर्लिंग विल्सन ला गुजरातमध्ये खावडा येथे NTPCREL कडून Rs १५३५ कोटींची ऑर्डर मिळाली.
अशोक लेलँड ला गुजरातमध्ये गुजरात रोड स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून १२८२ बसेस साठी ऑर्डर मिळाली.
IOC ने एव्हर ENVIRNO रिसोर्सेस बरोबर बायोगॅस युनिटसाठी JV केले.
कार्सचे सेफ्टी स्टँडर्ड्स प्रमाणे रेटिंग साठी सरकारने गाईडलाईन्स १ ऑक्टोबर २०२४ पासून जाहीर केल्या. BHARAT NCAP ची रेटिंग कार क्रॅश टेस्टवर आधारित आणि रँडम सिलेक्शन बेसिसवर असतील.या रेटिंगचा खर्च कंपनी करेल.
ल्युपिनच्या नागपूर १ युनिटला USFDA ने VAI बरोबर क्लीन चिट दिली.
सरकारने ऍग्रो टेक्सटाइल्सच्या २० प्रॉडक्टस साठी १ एप्रिल २०२४ पासून QUALITY स्टँडर्ड्स ठरवली.
ओरिएंट सिमेंटच्या चितलपूर मध्ये वेस्ट हिट रिकव्हरी सिस्टीम मध्ये फेज १ सुरु झाली.
साऊथ इंडियन बँकेने शेषाद्री यांना MD आणि CEO म्हणून नेमले.
अजमेरा रिअल्टीने मुंबई आणि बंगलोर मध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बनवण्यासाठी करार केला.
हिंदुस्थान झिंकने त्यांचे झिंक, सिल्व्हर, लेड आणि रिसायकलिंग बिझिनेस वेगळे काढण्यासाठी प्रस्ताव सुचवण्यासाठी कमिटीची नेमणूक करायला परवानगी दिली.
चेन्नई इन्व्हेस्टर फोरम ने मद्रास हायकोर्टात केस दाखल केल्यामुळे MCX ला त्यांचा नवीन टेडिंग प्लॅटफॉर्म करायला सेबीने मनाई केली. MCX ने सांगितले की आम्ही सेबीच्या लेटरला ३ ओक्टोबर ०२३ पर्यंत उत्तर देऊ. ही काहीशी तांत्रिक बाब असल्याने ही केस SEBI च्या टेक्निकल अडवायझरी कमिटी कडे जाईल.
TVS सप्लाय चेन TVS इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक पार्क मधील ४.५% स्टेक विकणार आहे.
जालन कॅलरॉक कन्सॉरशियमने Rs ३.५० बिलियन जेट एअरवेज मध्ये इन्फ्युज केले.
३M इंडियाने त्यांच्या इंटेलकच्युअल प्रॉपर्टि अग्रीमेंट मधील सुधारणांना मान्यता दिली.
S & P ने ग्लेनमार्क फार्माचा आऊटलूक पॉझिटिव्ह केला.
लिखिता इन्फ्राला BPCL कडून Rs १५६ कोटींची ऑर्डर मिळाली.
गोदरेज प्रॉपर्टिज ने नागपूर येथे १०९ एकर जमीन खरेदी केली. त्यातून कंपनीला २.२ मिलियन SQFT सेलेबल एरिया मिळेल.
पिरामल फार्मा च्या बेथॅलॅम फॅसिलिटीची तपासणी १८ ते २७ दरम्यान झाली होती USFDA ने सिस्टीम इम्प्रुव्हमेंट संबंधित २ त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ इशू केला.
तामिळनाडू मर्कंटाईल बँकेचे MDCEO S कृष्णन यांनी राजीनामा दिला.
सारेगम ‘POCKET ACES PICTURES’ मध्ये ऑल कॅश डील बेसिस वर ५१.८ % स्टेक Rs १७४ कोटींना घेणार आहे. उरलेला ४१% स्टेक पुढील १५ महिन्यात घेण्यात येईल.
इमामी AXIOM AYURVED मध्ये २६% स्टेक साठी स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट केली.
एलोवेरा पल्प आणि फ्रूट ब्लेंड यांचे फ्युजन करून बिव्हरेज प्रोडक्ट तयार करणार.
IHC ही अबूधाबीची कंपनी अडाणी ग्रीन आणि अडाणी एनर्जी मधील त्यांचा १% स्टेक विकणार आहे.
हॅपीएस्ट माईंडचे प्रमोटर सुता यांनी त्यांचा १.१% स्टेक विकला. आता त्यांचा स्टेक ५१.२४% वरून ५०.१३% होईल.
YES बँकेने येस सिक्युरिटीज मध्ये Rs ४७.७५ प्रती शेअर या भावाने शेअर्स खरेदी केले.
U SATELLITE कम्युनिकेशन आणि वन वेब यांच्यातील मर्जरची प्रक्रिया पूर्ण केली. यात भारतीची २१.२% हिस्सेदारी आहे.
ऑरोबिंदो फार्माच्या ‘REVLIMID’ या औषधाच्या लाँन्चला मंजुरी मिळाली. या औषधाचे Rs ४००० ते Rs ५००० कोटींचे मार्केट आहे.
युनो मिंडा मिंडा वेस्टपोर्ट टेक मध्ये ७६% स्टेक घेणार आहे.
NLC ८०० MW चे ३ थर्मल प्लांट लावणार आहे.
KIOCL ने आयर्न ओअर फाईन्स प्लांट बंद केला.
सन फार्मा DE मेक्सिको मध्ये उरलेली हिस्सेदारी खरेदी करणार आहे.
FII ने Rs ३३६४.२२ कोटींची विक्री आणि DII ने Rs २७११.४८ कोटींची खरेदी केली.
आज IT सेक्टरमधील शेअर्स सोडून सर्व सेक्टरमधील शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५८२८ NSE निर्देशांक निफ्टी १९६३८ बँक निफ्टी ४४५८४ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !