आजचं मार्केट – १५ September २०२३

आज क्रूड US $ ९४.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.०० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.२६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२८ आणि VIX १०.९० होते.आज सोने आणि चांदी मंदीत तर अल्युमिनियम कॉपर आणि झिंक तेजीत होते.

चीनने त्यांचा RRR मध्ये ०.२५बेसिस पॉइंट्सची कपात केली. आता RRR ७.४० असेल. चीनचा IIP ३.७% वरून ४.५% झाला. रिटेल सेल्स ४.६% ( जुलैमध्ये २.५% होते).

आज FII नी Rs २९४.६९ कोटींची खरेदी तर DII नी Rs ५०.८० कोटींची विक्री केली.

बलरामपूर चिनी, झी एंटरटेनमेंट, डेल्टा कॉर्प, हिंदुस्थान कॉपर, I बुल्स HSG फायनान्स, IEX, इंडिया सिमेंट, मन्नापुरम फायनान्स,NALKO, REC आणि SAIL बॅनमध्ये होते.

प्रत्येक राज्यांत वंदे भारत ट्रेन चालू करण्यासाठी रेल्वे वेगात काम करत आहे.या ट्रेनचे कोच बनवण्यासाठी हिंदाल्को इंडस्ट्रीज आणि इटलीच्या ‘METRA SPA ‘ यांच्यात करार झाला. त्यामुळे मोठ्या साईझचे अल्युमिनियम एक्सट्रुजन आणि फॅब्रिकेशनसाठी लागणारी टेक्नॉलॉजी जी हाय स्पीड अल्युमिनियम रेल्वे कोच बनवण्यासाठी उपयोगात येते भारतात येईल. या प्रोजेक्ट मध्ये हिंडाल्को Rs २००० कोटींची गुंतवणूक करेल. अल्युमिनियम कोच वंदे भारत गाड्यांची कार्यक्षमता, टिकाउपणा आणि सस्टेनेबिलिटी वाढवतात.

इन्फोसिसला १५ वर्षांसाठी Rs २५० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

डिक्सन टेक दिल्लीजवळ स्मार्ट फोन साठी प्लांट लावेल.

शक्ती पंप या कंपनीला UP कृषी विभागाकडून Rs २९३ कोटींची ऑर्डर मिळाली.

PI इंडस्ट्रीजने ‘KOPPERT’ बरोबर स्ट्रॅटेजिक करार केला.

इंडियन हॉटेल्सने जर्मनीतील फ्रॅन्कफुर्ट येथील ताज हॉटेल HESSISLER HOF बरोबर करार केला.

SEQUENT सायंटीफिकला त्यांची ठाणे येथील API युनिट विकण्यासाठी मंजुरी मिळाली.

अल्केम लॅब ने विकास गुप्ता यांची CEO म्हणून नेमणूक केली.

पटेल ENGG च्या JV ने Rs २०२ कोटींच्या प्रोजेक्टसाठी किमान बोली लावली. यात
पटेल ENGG चा ४०% स्टेक आहे.

ग्रीव्हज कॉटन या कंपनीने ग्रीव्हज ELTRA कार्गो थ्री व्हीलर EV लाँच केली.

लेमन ट्री हॉटेल्सने नेपाळ आणि गुजरात मध्ये लायसेन्सिंग साठी करार केला.

आज HDFC बँकेच्या शेअर्समध्ये ३.८ लाख शेअर्सचा सौदा झाला.

अशोक लेलँड ने UP राज्य सरकारबरोबर EV बस युनिट लावण्यासाठी करार केला.

झायड्स लाईफच्या ‘NORELGESTROMIN ETHINYL ESTRADIOL ‘ या गर्भनिरोधक औषधाला USFDA ने अंतिम मंजुरी दिली.

बजाज होल्डिंग या कंपनीने Rs ११० अंतरिम लाभांश जाहीर केला.

NTPC ने UPRVUNL ( उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड ) बरोबर सप्लिमेंटरी JV अग्रीमेंट केले.२००८मध्ये NTPC आणि UPRVUNL यांनी JV कंपनी ‘MEJA URJAA निगम लिमिटेड ची स्थापना केली.

स्नायडर इलेक्ट्रिक इन्फ्रा या कंपनीने उदय सिंग यांची १५ सप्टेंबर २०२३ पासून ३ वर्षांसाठी CEO म्हणून नेमणूक केली. अर्णव रॉय यांनी १४ सप्टेंबर २०२३ पासून राजीनामा दिला.

पॅरामाऊंट या कंपनेने भारत फोर्ज बरोबरच्या भागीदारीची मुदत वाढवू असे जाहीर केले. ही भागीदारी आर्मर्ड व्हेइकल्सचे वेगवेगळे प्रकार पॅरामाऊंटच्या जागतिक ग्राहकांसाठी बनवते. भारतीय सेनेसाठी KM ४ आर्मर्ड व्हेइकल्स बनवते.

स्ट्राईड फार्माच्या सबसिडीअरीला ‘DOLUTEGRAVIR’ ५०mg टॅब्लेट्स साठी USFDA ची अंतिम मंजुरी मिळाली.

टाटा पॉवरच्या सबसिडीअरीने ‘X प्रो इंडिया ‘ बरोबर ३.१२५ MW AC ग्रुप कॅप्टिव्ह सोलर प्लांट डेव्हलप करण्यासाठी पॉवर डिलिव्हरी अग्रीमेंट केले.

महाराष्ट्रातील आचेगाव येथील हे युनिट ७.१२८ मिलियन इलेक्ट्रिसिटी युनिट चे उत्पादन करेल. येथे X प्रो इंडियाचा पॉलिमर प्रोसेसिंग प्लांट आहे.

सरकार १५ वर्ष जुन्या डबल डेकर बसेस EV बसेसमध्ये बदलणार आहे. याचा फायदा JBM ऑटो, ओलेक्ट्रा ग्रीन आणि अशोक लेलँड या कंपन्यांना होण्याची शक्यता आहे

सियाराम सिल्कने शेअर बायबॅक ची किंमत Rs ६५० प्रती शेअरवरून Rs ७२० प्रती शेअर केली.बायबॅकच्या शेअर्सची संख्या १६.६१ लाखांवरून १४.९९ लाख केली. ह्या शेअर बाय बॅकसाठी १८ सप्टेंबर २०२३ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

अल्केम लॅब ने सांगितले की त्यांच्या ऑफिसेस आणि सबसिडीअरीजचा आयकर विभागाने सर्वे चालू केला. कंपनीने सांगितले की ह्याचा त्यांच्या बीझिझनेसवर काही परिणाम होणार नाही.

आज FTSE चे रिबॅलन्सिंग होणार आहे. त्यामुळे काही शेअर्समध्ये पॉझिटिव्ह तर काही शेअर्समध्ये निगेटिव्ह इनफ्लो येण्याची शक्यता आहे.

आज ऑटो, IT, मिडकॅप, स्मॉल कॅप, फार्मा, बँकिंग, इन्शुअरन्स शेअर्समध्ये खरेदी झाली तर PSE, रिअल्टी FMCG मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६७८३८ NSE निर्देशांक निफ्टी २०१९२ आणि बँक निफ्टी ४६२३१ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.