आज क्रूड US $ ८८.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ८३.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.२७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.९० आणि VIX १२.०८ होते. सोने Rs ६११०० तर चांदी Rs ७२२०० वर होती. बेस मेटल्स मंदीत होती.
काल USA ची मार्केट्स तेजीत होती. शॉर्ट कव्हरिंग जोरदार झाले.
बँक ऑफ जपानने त्यांचा व्याज दर -०.१% वर कायम ठेवला.
२ नोव्हेम्बरला बँक ऑफ इंग्लंड ची बैठक आहे.
चीनचा ऑक्टोबर २०२३ साठी मॅन्युफॅक्चरिंग PMI ४९.५ आणि कॉम्पोझिट PMI ५०.७ आले.
FII ने Rs १७६१ कोटींची विक्री तर DII ने Rs १३२८ कोटींची खरेदी केली.
IPCA लॅबच्या पीठमपुर युनिटला १५ जून २०२३ ते २३ जुन २०२३ च्या दरम्यान झालेल्या इन्स्पेक्शन मध्ये USFDA ने VAI ( व्हॉलंटरी ऍक्शन इनिशिएटेड) आणि EIR (एस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट) दिले.
कोलगेट ला Rs १७० कोटींची टॅक्ससंबंधीत ( ट्रान्स्फर प्राइसिंगसंबंधात) नोटीस मिळाली.
टाटा मोटर्सला पश्चिम बंगाल राज्य सरकार कडून सिंगूर संबंधात Rs ७६६ कोटी मिळतील.
इनॉक्स विंडमध्ये Rs ७३१ कोटींचे लार्ज डील झाले.
L & T ला हायड्रोकार्बन बिझिनेससाठी मध्य पूर्व देशातून गॅस कॉम्प्रेशन युनिट साठी Rs १५००० कोटींपेक्षा जास्त रकमेची ऑर्डर मिळाली.
KPIT टेक ने त्यांचा CC ग्रोथ गायडन्स ३७% केला.
EBITDA गायडन्स २०%+केला. ऑर्डर्सची पाईपलाईन चांगली असून आमची ग्राहकांबरोबर चांगले संबंध आहेत असे व्यवस्थापनाने सांगितले.
अशोक लेलँड ला GSRTC कडून १२८२ बसेस ची ऑर्डर मिळाली या बसेसची डिलिव्हरी डिसेंबर २०२३ पासून सुरु होईल.
शक्ती पम्पसला ग्राइंडर पंप विथ ऍडजस्टेबल इम्पेलर साठी ७ वे पेटंट भारत सरकार कडून मिळाले.
सरकारने डोमेस्टिक गॅसच्या किमती US $ ९.२०/mBtu वरून US $ ९.१२/mBtu केल्या.
पॉवर मेकला BHEL कडून Rs ३५५ कोटींची ऑर्डर मिळाली.
L & T टेक ने पोलंड येथे नवीन युनिट सुरु केले.
वेदांत फॅशनचे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
GILLET चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
अरविंदचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले
गो फॅशनचे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
NIIT चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले. अन्य उत्पन्न Rs १४.७ कोटी.
JSW होल्डिंग चे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले.
अजंता फार्माचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
IOC तोट्यातून फायद्यात आली. प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले.कंपनीने Rs ५ प्रतिशेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. यासाठी १० नोव्हेंबर २०२३ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
GAIL चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले.
V गार्डचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
VIP चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
प्राज इंडस्ट्रीज चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
कोकुयो कॅम्लिन चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
GET &D ला पॉवर ग्रीडकडून Rs ५०० कोटींची ऑर्डर मिळाली.
NCLAT ने IDBI आणि ऍक्सिस फायनान्स यांनी झी सोनी मर्जर संदर्भात दाखल केलेले अपील उच्च बेंचकडे वर्ग केले.
RITES चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ४.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
PNC इन्फ्राचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
इंडिया बुल्स रिअल इस्टेट फायद्यातून तोट्यात गेली.
मदर्सन वायरिंगचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
TVS मोटर्सचे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
बजाज हिंदुस्थान शुगरला UP पॉवर कॉर्पोरेशन थकबाकीचे Rs १३६१ कोटी मिळाले.
DLF चे प्रॉफिट उत्पन्न वाढले. कलेक्शन Rs २३५९ कोटी झाले.
मेरिको चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. कंपनीने Rs ३ लाभांश दिला.
GMR इन्फ्रा स्पंदन स्फूर्ती यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
बटरफ्लाय गांधीमती आणि क्रॉम्प्टन कंझ्युमरच्या मर्जरच्या विरोधात शेअर होल्डर्सनी मतदान केले.
DCXचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. सीमेन्स एनर्जी सीमेन्स इंडियामधील त्यांचा स्टेक कमी करण्याच्या विचारात आहे त्यामुळे आज सीमेन्स इंडियाच्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
नवीन फ्ल्युओरीन चे दुसऱ्या तिमाहीचा निकाल YOY चांगला आला पण अपेक्षेपेक्षा कमी आला.
आंध्र पेपर, DCM श्रीराम यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल कमजोर आले.
झायड्स लाईफ LIQNEDS ग्रुपच्या ५ कंपन्या Rs ६८९ कोटींमध्ये खरेदी करणार आहे.
आज रिअल्टी PSE आणि फर्टिलायझर्स मध्ये खरेदी झाली.
फार्म बँकिंग IT ऑटो मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६३८७५ NSE निर्देशांक निफ्टी १९०८० बँक निफ्टी ४२८४५ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !