आजचं मार्केट – १३ September २०२३

आज क्रूड US $ ९२.३० प्रती बॅरलच्या आसपास आणि रुपया US $१=Rs ८२.९० च्या आसपास होते US $ निर्देशांक १०४.५७ १० वर्षे USA बॉण्ड यिल्ड ४.३० आणि VIX ११.८३ होते.

ओरॅकल ने निराश केले( निकाल तसेच फ्युचर गायडन्स) तसेच APPLE च्या नवीन लाँच केलेल्या मॉडेलमधे नावीन्य वाटले नाही. म्हणून APPLE चा शेअर पडला. एनर्जी शेअर्समुळे डाऊ जोन्स तेजीत होते.

फेड FOMC ची १९ सप्टेंबर आणि २० सप्टेंबर २०२३ रोजी बैठक आहे.

FII ने Rs १०४७.१९ कोटींची विक्री तर DII ने Rs २५९.४८ कोटींची खरेदी केली.

IEX, नाल्को, BHEL, चंबळ फर्टी, डेल्टा कॉर्प, हिंदुस्थान कॉपर, I बुल्स HSG फायनान्स, इंडिया सिमेंट, मन्नापुरम फायनान्स बॅन मध्ये होते. SAIL आणि PNB बॅनमधून बाहेर आले.

भारताचे ऑगस्ट महिन्यासाठी CPI ६.८३ ( ७.४४) आणि जुलै २०२३ साठी IIP ५.७( ३.७) होती. ह्याचा अर्थ ऑगस्ट महीन्यात महागाई कमी झाली आणि जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन वाढले

इन्फोसिसला ‘MT STARK’ ह्या यूरोपमधील बिल्डिंग मटेरियल सप्लायर आणि रिटेलर कडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन साठी ऑर्डर मिळाली.

विप्रो होल्डिंग UK ने विप्रो 4CNVमधील १००% स्टेक विप्रो IT सर्व्हिसेस UK सोसायटीजला ट्रान्स्फर केला. या दोन्ही विप्रोच्या सबसिडीअरी आहेत. रॅशनलायझेशन आणि सिम्पलीफिकेशन या उद्देशाने हे restructuring करण्यात आले.

रशियाने त्यांच्या देशातून भारतात आयात होणाऱ्या DAP, युरिया, आणि NPK या खतांवर देण्यात येणारी US $८० प्रती टन सूट रद्द केली.

एलजी इक्वीपमेन्टला १० वर्ष मुदतीची आणि ३५ वर्षे मेंटेनन्स साठी सीमेन्स कडून मोठी ऑर्डर मिळाली.

सरकारने चीन मधून आयात होणाऱ्या स्टीलवर ५ वर्षांसाठी अँटी डम्पिंग ड्युटी लावली.

बर्जर पेन्ट्सच्या ५ शेअरवर १ बोनस शेअरची रेकॉर्ड डेट २३ सप्टेंबर निश्चित केली आहे.

आज RBI ने कर्ज पूर्णपणे फेडल्यावर कर्जा संबंधित कागदपत्रे कर्जदाराला परत देण्याविषयी गाईडलाईन्स जाहीर केल्या. कर्जफेड केल्यावर कर्जदाराला ३० दिवसात संबंधित कागदपत्रे परत करावी लागतील. जर कागदपत्र परत करण्यात उशीर झाला तर प्रत्येक दिवसासाठी Rs ५००० दंड द्यावा लागेल. जर बँकेतून कागदपत्रे गहाळ झाली /हरवली तर ही मुदत आणखी ३० दिवस वाढवली जाईल. आणि डुप्लिकेट कागदपत्रे मिळवण्यासाठी जो खर्च येईल तो बँकेला करावा लागेल.

GE पॉवरला वेदांताकडून Rs २५ कोटींची ऑर्डर मिळाली.
कफ आणि कोल्ड या वरील काही औषधांमध्ये ह्या रोगांवर उपाय करणारे घटक काही औषधांमध्ये कार्यक्षम नाहीत असे USA च्या अडवायझरी कमिटीने सांगितले उदा GSK फार्माचे T mimic, ग्लेनमार्क फार्माचे ASORIN, आलेम्बिक फार्माचे WIKOYN.

ब्ल्यू डार्ट त्यांच्या सध्याच्या ट्रेडमार्कचे ‘भारत डार्ट’ म्हणून रिब्रान्डींग करणार आहे.

डाटामाटिक्सने ग्लोबल एंटरप्राइज ट्रान्सफॉर्मेशन साठी ‘FINATO’ हा प्लॅटफॉर्म लाँच केला.

टाटा एलेक्सिने ‘ATEME’ बरोबर फ्री ट्रेंड सपोर्टेड टेलिव्हिजन सोल्युशन लाँच करण्यासाठी करार केला.

HCL TECH ने सेल्स फोर्स बेस्ड टेक्निकल सोल्युशन लाँच केले.

भारती एअरटेलचा शेअर आज रेकॉर्ड हाय वर होता या शेअरचे मार्केट कॅपिटलायझेशन Rs ५ लाख कोटींपेक्षा जास्त झाले.

RVNL च्या JV ने बरोडा डिव्हिजन मध्ये रेल्वे कंस्ट्रक्शनसाठी Rs २४५ कोटींच्या प्रोजेक्ट साठी किमान बोली लावली. यात RVNL चा ७४% स्टेक असेल.

KEC इंटरनॅशनल ला सौदी अरेबियाकडून ऑर्डर मिळाली.
LIC ने त्यांचा MGL (महानगर गॅस लिमिटेड) मधील स्टेक वाढवून ९.०३% केला.

KEC ला Rs १०१२ कोटींच्या ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन प्रोजेक्टच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या.

RITES ने रेल्वे आणि रेल्वे संबंधित इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी ” CAMINHO DE FERRO DE MUCAMEDES ANGOLA ‘ यांच्या बरोबर MOU केले.

WAAREE रिन्यूएबल टेक्नॉलॉजीला 52.6 mw सोलर पॉवर प्रोजेक्ट सेट करण्यासाठी EPC contract मिळाले

NTPC च्या तेलंगणातील सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट 800 MW capacity unit 1चे trial ऑपरेशन पूर्ण झाले
आज PSE, खते,पॉवर,सिमेंट,केमिकल,रिॲलिटी,मेटल यामध्ये खरेदी झाली ऑटो आणि IT मध्ये मंदी होती

BSE निर्देशांक सेन्सेक्स 67466,NSE निर्देशांक निफ्टी 20070,बँक निफ्टी 45909 वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.