आजचं मार्केट – १२ September २०२३

आज क्रूड US $ ९१ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.९० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.७५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२८ आणि VIX ११.७८ होते.आज सोने ५८९०० आणि चांदी ७१९०० च्या आसपास होती.
टेस्लाचे रेटिंग वाढवल्यामुळे शेअर १०% ने वाढला आज APPLE नवीन आय फोन लाँच करणार आहे.
सरकारने साखरेच्या उत्पादक कंपन्यांकडून आणि ट्रेडर्स आणि होलसेलर्स कडून मे आणि ऑगस्ट २०२३ या महिन्यातील विक्री आणि साखरेचा स्टॉक किती होता हे कळवायला सांगितले आहे.कर्नाटक आणि महाराष्ट्र सोडून इतर राज्यात उसाचे पीक चांगले आहे.
FII ने Rs १४७३.०९ कोटींची तर DII ने Rs ३६६.२४ कोटींची खरेदी केली.
BHEL , चंबळ फर्टी, डेल्टा कॉर्प, हिंदुस्थान कॉपर, I बुल्स HSG फायनान्स, इंडिया सिमेंट, PNB मन्नापुरम फायनान्स, बॅनमध्ये होते. SAIL आणि बलरामपूर चिनी बॅन मधून बाहेर आले.
स्टर्लिंग आणि विल्सनने ‘DATAVOLT’ बरोबर डेटा सेंटर बनवण्यासाठी MOU केले.
शाम मेटॅलिक्स ची सबसिडीअरी शाम SEL &पॉवर ने नेदर्लंड्स मध्ये नवीन युनिट सुरु केले.
सरकारने सांगितले की आयात केलेल्या फ्लॅट स्टील व्हील वर ड्युटी सुरु राहील.
ऑरोबिंदो फार्माने VIATRIS आणि फायझर च्या १५ ब्रँडेड प्रोडक्टसची इंडोनेशिया,मधील उत्पादन आणि मार्केटिंग साठी US $ ४.८ कोटींमध्ये अधिग्रहण केले.
PCBL च्या १.४७ लाख MTPA ग्रीनफिल्ड प्रोजेक्टच्या पहिल्या प्रोजेक्ट फेज १ मध्ये उत्पादन सुरु झाले.
स्पाईस जेट KAL एअरवेज ला Rs २२.५ कोटींचे पेमेंट करेल. याआधी Rs ७७.५ कोटींचे पेमेंट केलेले आहे. क्रेडिट सुईस ला स्पाईस जेट US $ १५ लाखांचे पेमेंट कोर्टाच्या आदेशानुसार करेल.
हॉटेल ऑर्चिड ‘REGETA INN’ हॉटेल गंगटोक मध्ये सुरु करेल.
ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्सला प्रायव्हेट प्लेसमेंट द्वारा प्रेफरंशियल अलॉटमेंट रूट ने Rs १२० कोटी उभारण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने मंजुरी दिली.
LIC ने DR रेडीज मधील स्टेक ९.६८% वरून ७.६२% केला.

सरकारने सांगितले की ६१ FMC ( फर्स्ट माईल कनेक्टिव्हीटी ) प्रोजेक्ट मध्ये Rs २४७५० कोटी गुंतवणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की डिझेल गाड्यांवर १०% एक्सट्रा GST लावण्यासाठी मी अर्थमंत्र्यांबरोबर बोलणी करणार आहे. या त्यांच्या विधानानंतर ज्या ऑटो उत्पादक कंपन्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये डिझेल वाहनाचा समावेश आहे त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. उदा अशोक लेलँड, टाटा मोटर्स, M & M, नंतर माननीय मंत्र्यांनी आपल्या विधाना चे स्पष्टीकरण दिले.

ऍक्सिकेड ने मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टीम साठी MOU केले.

SPARC चे कंपनी सेक्रेटरी आणि कंप्लायन्स ऑफिसर दिनेश लाहोटी यांनी ११ सप्टेंबर पासून त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.

मिष्टान्न फूड्स १८ महिने मुदतीची ७.४ कोटी कन्व्हर्टिबल वारंट्स ( हे वॉरंट १ शेअरमध्ये कन्व्हर्ट करता येईल) Rs १३.५० प्रती वॉरंट दराने नॉन -प्रमोटर्सला अलॉट करून Rs ९९.९० कोटी उभारेल.

प्रमोटर्स कन्व्हर्टिबल DEBT च्या माध्यमातून Rs २०० कोटी उभारेल.

RR KABEL या कंपनीचा Rs १९६४ कोटींचा IPO १३ सप्टेंबरला ओपन होऊन १५ सप्टेंबरला बंद होईल. प्राईस बँड Rs ९८३ ते Rs १०३५ असून मिनिमम लॉट १४ शेअर्सचा आहे. ही कंपनी वायर्स आणि केबल आणि FMEG उत्पादनात कार्यरत असून ५% मार्केट शेअर आहे. ह्या IPO मध्ये Rs १८० कोटींचा फ्रेश इशू आणि १.७२ कोटीं शेअर्स ची OFS असेल.

‘यात्रा ऑनलाईन’ या कंपनीचा Rs ६०२ कोटींचा IPO १५ सप्टेंबरला ओपन होऊन २० सप्टेंबरला बंद होईल. १२१८३०९९एवढ्या शेअर्सचा OFS असेल. या कंपनीचे २९ सप्टेंबरला लिस्टिंग होईल.

संदीप बक्षी यांना ICICI बँकेच्या CEO आणि MD पदावर झालेल्या ३ऑक्टोबर २०२६ पर्यंत नेमणुकीला RBI ने मंजुरी दिली.

गुफीक बायोसायन्सेस च्या तीव्र वेदना आणि पोस्ट ऑपरेशन वेदनेवरील ‘PARELOXIB
सोडियम ४० mg इंजेक्शनच्या LYOPHILIZED पॉवडरला ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलच्या रेग्युलेटरी ऑथॉरिटीजनी मंजुरी दिली.

KIMS ने कोंडापूर हेल्थ केअर या कंपनीतील त्यांचा स्टेक १३.२४% ने वाढवून १९.८६ % केला. हा १३.४% स्टेक त्यांनी Rs २० कोटींना खरेदी केला.

पॉवर ग्रीडला राजस्थानात रामगढ येथे नवीन ७६५/४०० KV सबस्टेशन आणि STATCOM साठी यशस्वी बीडर म्हणून जाहीर केले. यात इतर सबस्टेशनशी संबंधित कामांचा समावेश आहे
व्हाईट ओक कॅपिटल मॅनेजमेंट LLP ने रेनबो चिल्ड्रन मेडिकेअरचे २०.८८ लाख शेअर्स विकून कंपनीतील स्टेक ७.८% वरून ५.७४% केला.

L & T ने त्यांच्या शेअर बायबॅकची किंमत Rs ३००० प्रती शेअरवरून Rs ३२०० प्रती शेअर केली.कंपनीने शेअर बायबॅक मध्ये बायबॅक होणाऱ्या शेअर्सची संख्या ३.३३ कोटींवरून ३.१२५० कोटी शेअर्स केली. यासाठी रेकॉर्ड डेट १२ सप्टेंबर २०२३ ठेवली आहे.

सिगाची इंडस्ट्रीज ने त्यांच्या १ शेअरचे १० शेअरमध्ये विभाजन केले. रेकॉर्ड डेट १० ऑक्टोबर निश्चित केली.

हिंदाल्कोला ऍल्युमिनियम बिव्हरेजीस कॅन शीट ‘बॉल कॉर्पोरेशनला’ सप्लाय करण्यासाठी लॉन्ग टर्म कॉन्ट्रॅक्ट मिळाले. ह्या शीट्स नॉर्थ अमेरिकेतील प्लांटमध्ये बनतील.

बेन कॅपिटल L & T फायनान्शियल होल्डिंग मधील ६.५ कोटी शेअर्स किंवा २.६२% स्टेक Rs ८५० कोटींना विकतील.

टाटा स्टील चे MD आणि CEO नरेंद्र यांची टाटा स्टिलने रिअँपॉइन्टमेन्ट केली.

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट Rs २००० कोटींचा QIP लाँच करणार आहे. त्याची फ्लोअर प्राईस Rs ११४० आहे. त्यांनी आधीच Rs ४००० कोटींच्या QIP साठी परवानगी घेतलेली आहे.

ज्युपिटर वॅगन Rs ७०० कोटींचा QIP करणार आहे.

आज PSE, रिअल्टी, मेटल्स, ऑटो, इन्फ्रा, एनर्जी FMCG मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. तर फार्मा आणि IT मध्ये तुरळक खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६७२२१ NSE निर्देशांक निफ्टी १९९९३ आणि बँक निफ्टी ४५५११ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.