.
आज क्रूड US $ ८३.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.४० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.७९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२८ तर VIX १३.१४ होते. सोने Rs ६२५५१ चांदी Rs ७७००० च्या आसपास होते. बेस मेटल्स कॉपर आणि झिंक तेजीत होती. बासमती तांदुळाचे भाव १० % ते १२% वाढले. युरोप आणि मध्यपूर्वेत मागणी वाढली आहे.
USA च्या Q ३ GDP चे अनुमान ४.९% वरून ५.२% केले.
चीनचा मॅन्युफॅक्चरिंग PMI ४९.४ (४९.५) आणि कॉम्पोझिट PMI ५०.४( ५०.७) झाला. हे PMI कमी झाले की economy contract होत आहे package देऊन उपयोग होत नाही
.FII नी Rs ७२ कोटींची खरेदी तर DII ने Rs २३६० कोटींची खरेदी केली.
आज PCR १.४७ झाले त्यामुळे put च्या बाजूने हालचाल होते
SBI म्युच्युअल फंडाला करूर वैश्य बँकेत ९.९९% पर्यंत गुंतवणूक करायला परवानगी दिली
थॉमस कुक मधील ८.५० % स्टेक म्हणजेच ४ कोटी शेअर्स प्रमोटर्सनी फ्लोअर प्राईस Rs १२५ ने विकले.
हिंदुस्थान कॉपर आणि मन्नापुरम फायनान्स हे शेअर्स बॅनमध्ये होते.
आज तीन IPO चे BSE आणि NSE वर लिस्टिंग झाले
यात टाटा टेक्नॉलॉजीची IPO ची प्राईस Rs ५०० आहे त्याचे लिस्टिंग BSE वर Rs ११९९.९५ तर NSE वर Rs १२०० वर झाले. शेअर नंतर Rs १४०० पर्यंत गेला. पहिल्याच दिवशी १.०५ कोटी शेअर्समध्ये Rs १४३३ कोटींचा लार्ज ट्रेड झाला.
गंधर्व ऑइल चे लिस्टिंग BSE वर Rs २९५.४० वर तर NSE वर Rs २९८ वर झाले. हा शेअर IPO मध्ये Rs १६९ ला दिला आहे.
या दोन्ही IPO चे लिस्टिंग चांगले झाल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना खूपच चांगले लिस्टिंग गेन्स झाले. फेड फायनान्स चे लिस्टिंग BSE वर Rs १३७.७५ आणि NSE वर Rs १३८ वर झाले. IPO मध्ये शेअर Rs १४० दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना लिस्टिंग गेन्स झाले नाहीत.
मेट्रो ब्रँडने USA मध्ये असलेल्या ‘फुटलॉकर’ या कंपनी बरोबर लायसेन्सिंग अग्रीमेंट केले. फूटलॉकरचे स्टोर्स मेट्रो ब्रँड ओन आणि ऑपरेट करेल. न्यायका या कंपनीने ही फूटलॉकर बरोबर लायसेन्सिंग अग्रीमेंट केले.
PCBL ने ऍक्वाफार्म केमिकल ही कंपनी Rs ३८०० कोटींमध्ये खरेदी केली. तसेच PCBL या कंपनीने ‘किनाल टेक’ या USA मधील कंपनीबरोबर बॅटरी उत्पादन करण्यासाठी JV केले. यात PCBL चा ५१% स्टेक आणि ‘किनाल टेक’ चा ४९% स्टेक असेल.
सरकार ५ जानेवारीपर्यंत IDBI विक्री साठी बोली मागवणार आहे.
टाटा केमिकल्स आणि GHCL ने सोडा ASH च्या किमती कमी केल्या.
ड्रीमफोक्स ने रशियन Slounge ऑपरेटर ‘GREYWALKER ‘ बरोबर करार केला.
RR KABEL च्या ऑफिसेस मध्ये आयकर खात्याने सर्च केला.
डिफेन्स ऍक्विझिशन कौन्सिल Rs ४०००० कोटींमध्ये एअरक्राफ्ट कॅरियर खरेदी करण्याच्या योजनेवर विचार करणार आहे. कोची शिपयार्ड एअरक्राफ्ट कॅरियर बनवते.
आज डिफेन्स ऍक्विझिशन कॉउंसिल मध्ये खालील प्रस्ताव मंजूर झाले.
(१) डोमेस्टिक एअरक्राफ्ट कॅरियर Rs ४०००० कोटींपर्यंत खरेदी करणार. ही खरेदी डोमेस्टिक डिफेन्स सप्लायरकडून केली जाईल. कोची शिपयार्ड अशी एअरक्राफ्ट कॅरियर बनवते
(२) ९७ तेजस जेट फायटर Rs ५५००० कोटींना विकत घेणार
(३) १५६ प्रचंड हेलिकॉप्टर्स खरेदी करणार तेजस जेट फायटर आणि प्रचंड हेलिकॉप्टर HAL बनवते.
ऑरोबिंदो फार्माची सबसिडीअरी EUDIA फार्मा च्या ‘BUDESONIDE INHALING SUSPENSION’ या लहान मुलांच्या अस्थमावरील औषधाला USFDA कडून अप्रूव्हल मिळाले.
सरकारने डिसेंबर २०२३ महिन्यासाठी डोमेस्टिक नैसर्गिक गॅसची किंमत US $ ८.४७ प्रती mBtu ठरवली.
( US $ ९.१२ प्रती mBtu वरून कमी केली.)
सॅटिन क्रेडिट केअर NCD दवारा Rs ४५.६५ कोटी उभारणार.
टाटा कॉफी व्हिएतनाममध्ये नवीन फ्रीझिंग युनिट उघडून Rs ४५० कोटींची गुंतवणूक करणार. टाटा कॉफी व्हिएतनाम ही सबसिडीअरी या नव्या युनिटचे व्यवस्थापन करेल.
टाटा कॉफी आणि TCPL बिव्हरेजीस आणि फूड्स मध्ये करार झाला.
डिसेंबर २०२३ सीरिजसाठी खालीलप्रमाणे काही रोलओव्हर झाले.
JSPL ९१% , मन्नापुरम फायनान्स ९१% , कोफोर्ज ८९%, SBI कार्ड्स ८८%, बाटा ८८%, DRL ८७%, गोदरेज कंझ्युमर्स ८७%, ज्युबिलण्ट फूड्स, बजाज फायनान्स ८६%, HDFC बँक ८६%, EICHER मोटर्स ८५%, गोदरेज प्रॉपर्टीज ८५%, बजाज ऑटो ८१%, कोटक महिंद्रा ८१%, SBI ७९% अल्ट्राटेक सिमेंट ७८%
डाटामाटिक्सने AI सोल्युशन TRUE कॅप+ लाँच केले.
टाटा टेली सर्व्हिसेसने ‘TRUE CALLER’ बरोबर कोलॅबोरेशन केले.
आज फार्मा, FMCG, कॅपिटल गुड्स, ऑइल & गॅस, रिअल्टी, मेटल्स, ऑटो मध्ये खरेदी झाली. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६६९८८ NSE निर्देशांक निफ्टी २०१३३ बँक निफ्टी ४४४८१ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !