आजचं मार्केट – १४ September २०२३

आज क्रूड US $ ९२.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.६४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२३ आणि VIX ११.८१ होते.सोने Rs ५९००० आणि चांदी Rs ७१००० च्या आसपास होती.

APPLE चा शेअर पडला. USA मध्ये महागाई निर्देशांक ऑगस्ट महिन्यात ३.७ (३.२) होता. गॅसच्या किमती वाढल्या. USA मध्ये मार्केट मध्ये तेजी होती.

फेड व्याजाच्या दरात PAUSE घेईल असे वाटल्यामुळे मार्केटमध्ये तेजी परतली.

चीनमधून क्रूडची मागणी वाढली. क्रूड आज तेजीत होते.

बॉम्बे डाइंगच्या ३४.९३ लाख शेअरमध्ये Rs ५८ कोटींचे लार्ज डील झाले.

ऑगस्ट २०२३ महिन्यासाठी WPI निर्देशांक -०.५२%(-१.३६%) आला. म्हणजे होलसेल महागाई वाढली.

साई सिल्कस् (कलामंदिर ) लिमिटेड चा IPO ( Rs ६०० कोटींचा फ्रेश इशू आणि २.७ कोटी शेअर्सची ऑस) २० सप्टेंबरला ओपन होऊन २२ सप्टेंबरला बंद होईल. कंपनी IPO च्या प्रोसिड्सचा विनियोग नवीन ३० स्टोर्स, २ वेअरहाऊसेस सुरु करण्यासाठी, कर्ज फेड, आणि वर्किंग कॅपिटल साठी केला जाईल. कंपनीची आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगाणा, आंध्र प्रदेश मध्ये ५४ स्टोर्स आहेत. ही कंपनी ‘कलामंदिर’, ‘वरमहालक्ष्मी सिल्क’ ‘मंदिर’ आणि KLM फॅशन मॉल या स्टोर्स फॉर्मॅट मधून साड्या आणि महिलांची वस्त्रप्रावरणे विकते.

या कंपनीला FY २३ मध्ये Rs १३५१.०० उत्पन्न आणि Rs ९७.६ कोटी झाले.

‘SIGATURE ग्लोबल’ ह्या अफोर्डेबल हाऊसिंग च्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीचा IPO ( Rs ६०३ कोटींचा फ्रेश इशू आणि Rs १२७ कोटींचा OFS ) २० सप्टेंबरला ओपन होऊन २२ सप्टेंबरला बंद होईल.

‘RR कॅबेल’ चा IPO पहिल्या दिवशी २५% भरला.
क्रॉम्प्टन ने ‘DUROLITE’, ‘DUROROYAL’, आणि ‘BOLTMIX’ या ब्रँड अंतर्गत नवीन मिक्सर ग्राईंडर्सची रेंज लाँच केली.

बजाज हेल्थकेअरच्या गुजरातमधील API युनिटला USFDA ने EIR दिला. आता कंपनी USFDA आणि CDMA मध्ये १० ड्रग्स फाईल करू शकेल. कंपनी नजीकच्या भविष्यात ३ ते ४ नवीन प्रोडक्टस लाँच करेल.

ग्रासिमने ‘बिर्ला OPUS’ या नावाने पेंट बिझिनेस लाँच केला.

महिंद्रा हॉलिडेजने उत्तराखंड राज्य सरकारबरोबर ‘क्लब महिंद्रा’ रिसॉर्ट डेव्हलप करण्यासाठी करार केला. कंपनी यात Rs १००० कोटींची गुंतवणूक करेल.

सायप्रसमधील कंपनी ‘BERHYANDA INC’ ने सुवेन फार्मामध्ये ७६.१% स्टेक Rs ९५८९ कोटींना घेणार आहे. ९०% पर्यंत स्टेक घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

JLR ने नवीन रेंज रोव्हर लाँच केली.

सन फार्माने PHAARMAZZ INC बरोबर स्ट्रोक वरील औषध SOVATELTIDE चे भारतात मार्केटिंग करण्यासाठी करार केला.

KPI ग्रीन ला सुरतमध्ये ७.८० MW विंड सोलर हायब्रीड प्रोजेक्ट मिळाली.

टाटा मोटर्सने NEXON आणि NEXON EV चा जागतिक लाँच केला.यांची किंमत NEXON ची Rs ८.०९ लाख+ आहे.आणि निक्सन EV ची Rs Rs १४.७४ लाख+ आहे.

इन्टलेक्ट डिझाईन एरेनाने AFC कमर्शियल बँकेबरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन साठी करार केला.
DELHIVERY ने ‘LOCATEONE’ या नावाने इंटेलिजंट सोल्युशन लाँच केले. ‘OSI सॉफ्टवेअर सूट’ चा विस्तार केला.

इंडसइंड बँकेने कॉर्पोरेट आणि ट्रॅव्हल एजंटसाठी व्हर्च्युअल कमर्शियल क्रेडिट कार्ड लाँच केले.

L & T ने BAE सिस्टीम बरोबर भारतीय सेने साठी ‘ऑल TERRAIN व्हेईकल BVS १०’ चा सप्लाय करण्यासाठी करार केला.

IRCTC ने MSRTC ( महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ) बरोबर IRCTC च्या बस बुकिंग पोर्टलवरून MSRTC च्या ऑनलाईन बस बुकिंग साठी MOU केले.

बॉम्बे डाईंग & MFG कंपनीने त्यांची वरळी मधील २२ एकर जमीन ‘GOISU रिअल्टी PVT लिमिटेड’ या सुमिमोटो रिअल्टी डेव्हलपमेंट कंपनीच्या सबसिडीअरी ला Rs ५२०० कोटींना २ टप्प्यात विकण्यासाठी करार केला. पहिल्या टप्प्यात बॉम्बे डाईंगला Rs ४६७५ कोटी आणि उरलेली रक्कम दुसऱ्या टप्प्यात मिळेल.

व्हिनस रेमिडीजने DSIR ९ डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च ) बरोबर रजिस्ट्रेशन केले. या मुळे कंपनीला कस्टम्स ड्युटीमधील सवलतींचा फायदा घेता येईल.

विप्रोने DUSSELDARF जर्मनी येथे लोकलाइझ्ड सपोर्ट आणि ग्राहकाला सायबर सिक्युरिटी आणि COMPLIANCE रिक्वायरमेंट देण्यासाठी ‘सायबर डिफेन्स सेंटर’ लाँच केले

विनंती ऑर्गनिक्स ने विरल ऑर्गनिक्समध्ये आणखी Rs ११.६० कोटींची गुंतवणूक १.११ कोटी शेअर्स Rs १० प्रती शेअर दराने राईट्स इशूमध्ये सबस्क्राईब करून केली.

NBCC ने केंद्र सरकार, RINL (राष्ट्रीय इस्पात निगम) आणि NLMC ( नॅशनल ऍसेट मोनेटायझेशन कॉर्पोरेशन बरोबर) चौपदरी करार केला. याअन्वये NBCC RINL च्या विशाखापट्टणम येथील नॉनकोअर ऍसेट च्या मॉनेटायझेशनसाठी टेक्निकल आणि ट्रान्झॅक्शनल अडवायझर म्हणून काम करेल.

JSW इन्फ्रा या कंपनीचा Rs २८०० कोटींचा IPO या महिन्याअखेर ओपन होईल. हा पूर्णपणे फ्रेश इशू ऑफ शेअर्स असेल. या IPO चे प्रोसिड्स कर्ज फेड, आणि प्रोजेक्ट्स ची क्षमता वाढवण्यासाठी उपयोगात आणली जाईल. कंपनी ९३ मिलियम टन कार्गो व्हॉल्युम FY २३ केला. FY २३ मध्ये कंपनीचे उत्पन्न Rs ३१९५ कोटी आणि प्रॉफिट Rs ९७.६ कोटी होते. कंपनी भारतात मार्मा गोवा सकट भारतात ९ पोर्टमध्ये आणि UAE मध्ये फुजिराह आणि DIBBA टर्मिनल्समध्ये कमर्शियल ऑपरेशन्स करते.

टाटा पॉवरच्या TPREL या सबसिडीअरीने X प्रो इंडिया बरोबर ३.१२५ MW कॅप्टिव सोलर प्लांटसाठी पॉवर पर्चेस अग्रीमेंट केले.

NMDC ने आयर्न ore च्या लम्प आणि फाईंनचे भाव Rs ३०० प्रती टन वाढवले.

भारतातील डोमेस्टिक हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २२.८% ने वाढून १.२४ कोटी झाली.

टेस्ला भारतात येण्याच्या तयारीत आहे याचा फायदा सोना कॉम स्टार, युनो मिंडा भारत फोर्ज, संधार टेक्नॉलॉजी यांना होईल. कारण या कंपन्या सध्या EV ४ व्हीलर आणि EV २व्हीलरच्या स्पेअर पार्ट्सचे उत्पादन आणि सप्लाय करत आहेत.

तुतिकोरिन कस्टम विभागाने DCW वरील कारवाई स्थगित केली.

आज मिडकॅप, स्मॉल कॅप, PSU बँका, मेटल्स, रिअल्टी PSE, ऑटो, IT मध्ये खरेदी झाली. FMCG मध्ये प्रॉफीटबुकिंग झाले.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ६७५२९ NSE निर्देशांक निफ्टी २०१०३ आणि बँक निफ्टी ४६००० वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.