आजचं मार्केट – ६ November २०२३

आज क्रूड US $ ८५.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.०३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.६० आणि VIX ११.१० होते. सोने आणि चांदी तेजीत होती.

NONफार्म पेरोल १५०००० ने वाढले. २९७००० जॉब तयार झाले. आज USA ची एशियामधील मार्केट तेजीत होती.

FII ने १२.४३ कोटींची विक्री तर DII ने Rs ४०२.६९ कोटींची खरेदी केली.

GNFC आज बॅनमध्ये होता.

तांदूळ आणि गव्हाच्या निर्यातीवरील निर्बंध/ बंदी पुढील ५ वर्षांसाठी चालू राहतील असे केंद्र सरकारने सांगितले. निर्यातदारांकडून सरकार गहू तांदूळ खरेदी करेल. गहू आणि तांदळाचे उत्पादन कमी झाले ही समस्याच आहे.
SBI चे प्रॉफिट YOY वाढून Rs १३२६५ कोटींवरून Rs १४४३० कोटी झाले. NII YOY १८% ने वाढून Rs ३९५०० कोटी झाले. ग्रॉस ऍडव्हान्सेस Rs ३३ लाख कोटी झाले. डिपॉझिट्स YOY ११.९% ने वाढून ४६.९ लाख कोटी झाले. GNPA YOY ३.५२% वरून २.५५% झाले NNPA YOY ०.८०% चे ०.६४% झाले. SBI ने दुसऱ्या अर्धवर्षासाठी गायडन्स १३% ते १४% दिला.

बँक ऑफ बरोडा चे प्रॉफिट YOY २८% ने वाढून Rs ३३१३ कोटींवरून Rs ४२५३ कोटी झाले. ऍडव्हान्सेस YOY १६.५% ने वाढून Rs ७१६७३७ कोटींवरून Rs ८३४७२३ कोटी झाले. डिपॉझिट्स YOY १२% ने वाढून Rs ९५८९६७ कोटींवरून Rs १०७४११४ कोटी झाले. GNPA ५.३१% वरून ३.३२% झाले. NNPA १.१६% वरून ०.७६% झाले. २ मोठे अकाउंट्स स्लिपजीस झाल्यामुळे प्रॉफिट कमी झाले.

बँक ऑफ इंडियाचे प्रॉफिट YOY ५२% ने वाढून Rs ९६० कोटींवरून Rs १४५८ कोटी झाले. NII YOY १३% वाढून Rs ५०८३ कोटींवरून Rs ५७४० कोटी झाले. NIM ३.८% होते. ऍडव्हान्सेस १९% ने वाढून Rs ४९३८१४ कोटींवरून Rs ५४३१२८ कोटी झाले.

डिपॉझिट्स ८% ने YOY वाढून Rs ६४७५४१ कोटींवरून Rs ७०३७५१ कोटी झाले. रिटेल, होम लोन, इतर पर्सनल लोन्समध्ये चांगली वाढ झाली.

PB फिनटेक चा लॉस Rs १८६.६४ कोटींवरून Rs २१.१ कोटी झाला . रेव्हेन्यू ४२% ने वाढून Rs ८१२ कोटी झाला. ऑनलाईन रेव्हेन्यू ४६% ने वाढून Rs ५९७ कोटी झाले.

वेदांत फायद्यातून तोट्यात गेली. Rs २६९० कोटींचे प्रॉफिट YOY Rs ९१५ कोटी तोटा झाला. रेव्हेन्यू YOY ६.४% ने वाढून Rs ३६२३७ कोटींवरून Rs ३८५४६ कोटी झाला. मार्जिन २०.१% वरून २८.७% झाले. जे अपवादात्मक खर्च सोडला तर कंपनीला Rs ४४०३ कोटी फायदा झाला.

AFFLE इंडिया चे रेव्हेन्यू YOY Rs ३५५ कोटींवरून Rs ४३१ कोटी झाले. नेट प्रॉफिट
Rs ५९ कोटींवरून Rs ६७ कोटी झाले.

DELHIVERY चा लॉस Rs २२१ कोटींवरून Rs ७० कोटी झाले. रेव्हेन्यू Rs १६५३ कोटींवरून Rs १७७१ कोटी झाला.

JK सिमेंटचा रेव्हेन्यू Rs २२२८ कोटींवरून Rs २७५३ कोटी झाला.

नेट प्रॉफिट Rs १११ कोटींवरून Rs १७८ कोटी झाले.
HBL पॉवरचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

गोदरेज ऍग्रोव्हेट चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

इंडिगो पेंट्स चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.

थरमॅक्स चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

IKIO चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

IFGL रिफ्रॅक्टरीज चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

गोदावरी पॉवर चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.

स्नोमॅन लॉजिस्टिक्स चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
KPR मिल्सचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

VA टेकचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.

बाटाने ऑथेंटिक ब्रॅण्ड्स ग्रुपबरोबर त्यांच्या ‘NINE WEST’ ब्रॅण्ड्स अंतर्गत उत्पादन आणि मार्केटिंग साठी करार केला.

बोडल केमिकल्स चे प्रॉफिट फ्लॅट उत्पन्न कमी झाले.

PSP प्रोजेक्टला गुजरातमध्ये नर्मदा वॉटर रिसोर्सेस प्रोजेक्ट साठी Rs ३५७ कोटींची ऑर्डर मिळाली.

BARBEQ नेशन फायद्यातून तोट्यात गेली. कंपनीला १२.३ कोटी तोटा झाला उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले.
भारत फोर्ज प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

बिर्ला कॉर्प UP मधील प्रयागराज मध्ये १४ लाख टन क्षमतेचे ग्राइंडिंग युनिट मध्ये गुंतवणूक करणार आहे.

ऑन मोबाईल ग्लोबल चे QOQ प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.

झायड्स वेल्फेअर प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

भारत फोर्ज प्रॉफिट वाढले मार्जिन वाढले.

मॅक्स हेल्थ चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले Rs ९० कोटींचा टॅक्स खर्च झाला पण Rs १९२ कोटींचे टॅक्स क्रेडिट मिळाले.

बिकाजी चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
ज्युबिलण्ट इंडस्ट्रीचे प्रॉफिट कमी झाले उत्पादन कमी झाले मार्जिन वाढले.

SPARC चा तोटा वाढला उत्पन्न कमी झाले.
मान इंडस्ट्रीजला पाईप्स सप्लाय करण्यासाठी Rs ३८० कोटींची ऑर्डर मिळाली.

L & T ला आंध्र प्रदेशमध्ये विमानतळ उभारण्यासाठी Rs २५०० कोटी ते Rs ५००० कोटींदरम्यान ऑर्डर मिळाली.

बजाज इलेक्ट्रिकल्सचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले. झोमॅटोच्या शेअरमध्ये ९९ लाख शेअर्सचा सौदा झाला.

CELO वर्ल्ड चे BSE वर Rs ८३१ वर तर NSE वर Rs ८२९ वर लिस्टिंग झाले. हे शेअर्स Rs ६४८ला IPO मध्ये दिले होते. ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.

झायड्स वेल्फेअर चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

फिचने भारताचे मेडीयम टर्म GDP चे अनुमान ०.७% ने वाढवून ६.२% केले.

डिव्हीज लॅबचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

सतलज टेक्सटाईल्स फायद्यातून तोट्यात गेली.

आज एनर्जी, फार्मा, रिअल्टी, इन्फ्रा, मेटल्स, PSE, PSU बँकांच्या शेअर्समध्ये आणि केमिकल, सिमेंट क्षेत्रातील शेअर्स मध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६४९५८ NSE निर्देशांक निफ्टी १९४११ आणि बँक निफ्टी ४३६१९ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.