आज क्रूड US $ ९४.६०प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.३४ होते VIX १०.८२ होते.
USA चि मार्केट्स मंदीत होती.चिप उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये मंदी होती. तैवानच्या कंपनीने स्लो गोइंग पॉलिसी अवलंबली आहे. वेंडर्सनाही स्लो जाण्यास सांगितले आहे.
FII ने Rs १६४.४२ कोटींची खरेदी तर DII ने Rs १९३७.५७ कोटींची खरेदी केली.
चंबळ फर्टी, बलरामपूर चिनी, BHEL, हिंदुस्थान कॉपर, I बुल्स HSG फायनान्स, IEX इंडिया सिमेंट., मन्नापुरंम फायनान्स, REC ,झी एंटरटेनमेंट बॅनमध्ये होते , डेल्टा कॉर्प, नाल्को, SAIL बनमधून बाहेर आले.
सरकारने त्यांच्या पिरियॉडिक रिव्ह्यू मध्ये डोमेस्टिकली उत्पादित क्रूड वर विंडफॉल टॅक्स वाढवला. Rs ६७०० प्रती टन वरून Rs १०००० प्रती टन केला.
डिझेलवरची एक्स्पोर्ट ड्युटी Rs ६ वरून Rs ५.५० केली. ATF चे रेट Rs ४ प्रती लिटर वरून Rs ३.५० प्रती लिटर केली.पेट्रोल वर कोणत्याही प्रकारची ड्युटी लावली नाही.
IRCTC ने अमेझॉनवर लिस्टिंग केले हे लिस्टिंग ६ महिन्यांपुरते असेल. काही विशिष्ट्य गोष्टी IRCTC च्या साईटवरून ऑर्डर करता येतील.
लालपाथ लॅब, मेट्रोपोलीस हेल्थकेअर या ऑनलाईन व्यवसाय करणाया कंपन्यांनी त्याच्या किमती वाढवल्या.
ब्रिगेड TETRARCH ने ५ एकर जमीन बंगलोरमध्ये Rs १२३.५० कोटींना बंगलोर सिरॅमिक्स कडून खरेदी केली .
कोरोमॉंडेल ने फ्लिक फार्म या रोबोट बनवणार्या कंपनीमध्ये स्टेक घेतला.
GENSOL या कंपनीने SCORPIUS ट्रॅकर्स मध्ये मेजॉरिटी स्टेक ( ५४.३८% ) Rs १३५ कोटींना घेतला.
आज ज्युपिटर लाईफ लाईनचे BSE वर Rs ९६० आणि NSE वर Rs ९७३ वर लिस्टिंग झाले हा शेअर IPO मध्ये Rs ७३५ला दिलाअसल्याने ज्यांना शेअर अलॉट झाले त्यांना चांगला लिस्टिंग गेन झाला.
सालसार टेक्नोलोजिला .एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून ऑर्डर मिळाली.
TCS ने लाईफ सायकल ऍसेट आणि रिपोर्टींग इनोव्हेशन सोल्युशन लाँच केले.
इंडीगो पेंट्सने त्यांच्या तामिळनाडू युनिटमध्ये कमर्शियल उत्पादन सुरु केले. त्याचा क्षमता ५०००० KL आहे
AU स्मॉल फायनान्स बँकेने ग्रामीण क्षेत्रात स्वदेश बँकिंग सेवा लाँच केली.
इंटेलेक्च्युअल एरेना या कंपनीने कमर्शियल आणि कॉर्पोरेट बँकांसाठी iGTB लाँच केले. (ईंटलेक्ट ग्लोबल ट्रान्झॅक्शन बँकिंग)
HFCL ला मध्येप्रदेश जल निगमकडून EPC Rs १०१५ कोटींची ऑर्डर मिळाली. तत्वावर ऑर्डर मिळाली.
IOC ने HURL ( हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन ) मध्ये Rs ९०३ कोटींची गुंतवणूक करण्यासाठी मंजुरी मिळाली. यातून गोरखपूर सिंद्री आणि बरौनी येथे फर्टिलायझर प्लांट्स उभारणार आहेत.
TEXMACO रेल ला Rs १००० कोटी QIP च्या माध्यमातून उभारायला परवानगी मिळाली. कंपनी प्रेफरंशियल इशू मधून Rs ५० कोटी उभे करेल.
झोमॅटो स्लोव्हाकिया मध्ये लिक्विडेशन प्रोसेस सुरु केली.
आयशर मोटर्स आणि वोल्वो मध्ये JV झाले. या JV ला १००० EV ची ऑर्डर मिळाली.
या आठवड्यात बुधवार तारीख २० सप्टेंबर रोजी फेड चा निर्णय , गुरुवारी बँक ऑफ इंग्लंड चा तर शुक्रवारी बँक ऑफ जपान त्यांचा निर्णय देईल.
रेस्टारंट ब्रॅण्ड मध्ये प्रमोटर्स नी १२.५४ कोटी शेअर्स म्हणजे २५.३६% स्टेक विकला.
टाटा स्टील आणि UK सरकार दोघानी पोर्ट टॉलबॉट येथे इलेक्ट्रिक आर्क फर्नेस स्टील मेकिंग साठी GBP १.२५ बिलियन गुंतवण्यासाठी करार केला. या साठी UK सरकारकडून GBP ५०० मिलियन ग्रांट मिळेल.
HAL कडून १२ SU ३० MKI एअरक्राफ्ट HAL कडून प्रोक्युअरमेंट करण्यासाठी AON ( ऍक्सेप्टन्स ऑफ नेसीसीटी ) ला संमती मिळाली.
BEL ला कोची शिपयार्ड कडून सेन्सर, फायर कंट्रोल सिस्टीम, कम्युनिकेशन इक्विपमेंट साठी Rs २११८कोटींची ऑर्डर मिळाली.
USA मध्ये ऑटो कर्मचारी संपावर जाणार आहेत त्याचा आमच्या बिझिनेसवर काही परिणाम होणार नाही असे सोना BLW ने सांगितले.
JSW इंफ्राचा IPO २५ सप्टेंबरला ओपन होईल. त्याचा प्राईस बँड Rs ११९ ते Rs १२६ आहे.
रॅडिको खेतान या कंपनीने सीतापूर ग्रीन ग्रेन डिस्टिलरी चे काम सुरु केले.
UTI AMC ने अनुराग मित्तल यांना फिक्सड इन्कम हेड म्हणून नियुक्त केले.
तांतिया कन्स्ट्रक्शन ला Rs ६२ कोटींची ऑर्डर मिळाली.
जीनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशनने सौदी अरेबिया मध्ये डिजिटल ट्रॅक्शन ३D मॅपिंग साध्य केले. कंपनीला Rs ७६ कोटींची ऑर्डर मिळाली. कंपनीने एक सबसिडीअरी स्थापन केली.
अतिशय या कंपनीला Rs १५ कोटींची ऑर्डर मिळाली.
कॅपेसिटे इन्फ्राला Rs २८० कोटींची ऑर्डर मिळाली.
VA TECH VA BAG ने AI JOMAICH एनर्जी आणि वॉटर बरोबर मोठ्या प्रोजेक्टसाठी EPC पार्टनर म्हणून करार केला.
आशापुरा माईनकेम ने बॉक्साइट चा पुरवठा करण्यासाठी २ कॉन्ट्रॅक्ट केली.
आज PSE ऑटो एनर्जी PSU बँका मध्ये खरेदी तर रिअल्टी मेटल्स इट फार्ममध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६७५९६ NSE निर्देशांक निफ्टी २०१३३ आणि बँक निफ्टी ४५९७९ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !