आज क्रूड US $ ८९.६० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.८५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२४ आणि VIX १०.८४ होते.
FII ने Rs ७५५.५८ कोटींची विक्री तर DII ने २८.११ कोटींची खरेदी केली.
PNB, बलरामपूर चिनी, BHEL, डेल्टा कॉर्प, हिंदुस्थान कॉपर, I बुल्स HSG, इंडिया सिमेंट, मन्नापुरम फायनान्स, आणि SAIL बॅन मध्ये होते.
बजाज फिनसर्वच्या बजाज आलियान्झचा प्रीमियम ( अंडररिटन ) Rs १६७७.८७ कोटी झाले तर ऑगस्ट अखेरपर्यंत Rs ९२२८.८१ कोटी झाले.
स्टरलाईट टेक्नॉंलॉजीने ‘TRUVISTA’ बरोबर साऊथ कॅरोलिना च्या रूरल एरियात फायबर ऑप्टिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी करार केले.
कॅम्पस एक्टीव्हवेअर चे COO पियुष सिंग हे २ डिसेंबर पासून राजीनामा देणार आहेत.
माझगांव डॉक्स ने USA सरकारबरोबर मास्टर शिप रिपेअर अग्रीमेंट केले.
RBI ने इन्क्रिमेंटल CRR टप्प्याटप्प्याने मागे घेण्याची घोषणा केली. ९ सप्टेंबररोजी ०.२५% २५ सप्टेंबर रोजी ०.२५% आणि उरलेले ०.५०% ला ७ ऑक्टोबर २०२३ रोजी मागे घेतला जाईल. या प्रमाणे ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत इन्क्रिमेंटल CRR मागे घेतला जाईल.या घोषणेमुळे बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.
लॅण्ड मार्क कार्सने पश्चिम बंगाल मध्ये हावडा येथे डिलरशिप साठी लेटर ऑफ इन्टेन्ट साइन केले. यामध्ये कार्स आणि SUV यांचा समावेश आहे.
JB केमिकल्सचे CEO कटारिया यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.
टाटा स्टीलने AVAADA बरोबर ग्रीन हायड्रोजन आणि अमोनियाचे उत्पादन करण्यासाठी ओडिशामध्ये युनिट सेटअप करण्यासाठी करार केला.
LTIMAAIND ट्रीने सेल्सफोर्स प्लॅटफॉर्मवर टाइम टू मार्केटचा वेग वाढवण्यासाठी ADSPARK आणि स्मार्ट सर्व्हिस ऑपरेशन लाँच केले.
आता रेल्वेच्या सर्व स्पेशल ट्रेन्समध्ये प्रवासात मिळणारी खानपान सेवा IRCTC मार्फत बुक करावी लागेल. या मुळे IRCTC च्या उत्पन्नात वाढ होईल.
झायड्स लाईफने झायड्स फार्मास्युटिकल या नावाने कॅनडामध्ये सबसिडीअरी स्थापन केली.
ब्लूमबर्ग ने सांगितले की G-२० समिट मध्ये सौदी अरेबिया, UAE आणि USA बरोबर रेल्वे नेटवर्क सुरु करण्याचे कॉन्ट्रॅक्ट भारतातील रेल्वेचे काम करणाऱ्या कंपन्यांना मिळण्याची शक्यता आहे. उदा RVNL, IRFC , RITES
EXIDE ने त्यांच्या EXIDE एनर्जी सोल्युशन्स मध्ये Rs १०० कोटी गुंतवणार असे सांगितले.
नाटको फार्मा विरुद्ध ‘POMALIDOMIDA’ या औषधा संबंधात USA च्या कोर्टात लुइझाना SVC ने ऍण्टीट्रस्ट LAW SUIT दाखल केली.
तेजस नेटवर्कला TCS कडून Rs ७५० कोटी ऍडव्हान्स पेमेंट मिळाले.
मदर्सनसुमीने वायरिंग हार्नेस फॅसिलिटी सुरु केली.
JSW स्टीलचे क्रूड स्टील उत्पादन १९% YOY वाढून २२.९ लाख टन झाले.
कोटक महिंद्रा बँकेच्या MD आणि CEO म्हणून २ महिन्यांकरता दीपक गुप्ता यांच्या २महिन्यांसाठी नेमणुकीला RBI ने मंजुरी दिली.
रिलायन्स इंडस्ट्रीजने NVIDIA बरोबर ऍडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी करार केला.
टाटा कम्युनिकेशनने NVIDIA बरोबर ऍडवान्सड इंटेलिजन्स साठी करार केला,
आज मिडकॅप, स्माल कॅप ऑटो रिअल्टी बँकिंग ऑटो, एनर्जी कन्झ्युमर ड्युरेबल्स मध्ये खरेदी झाली.
श्रेयस शिपिंग आणि लॉजिस्टिक्स या कंपनीच्या शेअर्सच्या डीलीस्टिंग साठी फ्लोअर प्राईस Rs २९२ निश्चित केली आहे. ट्रान्सवार्ल्ड होल्डिंग ही कंपनी श्रेयस शिपिंगचे शेअर्स Rs ३३८प्रती शेअर या भावाने घेणार आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६६५९८ NSE निर्देशांक निफ्टी १९८१९ बँक निफ्टी ४५१५६ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
share करा पण क्रेडिट देऊन !