आजचं मार्केट – १० November २०२३

आज क्रूड US $ ८०.८० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.४० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.९१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.६३ आणि VIX ११.११ होते. आज सोने Rs ६०५०० च्या तर चांदी Rs ७२००० च्या आसपास होते.
US फेडचे अध्यक्ष जेरोमी पॉवेल यानी सांगितले की त्यांना महागाई २% पर्यंत कमी होईल अशी शक्यता वाटत नाही. महागाई कमी होण्यासाठी आणखी काही उपाय करावे लागतील.
FII ने Rs १७१२.३३ कोटींची विक्री तर DII ने Rs १५१२.१४ कोटींची खरेदी केली.
चंबळ फर्टी, MCX, डेल्टा कॉर्प आणि GNFC बॅनमध्ये होते.
हेल्थकेअर ग्लोबल चे प्रॉफिट YOY ८४% ने वाढून Rs १४ कोटी तर रेव्हेन्यू YOY १६% ने वाढून Rs ४८७ कोटी झाला. मार्जिन कमी होऊन १७.४% राहिले.
ESAF स्माल फायनान्स बँकेचे आज BSE वर Rs ७१.९० वर आणि NSE वर Rs ७१ वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ६० ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले असतील त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
ICICI बँकेला RBI ने काही अटींवर ICICI सिक्युरिटीज ला १००% सबसिडीअरी बनवण्यासाठी मंजुरी दिली. आता ICICI सेक्युरिटीजच्या शेअर्सचे डीलीस्टिंग होईल.
झी एंटरटेनमेंट चे प्रॉफिट YOY ९% ने वाढून Rs १२३ कोटी तर रेव्हेन्यू YOY २०.५% ने वाढून Rs २४३७.८० कोटी झाले. सब्स्क्रिप्शन आणि इतर सेवांमुळे रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झाले.
मुथूट फायनान्स चे प्रॉफिट YOY १४.३% ने वाढून Rs ९९१ कोटी तर NII YOY १८.२% ने वाढून Rs १८५८.४० कोटी झाले. जरी निकाल चांगले असले तरी मार्केटच्या अपेक्षेपेक्षा कमी होते.
ASTRA ZENECA फार्मा चे प्रॉफिट YOY ६०.८% ने वाढून Rs ५२.४ कोटी तर रेव्हेन्यू
३१.७% ने वाढून Rs ३११ कोटी झाले. कंपनीला वन टाइम गेन झाला.
GR इन्फ्रा TARAKOTE आणि सन्जीछाट दरम्यान रोपवे बनवण्यासाठी RITES ने मागवलेल्या टेंडरमध्ये L -१ बिल्डर ठरली. हे टेंडर या रोपवेचे डिझाईन, ENGG, डेव्हलपमेंट, फायनान्स, कन्स्ट्रक्शन ऑपरेशन आणि मेंटेनन्स साठी आहे. हे टेंडर श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डासाठी RITES ने मागवले होते. हे प्रोजेक्ट Rs २०० कोटींचे असून BOOT बेसिसवर दिले जाईल.
ऑरोबिंदो फार्माचे प्रॉफिट YOY ८५% ने वाढून Rs ७५७.२० कोटी तर रेव्हेन्यू YOY २५.८% ने वाढून Rs ७२१९.४० कोटी झाले. USA फॉर्म्युलेशन ३५.७% ने युरोप फॉर्म्युलेशन १६.७% ने आणि मार्केट रेव्हेन्यू २४.७% ने वाढले.
ASK ऑटोमोटिव्ह चा IPO एकूण ५१.०२ वेळा तर रिटेल पोर्शन ५.७ वेळा भरला.
AB फॅशन ला Rs २००.३४ कोटी तोटा झाला. रेव्हेन्यू Rs ३२२६.४४ कोटी झाला. कंपनीने TCNS क्लोदिंगचे अक्विझिशन पूर्ण केले.
टोरंट पॉवरचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
BEL,BEML, सुला वाईंयार्ड्स( प्रॉफिट, उत्पन्न मार्जिन वाढले,वाईन टुरिझम ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.Rs ७००+ प्रीमियम ब्रॅंड्समध्ये मार्केट लीडर आहे) यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
कॅम्पस ऍक्टिव्हवेअर चे निकाल खराब आले. प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
फोर्स मोटर्सचे प्रॉफिट Rs ९४ कोटी, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. आज फोर्स मोटर्सचा शेअर अपर सर्किटला होता.
HAL ने ‘SAS’ बरोबर मल्टिपर्पज हेलिकॉप्टर चे डिझाईन डेव्हलपमेंट साठी करार केला.
इंडिया सिमेंटच्या प्रमोटर्सनी ५२.५ लाख शेअर्स (१.७% इक्विटी ) तारण म्हणून ठेवले.
कारट्रेडचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
GVK पॉवर आणि इन्फ्रा चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले .
वेलस्पन कॉर्पला सौदी आरामको कडून लार्ज DIAMETER स्टील पाईप्ससाठी Rs १००० कोटींची ऑर्डर मिळाली.
ED ने पवन मुंजाल यांच्या Rs ५० कोटींच्या ३ मालमत्ता जप्त केल्या.
नेक्टर लाईफ सायन्सेस तोट्यातून फायद्यात आली. २२ कोटी तोट्यातून Rs १.०१ कोटी फायदा झाला. उत्पन्न वाढले.
M & M चे प्रॉफिट वाढून Rs ३४५२ कोटी ( Rs २०६८ कोटी ), उत्पन्न वाढून Rs २५७७३ कोटी ( Rs २२४०५ कोटी), मार्जिन १७% राहिले.
मावाना शुगर चा तोटा कमी होऊन Rs ११ कोटी झाला. उत्पन्न वाढून Rs ३८१ कोटी झाले.
एडेलवाईस चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
हिंडाल्कोचे स्टॅण्डअलोन प्रॉफिट ५४.६% ने वाढून Rs ८४७ कोटी झाले. रेव्हेन्यू १२.५ वाढून Rs २०६७६ कोटी झाला.
शाम मेटॅलिक्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले.
IPCA लॅबचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
HAL चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
बेक्टर्स फूड्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
बायोकॉनचे प्रॉफिट Rs १७२७ कोटी उत्पन्न Rs ३४६२ कोटी तर मार्जिन २१.४% होते.
कोल इंडिया चे प्रॉफिट Rs ६८१३.५० कोटी उत्पन्न Rs ३२७७६ कोटी तर मार्जिन २४.८% होते.हे सर्व अनुमानापेक्षा जास्त आहे.
झायड्स लाईफने ‘VORXAR’ ब्रँड अंतर्गत टॉरंट फार्माबरोंबर SAROGLITAZAR MG या लिव्हर च्या त्रासावरील औषधाच्या कोमार्केटिंगसाठी लायसेन्सिंग अग्रीमेंट केले.
हुडकोचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
SAIL चे प्रॉफिट Rs १३०५ कोटी,उत्पन्न २९७१२ कोटी आणि मार्जिन १३% राहिले.
स्टार सिमेंट, सुब्रोस, ACE कन्स्ट्रक्शन यांचे निकाल समाधानकारक होते.
कोल इंडियाचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अनुमानापेक्षा चांगले होते. कोल इंडियाचे प्रॉफिट Rs ६८१३.५० कोटी उत्पन्न Rs ३२७७६ कोटी आणि मार्जिन २४.८% राहिले.
इनकम टॅक्स अपीलेट ट्रिब्युनलचे HDFC लाईफ च्या बाजूने Rs ३३२० कोटींच्या संबंधात कंपनीच्या बाजूने निर्णय दिला. ही केस २०१७ -२०१९ दरम्यानची आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६४९०४ NSE निर्देशांक निफ्टी १९४२६ बँक निफ्टी ४३८२० वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.