आज क्रूड US $ ९०.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.८८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२९ आणि VIX १०.७६ होते.US $ मजबूत होत असल्यामुळे सोने आणि चांदी मध्ये मंदी होती. सोने Rs ५९१०० आणि चांदी Rs ७२३०० च्या आसपास होते.
चिनी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांनी कामावर असताना आयफोन वापरण्यावर बंदी घातली.तसेच फॉरीन ब्रँडचे फोन वापरण्यावर बंदी घातली. त्यामुळे APPLE च्या शेअरमध्ये मंदी आली. USA मधील मार्केट्स मध्ये मंदी होती.
UPI ने ‘UPI क्रेडिट लाईन’, ‘हॅलो UPI’ ‘ बिल पे कनेक्ट’ ‘UPI टॅप &पे. आणि ‘UPI लाईन X’ हे नवीन फिचर लाँच केले.
श्री व्यंकटेश रिफायनरी या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला. याची रेकॉर्ड डेट २२ सप्टेंबर २०२३ आहे.
बायोकॉन बायालॉजीक्स ने USA मधील ‘VIATRIS’ च्या बायोसिमिलर बिझिनेसचे इंटिग्रेशन स्वतःच्या बिझिनेस मध्ये १ सप्टेंबर २०२३ पासून केले. कंपनीने ‘VIATRIS’ चा जागतिक बायोसिमिलर्स बिझिनेस अलीकडेच खरेदी केला होता.
रेस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज या VINYL फ्लोअरिंग उत्पादन करणाऱ्या कंपनीने भारतीय रेल्वेजबरोबर त्यांच्या ‘गरीब रथ ‘ या प्रोजेक्टसाठी कॉन्ट्रॅक्ट केले. या आधी रेस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज ला वंदे भारत प्रोजेक्टसाठी ऑर्डर्स मिळाल्या होत्या.
REC ने एक्सिम (एक्स्पोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया) बरोबर US $ १०० मिलियनचे ५ वषे मुदतीचे करन्सी टर्म लोन घेतले. हे कर्ज कंपनीच्या पॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर, आणि लॉजिस्टिक सेक्टरमधील कर्जदारांना कॅपिटल इक्विपमेंट आयात करण्यासाठी कर्ज देण्यासाठी उपयोगात आणले जाईल.
रिलायन्स रिटेलने आलिया भटच्या लहान मुले आणि मॅटर्निटी वेअर च्या ‘ED-A-Mamma’ मध्ये ५१% स्टेक साठी JV केले. रिलायन्स रिटेल ने कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटीला ६.८६ लाख शेअर्स Rs ८२७८ कोटींना अलॉट केले.
SAMHI हॉटेल्स चा IPO ( Rs १२०० कोटींचा फ्रेश इशू आणि १.३५ कोटी शेअर्सची OFS ) सप्टेंबर १४ ला ओपन होऊन १८ सप्टेंबरला बंद होईल.
SAMHI हॉटेल्स हा एक प्रमुख हॉटेल ओनरशिप आणि ऍसेट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म आहे. कंपनीकडे स्वतःच्या मालकीची आणि लीजवर हॉटेल्स आहेत.
ही हॉटेल्स अपस्केल , अपर मिडस्केल, आणि मिडस्केल वर्गात येतात. कंपनी ही हॉटेल्स जगातील प्रसिद्ध हॉटेल ऑपरेटर्सबरोबर दीर्घ मुदतीच्या कराराने चालवते. कंपनीला FY २३ साठी Rs ७३८ कोटी उत्पन्न आणि Rs ३३८.५० कोटी तोटा झाला आहे.
ज्युपिटर लाईफ लाईनचा IPO पहिल्या दिवशी ८७% भरला.
रत्नवीर प्रिसिजन इंजिनीअरिंग चा IPO एकूण ९३.९५ वेळा भरला. रिटेल कोटा ५३.९३ वेळा भरला.
ल्युपिन ‘मार्क क्युबन कॉस्ट प्लस ड्रॅग कंपनी’ आणि COPD फाउंडेशन बरोबर कोलॅबोरेशन करणार आहे. हे कोलॅबोरेशन USA मधील COPD ( क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) रूग्णासाठी ‘ TITROPIUM BROMIDE इनहॅलेशन पॉवडर’ च्या १८mg कॅप्सूल्स ची उपलब्धता वाढवेल.
ल्युपिनची ही पॉवडर हे BOEHRINGER INGDHEIM च्या ‘स्पिरीवा हॅण्डीहेलर’ साठी एकमेव जनरिक प्रॉडक्ट उपलब्ध आहे.
TCS ने ‘JLR’ च्या डिजिटल युनिट बरोबर ‘JLR’ च्या ‘REIMAGINE’ स्ट्रॅटेजी साठी नवीन, भविष्यात उपयुक्त, स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर बनवण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करार केला. या नवीन पार्टनरशिपचे व्हॅल्युएशन GBP ८०० मिलियन येत्या ५ वर्षांसाठी असेल.
CCI ( कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) ने ‘RHONE CAPITAL’ ला ‘RH MAGNESITA NV’ मध्ये २९.९% स्टेक घेण्यासाठी परवानगी दिली.
बॉम्बे डाईंगची वरळी मधील १८ एकर जमीन सुमिटोमोला Rs ५००० कोटींमध्ये विकण्यासाठी बोलणी चालू आहेत.
क्रॉम्प्टन ला सोलर वॉटर पम्पिंग सिस्टीमसाठी Rs २५ कोटींची ऑर्डर मिळाली.
वेरॉक इंजिनीअरिंगने AMP एनर्जी SPV मध्ये २६% स्टेक घेतला.
टाटा कंझ्युमरने कंपनीचा हल्दीराम मध्ये स्टेक खरेदी करण्याच्या बातमीचा इन्कार केला.
Paytm ने सांगितले की त्यांची इन्शुअरन्स कारभारात उतरण्याची योजना नाही.
स्ट्राइड्स फार्मा SPSTL( स्ट्राइड्स फार्मा सर्व्हिसेस PVT LTD) मधील १००% स्टेक घेणार आहे.
अनुपम रसायनने गोपाळ अगरवाल यांना CEO म्हणून नेमले.
L & Tच्या हायड्रो कार्बन युनिटला सौदी आरामको कडून गॅस कॉम्प्रेशन युनिट लावण्यासाठी US $ १ अब्ज ची ऑर्डर मिळाली.
ऑरोबिंदो फार्माच्या तेलंगणा युनिटला USFDA ने EIR दिला.
नजारा टेक प्रेफरंशियल तत्वावर SBI फंडाला ५७.४२ लाख शेअर्स अलॉट करेल.
युनायटेड बिव्हरेजीस चे MD आणि CEO म्हणून विवेक गुप्ता यांची ५ वर्षांसाठी नेमणूक केली.
RBI उद्या ८ सप्टेम्बर २०२३ रोजी १०% इन्क्रिमेंटल CRR संबंधित रिव्ह्यू करेल. जर १०% इन्क्रिमेंटल CRR काढून टाकला तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा HDFC बँकेला होईल.
पॉवर मेक ला हिंदुस्तान झिंक आणि वेदांताकडून Rs ६२५ कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या. UPL ने ‘ASI सीड्स एंटरप्रायझेस केनया ‘ या नावाने नवीन सबसिडीअरी स्थापन केली.
ऑगस्ट २०२३ या महिन्यात HDFC लाईफचे न्यू बिझिनेस प्रीमियम २४.९% ने वाढला आणि APE १६% ने वाढले
ICICI पृ चे न्यू प्रीमियम ५.४^% ने कमी झाले APE १२.३% ने वाढले.
आज PSE, एनर्जी, बँकिंग, रिअल्टी आणि कन्झ्युमर गुड्स, मिडकॅप, स्मॉलकॅप मध्ये खरेदी तर FMCG आणि फार्मा मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
आज BSE निर्देशांक सेन्सेक्स६६२६५ NSE निर्देशांक निफ्टी १९७२७ बँक निफ्टी ४४८७८ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
share करा पण क्रेडिट देऊन !