आजचं मार्केट – ११ September २०२३

आज क्रूड US $ ९०.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.९० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.०० तर USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२९ आणि VIX ११.४५ होते. आज सोने आणि चांदी तेजीत होती.

FII ने Rs २२४.२२ कोटींची विक्री तर DII ने Rs ११५० कोटींची खरेदी केली.

चंबळ फर्टिलायझर, बलरामपूर चिनी, डेल्टा कॉर्प, हिंदुस्थान कॉपर, I बुल्स HSG फायनान्स, इंडिया सिमेंट, मनापूरम फायनान्स, PNB बॅनमध्ये होते. SAIL आणि BHEL बॅनमधून बाहेर आले.

वक्रांगी या कंपनीने आविष्कार कॅपिटल बरोबर व्होर्टेक्स ENGG या ऑटोमेटेड टेलर मशीन सप्लाय करणाऱ्या कंपनीत ४८.५% स्टेक घेण्यासाठी टर्म शीट साईन केली. या कंपनीने भारत आफ्रीका आणि दक्षिण आशियात १०००० ATM सॉफ्टवेअरसकट पुरवले आहेत.

SAMHI हॉटेल्स ने प्राईस बँड Rs ११९ ते Rs १२६ जाहीर केला. मिनिमम लॉट ११९ शेअर्सचा असेल. हा IPO १४ ऑगस्ट २०२३ रोजी ओपन होऊन १८ ऑगस्टला बंद होईल.

अडाणी इंटरप्रायझेसच्या सबसिडीअरीने कोवा होल्डिंग आशिया PTE सिंगापूर बरोबर अडाणी ग्रुपच्या ग्रीन अमोनिया, ग्रीन हायड्रोजन आणि डेरीव्हेटीव्ह्जच्या विक्री आणि मार्केटिंग साठी करार केला.

SJVN ग्रीन एनर्जी ह्या SJVN च्या सबसिडीअरीने हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील भाक्रा बियास मॅनेजमेंट बोर्डाच्या १८ MV सोलर प्रोजेक्टसाठी पॉवर पर्चेस करार केला हे प्रोजेक्ट ऑगस्ट २०२४ मध्ये सुरु होईल.

SCHAFELLER इंडियाने KRSV इनोव्हेटिव्ह ऑटो सोल्युशन्स मध्ये ८ सप्टेंबर रोज्जी १००% स्टेक घेतला.

संदीपकुमार शॉ ने गेटवे डिस्ट्री पार्क च्या कॅफे पदाचा NOV २८ २०२३ पासून राजीनामा दिला.

बामर लॉरी इन्व्हेस्टमेंट्स या कंपनीने Rs ३३ प्रति शेअर लाभांश जाहीर केला. याची रेकॉर्ड डेट २० सप्टेंबर २०२३ निश्चित केली आहे.

श्याम मेटॅलिक्स चे २ प्रमोटर्स NARANTAK DEALCOMMN आणि शुभम बिल्डवेल हे १.३ कोटी शेअर्स ( ५.११ % स्टेक ) Rs ४१४ प्रती शेअर फ्लोअर प्राईसने आणत आहेत. ही फ्लोअर प्राईस CMP ला ११.५% डिस्काउंटने आहे. ही OFS रिटेल इन्व्हेस्टर्स साठी सप्टेंबर १२ ला ओपन होईल.

.ITI ने इंटेलकॉर्प बरोबर लॅपटॉप आणि मायक्रो PC च्या डिझाईन आणि मेन्यूफॅक्चरिंग साठी करार केला.

ITI ला केरळ टेक्निक फंडाकडून १२००० मायक्रो PC ची ऑर्डर मिळाली.हे लॅपटॉप आणि मायक्रो PC SMAASH या ब्रॅण्ड अन्तर्गत विकले जातील.

सुप्रीम कोर्टाने क्रेडिट SUSSI ला US $५लाख सेटलमेंट प्रमाणे शुक्रवारपर्यंत द्यायला सांगितले.

भारत आणि सौदी अरेबियामध्ये एनर्जी सेक्टर आणि इलेक्ट्रिसिटी आणि रिन्यूएबल एनर्जी साठी MOU केले. भारत आणि सौदी अरेबिया मध्ये समुद्राखालून पॉवर ट्रान्स्मिशनसाठी करार केला. हायड्रोजन,ऑइल & गॅस, मध्ये गुंतवणुकीसाठी करार केला.

लंडन स्टॉक एक्स्चेंजने सांगितले की लंडन स्टॉक एक्स्चेंजवर भारतीय कंपन्यांचे लिस्टिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

आज रत्नवीर प्रिसिजन इंजिनीअरिंगचे BSE वर Rs १२८.०० आणि NSE वर Rs १२३.२० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ९८ ला दिले असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगला लिस्टिंग गेन झाला.

रिषभ इंस्ट्रुमेंट्स चे BSE आणि NSE वे Rs ४६० ला लिस्ट झाला. हा शेअर IPO मध्ये Rs ४४१ ला दिला असल्याने ज्यांना IPO मध्ये अलॉट झाले त्यांना माफक लिस्टिंग गेन्स झाले.

टाटा पॉवर ला तामिळनाडूमध्ये ४३ GV ग्रीनफिल्ड सोलर सेल मोड्यूल्सचे उत्पादन करण्यासाठी DFC ने कर्ज दिले.

आज G -२० मध्ये युरोप आशिया कॉरिडॉर ची घोषणा झाली. याचा अनुकूल परिणाम रेल्वे संबंधित शेअर्स IRFC, TEXMACO RAIL, L & T, RVNL, रेलटेल, RITES, आणि वॅगन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल.

G -२० मध्ये ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स जाहीर झाला. याचा फायदा ज्या शुगर कंपन्या इथॅनॉलचे उत्पादन करतात त्यांना होईल. ऊदा बलरामपूर चिनी, श्री रेणुका शुगर, इंडियन ग्लायकॉल, प्राजु इंडस्ट्रीज, बजाज हिंदुस्थान मवाना शुगर.

IDFC १st बँकेच्या ५.७ कोटी शेअर्सचा Rs ४७९ कोटींना सौदा झाला. CGQ ने त्यांचा स्टेक ०.५८% वरून १.०४% केला.

HFCL ला ऑप्टिकल फायबर पुरवण्यासाठी Rs ८२.६ कोटींची ऑर्डर मिळाली.

THE युनिव्हर्सल हलवासीया ग्रुप आणि फॅमिलीने गर्ग यांच्या कडून ४१.८४% स्टेक विकत घेण्यासाठी करार केला. हलवासीय ग्रुप आणि फॅमिली आणखी २६% स्टेक विकत घेण्यासाठी ओपन ऑफर आणणार आहेत.

PVR इनॉक्स ने धारवार मध्ये ४ स्क्रीन मल्टिफ्लेक्स उघडले. त्यामुळे त्यांच्या ११५ शहरांमध्ये १७०८ स्क्रीन्स ३६१ प्रॉपर्टीज झाल्या.

सविता ऑइल ने Rs ४ लाभांश दिला असून २२सप्टेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे
EMS या कंपनीचा IPO १२ वेळा भरला.

सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स स्कीम २०२३ -२०२४ सिरीज २ आजपासून ओपन झाली.

IRB इन्फ्राचे टोल कलेक्शन २४% ने वाढून Rs ३३६ कोटींवरून Rs ४१७ कोटी झाले. . ओलेक्ट्रा ग्रीनला उत्तरप्रदेशमधील १० शहरातून १८५० बसेससाठी ऑर्डर मिळाल्या.

आज मेटल्स, एनर्जी, ऑटो, बँकिंग, FMCG,IT, रेल्वे संबंधित कंपन्यांचे शेअर्स, इथेनॉल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. आज NSE निर्देशांक निफ्टीने २००००चा टप्पा पार केला. एक लाईफ टाईम हाय झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६७१२७ NSE निर्देशांक निफ्टी १९९९६ बँक निफ्टी ४५५७० वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.