आज क्रूड US $ ८४.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.६० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.६१ आणि VIX ११.१९ होते.
USA चे सरकार US $ ११२ बिलियन्सचे बॉण्ड्स विकत आहे.
आज FII ने Rs ५४९.३७ कोटींची विक्री आणि DII ने Rs ५९५.७० कोटींची खरेदी केली.
GNFC आज बॅनमध्ये होते.
HONASA कंझ्युमर्सचे आज BSE वर Rs ३३० आणि NSE वर Rs ३२४ वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये हा शेअर Rs ३२४ ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना लिस्टिंग गेन्स झाले नाहीत.
बजाज फायनान्स QIP रुट ने Rs ८८०० कोटी Rs ७५३३.८० प्रती शेअर या फ्लोअर प्राईसने उभारणार आहे. या प्राईसवर ५% डिस्काउंट देण्याची शक्यता आहे.
न्यायका चे प्रॉफिट YOY ४२.३% ने वाढून ५.८५ कोटी तर रेव्हेन्यू YOY २२.४% ने वाढून Rs १५०७ कोटी झाले.
HPCL चे प्रॉफिट YOY १७.५% ने वाढून ५११८.२० कोटी तर रेव्हेन्यू YOY १४.५% ने कमी होऊन Rs ९५७०१ कोटी झाले. मार्जिन कमी झाले.
GSPL चे प्रॉफिट QOQ ३६% ने वाढून Rs ५९०.४० कोटी तर रेव्हेन्यू QOQ ३.८% ने वाढून Rs ४२६५.२० कोटी झाले.
ग्लॅन्ड फार्माचे प्रॉफिट २०% ने कमी होऊन Rs १९४.१० कोटी तर रेव्हेन्यू ३२% ने वाढून Rs १३७३ .४० कोटी झाले.
देवयानी इंटरनॅशनल चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
झायड्स लाईफचे प्रॉफिट Rs ८०२ कोटी, उत्पन्न Rs ४३६९ कोटी तर मार्जिन २६.२% राहिले.
DB रिअल्टीचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले. कंपनीचे Rs ९३ कोटी वन टाइम इन्कम झाले. अन्य उत्पन्न Rs ८२२ कोटी झाले.
ऍडव्हान्स एंझाइम चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
ALKYL अमाईन्स चे प्रॉफिट कमी झाले
इन्फोएजचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने Rs १० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
ज्योती लॅबचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
आलोक इंडस्ट्रीज ने RIL ला Rs ३३०० कोटींचे प्रेफरन्शियल शेअर्स अलॉट केले.
मेघमनी ऑर्गनिक्स फायद्यातून तोट्यात गेली. उत्पन्न कमी झाले.
IMF ने चीनच्या ग्रोथचे अनुमान ५% वरून ५.४% केले.
आयशर मोटर्सने रॉयल एन्फिल्ड हिमालय ४५२ लाँच केली.
कॅम्लिन फाईन फायद्यातून तोट्यात गेली.
सिनेलाईनइंडिया चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले.
अरविंद फॅशन्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
अल्केम लॅबचे प्रॉफिट Rs ६२०.५० कोटी उत्पन्न Rs ३४४०.०० कोटी आणि मार्जिन २१.७% राहिले.
कोची शिपयार्डसने एका शेअरचे २ शेअर्समध्ये विभाजन केले. प्रॉफिट उत्पन्न वाढले कंपनीने Rs ८ अंतरिम लाभांश जाहीर केला.
विजया डायग्नॉस्टिक्सचे प्रॉफिट, उत्पन्न, वाढले मार्जीन वाढले.
वास्कॉन ENGGचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न फ्लॅट आणि मार्जिन कमी झाले.
SP अपरल्स चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले.
ट्रेन्टचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन १५.९% झाले.
एव्हरेड़ी चे प्रॉफिट वाढले,उत्पन्न कमी झाले.
VST टिलर्स & ट्रॅक्टर्सचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
NEULAND लॅबचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
TVS मोटर्सने TVS किंग DURAMAX PLUS ही थ्री व्हीलर Rs २.३५ लाख किमतीला लाँच केली.
धानुका एग्रीटेक चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
कोपरान चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
आलेम्बिक फार्माचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
GHCL चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
इंडिया पेस्टीसाईड्सचे प्रॉफिट आणि रेव्हेन्यू कमी झाले.
इमामीचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. अड्वर्टाइजमेण्ट खर्च १०४.४० कोटी झाला. इतर उत्पन्न कमी होऊन Rs ११ कोटी झाले. व्हॉल्युम ग्रोथ २% झाली.
किंगमेकर डेव्हलपर्स बरोबर DB रिअल्टीने शेअर पर्चेस अग्रीमेंट केले.
सिंगापूर एअरलाईन्सने कस्टमर सपोर्टसाठी टाटा कम्युनिकेशन बरोबर पार्टनरशिप करार केला.
अनुपम रसायनाचे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
अतुल लिमिटेड Rs ५० कोटींपर्यंत Rs ७५०० प्रती शेअर या भावाने आणि मार्केट रूटने शेअर बायबॅक करेल.
L & T ला त्यांच्या WET ( वॉटर आणि इफ्ल्युएंट ट्रीटमेंट) बिझिनेससाठी Rs १००० कोटी ते Rs २५०० कोटी दरम्यान कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
वेंकीज ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. Rs २१ कोटींच्या लॉस चे रूपांतर YOY Rs ३४ कोटी प्रॉफीटमध्ये झाले. उत्पन्न कमी झाले मार्जिन ५.४४% राहिले.
सरकारने डाळींचे स्टॉक लिमिट ५० टनांवरून २०० टन केले.
IRCTCचे प्रॉफिट YOY ३०% ने वाढून Rs २२६ कोटींवरून Rs २९५ कोटी झाले. रेव्हेन्यू YOY२३% ने वाढून Rs ८०६ कोटींवरून Rs ९९५ कोटी झाला. मार्जिन ३६.८% राहिले.कंपनीने Rs २.५० प्रती शेअर इंटरीं लाभांश जाहीर केला. नोव्हेंबर १७ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
श्री सिमेंटचे प्रॉफिट दुपटीपेक्षा वाढून Rs ४४७ कोटी झाले. रेव्हेन्यू YOY १९% ने वाढून Rs ४८०० कोटी झाला. टोटल सेल्स व्हॉल्युम ८.२मिलियन टन्स झाला.कंपनी बालोडबाजार येथे ३.४० मिलियन टन्स क्षमतेचे ग्राइंडिंग युनिट Rs ५५० कोटींची गुंतवणूक करून उभारणार आहे.
ESAF SFB चा इशू १९ वेळा ओव्हरसब्सक्राइब झाला. रिटेल पोर्शन १२.४५ वेळा ओव्हरसब्सक्राइब झाला.
फार्मा, हेल्थकेअर, FMCG, मेटल्स, ऑइल &गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी तर ऑटो, मेडिया, रिअल्टी, कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६४९४२ NSE निर्देशांक निफ्टी १९४०६ बँक निफ्टी ४३७३७ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !