आजचं मार्केट – ५ September २०२३

आज क्रूड US $ ८८.९० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.२१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२१ आणि VIX १०.९४ होते.सोने ५८३०० च्या आसपास चांदी ७३१०० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.

FII ने Rs ३३६७.६७ कोटींची विक्री तर DII ने Rs २५६३.४८ कोटींची खरेदी केली.

बलरामपूर चिनी, BHEL, हिंदुस्थान कॉपर, इंडिया सिमेंट्स, I बुल्स HSG फायनान्स बॅन मध्ये होते.
ऑगस्ट महिन्यासाठी भारताचा सर्व्हिस PMI ६०.१ ( ६२.३) आणि कॉम्पोझिट PMI ६०.९ ( ६१.९) आला.

ग्लॅन्ड फार्माने अंकित गुप्ता यांची VP ( स्ट्रॅटेजी आणि गुंतवणूक ) म्हणून नेमणूक केली.

ऑइल इंडिया ला JV कंपनी नॉर्थईस्ट गॅस डिस्ट्रिब्युशन कंपनीमध्ये Rs १७३८ कोटींच्या गुंतवणुकीला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी मिळाली. या कंपनीत ऑइल इंडियाचा ४९% आणि आसाम गॅस कंपनीचा ४९% स्टेक असेल.ही कंपनी सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनचे काम करेल.

MRS. बेक्टर फूड स्पेशॅलिटीज या कंपनीने अर्णव जैन यांना ११ ऑगस्ट २०२३ पासून CFO म्हणून नेमले.

अव्ह्येन्यू सुपर मार्केटने गुजरातमधील मोरबी येथे नवीन स्टोअर उघडले.

रत्नवीर प्रिसिजन इंजिनीअरिंगचा IPO पहिल्या दिवशी ५.७७ पट भरला. रिटेल कोटा ७.६५ पट भरला.

EMS IPO चा प्राईसबँड Rs २०० ते Rs २११ असून मिनीमम लॉट ७० शेअर्सचा असून दर्शनी किंमत Rs १० आहे. हा IPO ८ सप्टेंबरला ओपन होऊन १२ सप्टेंबर २०२३ ला बंद होईल.

बिकाजीमध्ये ३२ लाख शेअर्स चा सौदा झाला.
मध्य प्रदेशातील उज्जैन मध्ये ड्रिंकिंग वॉटर स्कीमच्या ऑपरेशन आणि मेंटेनंस साठी दिलीप बिल्डकॉन ला मध्य प्रदेश राज्य सरकारकडून Rs १२७५ कोटींची ऑर्डर मिळाली.

हिरो मोटो कॉर्प ‘ATHER एनर्जी’ या EV २ व्हीलर उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या राईट्स इशूमध्ये Rs ५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

आज विष्णू प्रकाश पुंगलिया या कंपनीचे BSE वर Rs १६३.३० आणि NSE वर Rs १६५ वर लिस्टिंग झाले. कंपनीने IPO मध्ये Rs ९९ ला शेअर दिला आहे. ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगला लिस्टिंग गेन झाला.

एस्कॉर्टस कुबोटा त्यांच्या ट्रॅक्टरच्या किमती १६ सप्टेंबर पासून वाढवणार आहे. ही वाढ भौगोलिक, मॉडेल्स आणि व्हरायन्ट यांच्या प्रमाणे वेगवेगळी असेल.

M & M फायनान्स ची ऑगस्ट महिन्यात डिसबर्समेंट योय १५% ने वाढून Rs ४४०० कोटी झाली ऑगस्ट महिन्याअखेर एकूण डिसबर्समेंट YOY २२% वाढून Rs २०९५० कोटी झाली. कलेक्शन एफिशिअन्सी ९६% होती.

टाटा पॉवर ची सबसिडीअरी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जीने ‘NEOSYM इंडस्त्री’ या ग्रे आणि SG आयर्न कास्टिंग आणि उत्पादन करणाऱ्या कंपनीबरोबर अहमदनगर येथील प्लांटसाठी २६ MW AC ग्रुप कॅप्टिव्ह सोलर प्लांट साठी करार केला. या युनिटची क्षमता ५९ मिलियन युनिट्स असून मार्च २०२४ पासून कार्यरत होईल.

TCNS क्लोदिंग मध्ये ८.८९ लाख शेअर्स (१.४%स्टेक) Rs ३७०.०३ प्रती शेअर या दराने नालंदा इक्विटी फंडाने विकले.

RMC स्विच गियर या कंपनीने २ शेअर्सला १ बोनस शेअरची घोषणा केली.

येस बँकेच्या ARC JC फ्लॉवर्स लिमिटेड आणि सुभाषचंद्रा यांच्यामध्ये Rs ६५०० कोटींच्या कर्जासंबंधात समेट झाला.

GIC ने Rs ७.२० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.यासाठी रेकॉर्ड डेट ८ सप्टेंबर २०२३ निश्चित केली आहे.

कामा होल्डिंगने एका शेअरला ४ बोनस शेअर्सची घोषणा केली.

सिप्लाने ACTOR फार्मा ही कंपनी US $ ४९ मिलियन्स ला खरेदी केली. याचा उपयोग सिप्लाला साऊथ आफ्रिकन मार्केटमध्ये होईल.

भारत बिजलीच्या Rs ४० लाभांशाची रेकॉर्ड डेट ७ सप्टेंबर आहे.

IEX चा परफॉर्मन्स ऑगस्ट महिन्यात चांगला आला.

३१% व्हॉल्यूम आणि किंमत ३३% ने वाढली.

क्रॉम्प्टनने डोमेस्टिक वॉटर हीटर ३५ लिटर्स आणि ५० लिटर क्षमतेचे ARNONEO या ब्रॅण्डखाली लाँच केले.

वैद्यकीय उपकरणांना ड्रग्सश्रेणी म्हणून समाविष्ट करण्याचा सरकारचा नियम न्यायालयाने कायम ठेवला.

LIC ने LIC म्युच्युअल फंड AMC मधील गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला.

सोम डिस्टीलरीज ला Rs. ३५० कोटी उभारायला कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने मंजुरी दिली.

टाटा मोटर्सची JLR विक्री १९३५ वरून १४७९ युनिट झाली.

गेलच्या एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर सहीत ५ जणांवर CBI ने लाच घेण्यासंबंधात कारवाई सुरु केली.

आज फार्मा, रिअल्टी, FMCG, IT, मेटल्स, एनर्जी या क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.

बँकिंग आणि फायनॅन्शियल्स मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५७८० NSE निर्देशांक निफ्टी १९५७४ बँक निफ्टी ४४५३२ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.