आजचं मार्केट – ६ September २०२३

आज क्रूड US $ ९०.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.८२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२७ आणि VIX १०.७६ होते.

आज USA मधील मार्केट्स मंदीत होती.

सौदी अरेबिया आणि रशिया या देशांनी त्यांच्या क्रूडच्या उत्पादनात १.३ mbpd एवढी केलेली कपात पुढील तीन महिने म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत चालू राहील असे जाहीर केले

FII ने ने Rs १७२५.११ कोटींची विक्री तर DII ने Rs १०७७.८६ कोटींची खरेदी केली.

आज I बुल्स HSG फायनान्स, इंडिया सिमेंट, हिंदुस्थान कॉपर, BHEL, डेल्टा कॉर्प, बलरामपूर चिनी बॅनमध्ये होते.

झाम्बिया सरकारने कोनकोला कॉपर माईन्सची मालकी वेदांता रिसोर्सेस ला परत दिली आहे. या कॉपरच्या खाणींमध्ये १६ मिलियन टन्स कॉपरचा साठा आहे.

निला इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला गुजरातमध्ये अहमदाबाद मधील वडज येथे १६९४ रेसिडेन्शियल फ्लॅट्स १८ महिन्यात बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट ‘श्री इंफ्राकॉन’ कडून मिळाले.

अमरिश जैन यांनी HDFC AMCच्या हेड मार्केटिंग या पदाचा ८ सप्टेंबर २०२३ पासून व्यक्तिगत कारणांसाठी राजीनामा दिला.

पॉवर ग्रीड ला BOOT (बिल्ड,ओन, ऑपरेट, ट्रान्सफर ) तत्वावर राजस्थान मध्ये इंटरस्टेट ट्रान्समिशन प्रोजेक्ट मिळाली.

IREDA ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी ) ने युनियन बँक आणि बँक ऑफ बरोडा यांच्या बरोबर रिन्यूएबल एनर्जी कोफायनान्स करण्यासाठी MOU केले.

NBCC ने केरळ राज्य हाऊसिंग बोर्डाबरोबर कोची येथील १७.९ एकर्सची जमीन डेव्हलप करण्यासाठी MOU केले. ही प्रोजेक्ट Rs २००० कोटींची आहे.

जिओ फायनान्स NSE च्या सर्व निर्देशांकातून ७ सप्टेंबर २०२३ पासून बाहेर पडेल. निफ्टी ५०, १००, २०, ५००, तसेच निफ्टीच्या इतर निर्देशांकातून बाहेर पडेल

SBI लाईफ इन्शुअरन्स ने सफारी इंडस्ट्रीजचे Rs ७७.३८ किमतीचे शेअर्स खरेदी केले .इन्व्हेस्टकॉर्प प्रायव्हेट इक्विटीने २.१४ लाख शेअर्स विकले.

PLUTUS WEALTH मॅनेजमेंट LLP ने बिकाजी फुड्सचे १३.५ लाख शेअर्स खरेदी केले तर लाईटहाऊस इंडिया फंडाने बिकाजी फूड्स मधील १.३% स्टेक विकला.

क्लास ८ ट्रक्सची विक्री USA मध्ये १४% ने वाढली. याचा फायदा भारत फोर्ज आणि रामकृष्ण फोर्जिंग यांना होईल.

DGCI ने ऍबॉट लॅबोरेटरीजच्या ‘DIGENE GEL’ ची रुग्णांना शिफारस करू नये असे डॉक्टरांना आदेश दिले. ऍबॉट लॅबने ह्या औषधाच्या सर्व बॅचेस परत बोलावल्या.

बेस्ट ऍग्रो लाइफला सिनर्जीसटीक पेस्टीसाइडल कंपोझिशन साठी भारत सरकारचे पेटंट मिळाले.

बॅटरी एनर्जी स्टोअरेज सिस्टीम साठी Rs ९४०० कोटी मंजूर केले. या पैकी Rs ३७६० कोटी अंदाजपत्रकीय तरतूद असेल. रक्कम व्हायाबिलिटी गॅप फंडिंग म्हणून दिली जाईल. २०३०-३१ पर्यंत ४००० MWH क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे.

अपोलो हॉस्पिटल्सने अपोलो २४X ७ प्लॅटफॉर्मसाठी गूगल क्लाऊडबरोबर करार केला.

इंडस्वीफ्ट लॅब ही कंपनी SYMPHIMED लॅब चा API बिझिनेस Rs १६५० कोटींना विकला.

BEML ला भारतीय सेने कडून आर्मर्ड रिकव्हर्ड व्हेइकल्स साठी ऑर्डर मिळाली.

DIC इंडिया कोलकातामधील मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंद करणार आहे.

सरकार पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती दिवाळीच्या आसपास Rs ३ ते Rs ५ प्रती लिटर कमी करण्याची शक्यता आहे.

टाटा स्टील आणि ABB स्टील उत्पादनादरम्यान जो कार्बन बाहेर पडतो तो कमी करण्यासाठी तंत्रज्ञान शोधणार आहे.

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट हल्दीराम मध्ये ५१ % स्टेक घेण्यासाठी बोलणी करत आहे. हल्दीरामचे व्हॅल्युएशन US १० बिलियन होण्याची शक्यता आहे.
HCL टेक ने ऑस्ट्रेलिया मधील एल्डर कंपनीबरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला.

आज FMCG, फार्मा, ऑइल &गॅस क्षेत्रातील शेअर्स मध्ये खरेदी झाली. तर मेटल्स आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५८८० NSE निर्देशांक निफ्टी १९६११ आणि बँक निफ्टी ४४४०९ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.